वेळेवर पोहोचण्यासाठी

“मीही माणूस आहे, रोबोट नाही…” मानसी मुलांवर राग काढत होती.नोकरी आणि घर दोन्ही सांभाळताना तिच्या नाकी नऊ यायचे, त्यात आज सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावणं आलं आणि त्यात मुलांनी वेगळाच हट्ट धरला. तिने मुलांना खाऊ पिऊ घालून सासूबाईंकडे सोपवले इतक्यात सासूबाई म्हणाल्या, “आज फरशी नाही केलीस?” “तुम्हाला दिसत नाहीये का माझी घाई?” तिच्या बोलण्यावर तोंड वाकडं … Read more

दुजाभाव

  “तुला माहेरचेच लोकं प्रिय, सासरच्यांसाठी काही करायचं म्हटलं की नाक मुरडणार…” श्रीधर वैतागून रुचिता ला म्हणतो… “अहो असं कसं बोलता तुम्ही? मला सगळे सारखेच आहेत..” “माहितीये सगळं, तुझ्या आईच्या वाढदिवशी काही गिफ्ट वगैरे मध्ये पैसे घालवायचे नाही अजिबात, मागच्या वेळेस दिलं होतं ना आपण मग बस झालं…” रुचिता दुःखी झाली, सर्वांना समान वागणूक देऊनही … Read more

अहंकार त्याचा…

“इतकाही अहंकार चांगला नाही…एक दिवस तुझा हाच अहंकार तुला संपवेल…” राधिका नेहमी त्याला म्हणायची… आदेश आणि राधिकाचा प्रेमविवाह, एकाच कॉलेज मध्ये शिकणारे दोघे…अभ्यासात दोघांची चढाओढ…राधिकाही जबरदस्त स्कॉलर…दोघांची अभ्यासातही स्पर्धा…आदेश तिला मागे टाकण्यात आनंद मानायचा.. आणि राधिकाचा हरण्यातही आनंद मिळायचा..कारण त्याच्या चेहऱ्यावर चा आनंदच तिला खूप होता… लग्न झालं, पण त्याचा अहंकार तिला आता त्रास देऊ … Read more

डॉक्टर cool (भाग 4)

त्या मोलकरणीची शुगर टेस्ट केली, तिला काही शुगर वगैरे नव्हती. शिल्पा ला खात्री पटली की हे सगळं ती अवयव चोरणारी गॅंग करत आहे. तिने आकाश ला याबद्दल कळवलं, आकाश ने प्लॅन करून त्या गॅंग ला पकडायचं ठरवलं. त्या मोलकरणीला पुन्हा बोलावण्यात आलं, तिला सांगितलं की पुन्हा ते डॉक्टर घरी आले की सरळ आम्हाला फोन करायचा. … Read more

तुही हकीकत (भाग 1)

“ईशिका??? तू??” आशिष ने दार उघडलं तशी तिने आत येऊन आशिष ला मिठीच मारली…स्वरा किचन मधून बाहेर आली आणि फक्त बघतच राहिली…आशिष चे आई वडील यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहायला ती त्यांच्याकडे बघते, पण मुलाच्या बाबतीत इतके शिस्तप्रिय असणाऱ्या त्यांना मात्र याचं काहीही वाटत नव्हतं… स्वरा आतून कोसळत चालली होती… आशिष चं काय? तोही … Read more

माझ्यासाठी माणुसकी दाखवाल… प्लिज???

बिल्डींग च्या सेक्रेटरी ने आदेशच काढला होता..आपल्या फ्लॅट मध्ये एकही कोरोना पॉसिटीव्ह असता कामा नये, सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. सर्वजण एकदम सतर्क होते..काहीही झालं तरी बिल्डींग मध्ये या आजाराचा शिरकाव होऊ द्यायचा नाही असं सर्वांनी ठरवलं होतं.. 1 महिना गेला, 2 महिने गेले.. बिल्डिंग सुरक्षित होती… सर्वांना काहीतरी जिंकल्याचा भास झाला…पण इतक्यात एक ऍम्ब्युलन्स … Read more

आत्महत्येमागे कोण कारणीभूत? | reason behind Sushant Singh’s Suicide

“सुशांत सिंग राजपूत ची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या” ही बातमी ऐकल्यावर कुणाचं डोकं सुन्न झाले नसेल? पैसा, प्रसिद्धी सर्वकाही पायाशी लोळण घेत असूनही आयुष्य संपवण्याचा असा टोकाचा विचार कुणी कसं करू शकतं???खरं तर त्याचं दुःखं त्यालाच माहीत, तो गेला पण जाताना हजारो प्रश्न मागे सोडून गेला. आजही त्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उठवले जात आहेत. … Read more

