राज्यातील प्रसिद्ध उद्योगपती मिस्टर सावंत यांच्या घरी एक मोठी बिझनेस पार्टी आयोजित केली होती…विविध ठिकाणाहून उच्चभ्रू कुटुंबातील व्यक्ती आलेले होते..मोठा हॉल, जेवायला 50हुन अधिक प्रकार, बियर चे स्टॉल्स… सगळं अगदी महागडं होतं…एका ठिकाणी आलेल्या व्यक्तींची मुलं टॅब वर गेम्स खेळत होती तर दुसरीकडे सावंतांचा 12 वर्षांचा मुलगा दिनेश जेवण बनवणाऱ्या कुक च्या घोळक्यात घुटमळत होता…
पार्टीतील काही जळाऊ लोकं नावं ठेवत होते,
“मिस्टर सावंतांचा मुलगा, हा असा तिकडे काय करतोय??”
“नमस्कार, हो आमचा मुलगा दिनेश…त्याला कुकिंग ची फार आवड आहे…शेफ व्हायचं स्वप्न आहे त्याचं..”
“Omg… एवढा मोठा बिझनेस सांभाळायचा सोडून शेफ बनणार??”
“हो…त्याला ज्यात आवड आहे तो ते करेल, आम्ही त्याला नाही रोखणार…”
या प्रसंगावर बरीच कुजबुज सुरू होती…अखेर पार्टी संपली अन सर्वजण आपापल्या घरी गेले…
दिनेश…मिसेस आणि मिस्टर सावंतांचा एकुलता एक मुलगा…लहानपणापासून किचन मध्ये सावित्री मावशी सोबत राहायला त्याला फार आवडे…सावित्री मावशी त्याला जेवण बनवता बनवता छान गोष्टी सांगे…गाणी म्हणून दाखवे…त्याला सावित्री मावशी फार आवडायची, आणि तिच्या हातचं सोडून कुणाच्याच हातचं तो जेवत नसे…
सावित्री, सावंतांच्या घरी फार पूर्वीपासून ती स्वयंपाकीण म्हणून कामाला होती…खास करून दिनेश साठी तिला त्यांनी तिला कुठेही जाऊ दिलं नाही…बंगल्यातच एक खोली दिली आणि सगळ्या सुविधा दिल्या…
दिनेश ला सावित्री मावशी सोबत राहून राहून स्वयंपाकात रस वाटू लागला..लहानपणीच तो नवनवीन प्रकार बनवून घरी सर्वांना खाऊ घालत असे…हळूहळू तो त्यात प्राविण्य मिळवत गेला…अखेर त्याने शेफ चा कोर्स करायचा ठरवला… अमेरिकेतील एका प्रसिद्ध कॉलेज मध्ये तो शिकायला गेला..
तो गेल्यावर सावित्री मावशीला सतत हुरहूर वाटत असे, मग सावंत जोडपं तिला धीर देऊन तो लवकरच परत येईल असं आश्वासन देत असत..
3 वर्षांनी दिनेश परत येणार होता…त्याच्या आई वडिलांना आणि सावित्री मावशीला तो केव्हा येईल अन केव्हा नाही असं झालं…
अखेर तो आला….सावित्री मावशी ने डोळ्यात पाणी आणून त्याला पाहिलं…पण दिनेश बदलला होता…आधी सारखा राहिला नव्हता…तो दमला असेल म्हणून नीट बोलला नाही असा सावित्री मावशीने स्वतःलाच धीर दिला…
इकडे आल्यावर दिनेशने मला मोठं हॉटेल टाकायचं आहे असा निर्णय जाहीर केला…त्या हॉटेल मध्ये सर्व सुविधा, सर्व देशातील सर्व प्रकारचं अन्न, पॉश रूम्स, राहायची सोय अशी एक मोठी इमारत बांधायची ठरली…सावंतांकडे हे सगळं करून द्यायला अमाप पैसा होता… त्यांनी फोन फिरवला आणि तातडीने आर्किटेक्ट ला बोलावून घेतलं..
