अंदाज-1

त्याक्षणी तिच्याकडे सगळं काही होतं,

मागच्या काही वर्षात तिने जी स्वप्न पाहिली होती,

स्वतःचं घर, गाडी, बँक बॅलन्स…

आज ती सगळी खरी झालेली,

एका मोठ्या शहरात तिचा फ्लॅट होता, स्वतःची गाडी होती,

बँकेत आयुष्यभर पुरेल इतका पैसा होता..

पण या सगळ्याकडे आज तिला बघूही वाटत नव्हतं..

क्षुल्लक कारणावरून तिने घटस्फोट घेतला होता,

घरी सासू, सासरे..त्यांचा एकुलता एक मुलगा यश आणि ती..

चौघेजणं छानपैकी रहात,

तिच्या हट्टापायी ती वेगळी झाली,

तिला भरपूर पोटगी मिळाली,

तिच्या घरच्यांनी तिला त्यात घर, गाडी करून दिलं आणि दूर पाठवून दिलं,

नोकरीसाठी..

तिला हेच हवं होतं ना,

स्वातंत्र्य, आर्थिक स्वावलंबन, स्वच्छंदी आयुष्य..

यश खूप चांगला होता, पण बायकोच्या आवास्तवी मागण्यांपुढे तोही नमला होता,

घटस्फोट होऊ नये म्हणून त्याने खूप प्रयत्न केले,

***

भाग 2

https://irablogging.in/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9c-2/

भाग 3

https://irablogging.in/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9c-3/

1 thought on “अंदाज-1”

Leave a Comment