अदृश्य शक्ती-2

दोन्ही सुना ऐकून सुखावल्या..

भाऊबीजेवरून मोठा भाऊ परतला..

आल्यावर फ्रेश होऊन खोलीत गेला,

त्याची बायको त्याला चहा द्यायला खोलीत आली,

तो म्हणाला,

“तू म्हटलीस ते सगळं देऊन आलोय बरं का..फार आवडलं सर्वांना..”

ती फक्त हसली,

खरं तर हे सगळं डोकं तिचं होतं,

पण क्रेडिट मिळालं नवऱ्याला..

तिला क्रेडिट नको होतं,

नवऱ्याचं कौतुक हेच तिचं कौतुक..

“खरंच, भाऊ नुसता दारात दिसला तरी बहिणीला कृतकृत्य वाटतं… बाकी सगळं तर होतच राहील..”

“तुला कसं माहीत गं? त्याने हसून विचारलं,

“पुरे..मला भाऊ नाही तरी हे कसं माहीत असा विचार करताय ना? भाऊ नाही म्हणून भावाची कमी जास्त जाणवते, ते नातं तुमच्या आणि तुमच्या बहिणीच्या रूपातून जगण्याचा प्रयत्न करतेय..”

संध्याकाळी जेवणं झाली,

लहान भावाची बायको दारापाशी तिच्या भावाची वाट बघत होती..

मोठ्या भावाची बायको तिच्या डोळ्यातून ती आतुरता अनुभवत होती.

लहान भावाच्या बायकोचा भाऊ आला आणि तिच्या डोळ्यात एक चमक आली,

त्याचं स्वागत झालं,

गप्पा झाल्या..

लहान जाऊ भावाशी गप्पा मारत होती,

माहेरची चौकशी करत होती,

सासुबाई म्हणाल्या,
***

भाग 3

अदृश्य शक्ती-3

1 thought on “अदृश्य शक्ती-2”

Leave a Comment