“दिनेश बाळा, तुझ्या हॉटेल मध्ये सर्वांवर लक्ष ठेवायचं काम सावित्री मावशीलाच दे बरं का…तिच्या मुळेच तर इतकं शिकलाय तू..”
“Oh come on mom… माझं हॉटेल हे फाईव्ह स्टार हॉटेल आहे…तिथे अशी गावठी मंडळी शोभून दिसणार नाही..”
दिनेश ला अमेरिकेतील हायफाय संस्कृती ची भुरळ पडली होती, जिव्हाळा, आदर, प्रेम या गोष्टी तो विसरला होता..फक्त आपला फायदा करून घेण्यासाठी माणसं असतात असा attitude घेऊन तो आलेला…
“गावठी कोणाला म्हणतोस?” सावंत चिडले
“सॉरी बट… fact is fact..”
“Fact??? तुला माहितीये का fact काय आहे ते??”
“प्लिज शांत व्हा..काही बोलू नका..” मिसेस सावंत म्हणाल्या…
“आज बोलू दे मला, याला सत्य सांगितलं नाही तर स्वतःच्या जन्मदात्या आईला तो घराबाहेर काढेल..”
“मी का असं करेन डॅड?? You are overreacting….”
“ऐक मग, ज्या सावित्री मावशीला तू गावठी म्हणतोस ना, ती तुझी सख्खी आई आहे…”
“काय??” दिनेश ताडकन उठून उभा राहिला…
“होय, झोपडपट्टीत राहत असलेल्या सावित्री वर तिथल्याच एका व्यक्तीने अतिप्रसंग केला…ती जीव द्यायला ब्रिज वर गेली असता आमची गाडी तिला आडवी आली..आम्ही तिला रोखलं आणि घरी आणलं…ती इथेच काम करू लागली…एक दिवस आम्ही डॉक्टर कडे गेलेलो…आम्हाला मूल हवं होतं…पण असं समजलं की आम्ही कधीच आई वडील होऊ शकत नाही…घरी आलो अन सावित्री ला उलट्या सुरू झाल्या…चेक केल्यावर समजलं तिला दिवस गेलेत…आम्ही तो दैवाचा संकेत समजलो आणि हे मूल आमच्या पदरी घेण्याचं ठरवलं…पण आई ती आईच, माझ्या मुला पासून मला दूर करू नका, हवं तर मी घरातलं सगळं काम करीन असं म्हणत तिने तुझी साथ कधीच सोडली नाही..आम्ही तुला आमचा मुलगा म्हणून वाढवलं… तुला काहीही कमी केलं नाही…तू शिकलास, मोठा झालास, पण तुझ्यासाठी ती घरात फक्त मोलकरीण बनून राहिली”
“डॅड..हे खरं आहे??? ” दिनेश धक्क्यातून सावरायचा प्रयत्न करतो..
“हो बाळ…ती आई आहे तुझी..आणि हो, ती उत्तम स्वयंपाक करते…तिचाच गुण आला आहे तुझ्यात…म्हणून तर मोठा शेफ झालास…तुला इतरांसारखा व्यवसायात रस नव्हता याचं कारण हेच होतं…”
दिनेश ला आपली चूक कळते..सावित्री मावशी आपल्याला किती जीव लावायची हे त्याला आठवलं…मी उपाशी तर नाही ना याची सतत काळजी घेई…अभ्यास करताना माझ्याकडे कौतुकाने पहायची, निकाल लागल्यावर स्वतः जाऊन पेढे आणायची….आईची माया मला का समजली नाही….याचाच विचार तो करतो..
दिनेश डोळे पुसतो आणि किचन मध्ये जाऊन सावित्रीला बघतो… ती आनंदाने त्याच्यासाठी गोड धोड बनवत असते…
“आई…” दिनेश हाक देतो तसे तिचे हात थांबतात…मागे वळून दिनेश कडे बघते…
खूप छान
Khup mast lekh aahe👌
अप्रतिम लेखन केले
अप्रतिम कथा 👌👌
Masta
छान