अशिक्षित सून हवी (भाग 6)

शिखाला एकीकडे आनंदाची बातमी आणि दुसरीकडे दुःखद बातमी कळली होती..साहिलची नोकरी गेल्याने आता दोघांना गावतच आपल्या कुटुंबासोबत राहावं लागणार होतं..

शिखा खोलीत जाऊन स्वतःला बंदिस्त करून घेते..आता आपली इथून कधीच सुटका नाही? आयुष्यभर आपण असंच पत्रकारिता सोडून घरात बसायचं? नाही, मला शक्य नाही..

शिखा तातडीने आपली बॅग भरायला घेते..आता सर्वांना खरं सांगून इथून काढता पाय घ्यायचा असं ती ठरवते..साहिल बघत असतो, पण तिला कोणत्या आशेवर तो थांबवणार होता? जे होत आहे ते निमूटपणे बघायचं सोडून त्याच्याकडे काहीही पर्याय नव्हता…

ती बॅग भरून बाहेर येते, लहान सासूबाई तिला बघतात…साहिलच्या नोकरीचं त्यांना आधीच समजलेलं असतं आणि साधारण दोघात काय घडलं असेल याची त्यांना कल्पना आली..

शिखाने त्यांना पाहिलं, आणि आपापली चालायला लागली..

“nothing happens without a reason, the god has written an excellent opportunity behind a failure… Take it as an opportunity or run away to your safe zone, choise is yours…”

सासूबाईं मागून बोलतात अन शिखाच्या हातातली बॅग गळून पडते..चौथी नापास स्त्रिया असलेल्या घरात ही बाई इतकं अस्खलित इंग्रजी कसं बोलू शकते??

“सासूबाईं??”

“Surprised?? आश्चर्य वाटलं ना मला असं बोलताना पाहून?? चौथी नापास चा शिक्का बसलेली मी, इतकं सगळं कसं बोलून गेले?? त्याआधी मला सांग, कुठे निघालीस..”

“सासूबाईं, मला वाटतं तुम्हाला सगळं माहीत आहे, आपण प्रत्यक्षात जरी बोललो नसलो तरी तुमच्या वागण्यातुन मला ते जाणवलं..”

“बरोबर आहे..मला सगळं माहीत आहे…तुझं शिक्षण, तुझी पत्रकारिता…पण तुला अजून सर्व गोष्टी माहीत नाही..”

“कुठली??”

“चौथी नापास चा शिक्का बसलेली मी, खरं तर एक डॉक्टर आहे…MBBS केलंय मी, माझे आई बाबा दोघंही डॉक्टर..”

“इतकं सुशिक्षित कुटुंब असून या घरात?? कसं…??”

“मोठी कथा आहे…सांगेन कधीतरी..”

“तुम्ही केला असेल हा त्याग पण मला नाही जमणार..मी निघते..”

“निघालीस?? इतक्या लवकर हार मानलीस? अगं हे जे तुझ्यापुढे आव्हान आहे ना, वादळासारखं घोंगावत आहे तुझ्याभोवती….पत्रकार ना तू? परिस्थितीला भेदून काम करतेस ना? मग या आव्हानाला भेदून जाण्याचं सामर्थ्य नक्कीच तुझ्याकडे आहे..नवरा, संसार यासाठी त्याग नको करुस, पण हे जे झालं आहे ना त्याकडे एक संधी म्हणून बघ…आहे त्या वातावरणात तुझी पत्रकारिता सांभाळ…आगीच्या ज्वाळांना बाहेरून फुंकर मारण्यात काही अर्थ नाही गं , आगीच्या चक्रव्यूहात मधोमध सर्व दाह झेलत आगीचे लोळ परतवून लावणं यातच मजा आहे…”

“तुम्हाला आलीये ती मजा?? डॉक्टर असून घरातच आहात ना??”

“For your kind information…मी आजही प्रॅक्टिस करते…आणि माझी online consultancy आहे…महिना लाख रुपये मिळतात मला..”

“कसं शक्य आहे??”

“हेच.. मलाही हेच वाटायचं…कसं शक्य आहे? पण शिक्षण तेच असतं जे अशक्याला शक्य करून दाखवतं… शिक्षित असूनही असे हातपाय गाळून बसलो तर चौथी नापासचा शिक्काच काय वाईट आहे बरं??”

सासूबाई त्यांचा मोबाईल काढतात..

“हे आर्टिकल तूच लिहिलं आहेस ना?”.

” निनावी दिलंय, तुम्हाला कसं कळलं?”

“आपल्याच गावातील महिलेची कहाणी, आणि तीही तू घराबाहेर पडल्यानंतर… आणि निनावी…याचा अर्थ काय होतो??”

“होय..मीच लिहिलं आहे..”

बाहेर वातावरण एकदम ढगाळ झालेलं असतं..आभाळ एकदम भरून येतं… दिवसाढवळ्या किंचितसा अंधार पडतो…सूर्य झाकोळला जातो…इकडे सासूबाई वाणीत प्राण आणून सांगतात…

“पत्रकार म्हणजे केवळ घडलेल्या घटनांचा वृत्तांत सांगणारा नव्हे…माणसाच्या आतला माणूस ओळखून त्याची जीवनगाथा लिखाणातून पुन्हा जिवंत करतो तो खरा पत्रकार…”

या वाक्यानंतर आकाशात एक वीज चमकते आणि त्याचा प्रकाश दोघींच्या मधोमध पडतो..

