आईला शहाणपण शिकवू नये-3

 “पप्पा अहो आईने नाही सांगितलं, मला कफ होतो त्याने”

“तुझी मम्मी डॉकटर आहे की पप्पा? काही नाही होत थोडसं खाल्ल्याने, खा..”

दुसऱ्या दिवशी घरात दूध बरंच उरलेलं, काय करायचं म्हणून सर्वांनी ग्लास ग्लास प्यायला घेतलं, दिवेशला त्याच्या वडिलांनी आणून दिलं..

“घे..पी…दुधाने शक्ती येते, दोन दिवसांनी तुला स्पर्धेला जायचं आहे ना, घे..”

दिवेशने नको नको करत शेवटी घेतलंच..

रात्री दिवेश tv वर पिक्चर बघत बसला, वडिलांनी विचारलं,

“कोणता मुव्ही आहे?”

“स्पोर्ट्स मुव्ही आहे पप्पा”

“अरेवा..बघ बघ, आई तर पाहू देत नाही तुला…

पण बघून झालं की खोलीत ये झोपायला…मी झोपतो आता..”

दिवेश उशिरापर्यंत पिक्चर बघतो आणि बेडवर पडल्या पडल्या half पॅन्ट मध्ये झोपून घेतो,

आई असली की फुल पॅन्ट घालून आणि ब्लॅंकेट नीट पांघरून मगच झोपवायची,

पण आता कसलं कसलं बंधन नव्हतं,

शेजारी वडील घोरत होते, इकडे दिवेश अंगावर काही न घेताच झोपून गेला..

तिकडे आईने वडिलांची नीट काळजी घेतली, तिचा भाऊ घरी येताच तिने तिथून निघण्याचा निर्णय घेतला..

“अरे दादा उद्या दिवेश पहाटे पहाटे जाणार आहे स्पर्धेला.. जमलं तर दुपारच्या वेळी मीही जाईन म्हणते match पाहायला, म्हणून यावेळी जरा घाई करते..”

माहेराहून परवानगी घेऊन ती सासरी आली,

सकाळी 9 ला पोचली,

“दिवेश पहाटे पहाटे गेला असणार match साठी, काही खाल्लं की नाही त्याने देव जाणे”

या विचारातच ती घरात पाय ठेवते आणि बघते तर काय,

“दिवेश डोक्यात टोपी घालून, अंगावर स्वेटर घालून तापाने फणफणला होता, खोकलत होता आणि शेजारी सासू आणि नवरा बसले होते..”

सासू अन नवरा, दोघेही नजर चोरत होते,

तिला काय सांगायचं या विचाराने जरासे घाबरले होते,

तिचा संताप झाला,

कशामुळे हे झालं असेल याची कल्पना तिला आली,

तिनेही चांगलंच सुनावलं दोघांना..

दोघांनाही ऐकून घेणं भाग होतं..

“माझं ऐकलं असतं तर आज लेकरू स्पर्धेत जाऊन जिंकून आलं असतं..”

ती राग राग करत होती,

सासुबाई नजर चोरत निघून गेल्या,

आई आपल्याला एकटं पाडून निघून गेली म्हणून नवरा अजूनच घाबरला..

तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली,

“आला मोठा डॉक्टर”

****

तात्पर्य

आपल्या बाळाचा इतिहास, भूगोल, विज्ञान हे सगळं आईपेक्षा जास्त कुणालाच ठाऊक नसतं, त्यामुळे मुलांच्या बाबतीत आईला चुकूनही शहाणपण शिकवू नये. 

Leave a Comment