पण सगळं निष्फळ,
ती दुसऱ्या शहरात आली,
नोकरी सुरू केली,
अगदी स्वतंत्र होती ती,
केव्हा जातेय, केव्हा येतेय, काय खातेय, कुणासोबत आहे..
विचारायला कुणी नसायचं,
किती खरेदी केली,
कोणते कपडे घातले,
किती खर्च केला,
विचारायला कुणीही नव्हतं,
अगदी तिला जसं हवं होतं तसंच,
आता तरी खुश व्हायला हवं होतं ना तिने?
पण काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं तिला..
तिने डबा लावला होता, जेवणाचा..
सकाळचा चहा सुदधा बाहेर टपरी वरचा मुलगा आणून देई,
कारण किचन अजून मांडलाच नव्हता,
डबा मात्र काही आवडेना,
आपण स्वतःच सगळं बनवू असं ठरवलं,
बाजारात गेली,
कढई, तवा, कुकर, पोळपाट लाटणं, परात, डबे आणि काही किराणा आणला,
किचनमध्ये सगळं मांडलं,
दुसऱ्या दिवसापासून डबा बंद सांगितला, चहा पण स्वतः करणार होती,
सकाळी 8 ला ती उठली,
चहा करायला पातेलं घेतलं,
एक कप चहा टाकला,
उकळला, तिने कपात गाळला..
अजून 3 कप भरतील इतका चहा झालेला..
सवयच नव्हती ना,
एका माणसाच्या मापाचा अंदाज लागतच नव्हता,
उरलेले 3 कप चहा वाया गेला,
दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच
भाग 3
1 thought on “अंदाज-2”