अधिपत्य 2

पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली,

चांगल्या धातूच्या सुंदर कढई बघू लागली,

पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची,

ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला..

तो म्हणाला,

“जड आहे खूप”

“चांगल्या धातूची दिसतेय म्हणून”

“असं काही नसतं, तुला नाही कळत त्यातलं..चल”

तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे निघाली,

नाष्टा करण्यासाठी ते टेबलापाशी बसले,

ती म्हणाली मी मुलं खातात तसा पिझ्झा खाणार,

तो म्हणाला, मी ऑर्डर देऊन येतो..

“मी जाऊ का? तुम्ही बसा”

तो हसला,

“तुला नाही जमणार..मॉल मध्ये आहोत आपण, कोपऱ्यावरच्या साई वडापाववाल्याकडे नाही..”

तो म्हणाला, तीही हसली..तिनेही आपलं “न जमणं” मान्यच केलेलं..

तो काउंटर वर गेला, गर्दी होती तिथे,

ती आजूबाजूला बघू लागली,

एका ठिकाणी एक कार्यक्रम चालू होता,

मॉलमध्ये त्या फ्लोर च्या मधोमध एक छोटासा स्टेज होता, आजूबाजूला बरीच गर्दी होती, माईकवरुन आवाज येत होता..

काय असेल? तिला कुतूहल वाटलं..

नवरा लाईनमध्ये उभा होता, त्याला वेळ लागेल हे लक्षात येताच ती स्टेजजवळ गेली,

“Now next contestant? Please step forward”

तिथे वेगवेगळे खेळ खेळले जात होते, सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न बायका हिरीरीने भाग घेत होत्या,

ती बघायला पुढे गेली आणि स्पर्धकांमध्ये केव्हा लोटली गेली तिला कळलंच नाही,

तिथल्या मुलांनी ती आणि तिच्या बाजूच्या चार बायकांना पुढे यायला सांगितलं तसा तिला घाम फुटला..

अरे देवा, हे कुठलं संकट…!

ती मागे फिरू बघत होती पण तो मुलगा ओरडला,

“ओह मॅडम, तिकडे कुठे, इकडे या”

ते ऐकून ती अजूनच घाबरली,

स्टेजवर जाऊन आपल्या नवऱ्याला शोधू लागली, तो अजून लाईनमध्येच होता आणि त्याचं लक्षही नव्हतं…

त्या पाच बायकांना एक खेळ खेळायचा होता,

इंग्रजीमधले अवघड स्पेल्लिंग त्यांना बोर्डवर लिहायला लावणार होते, ज्याचं चुकलं तो आऊट होणार होता..

तिला दरदरून घाम फुटला,

सगळ्या बायका शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या,

तिला कुठे काय येत होतं?

त्यांना पहिला शब्द दिला..

लेफ्टनंट…

सगळ्या बायकांनी बोर्डवर लिहिलं,

तिला आठवलं,

सासऱ्यांचा एक मित्र लेफ्टनंट होता, त्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेली, तिने ती बातमी आणि त्यांचं नाव खूप वेळा वाचून काढलेलं..

*****

भाग 3

अधिपत्य-3

1 thought on “अधिपत्य 2”

Leave a Comment