तिसरा डोळा-3

 तोही एकटाच असायचा.. दोघे लिव्ह इन मध्ये राहू लागले, एकमेकांवर खूप प्रेम करत, तिला त्याच्यासोबत राहून सगळं मिळालं होतं, आयुष्यभर ज्या प्रेमाची आसुसलेली होती ते भरभरून मिळत होतं,तिच्याएवढं आनंदी कुणी नव्हतं.. एके दिवशी तिने त्याला सांगितलं, आपल्याला समाजात राहायचं आहे, लग्न करूया, तो म्हणाला ठीक आहे, पण त्या आधी तुला रीतसर मागणी घालेन, चल माझ्यासोबत.. … Read more

तिसरा डोळा-1

तिच्या घरी आठरविश्वे दारिद्रय.. आई सोडून गेलेली, वडिलांनी कसेबसे वाढवले, तीन भावंडं, ही मधली, मोठा भाऊ उनाडक्या करत फिरे, लहानीचा घरात पाय टिकत नसे, ही थोडंफार शिकली, बऱ्यातली नोकरी करू लागली, घराला थोडाफार आकार येऊ लागला.. वडील अंथरुण धरून बसले, वडिलांचं आजारपण, बहिणीचं शिक्षण, मोठ्याचं लग्न, तिने जबाबदारी तिच्यावर घेतली.. घर कसलं, सगळी आपापल्या विश्वात … Read more

तिसरा डोळा-2

जबाबदारी अंगावर घेतली होती, मोठा भाऊ सांगायचा, एका ठिकाणी पैसे भरायचेत, ते भरले की काम मिळेल, लहान बहीण क्लाससाठी पैसे न्यायची, वडिलांचं सगळं करून त्यांना किंमत नव्हती, नोकरीसाठी बाहेर राहते तर शंका घ्यायचे तिच्यावर.. तिचा जीव घुसमटत होता, पण जबाबदारी सोडू शकत नव्हती, तिची ओळख एका मुलाशी झाली, दुसऱ्या धर्माचा तो, पण खूप प्रेमळ, त्याला … Read more

किंमत-3

 गजरा? कोणाला? मला अन कोणाला? – ती अजून मोठ्याने ओरडली.. अच्छा, कशासाठी? माझ्या मढ्यावर ठेवायला.. डोक्यावर हात मारून ती तणतणत तिथून निघून गेली, बाहेर जाऊन एका ठिकाणी रडत बसली, एवढीशी गोष्ट सुद्धा करू शकत हा माणूस..बायको म्हणून काय सुख आहे मला.. स्वतःला कोसत असतांना तिचा मोबाईल वाजला.. मोबाईल कसला, डब्बाच तो..चिगटपट्टीने तोलून धरलेलं जुनं 1500 … Read more

किंमत-2

तिचं रुटीन मीनाने पाहिलं होतं, ती म्हणायची काय आयुष्य आहे, अगदी राणी सारखं.. कामं नाही तर नाही वर एवढी हौसमौज.. आमचं मेलं अख्खं आयुष्य राब राब राबण्यात जाणार.. मीना संध्याकाळी स्वयंपाकाला जाई तेव्हा मालकिणीचा नवरा आलेला असे, आल्या आल्या मालकिणीला तो मिठीत घेई.. मग दोघेही हातात हात घालून घरात यायचे, दर चार दिवसांनी तो तिला … Read more

किंमत-1

मीना जसजशी कामावर जाऊ लागलेली तसतशी तिची चिडचिड वाढत होती, तिच्या नवऱ्याला कारण काही समजेना.. तिचं कुटुंब एक गरीब पण समाधानी कुटुंब होतं.. दोन मुलं, नवरा आणि ती.. जेमतेम कमावून सुखी होते, नवरा एका शाळेत शिपाई म्हणून कामाला होता, खर्च वाढला तशी मीनानेही कामं पाहायला सुरवात केली, एका श्रीमंत घरात स्वयंपाकिण म्हणून तिला काम मिळालं … Read more

आशीर्वाद-3

 बरं झाल्यावर त्याने पुन्हा काम सुरू केलं.. अनेक वेळा निशा आणि कुटुंबाच्या घरासमोरून जाणं होई.. दरवेळी त्याला त्यांनी केलेल्या मदतीची जाणीव व्हायची अन तो मनोमन आभार मानून पुढे जाई.. दिवाळी झाली, बरेचजण गावाला गेले, निशाच्या नवऱ्याने सुट्टीनंतर पुन्हा ऑफिस जॉईन केलं.. असंच एकदा तो डिलिव्हरी बॉय ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरासमोरून जात असताना त्यांचा घरातून … Read more

