आपण पालक असाल तर नक्की वाचा..

 पालक झाल्यावर खालील ज्ञानात भर पडते..

1. Tom and jerry व्यतिरिक्त pepa pig, wolfoo, pupu, Vlad and Nikki, masha and the bear अशीही कार्टून्स अस्तित्वात असतात.

2. कॅडबरी हे सर्वोच्च सुख नसून त्यात अनेक पोटजातीही असतात. 

3. सहा फुटाच्या माणसापेक्षा 2 फुटाचे कपडे महाग असतात.

4. खेळणीतील गाड्या खेळण्यापेक्षा त्याचे पार्टस वेगळे करणं हा मनोरंजक खेळ असतो.

5. घरातील व्यक्ती फक्त चॉकलेट आणण्यासाठी बाहेर जाऊ शकते.

6. SSC, CBSE सोडून इतर अनेक बोर्ड असतात. 

7. मोबाईल मध्ये रोज नवनवीन गेम्सचे सरप्राईज मिळू शकते. 

8. डायपर ही अत्यावश्यक सेवा असते. 

9. घराच्या भिंतींना वेगवेगळ्या रंगांने, खडूने, पेनने माळा घालायच्या असतात. 

10. एखाद्याच्या मोबाईल स्क्रीनला तडे दिसले, तर समजावे की तो 2 ते 5 वयोगटातील मुलाचा पालक असतो. 

11. मोबाईल बघत असताना व्यत्यय आला की लाल बटण पटकन दाबायचं असतं.

तुमच्या ज्ञानात अजून काय काय भर पडली आहे?

Leave a Comment