प्रश्नार्थक चिन्ह-3

 तिचं तयार होऊन नोकरीवर जाणे, पगार कमावणे, आजेसासू कौतुकाने बघत असायची, “भलती हुशार हो माझी नातसून..पैसाही कमावते, घर पण बघते..बायका कसं बाई दोन्ही सांभाळतात” ती प्रश्नार्थक नजरेने पहात राहिली, घरातले खर्च वाढले,  ती मुलांकडे मागत राहायची, मुलं एक दिवस कंटाळले, म्हणाले, “आई तू कमावती पाहिजे होतीस” नवऱ्याने एक दिवस एका पार्टीला नेले, मित्र मित्र बोलत … Read more

प्रश्नार्थक चिन्ह-2

नवरा बरा मिळाला, बरा म्हणजे त्या काळातील बरा, काटकसर करून संसार, पण शिस्तबद्ध लागायचं, कसं राहायचं, काय बोलायचं, काय करायचं, सगळी सूत्र सासूच्या हातात, ते मान खाली घालुन मान्य करणं हेच योग्य असा त्यावेळचा समज, मग ते चांगलं असो वा वाईट, व्यक्तिस्वातंत्र्य गेलं चुलीत, कारण हा शब्द जरी काढला, तरी टूक्कार, अवलादी, मजोरडी हे लेबल … Read more

प्रश्नार्थक चिन्ह-1

“मी स्वतःच्या जीवावर वस्तू घेते, नवऱ्याच्या जीवावर नाही” सुनबाई असं बोलली अन मालतीच्या काळजातून एकच कळ गेली, वयाच्या पंचावन्नव्या वर्षी तिला हे ऐकावं लागत होतं, 70-80च्या दशकातील तिचं लग्न, हा काळ स्त्रीवर्गासाठी प्रचंड संघर्षमयी, एकीकडे स्त्रीवादाचे वारे वाहत होते, स्त्रिया आगेकूच करत होत्या आणि दुसरीकडे जुनी पिढी आपल्या विचारांना सोडून द्यायला तयार नसायची, त्या काळातल्या … Read more

मंत्र-1

सुमती बाईंचा बदललेला स्वभाव बघून सर्वांनाच आश्चर्य वाटलेलं.. सुमतीबाई, बोलायला अत्यंत कठीण, माणसं मनातल्या मनात बोलतात, सुमतीबाई मात्र मनातलं डायरेक्ट तोंडावाटे बाहेर काढणार, मग कुणाला राग येवो नाहीतर वाईट वाटो, लग्न करून आल्या तेव्हा सासूबाईंनी तिला म्हटलेलं, “बाई चार पाच जणांचा स्वयंपाक कर..” सुमतीबाई लगेच उत्तरल्या, “बाई गं, आत्ताच लग्न करून आले, लगेच कामाला जुंपलं … Read more

मंत्र-2

 त्यांना प्रश्न पडला, हे कसं शक्य आहे? माणसाचा स्वभाव इतका कसा बदलू शकतो? एके दिवशी त्यांनी सुनेला बोलावून घेतलं, आणि विचारलं, “तुला तुझ्या सासूचा स्वभाव चांगला माहीत आहे, तू अशी काय जादूची कांडी फिरवली की त्या बदलूनच गेल्या?” सून हसली, म्हणाली, “यांनी मला आईच्या स्वभावबद्दल आधीच सांगितलं होतं, मग माझ्या आईने मला 3 वाक्यांचा मंत्र … Read more

दडपण-4

  नवरा बोलणार म्हणून ती थोडी बाजूलाच उभी होती, तो माईकसमोर गेला, समोर गर्दी पाहिली, जवळपास 300 लोकं आणि त्यांचे 600 डोळे त्याच्याकडेच पाहत होते, त्याचे पाय लटपटू लागले, अंगाला घाम फुटला, तोंडातून शब्द फुटेना, तो एकदम ब्लॅंक झाला, तिला ते समजलं, तिचीच भीतीने गाळण उडाली, मागून शिक्षिका आवाज देत होत्या, “अहो बोला बोला..” गर्दी … Read more

