फरक-1

“वहिनी अगं तू जा दादासोबत बाहेर, मी आहे घरातलं बघायला” “नको ताई, तिकडे जाणं इतकं काही महत्वाचं नाही, तुम्ही आराम करा..मी आहे इथेच, कुठेच नाही जात..” नणंद भावजयीचा प्रेमळ संवाद सुरू होता.. आणि आई कोपऱ्यात उभी राहून मुलीवर चिडत होती.. “तुला सासरी काही कमी कामं असतात का जे इथेही करायला बघतेस? आराम करायचा सोडून कशाला … Read more

दुनिया गोल है-3

 ती म्हणाली, चल माझ्यासोबत.. त्या पत्त्यावर जाऊन येऊ.. सासूबाईही आवेशात आल्या, भेटला की चांगलं झापते त्याला,हा असा बिझनेस करतात का? आज इतक्या महत्वाच्या दिवशी ग्राहकाची अशी फजिती करताना लाज नाही वाटत का या लोकांना? हो ना, मी ऐकलं होतं खूप छान केक बनवतात, पण नुसतं बनवून काय उपयोग? सर्व्हिस पण द्यायला हवी ना चांगली.. मैत्रीण … Read more

दुनिया गोल है-1

“सुनबाई, मला एका कार्यक्रमाला जायचं आहे, माझी साडी छान प्रेस करून दे आणि दुकानात जाऊन एखादं गिफ्ट घेऊन ये..” हे ऐकून निमा चांगलीच पेचात पडली, तिला आज एक मोठी ऑर्डर मिळाली होती, ती वेळेत पूर्ण करायची होती, सासूबाई कार्यक्रमाला जाणार हे तिला माहीत होतं, त्यामुळे त्या गेल्या की भरपूर वेळ मिळेल या हिशेबाने तिने प्लॅनिंग … Read more

दुनिया गोल है-2

सुनबाईला ते शब्द खूप लागले, रडकुंडीला आली.. तिलाही सूनवता आलं असतं पण तिला मनापासून हा व्यवसाय करायचा होता, थोडीशीही चूक झाली तर थोडाफार जो सपोर्ट मिळतो तोही बंद झाला असता.. तिने हातातलं काम बाजूला ठेवलं आणि सासूबाईंची काम पूर्ण करून दिली.. पुन्हा आपल्या कामाला लागली, तिची धावपळ बघून सासूबाईंना समाधान वाटलं, तिलाच हौस होती, आता … Read more

देवपण-3

 घरी आई अंघोळ करून बाहेर आली, आजोबांनी मनूला आईकडे ठेवलं आणि ते गेले, सर्व विधी आटोपून आजोबा आणि वडील घरी परतले, सगळे बसले असता मनूने परत आईला विचारलं, “आई, त्या काकांचे सर्वजण पाया का पडत होते? ते दुसरे काका, त्या आजी, मोठ्या आहेत ना त्यांच्यापेक्षा?” आजोबा आणि तिचे वडील आईकडे बघत होते, आई मनूला आता … Read more

देवपण-1

 “आजोबा, बाळाकाका त्या काकांचे पाय का पडताय? ते तर त्यांच्यापेक्षा मोठे आहेत ना?” निरागस मनूला हा प्रश्न पडला, आजवर केवळ मोठ्या व्यक्तींचे पाय पडायचे असतात हे तिला माहीत होतं, पण शेजारच्या काकांचे आबालवृद्ध सगळेच पाया पडत होते, शेजारी आक्रोश सुरू होता, गंभीर वातावरण, त्याची बायको तोंडावर मारून घेत होती, मुलं घाबरलेल्या अवस्थेत शेजारी बसून होते.. … Read more

देवपण-2

 कामधंदा संपला की बडबडत, झोकांड्या देत घराकडे येई.. बायकोला हात पकडून घरापर्यंत आणावे लागे, ती काही बोलायला लागली की तिलाच शिवीगाळ.. हा सगळा तमाशा शेजारचे बघत, बायकोला लाज वाटे, पण ती खमकी होती, चांगले कष्ट करून त्याच्याहुन जास्त कमवत होती, हॉटेलमध्ये पोळ्या करायला जाई, कपड्यांच्या दुकानात 3-4 तास काम करे, घरी आली की शिवणकाम.. मुलांच्या … Read more

