तिने बरोबर स्पेल्लिंग लिहिलं,
बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या,
पुढचं स्पेल्लिंग, बुके..
तिला आठवलं, मुलांचे तापसलेले पेपर घरी आलेले तेव्हा मुलाने हे स्पेल्लिंग चुकवलं होतं, टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिलेलं..ते तिच्या लक्षात होतं,
एक बाई आऊट झाली,
आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली,
पुढचं स्पेल्लिंग, रेस्टरन्ट..
तिच्या डोक्याला मुंग्या आल्या,
सगळं गरगर फिरायला लागलं, तिला हे काही येत नव्हतं, डोळ्यात पाणी जमू लागलं..
नवीन लग्न झालं तेव्हा सासरचा जाच ती आईकडे बोकून दाखवायची, तेव्हा आई बोलायची ते वाक्य आठवलं, “उत्तरं आपल्या आजूबाजूलाच असतात..फक्त नजर तीक्ष्ण हवी”
तिला येईना, तिने आजूबाजूला पाहिलं,
लक्षात आलं, नवरा जिथून ऑर्डर घेत होता तिथेच वर लिहिलं होतं,
“कॉंटिनेंटल restaurant”
तिने ते वाचलं, बोर्डवर लिहिलं..
दुसऱ्या स्त्रीने चुकवलं होतं,
ती जिंकली,
सर्वांनी टाळ्या वाजवल्या,
तिकडे नवरा ट्रे घेऊन बायकोला शोधत होता,
माईकवर तिचं नाव ऐकलं तसा तो ट्रे टेबलवर ठेऊन तिकडे पळाला,
त्याला सगळं समजलं, तो हैराण झाला..
सर्वांनी तिचं अभिनंदन केलं,
सोबतच्या मॉडर्न आणि इंग्रजी बोलणाऱ्या बायकांना ही साधी स्पेलिंग जमली नव्हती, मॉडर्न कोणाला म्हणावं मग? तिला प्रश्न पडला…
ती आनंदाने त्याच्यापाशी आली,
“तू आणि इंग्रजी स्पेल्लिंग खेळात जिंकलीस? पहिली दुसरीतली स्पेल्लिंग विचारलेली की काय? हा हा हा” तो या गोष्टीकडे गम्मत म्हणून बघून हसत होता,
“अशी स्पेल्लिंग होती जी तुम्हालाही जमली नसती”
“मग तुला कशी जमली?”
“कसं आहे ना,
आजवर तूला काही जमणार नाही, तुला काही समजत नाही, तुला काही येत नाही हेच ऐकत होते आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला..तुम्ही सोबत होतात तेव्हा याच गैरसमजात असायचे मी..पण आज तुमच्यापासून काही काळ दूर गेले आणि मी स्वतःला गवसले…कदाचित, उशिराच…”
तो खजील झाला, त्याच्या नजरेत ते दिसू लागलं..
नजर चुकवत तो पिझ्झा खाऊ लागला, सोबत आलेलं सॉस चं छोटं पॅकेट फोडायचा प्रयत्न करू लागला, काही जमेना..
तिने त्याच्या हातातून ते घेतलं आणि म्हणाली,
“सोडा, तुम्हाला नाही जमणार”
समाप्त
***
जोडीदाराचा प्रयत्न असला पाहिजे की माझ्याइतकाच माझा जोडीदार सक्षम व्हायला हवा, प्रत्येक ठिकाणी जोडीदाराला कमी समजून स्वतः पुढे होणं याला संसार नाही, अधिपत्य गाजवणं म्हणतात.
Agadi barobar
Khupch chaan
खूप सुंदर❤️
Khup Chan
खूप छान!
बेस्ट