डॉक्टर cool (भाग 3)

डॉक्टर शिल्पा दवाखान्यात व्यस्त होती तर तिचे मिस्टर रोशन हे पोलीसांच्या वर्दीत राहून आपलं कर्तव्य निभावत होते. “वहिनी, मेडिकल सायन्स सगळ्या आजारावर उपचार का करू शकत नाही?” अक्षरा च्या या अनपेक्षित प्रश्नाने शिल्पाला आश्चर्य वाटलं…पण काहीतरी उत्तर तर द्यायचंच होतं.. “माणसाच्या शरीरातील काही घटक इतके गुंतागुंतीचे असतात की त्यावर मेडिकल सायन्स काहीही करू शकत नाही…” … Read more

भार कुणीही पेलो…

ती ऑफिसहून आली आणि रोजच्याप्रमाणे तिचं डोकच फिरलं.. किती वेळा माधव ला सांगितलं की घरातली कामं करायची नाहीत मी असताना…पण तो ऐकेल तेव्हा खरं… एक तर आधीच लोकांच्या टोमण्यांनी तिच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. “माधव…ठेव ती भांडी, मी घासून घेईन..” “थकून आली असशील गं… आल्या आल्या काय कामाला लागतेस..” “काही होत नाही मला, सरका … Read more

डॉक्टर cool (भाग 2)

डॉक्टर शिल्पा घरी जाते, सासूबाई आल्या आल्या तिला मिठी मारतात आणि जोरात ओरडतात… “आई आई गं..” “काय झालं आई?” “काही नाही गं… ही डोक्यातली नस एकदम दुखून येते कधी कधी..” शिल्पा च्या मनात शंका निर्माण होते, हे दुखणं बऱ्याचदा सासूबाईंना यायचं…पण तपासणीला त्या कायम नकार देत असत… “आई ऐका माझं, एकदा MRI काढून घ्या..” “अगं … Read more

डॉक्टर cool (भाग 1)

“हं… बोला काय त्रास होतोय तुम्हाला?” डॉक्टर शिल्पा समोर बसलेल्या एका पन्नाशीच्या बाईला विचारत होत्या, शेजारी मुलगा बसलेला आणि मागे सून उभी होती… “काय सांगू डॉक्टर, पाय उभे राहू देत नाही…उठायला बसायला त्रास…धड चालताही येत नाही…” डॉक्टर शिल्पा ने निरखून पाहिलं, तिने बरोबर त्यांची दुखरी नस पकडली, आधी पूर्ण चेक केलं आणि डॉक्टर ची शंका … Read more

साबुदाण्याची खिचडी

ठिकाण: बेडरूम, वेळ सकाळी 9 (एक लग्न झालेली मुलगी ऑफिस ला जायची तयारी करत असते, तिच्या खोलीत तिची पर्स भरत असते आणि कानाला फोन लावलेला असतो, फोनवर बोलत असते…) अगं आई हो…मला नसतं आवडलं का माझ्या सख्ख्या बहिणीच्या वाढदिवसाला यायला? पण समजून घे, माझी आज खूप महत्त्वाची मिटिंग आहे ऑफिस मध्ये, मला जायलाच हवं…एक तर … Read more

डाग…

“हे कुठे राहिले आता, मिठाई घेऊन येतो म्हणे 10 मिनिटात… अजून पत्ता नाही…मोबाइलही विसरले…पाहुणे यायची वेळ झाली…” शोभा काकू धावपळ करत होत्या, आज त्यांच्या लाडक्या मुलीला पाहायला पाहुणे येणार होते. अगदी मनाजोगतं स्थळ होतं… मुलगा दिसायला देखणा, सुशिक्षित कुटुंब, आर्थिक सुबत्ता..सगळं काही होतं… हे स्थळ हातातून जाऊ द्यायचं नव्हतं… पण…कीर्तीच्या चेहऱ्यावर असलेल्या हलक्याश्या डागांमुळे काकू … Read more

मिशन इंडिया (भाग 7 अंतिम)

दहशतवादी चिडतात पण तेवढेच घाबरतात, विमानात ते फक्त 5 आणि इतर 60 प्रवाशी. संपदा बाहेर येते, या पाचही लोकांना रांगेत एक खुर्चीवर बसवते आणि हाताची घडी घालत नजर रोखून प्रत्येकाकडे बघते… “ये धोखा है…” “अबे चूप…” संपदा त्याच्या एक कानशिलात लावते… आशा चव्हाण पुढे येते… “माझ्याच देशात राहून देशाचीच गद्दारी करेन असं वाटलं तरी कसं … Read more

थोडाही उशीर झाला असता तर….!!!