छोटीशी आशा-3

 दुसऱ्या दिवशी एक स्वस्तातला हॉल बघायला ते गेले, तिला पटत नव्हता, पण नकार देऊ शकत नव्हते, काम झाल्यावर दोघेही कॉफी घ्यायला एका ठिकाणी गेले, तिच्या चेहऱ्यावरचं दुःखं त्याला दिसत होतं, तो म्हणाला, तुला वाईट वाटलं माहितीये मला, पण मी हे आपल्या भविष्यासाठीच करतोय, हा खर्च तात्पुरता आहे..पण पुढे होणाऱ्या बाळाचा खर्च, त्याचं शिक्षण…यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी … Read more

छोटीशी आशा-2

 बरेच हॉल पाहिले, हॉटेल पालथी घातली, पण तिला काही आवडेना, आयताकृती हॉल अन स्टेज, यापलीकडे काही नव्हतं, तिला जरा वेगळं, निसर्गरम्य जागा हवी होती, जिथे तिला स्वतःच्या काही कल्पना राबवता येतील, अखेर एक छानसा हॉल तिला पसंत पडला, बाहेर छान गार्डन होते,  स्वागतासाठीची जागा शोभिवंत होती, तिला पाहताक्षणी पसंत पडलं, ती म्हणाली, अहो, हाच घेऊयात.. … Read more

छोटीशी आशा-1

 तिचं डोहाळजेवण करायचं होतं.. पाहिलं आईपण, पहिला अनुभव, ती मोहरली होती, खूप खुश होती, हौशी फार, कार्यक्रमाला कसं हवं,काय हवं.. सगळं ठरवलेलं, तिला सगळं साग्रसंगीत लागे, स्वतः उत्तम कलाकार, त्यामुळे सजावट आणि बराचसा खर्च वाचेल इतकं तिने बनवून ठेवलेलं, अश्या अवस्थेतही आवडीने सगळं करे, घरात जागा पुरणारी नव्हती, त्यामुळे बाहेर एखादा हॉल बघायचं ठरलं, तिचा … Read more

क्वीन-5

 गेटवर आज त्याची एन्ट्री होणार होती.. सर्वजण श्वास रोखून पाहत होते.. कोण जिंकणार म्हणून, एकीला लक्षात आलं.. ती इथे दिसत नाही, म्हणजे…ती नक्की आर्यनच्या मागे बसणार… म्हणजे…आर्यन विजेता?? कुजबुज सुरू झाली, गर्दी ओरडू लागली, “आर्यन…आर्यन..आर्यन..” काही वेळाने आर्यन गर्दीतून पुढे आला.. “अरे मी नाहीये विनर, नाहीतर मला कळलं असतं आधीच..” “तू इथे आहेस, विहान..मानव इथे … Read more

क्वीन-4

 खाली मान घालुन लायब्ररीत जायची, अभ्यास करायची.. एकजण म्हणाला, “आर्यन…अरे आयटम गर्ल ला कुणीही पटवतं… या पोरीला पटवून दाखवलंस तर मानू तुला..” “कोण ही? बेहेनजी…सॉरी ब्रो…” “अरे लाईफ मध्ये काहीतरी थ्रिल पाहिजे…ही पोरगी कुणाला पटण्यासारखी वाटत नाही..” “आर्यनला पटणार नाही अशी एकही मुलगी इथे नाही..” “मग घेतोस का चॅलेंज?” “घेतलं..” हातावर टाळ्या देत त्यांचं ठरलं.. … Read more

क्वीन-3

 हे स्पर्धा विद्यार्थ्यांनी आपापसात ठरवलेली, आणि जो किंग ऑफ द इअर असायचा त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळे, कॉलेजमध्ये त्याची शान असायची, होर्डिंग्ज लागायचे, कॉलेजचा हिरो म्हणून तो गणला जाई. आणि दुसरीकडे मुली, यापैकी एकाला आपला बॉयफ्रेंड म्हणून मिरवण्यासाठी धडपड करत.. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची गर्लफ्रेंड बनण्याचा प्रयत्न… ती रूमवर आली, हे सगळं बघून ती पुरती धास्तावली, पण … Read more