दडपण-3

ती घाबरली होती पण ठिकाण कुठलं, प्रसंग कोणता हे ती जाणून होती, इथे हे वाक्य सूट होणार नव्हते, तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं, तो म्हणाला, “बघतेस काय? लिहून घे ना…लिहून देतो तर देतो वर मलाच डोळे वर करून बघते..” एवढं आहे हेही हातातून जायचं या विचाराने तिने ते लिहून घेतलं.. त्याने परत एकदा समजावलं, “हे … Read more

दडपण-2

“अगं तुला काय पाहाड उचलून न्यायचाय का? उगाच टेन्शन घेते, मी असतो ना खरंच टेन्शन नसतं, पण मला बाहेरगावी जाणं भाग आहे…ऑफिसमधून तशी ऑर्डर आलीये..” आता काही पर्यायच नसल्याने ती अजूनच घाबरली, पण प्रयत्न करत होती, आरशासमोर उभी राही… तोंडातून शब्द बाहेर पडला की स्वतःलाच हसू येई, मग तिकडे असं केलं तर आपलंच हसू होईल … Read more

दडपण-1

मुलाच्या शाळेत स्नेहसंमेलनाचं निमंत्रण आलं आणि तिने धसकाच घेतला, कारण नुसतं जायचं नव्हतं, स्टेजवर जाऊन दोन शब्द बोलायचे होते, नवरा नेमका त्यावेळी परगावी असणार होता, उरली ही एकटी, आई बोलणार म्हणून पोरगं नाचत होतं, सर्व मित्रांना त्याने सांगून ठेवलं होतं, पोरगं फारच गुणी, नाव काढलं होतं त्याने शाळेत, अभ्यासात, खेळात नेहमी पुढे, कुणावर गेलेला काय … Read more

मित्र मैत्रीण-3

 त्याने आपल्या बायकोकडे पाहिलं, समोरची मुलगी निघाली तर? बायकोशी अप्रामाणिक तर नाही ना होणार? मनात चलबिचल झाली.. मी कुठे बायकोचा हात सोडतोय, फक्त एक मित्र म्हणून। भेटतोय, समोरचा मुलगा आहे की मुलगी हेही माहीत नाही, मग घाबरायचं कशाला? तो स्वतःलाच समजावत होता, सुट्टीच्या दिवशी तो तयारी करून निघाला, ठरल्या ठिकाणी पोहोचला, तिथे ती व्यक्ती येणार … Read more

मित्र मैत्रिण-2

बायको चांगलं खाऊ पिऊ घालायची, सगळं करायची, पण तो ऑफिसमध्ये अगदी रडून आलेला असायचा, तिचा हसरा चेहरा बघून त्याला काहीही सांगावंसं वाटेना.. अश्यातच इंटरनेट वर एक ऑनलाइन पोर्टल सुरू झालं होतं, अल्पावधीतच लोकप्रिय होत होतं, त्यात आपलं नाव समोर न आणता अनामिक राहून आपली व्यथा मांडायची सोय होती, त्यावर अनामिक लोकं सहानुभूती दाखवायचे, सल्ला द्यायचे… … Read more

मित्र मैत्रीण-1

म्हणायला दोघेही नवरा बायको, पण दोघांचं तोंड दोन दिशेला, तो आयटी कंपनीत कामाला, आणि ती कॉलेजमध्ये प्रोफेसर.. ती मजेत असायची, घर, नोकरी सगळं सांभाळून आनंदी राहायची, पण तो मात्र आतून पोखरत जात होता, ऑफिसमधलं राजकारण, दुसरं काही नाही, मोकळं व्हायला विश्वासू असे मित्रही नव्हते, बायकोला सांगून काही उपयोग नाही असं त्याला वाटायचं, म्हणून तो तिच्याशी … Read more

स्वावलंबी-3

 उगाच हे खूळ डोक्यात आणलं असं तिला वाटू लागलं, किचनमधून छान पदार्थाचा वास येत होता, बाहेर भाजीवाला आरोळ्या देत होता, कचरागाडी दाराशी येऊन थांबलेली, ती उठली तसं सासूबाईंनी अडवलं.. “बाई तू अभ्यास कर, मी भाजीपाला घेते, कचरा पण टाकते..तू उठू नकोस..” या निमित्ताने जरा फेरफटका मारता येईल या विचाराने ती खुश होती पण सासूबाईंनी तेही … Read more