“तटस्थपणे समाजातल्या घटनांवर भाष्य करून समाजाला दिशा देतो तो पत्रकार..”

पहिली वीज गडगडते..

“समाजातल्या ज्या घटकांना स्वतःचा आवाज नाही त्यांचा आवाज बनून बहुसंख्यापर्यंत नेतो तो खरा पत्रकार..”

“वादळ वाऱ्याशी झुंज देऊन प्रतिकूल परिस्थितीला मात देऊन जो अक्षय राहतो तो खरा पत्रकार..”

विजांच्या गडगडाटाने आकाश दुमदुमून जातं… शिखाच्या डोळ्यात निखारे पेटलेले असतात…पत्रकार म्हणजे कोण हे तिला आज समजलेलं असतं.. केवळ व्यवसाय आणि पैसा या पलीकडे पत्रकार समाजात काय उलथापालथ करू शकतो आणि आपल्याकडे किती सामर्थ्य आहे याची जाण तिला झाली…

काही मिनिटे दोघीही समोरासमोर स्तब्ध उभ्या राहतात…बाहेर जोरदार पावसाला सुरुवात होते…

“बघ…निसर्गालाही मान्य नाही की तू परिस्थितीशी हार मानून पळ काढावा..”

शिखा आपली बॅग उचलते अन खोलीत जाते..

“साहिल…साहिल…अरे हे काय केलंस?? साहिल..”

लहान सासूबाई आवाज ऐकून आत येतात..पावसाच्या आवाजाने घरात इतरांना काहीही ऐकू जात नाही..
साहिल पंख्याला लटकलेला असतो..दोघी मिळून त्याला खाली उतरवतात..सासूबाई त्याची नाडी बघतात..अगदी 4 ते 5 sec फक्त गळ्याला फास बसलेला असतो..
साहिल मध्ये प्राण असतात..

“मरु द्या मला…मला नोकरी नाही..माझी बायको मला सोडून चालली.”

“साहिल मी कुठेही जात नाहीये आणि जाणार नाहीये…”

“अजून फक्त काही सेकंद उशीर झाला असता तर…”

“सासूबाई, तुम्ही मला थांबवलं म्हणून याचे प्राण वाचले..नाहीतर काय अनर्थ झाला असता…साहिल…मला वचन दे, तू यापुढे असं कधीही करणार नाही, आणि मीही तुला वचन देते, की मी तुला सोडून कुठेही जाणार नाही..”

साहिलचा जीव की प्राण म्हणजे शिखा असते..शिखाला याची जाणीव होते तेव्हा तिला बायको म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव होते..

शिखा काही दिवस साहिलकडेच थांबते, त्याची मनस्थिती पूर्वतत होते आणि तो शिखाला बाहेर पडायला सांगतो..

“शिखा… तुझं काम तू चालू ठेव…मीही जॉब शोधतोय”

 शिखा पुन्हा गावातल्या महिलांना भेटायला जाते..

एका ठिकाणी एक स्त्री बाहेर कपडे धुत असते..तिची तिन्ही लहान मुलं जवळ खेळत असतात..समोरून एक ट्रॅक्टर येत असतं.. त्या स्त्री चं लहान मूल त्याच्या समोर जातं… शिखा त्याला वाचवायला धावायच्या आत ती स्त्री वाऱ्याच्या वेगाने पळत जाते अन मुलाला बाजूला ओढते..त्याला उचलून छातीशी धरते..तिन्ही मुलांना आपल्या झोपडीत नेऊन ठेवते…

शिखाच्या काळजाचा ठोकाच चुकतो..ती त्या स्त्रीच्या झोपडीत जाते..

“अहो शिखा ताई तुम्ही?? या या..”

“अहो तुमचा मुलगा..”

“देवाची कृपा म्हणून लक्ष गेलं माझं..नाहीतर या मुलांशिवाय मला आहे तरी कोण??”

“तुमचे पती??”

“नाव काढू नका त्याचं.. आम्हाला वाऱ्यावर सोडून गेला दुसऱ्या बाईसोबत पळून.. त्या बाईने अतोनात हाल केले याचे…आला होता परत, पण मीच हाकललं त्याला…दारू प्यायचा, आम्हाला मारझोड करायचा..”

“बापरे..मग तुम्ही मुलांना कसं वाढवणार??”

“आईला काहीही अशक्य नसतं ताई..मोठा मुलगा हुशार आहे माझा, शाळेत त्याचे मास्तर स्कॉलरशिप देताय त्याला….आणि मी मोलमजुरी करून खायची सोय करतेय..”

“लोकं त्रास नाही देत??”

“रोज रात्री एकदा तरी दार वाजतं ताई…पण मीही सुरा घेऊनच दार उघडते..”

त्या स्त्रीची कहाणी ऐकून शिखाला गलबलून येतं.. आपलं दुःखं तिला तिच्या दुःखासमोर कस्पटासमान वाटू लागतं…

तिचा पुढचा लेख याच स्त्री वर असतो…

शिखा घरी येते…दारापुढे एक गाडी उभी असते..

“ही गाडी…ओळखीची आहे…”

शिखा घरात जाऊन विचार करते आणि अचानक तिच्या डोक्यात प्रकाश पडतो..

“ज्याच्यावर खटला सुरू आहे तो बिल्डर सुधीर??? सासऱ्यांकडे??”

क्रमशः

1 thought on “अशिक्षित सून हवी (भाग 6)”

Leave a Comment