दिशाची रोजच धांदल उडत असे. लग्न करून आली अन समोर नोकरी अन घर सांभाळणं दोन्ही जबाबदाऱ्या तिने हसत हसत अंगावर घेतल्या. सासूबाईंनी सून आली म्हणून एकेका जबाबदारी मधून अंग काढून घेतलं. आणि आता त्याची इतकी सवय झालेली की एखादं काम करायची वेळ आली ली त्यांना प्रचंड जीवावर यायचं.
“माझ्याकडून आता कामच होत नाही बाई..”
हे त्यांचं वाक्य सतत कानी यायचं. दिशाला ते पटायचं. कारण इतकी वर्षे घरासाठी, घरातल्या माणसांसाठी सगळं करून एका पॉईंटला थकवा येणं साहजिकच आहे. वय वाढतं तशी दुखणीही मागे लागतात. माणसं रिटायर होतात पण बाईची रिटायरमेंट सून आल्यावरच.त्यामुळे तिने कधीही याबाबत तक्रार केली नाही, उलट सासूबाईंना जास्तीत जास्त आराम कसा मिळेल याकडे ती लक्ष देई.
दिशा घरातलं काम करून ऑफीसला जाण्याचं काम अगदी चोख करे. तक्रारीला कधीही जागा दिली नाही. घरातल्या छोट्या मोठ्या कामाला बाई लावून वेळेत ती काम पूर्ण करे. सकाळी लवकर उठून स्वयंपाक तयार करे, किचन ओटा पुसून भांडी बाजूला काढून ठेवे. मग स्वतःचं आवरून ऑफिसला जाई. बाई आली की ती भांडी, झाडू, फरशी करून निघून जाई. सासूबाईंना फक्त कपडे मशीन मध्ये लावायचं काम असायचं, वाळत घालायचं कामही ती कामवालीच करून जाई. त्यामुळे सासूबाईंना भरपूर आराम असायचा. पण मधेच एखादा पाहुणा आला तर त्याला चहा पाणी करणं सुद्धा आता कठीण होऊन बसलं.. का? कारण “आता कामच होत नाही बाई माझ्याकडून..”
अश्यातच त्यांची लाडकी लेक माहेरी आली. सासूबाई खुश, वर्षभराने लेक आलेली, तिचे कोडकौतुक पुरवायला दिशाला सर्व सूचना देऊन झाल्या. दिशाही आनंदी होती, नणंदबाई म्हणजे हक्काची मैत्रिणच. माहेर काय असतं हे दिशाला माहीत होतं, त्यामुळे माहेरपण अनुभवताना दुसऱ्याला माहेरपण देण्याचं कामही तिला उत्तम जमत असे.
पहिला दिवस मजेत गेला, दिशाने ऑफिसला जायच्या आधी गोड पदार्थ जास्तीचे करून ठेवले. पदार्थ चाखून बघताना तिला मात्र काही चव लागेना, तिने कामवाली ला विचारलं..
“ताई छान झालीये खीर..गोड पण प्रमाणात आहे. “
“मला कशी लागत नाहीये चव? असो..”
लेक आल्यावर मनसोक्त जेवली. माय लेकीच्या गप्पा झाल्या. संध्याकाळी दिशा घरी आल्यावर नणंद-भावजय मध्ये छान गप्पा झाल्या, दिशाने नणंदबाईंना आवडणारे ड्रेस, दागिने, बांगड्या सगळं भेट दिलं.
दुसऱ्या दिवशी दिशा जरा टेन्शन मधेच घरी आली, आल्या आल्या अंघोळ केली अन हातावर हात ठेवून इकडे तिकडे सैरभैर बघू लागली.
“वहिनी काय झालं? ऑफिसमध्ये काही झालंय का? तुला बरं नाही का? बघू??”
“ताई थांबा..माझ्या जवळ येऊ नका..माझ्या ऑफिसमध्ये माझीच सहकारी covid positive निघालीये. मीही टेस्ट करून आले. खरं तर मला चव लागत नाहीये कसली, टेस्ट चा रिझल्ट येईपर्यंत मला quarantine राहावं लागेल..”