आशीर्वाद-1

आज निशाला स्वयंपाकाचा कंटाळाच आलेला, रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळले होते सगळे, सगळे म्हणजे ती, तिचा नवरा आणि तिचा लहान मुलगा.. तिघेच घरी, आज बाहेरून काहीतरी मागवूयात म्हणत तिने स्वयंपाकघरातुन सुट्टी घेतली, त्यानेही लगेच ऑर्डर करायला घेतली, काय मागवूया सांग तूच.. तिने तिच्या आणि मुलाच्या आवडीचे 2-3 मेनू सांगितले, त्याने ऑर्डर कन्फर्म केली, अर्ध्या … Read more

आशीर्वाद-2

पण यावेळी त्याला जास्तच त्रास होऊ लागलेला, कशीबशी त्याने गाडी सुरू केली, तिच्या नवऱ्याने त्याला थांबवलं, “भाऊ तुम्हाला त्रास होतोय का काही? ठीक आहात ना?” हो सर, बोलता बोलता त्याच्या डोळ्याची झापड अर्धवट होत होती.. तिच्या नवऱ्याला गांभीर्य लक्षात आलं, त्याने पटकन त्याला खाली उतरायला सांगितलं.. “आधी खाली उतरा…या आत खुर्चीवर बसा..” “नको साहेब, माझ्या … Read more

माहेर-3

 आईला आवाज देई, वडील तिच्या हातातील पिशवी घ्यायला पुढे यायचे..भाऊच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसायचा.. आजीने घराकडे पाहिलं आणि ती भानावर आली, भूतकाळातून बाहेर आली, घराला लागलेलं टाळं आणि जीर्ण झालेलं घर तिला बघवत नव्हतं, सर्वजण सोडून गेलेत, तिच्या लक्षात आलं तेव्हा हृदयात कालवाकालव झाली.. वाड्यातले भाऊबंद सुद्धा कामानिमित्त दुसरीकडे स्थायिक झाले होते, कोपऱ्यावरची टपरी, वाण्याचं … Read more

माहेर-2

अश्यातच माहेरी जायला मिळणं म्हणजे स्वर्गसुख असायचं, पण कितीतरी वर्षांपासून हे सुख आजीच्या वाट्याला आलं नव्हतं, आजीचा संसार मोठा होता, सगळी माणसं तिचीच होती, पण माहेर संपलं होतं.. आई, वडील, भाऊ, बहीण..वयानुसार सर्वजण हे जग सोडून गेले होते, त्यांच्या कुटुंबात आजी तेवढी शिल्लक होती, नातसुनेच्या माहेरची ओढ बघून आजीच्या डोळ्यात पाणी आलं.. तिथून सर्वजण निघाले, … Read more

माहेर-1

मोठया सूनबाईला बाळंतपणासाठी माहेरी सोडायला सासरचे सर्वजण गेले होते, पहिलंच मूल, बाळंतपण सासरी होऊ द्या, आम्ही तिचं सगळं करू असा हट्ट करूनही तिच्या माहेरच्यांनी ऐकलं नाही, सासरच्यांनीही म्हटलं, जाऊद्या शेवटी माहेर ते माहेरच.. घरातुन नवरा, सासू,सासरे आणि शंभरीकडे झुकलेली आजी सुद्धा तिला सोडायला आलेली, आजी..इतकं वय झालं पण अजूनही कडक होती, नातसुनेच्या बाळंतपणासाठी उत्सुक होती.. … Read more

योग्य वेळ-1

मोठ्या बहिणीने जेवायला घरी बोलवलेलं.. लहान बहीण आणि तिचे मिस्टर तयार होऊन पोहोचले सुद्धा.. दोघी बहिणी एकाच शहरात, पण एका शहरात असूनही भेटीगाठी फार कमी, सांसारिक जबाबदाऱ्या, मुलांची शिक्षणं.. यातच आपापला वेळ जाई, पण दोन्ही जोडपे आता वयस्क झाले होते, मुलं शिक्षणासाठी परदेशी गेलेली, काही बाहेरगावी.. आता कुठे दोन्ही कुटुंबांना स्वतःसाठी वेळ मिळत होता.. मोठ्या … Read more