स्वावलंबी-2

तो गालातल्या गालात हसला, “बरं, तुला शिकायची ईच्छा आहे का?” “आता कशाला विचारताय? जेव्हा विचारायचं तेव्हा तर विचारलं नाही.” “अगं अजून वय तरी आहे का तुझं? कॉलेजला गेलीस तरी चार मुलं प्रपोज करतील तुला..” या वाक्याने मात्र ती विरघळली, पण पुन्हा आपल्या विषयावर आली.. “मला फूस लावू नका..मी शिकले असते तर आज कमावती झाले असते” … Read more

स्वावलंबी-1

“मला सपोर्ट मिळाला असता तर मीही पुढे गेले असते हो..” महिन्याभरात दहाव्यांदा हा टोमणा तो ऐकत होता, सगळं कसं सुरळीत चाललं होतं, पण मधेच हिच्या डोक्यात हे कसलं भूत घुसलंय त्याला काही समजेना, रोज रोज tv वरच्या सिरीयल बघून असेल, किंवा कदाचित ईरा वरच्या नारीवादी कथा वाचून असेल, की हार्मोन्सला भरती आलीये? समजायला मार्ग नव्हता, … Read more

गेलं उडत-2

तिचे संस्कार, बिचारं माझं लेकरू, ते फुटकं नशीब पर्यंत येऊन थांबते… त्यामुळे चार दिवस सासूबाईंसमोर जरा जास्तीची कामं केली तर निदान या खेपेला तरी आपण “good girl” म्हणून राहू असा तिचा विचार होता… ती लवकर उठली, स्वयंपाक केला, धुनी भांडी केली, ओटा आवरला, झाडू फरशी केली, सासुबाई अंगण झाडायला लागल्या, “अहो आई असुद्या मी करते..” … Read more

गेलं उडत-3

 खाली सासुबाई आणि सासूबाईंच्या बहिणी दुपारची जेवणं आटोपून खोलीत मस्तपैकी पाय पसरून बसल्या होत्या, गप्पा रंगल्या होत्या, ती जिन्यातून खाली येत असतांना बेडरूममधून आवाज कानी पडला, “पोटभर पोहे झाले आता भूकच नाही..” “अगं मस्त पाटोड्यांची भाजी केलीये, बरोबर जेवण जाईल बघ..” “यावेळी ते शेजारच्या सटवीने बोलावलं होतं का?” “हा बाई, बोलवलं होतं तोंड वाकडं करत..” … Read more

गेलं उडत-1

आज ती जरा जास्तीचेच कामं करत होती, चार दिवसांनी सासूबाईंच्या माहेरची लोकं येणार होती, चांगली चार दिवस मुक्काम ठोकणार होती, हिची साफसफाई सुरू होती, कशासाठी? ती येताय म्हणून? छे..! कारण वेगळंच होतं, माहेरची माणसं आली की सासूबाईंच्या अंगातच येई जणू, जणू एका निर्जन वाळवंटात 12 वर्षे राहून अचानक माणसं दिसावीत आणि मनात साठलेलं सगळं बाहेर … Read more

शून्य-3

 वेळ पडायची तेव्हा एक वेळचे जेवण ती टाळे, त्यांच्या कष्टाला फळ आलं, शहरातल्या मोठ्या हॉटेल्स ने सेंद्रिय मालासाठी त्यांना काँट्रॅक्ट दिलं, आगाऊ रक्कम दिली, दोघे भरून पावले, कष्टाला फळ आलेलं, तिकडे बहिणीने मौजमजा करून सगळा पैसा उडवून लावलेला, नवरा दारूच्या आहारी गेला, पैशाच्या जीवावर घरखर्च वाढवून ठेवलेला, पण आता तो फेडायचा कसा हा प्रश्न उभा … Read more

शून्य-1

आई वडिलांच्या प्रेमाचा फायदा घेऊन तिने अर्ध्याहून जास्त संपत्ती तिच्या नावावर करून घेतली होती, मीनल, स्वभावतःच जरा स्वार्थी, काय करणार, लहानपणापासून गरिबी बघितली होती, लग्नही लवकर झालेलं, नवऱ्यालाही जेमतेम पगार, पण आयुष्य असंच जगत राहणं तिला पटत नव्हतं, कुठून कसा पैसा येईल याचाच सतत विचार, नकुल, तिचा भाऊ… साधभोळा बिचारा, बहिणीच्या प्रेमापोटी संपत्तीचा 75% वाटा … Read more