हे ऐकताच सासूबाई आणि नणंदबाई घाबरल्या. सासूबाईंनी लेकीला मागे ओढलं.
“आजकाल काय काय ऐकू येतंय, दिशा तू खोलीतच थांब आता, बाहेर येऊ नको..आम्ही सर्व देतो तुला खोलीबाहेर..”
दिशा खोलीत गेली. नवऱ्यालाही दुसऱ्या खोलीत काढून दिलं. रिपोर्ट येईपर्यंत धाकधूक होतीच.
इकडे मात्र सासूबाईंना लेकीचे लाड करायचे होते. त्यांनी पदर खोचला. डाळ शिजत टाकली, गूळ किसला अन घेतले मांडे करायला..
“आई अगं तू कशाला करतेस? मी करेन ना..तुझ्याकडून होणार नाही आता..”
“होईल गं, म्हातारी झालीये का मी? बघ कशी पटापट करते..”
सासूबाईंनी चांगले चार तास स्वयंपाक केला. मांडे काय, आमरस काय, सार काय, कुरडया भजे काय..अगदी मनसोक्त जेवण बनवलं गेलं. दिशाला जेव्हा खोलीबाहेर ताट दिलं गेलं तेव्हा ती चकितच झाली.
“अहो आई ताईंना कशाला इतकं करायला लावलं?”
“तिला कशाला करू देईन मी? मीच केलंय सर्व..”
दिशाला धक्काच बसला, एरवी चहा ठेवायची वेळ आली तरी आढेवेढे घेत उठणाऱ्या सासूबाई आज मात्र पंचविशीतल्या तरुणी सारखं काम करत होत्या.
जेवण झालं अन सासूबाईंनी सगळं आवरून ठेवलं. कामवाल्या बाई ला खबर लागली, तिने सुट्टी घेतली.
“आई आता मी आवरून ठेवते सगळं..”
“असुदेत गं.. मी करेन..”
सासुबाईंनी सगळी भांडी धुतली, किचन ओटा पुसला आणि एवढं करून लेकीला म्हणतात..
“तुला सरबत करू का?”
“मला नको, वहिनीला दे..”
“माझं जरा अंग जड वाटतंय..आता आराम करून घेते..”
“लेक हसली, स्वतःहून सरबत वहिनीला देऊन आली..”
नंतरचे बरेच दिवस सासूबाईंनी अंगात वीज संचारल्या सारखी कामं केली…
“आई..वहिनी असताना करतेस का गं हे सगळं?”
“नाही गं, माझ्याकडून होत नाही आता..”
“लेकीसाठी होतं.. मग सुनेसाठी का नाही? आई तीही नोकरी करते, घर सांभाळते.. माझ्याबद्दल तुला प्रेम आहे म्हणून तू एवढं सगळं केलंस, मग तिच्यासाठी थोडंफार करायला काय हरकत आहे?”
“बरोबर आहे गं, करायला पाहिजे थोडंफार. होतच नाही गं कामं..”
आपली आई शेवटी एक सासुही आहेच..लेक फक्त हसली..
____
कामं होतात वा होत नाही हा वेगळा प्रश्न, पण कामं कुणासाठी करायची यावरून मोठा फरक पडतो..फरक फक्त एका दृष्टिकोनाचा असतो. काय वाटतं? 😁😁😁
कमेंट मध्ये नक्की सांगा
Right…. Mulisathi kam kartana hat Pay nay dukht ki kantala yet nahi.. Pn sune la madat karayla purn angch dukht ast. Anubhvache bol Ho baki kahi nahi 😂😂😉
Agdi barrobar….
Aamchyakade ulat, sunesathi jiv ovalun taken aai😃
Yes it's only about diff between daughter & in-law.
Very true.. Eye opener story
Ho aaplya mulisathi kartat. Navalach mhnayche sun nahi mulgi netoy .pn lagech aamhala ata hot nahi, sun kashasathi aanli he uttar milate
100 &1% right
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.