शाळेत दहावीच्या मुलांच्या उत्तरपत्रिका तिच्याकडून गहाळ झाल्या होत्या, सगळे आरोप तिच्यावरच आले होते..वर्गात पेपर चेक करत असताना लक्षात आलं की अमुक एका शाळेच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, तो गठ्ठा तिच्याकडेच होता. मग चौकशी, मुख्याध्यापकांकडून चौकशी, पुढे काय काय वाढून ठेवलेलं आहे याची तिला कल्पना दिली गेली. शाळेतील स्टाफ तसा समजदार होता, त्यांनी तिला धीर दिला … Read more

मिशन इंडिया (भाग 6)

नीरज ला समजतं की ज्या गुरुजी च्या इशाऱ्यावर ही सगळी मंडळी कामं करत होती ते गुरुजी दुसरे तिसरे कुणी नसून वेशीवर भेटलेला वेडा माणूसच होता. पण आता खूप साऱ्या गोष्टींची उकल अजूनही बाकीच होती, गुरुजी वेड्या माणसाचं सोंग का घेताय? राशीद इथे काय करतोय? त्या नकली पासपोर्ट छापायच्या गुन्ह्याचा आणि परभणी जिल्ह्यातच हे सगळं करायचा … Read more

मिशन इंडिया (भाग 5)

नीरज ला रात्रभर झोप लागत नाही, काय प्रकरण आहे हे नक्की? या चौघांच्या भेटीनंतर नीरजच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळतं. नीरज आता या चौघांचं रहस्य शोधायला लागतो. नीरज ऑफिसमध्ये जाताच बॉस सोबत हे सगळं बोलतो… “नीरज, आपलं काम फक्त मुलाखत घेणं आहे…बाकीच्या उद्योगात तुम्ही पडू नका..” “सर पण याचा संबंध दहशतवादी संघटनेशी असू शकतो..आपण पोलिसांना … Read more

टिक टॉक हाणून पाडणारा हा कॅरी मिनाटी आहे तरी कोण?

टिक टॉक हाणून पाडणारा हा कॅरी मिनाटी आहे तरी कोण? नुकतेच फेसबुकवर “200 रुपये… मिठाई दुकान” चे मिम्स दिसू लागले होते…त्या मिम चा अर्थ काही समजला नाही. मग नंतर “youtubeVsTiktok” असा हॅशटॅग ट्रेंड झालेला..आणि मग अचानक tiktok ची रेटिंग 4.2 वरून 1.3 वर आली… मग लक्षात आलं की मीडिया जगतात भयंकर काहीतरी वादळ येऊन गेलंय. … Read more

मिशन इंडिया (भाग 4)

      नीरज ने इतक्या मुलाखती घेतल्या पण ही 3 माणसं त्याच्या डोक्यात सतत घुमत होती, एकाहून एक गजब व्यक्तिमत्त्व होती ती…काहीतरी connection होतं त्या तिघांमध्ये…तिघांची क्षेत्र वेगळी होती, तिघांच्या वाटा वेगळ्या होत्या..पण एक कुठलीतरी कडी होती जी या तिघांना बांधून होती. “मिस्टर नीरज…मुलाखतींचे आर्टिकल्स झालेत का लिहून.” “हो सर..हे घ्या…” “बरं… नशीब, हे … Read more

3. बना महिला उद्योजिका । व्यवसाय । कोचिंग क्लासेस

व्यवसाय निवडताना कुठलीही घाई न करता विचारपूर्वक व्यवसायाची निवड करता आली पाहिजे. व्यवसायाची निवड करताना आततायीपणा करून चालणार नाही. अमुक एखाद्या व्यवसायात केवळ पैसा जास्त आहे म्हणून आपल्याला त्या व्यवसायाची माहिती नसताना त्यात जाणे चुकीचे ठरेल. व्यवसाय निवडताना खालील गोष्टी तपासून पहाव्यात. 1. या व्यवसायाची मला आवड आहे का? 2. या व्यवसायबद्दल मला थोडेफार ज्ञान … Read more