क्वीन-2

 आपल्याला लाज वाटेल असे कपडे आणि बघू न वाटणारे चाळे.. तिला धक्काच बसला, जी कल्पना केलेली त्याहीपेक्षा अवघड आहे हे.. करण जोहरच्या चित्रपटातील कॉलेज असतं ना अगदी तसंच.. मुलं गेटमधून वेगाने गाड्या आत घेत, मुली त्यांच्याकडे बघून इशारे करत.. हिरोगीरी करत मुलं मुलींना मागे बसवत.. बाई बाई बाई… ती पटकन आत गेली, विचारत विचारत वर्गापाशी … Read more

क्वीन-1

 आज तिच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता… कॉलेजचा पहिला दिवस, एका लहानश्या शहरातून आलेली ती.. दिल्लीत मोठ्या कॉलेजला ऍडमिशन घेतलेली.. मोठी स्वप्न पाहणारी, साधी, सरळ, नाकासमोर चालणारी.. हुशारीच्या जोरावर या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.. पहिला दिवस होता, कुणीही ओळखीचं नाही, इथे सगळे नवीन, कॉलेजमध्ये कसे कपडे घालून येत असतील मुली? त्याही माझ्यासारख्या सध्या असतील की मॉडर्न? … Read more

लक्ष्मी-2

जवळचे सगळे पैसे, सोन्याची चेन त्यांना देऊन सोडायची विनंती केली, “एवढ्यात काय होणार? खरा माल अजून लांबच आहे..” त्याला त्यांचा रोख समजला, तो चिडला, त्यानेही झटापट केली पण एकाने डोक्यात मारलं तसा तो बेशुद्ध पडला.. ती जिवाच्या आकांताने ओरडू लागली, पण जवळपास कुणीही नव्हतं, त्यांनी तिला ओढत नेलं, तिच्यावर अत्याचार केला, तिला ओरबाडलं.. तिला तसंच … Read more

लक्ष्मी-3

 मला दोन शब्द बोलायचं आहे.. भटजींनी माईक हातात दिला.. “नमस्कार, आज तुम्ही मला कार्तिक शिरोडकर, यशस्वी उद्योजक म्हणून ओळखत आहात..पण 2 वर्षांपूर्वी एक परिस्थिती आलेली, की माझा बिझनेस ठप्प झालेला..मी पुरता कोलमडून गेलेलो…अश्यावेळी माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली..तिने माझं आयुष्य आणि माझा बिझनेस बदलून टाकला..एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला…तिची हुशारी, बिझनेसचे ज्ञान आणि व्यवहारचातुर्य याच्या … Read more

लक्ष्मी-1

लवकरच ते लग्न करणार होते, दोघेही खुप आनंदात होते.. पाच वर्षांपासून एकत्र होते, सर्वांचा विरोध पत्करून अखेर घरून परवानगी मिळवली, आता त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार होतं, दोघेही खरेदीसाठी फिरत होते, कारमध्ये.. एका लांबच्या शहरात त्याच्या मित्राने खास बोलावले होते खरेदीसाठी, त्याच्याकडे अप्रतिम साड्या होत्या, तिला खूप आवडल्या, खरेदी झाली आणि दोघेही तिथून निघाले, दोघांच्या … Read more

तिची काय चूक?-3

   तू सांगितल्यावरच आणेल का तो?   माझा मुलगा आहे, न सांगता करेन…   ज्याने कधी एखादं फळ घरात आणलं नव्हतं त्याच्याकडून आज शहाळे आणण्याची अपेक्षा..   दादा बायकोचं ऐकतो की बहिणीचं?   नणंदेला परीक्षा घेऊ वाटे,   ते दोघे कुठे निघाले की ती तिचं काम पुढे करी,   दादाला पेचात पाडी,   मग तीच … Read more

तिची काय चूक?-2

आपल्यापेक्षा हिला चांगलं जमलं.. म्हणजे आपण कमी पडलो.. यात तिची काय चूक होती? संध्याकाळी तिच्या नवऱ्याने मुव्हीचे तिकीटं काढली दोघांसाठी.. नणंद तिरकस नजरेने पाहत होती, आजवर दादा माझे हट्ट पुरवत होता, आता बायको आली, तिचे नखरे पुरवणार… तिच्याही मनात असूया, यात तिची काय चूक होती? संध्याकाळी दोघे बाहेर गेले, सूनबाईने स्वयंपाक करून ठेवलेला.. माय लेकी … Read more