अशी ओळखा अन्नपदार्थातील भेसळ


पूर्वीच्या काळची लोकं इतके वर्षे कशी जगायची? वय झालं तरीही शरीर तितकंच कडक कसं असायचं? या सगळ्याची उत्तरं देताना ते नेहमी सांगतात, की आम्ही शुद्ध हवेत वाढलो, ताज्या भाज्या, फळं खाल्ली…कसलीही भेसळ नसलेले पदार्थ खाल्ले… त्यामुळे आम्ही तंदुरुस्त आहोत.

आज बहुतांश आजार हे भेसळयुक्त पदार्थातील विषारी घटकद्रव्ये यामुळे वाढत आहेत. वाढती स्पर्धा लक्षात घेता त्यात टिकून राहण्यासाठी आणि आपला जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी कंपन्या अगदी ग्राहकाच्या आयुष्याची खेळायला तयार असतात. पण आपण मात्र सतर्क राहायला हवे, कुठल्याही पदार्थात भेसळ आहे की नाही हे आपल्या खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने ओळखता येईल.

तूप:

आजकाल शुद्ध तूप मिळणे महाकठीण. त्यात घरी तूप बनवायला काही लोकांकडे वेळही नसतो. पण बाहेरच्या तुपात खोबरेल तेल किंवा वनस्पती तेल याची भेसळ असू शकते. तुपातील भेसळ कशी ओळखावी?
1. तूप वितळवून एका काचेच्या भांड्यात भरून फ्रीज मध्ये ठेवावे, जर त्यात खोबरेल तेल मिक्स असेल तर तूप आणि तेल यांचे वेगवेगळे थर दिसून येतील.
2. एका पारदर्शी भांड्यात तूप टाकावे आणि त्यात थोडी साखर भुरभुरावी. भांडे बंद करून जोरजोराने हलवावे, जर तळाशी लाल रंग दिसत असेल तर त्यात वनस्पती तेल आहे.

गूळ:

आजकाल ऑरगॅनिक गुळाची डिमांड आहे, पण त्यावरही कितपत भरवसा ठेवावा हाही प्रश्नच आहे. गुळामध्ये कृत्रिम रंग अथवा सल्फर पावडर ची भेसळ असू शकते, ती कशी ओळखावी??
1. एका पारदर्शक भांड्यात पाणी घेऊन त्यात गुळाचा खडा टाकावा. तळाशी जर काही पावडर जमा झालेली दिसली तर त्यात सल्फर ची भेसळ आहे.
2. गुळाचा रंग हा गडद असावा, जर त्यावर पिवळा रंग जास्त दिसत असेल तर त्यात नक्कीच काही केमिकल चा वापर जास्त केलेला आहे.

मध

आजकाल शुद्ध मध मिळणं महाकठीण. काहीजण सर्रास गुळाचा पाक मध म्हणून विकतात. शुद्ध मध ओळखायची पद्धत:
1. एक वाटी पाण्यात अर्धा चमचा मध टाका, जर मध पाण्यात विरघळले गेले तर मधात भेसळ आहे.

साखर

साखर आपल्या दैनंदिन जीवनात लागणारी महत्वाची गोष्ट. जर त्यातच भेसळ असेल तर आपण आपल्या आरोग्याशी खेळतोय असंच म्हणावं लागेल. साखरेतील भेसळ ओळखण्याची पद्धत.

1. एक ग्लास पाण्यात 10 ग्राम साखर मिक्स करा, जर पाण्याचा रंग पांढरा होऊन तळाशी पावडर दिसत असेल तर साखरेत भेसळ आहे.

हळद

हळद आजकाल रेडिमेड घेतली जाते, त्यातली भेसळ ओळखण्याची पद्धत.

1. कोमट पाण्यात हळद टाका, मिक्स न करता 20 मिनिटे ती तशीच ठेऊन द्या. जर 20 मिनिटांनी हळद तळाशी जाऊन वर नितळ पाणी उरत असेल तर हळद शुद्ध आहे.

चहा पावडर

चहा पावडर मधील भेसळ ओळखण्याची पद्धत:

एक ओला tissue पेपर घ्या आणि त्यावर चहा पावडर भुरभुरा..जर पेपर वर चॉकलेटी किंवा पिवळे ठिपके दिसत असतील तर चहा पावडर मध्ये कृत्रिम रंगांची भेसळ आहे.

दूध

दूध आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गोष्ट, आपण लहान मुलांनाही दुधाचं सेवन करायला लावतो, पण हेच दूध जर भेसळीचे असेल तर काय उपयोग? दुधातील भेसळ ओळखण्याची पद्धत:

1. एखाद्या उभ्या गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाकावा…जर तो हळूहळू आणि पांढरे डाग सोडत खाली घसरला तर त्या दुधात पाणी मिक्स केलेले नाही. तोच जर वेगाने खाली घसरत गेला आणि मागे कसलेही पांढरे व्रण दिसले नाहीत तर त्यात पाणी मिक्स केलेले आहे असे समजावे.

2. दुधात थोडे मीठ टाकावे, जर निळा रंग दिसला तर त्याचे स्टार्च मिक्स केलेला आहे.

हे झालं दैनंदिन पदार्थांचं, याव्यतिरिक्त भाज्या आणि फळं यातील भेसळ मी पुढच्या लेखात सांगेन, जाणून घ्यायचे असेल तर नक्की कंमेंट करा आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त शेयर करा.


Leave a Comment