योग्य वेळ-2

तिकडे बहिणी काम करत होत्या पण आवाज हॉल पर्यंत ऐकू येत होता.. गप्पा मारून झाल्या, मोहन पेपर चाळू लागला आणि ललित मोबाईल स्क्रोल करू लागला.. बहिणींच्या गप्पा कानावर ऐकू येत होत्या, लहान बहीण चिडचिड करत होती, “ही काय गं कोथिंबीर काळी पडली? आजकाल फ्रेश भाजीपाला येतच नाही..” “अगं इतकी काही खराब नाही झालेली, होईल बरोबर..” … Read more

योग्य वेळ-3

 “बायकोला धाकात ठेवलं म्हणजे घरच्यांची मर्जी जिंकली हा विचारच चुकीचा आहे भाऊ, तुम्ही ते केलंत पण परिणाम काय? लग्नानंतर 20 वर्षांनी घरात वाद घालून बाहेर पडलातच ना?” “तेच म्हणतोय, आता झालंय ना तिच्या मनासारखं, मग आता तिने आनंदी राहावं..” “तसं नसतं भाऊ, आमचंही एकत्र कुटुंब होतं.. पण घरचे त्यांच्या जागी आणि बायको तिच्या जागी..” “अहो … Read more

अदृश्य शक्ती-3

 त्याला पाणी तरी आण, चहा ठेव.. मोठी जाऊ क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, मी आणते, बसा तुम्ही गप्पा मारत.. दोघांच्या त्या संवादात ती तिचा भाऊ अनुभवत होती.. लहान जावेची नजर अधूनमधून मोठ्या जावेकडे जाई.. लहान जावेच्या मनात काहीतरी शिजत होतं… पण ती आत्ता बोलणार नव्हती.. लहान जावेने भावाला ओवाळले, भावानेही तिला मनापासून आशीर्वाद आणि भरपूर … Read more

अदृश्य शक्ती-2

दोन्ही सुना ऐकून सुखावल्या.. भाऊबीजेवरून मोठा भाऊ परतला.. आल्यावर फ्रेश होऊन खोलीत गेला, त्याची बायको त्याला चहा द्यायला खोलीत आली, तो म्हणाला, “तू म्हटलीस ते सगळं देऊन आलोय बरं का..फार आवडलं सर्वांना..” ती फक्त हसली, खरं तर हे सगळं डोकं तिचं होतं, पण क्रेडिट मिळालं नवऱ्याला.. तिला क्रेडिट नको होतं, नवऱ्याचं कौतुक हेच तिचं कौतुक.. … Read more

अदृश्य शक्ती-1

रेखाच्या सासरी रेखाच्या भावांचं प्रचंड कौतुक सुरू होतं.. “बाई, बाई, बाई…भाऊबीजेला किती काय काय दिलं रेखाच्या भावांनी.. महागडी साडी काय, सोन्याची चेन काय, पर्स काय, बांगड्या काय..आमच्यासाठी एकेक वस्तू काय..भाऊ असावेत तर असे..” भावाचं कौतुक ऐकून बहीण भारावून गेलेली, भाऊ जाताच तिने माहेरी आईला फोन केला, “अगं दादाने किती काय काय आणलं माझ्यासाठी.. माझ्या सासरची … Read more

फरक-3

 आल्यावर पाहते तर काय, मुलगी ओट्यासमोर उभी राहून स्वयंपाक करत होती, आईचा संताप झाला, कुठे गेली तुझी वहिनी तुला कामाला लावून? आई शांत हो, दादाने पिक्चरची तिकिटं काढलेली, वहिनीला न सांगता..वहिनी नाहीच म्हणत होती पण मी बळजबरीने पाठवलं.. तू का लाडवून ठेवतेस तिला? नसती गेली तर काय बिघडलं असतं तिचं? आई तू इतकी चिडचिड का … Read more

फरक-2

वहिनीही प्रेमळ, नणंदबाईंना सासरी कसा त्रास झालेला हे ओळखून होती, त्यामुळे तिला पुरेपूर माहेर पुरवण्याचं काम ती करत होती.. आई मंदिरात गेली, वहिनी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली.. तेवढ्यात तिला एक फोन आला, नणंद ऐकत होती, वहिनी चिडून बोलत होती, “मला न विचारता तिकिटं काढलीच कशी? तुम्हाला समजत नाही का घरी ताई आल्या आहेत ते?” “अगं नवीनच … Read more