मालती

 छकुली लहान होती, मोठया भावाच्या लग्नाची तिला भारी हौस. दादा मला एक वहिनी आन गाणं गुणगुणायला तिला फार आवडे. अखेर सुयश साठी एक स्थळ बघितलं आणि दादा चं लग्न ठरलं. छकुली जाम खुश झाली, लग्नात नवीन कपडे, नवीन कानातले, बांगड्या मिळणार होत्या तिला. निरागस मन ते… तिला काय कळणार, घरी वहिनी आणायची म्हणजे मोठ्यांच्या डोक्यात … Read more

अशिक्षित सून हवी (भाग 9)

सुधीरला जमिनीवर मंदिर बांधण्याची गोष्ट समजताच तो बिथरतो..काहीही करून त्याला जमीन बळकवायची असते. “असं कसं ऐकणार नाही तेच बघतो मी” यावेळी तो गुंड सोबत घेऊन रावसाहेबांच्या घरी जातो. रावसाहेबांच्या घरी समजतं की ते सकाळीच शहराकडे रवाना झाले आहेत, सुधीर पत्ता घेऊन रावसाहेबांना तिथेच गाठायचं ठरवतो.. शिखा काळजीत असते..पुरस्कार घ्यायला जायचं तर आहे, पण जाणार कसं..घरून … Read more

अशिक्षित सून हवी (भाग 8)

#अशिक्षित_सून_हवी (भा सुधीर रावसाहेबांना शब्दात पकडून बरोबर तयार करतो.. रावसाहेब अखेर नातेवाईक म्हणून जमीन सुधीर ला भाड्याने द्यायला तयार होतात.. रावसाहेबांकडे दुपारी एक वकील येतात, “नमस्कार रावसाहेब…मी मिस्टर सुधीर यांच्याकडून आलो आहे…जमिनीच्या व्यवहारासंबंधी बोलायचं आहे..” “हो बसा तुम्ही…पण असे अचानक आलात, मला माझ्या वकिलांशी बोलायचं होतं..” “अहो त्यात काय बोलायचं, मी सगळे कागदपत्र तयार केले … Read more

अशिक्षित सून हवी (भाग 7)

शिखा मागच्या दाराने आत जाते, घरात जेवण बनवण्याची रेलचेल चालू असते. एकीकडे सासूबाई शाल, टोपी काढून ठेवतात, आणि लहान सासूबाई जेवणाचं बघत असतात.. “आलीस? ये…” “बाहेर कोण आलं आहे सासूबाई??” “अगं माझा धाकटा भाऊ, सुधीर..तुमचं लग्न थोडक्यात उरकलं, तुझी ओळखच नाही झाली बघ कुणाशी…” लहान सासूबाईं सांगतात… बिल्डर सुधीर हा सासूबाईंचा भाऊ?? हा तोच ज्याला … Read more

तुझं माझं

  “तुझे बाबा परत कधी जाणार आहेत?” “अहो असं काय करता… त्यांची कंडिशन बघताय ना तुम्ही? ट्रीटमेंट पूर्ण झाल्याशिवाय त्यांना इथून हलता येणार नाही..” योगेश चे आई वडील यात्रेसाठी दोन महिने बाहेर गेलेले..आणि दुसऱ्याच दिवशी काजल च्या माहेराहून फोन आला, वडिल अचानक बेशुद्ध पडले होते..आणि मोठ्या डॉक्टर कडे म्हणून काजलच्याच शहरी ते येणार होते. मुलगी … Read more

गैरसमजाची कीड..!!!

  वहिनी आणि आईचा वाद टोकाला पोचल्यावर सुनंदा तडक माहेरी गेली. वाद इतका टोकाला पोहोचेल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. वहिनी समजूतदार होती, आईही प्रेमळ होती, मग हा वाद कशासाठी? काय कारण असावं? हा विचार सुनंदा पूर्ण प्रवासात करत राहिली. ती घरी पोहोचली. आत भयाण शांतता होती. आई आणि वहिनी आपापल्या खोलीत. दोघींशीही ती बोलली, दोघीजणी … Read more

धुतल्या तांदळातील पोरं..

   “माझी मुलं अगदी धुतल्या तांदळासारखी..” हे वाक्य सासूबाईंकडून ऐकलं आणि सई ला हसूच फुटलं. आपला नवरा आणि धाकल्या नणंद बाई काय गुणाचे आहेत हे फक्त सई लाच माहीत होतं. सई ला फोटोग्राफी ची भारी आवड. हातात मोबाईल असला की तिचा कॅमेरा सुरूच असे..किचन मधला एखादा पदार्थ असो व बागेतील एखादं फूल, तिचा फोन उत्तम … Read more

कहाणी घर घर की

  मुलांचं कौतुक करता करता सासुबाई सुनांच्या कौतुकाकडे सपशेल दुर्लक्ष करायच्या, कौतुकाचा कधी एक शब्द काढत नव्हत्या..दोन्ही सुना तश्या प्रेमळ, कष्टाळू…जीवाला जीव लावणाऱ्या… लीला बाईंना आई म्हणून मुलांकडून प्रेम मिळालं, पण एक कर्तव्य म्हणून मुलांनी ते दिलं… काहीका असेना, पण मुलं जीव लावताय याचं अवाच्या सवा वर्णन लिलाबाई करायच्या… “या शिंदे बाई..खूप दिवसांनी..” “तब्येत बरी … Read more

अशिक्षित सून हवी (भाग 6)

शिखाला एकीकडे आनंदाची बातमी आणि दुसरीकडे दुःखद बातमी कळली होती..साहिलची नोकरी गेल्याने आता दोघांना गावतच आपल्या कुटुंबासोबत राहावं लागणार होतं.. शिखा खोलीत जाऊन स्वतःला बंदिस्त करून घेते..आता आपली इथून कधीच सुटका नाही? आयुष्यभर आपण असंच पत्रकारिता सोडून घरात बसायचं? नाही, मला शक्य नाही.. शिखा तातडीने आपली बॅग भरायला घेते..आता सर्वांना खरं सांगून इथून काढता पाय … Read more

अशिक्षित सून हवी (भाग 5)

शिखाला पत्रकारिता सोडणं अवघड होतं, काही महिन्यांचाच प्रश्न होता पण तिच्यातील पत्रकार तिला काही स्वस्थ बसू देईना…साहिलकडून तिने लॅपटॉप मागितला…तिच्या चॅनेल ची झालेली अवस्था तिने पहिली…अतिशय बकवास बातम्या आणि वाईट अग्रलेख…समाजात घडत असलेल्या गोष्टी अतिशय नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आलेल्या…लोकही आता मीडियाला नावं ठेऊ लागलेली… सगळीकडे फक्त आणि फक्त नकारात्मकता पसरत होती… शिखाला बातमी लिहायला बाहेर … Read more

इज्जत

 कीर्ती चा बघण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला होता..दोघांची पसंती झाली होती, आता मुहूर्त बघायचा तेवढा बाकी होता…कीर्ती च्या आईची एका फार मोठ्या पंडिजींशी ओळख होती, ते रविवारी घरी येणार होते. कीर्ती च्या आईने मुलाच्या आईलाही घरीच बोलावलं.. संध्याकाळी गुरुजी घरी आले, कीर्ती ऑफिस मधेच होती..होणाऱ्या सासूबाई दाराकडे डोळे लावून बसलेल्या, “कुणाची वाट बघताय विहिनबाई??” “कीर्ती … Read more

अशिक्षित सून हवी (भाग 4)

लहान सासूबाईंच्या वागण्याने शिखा जरा धास्तावली, पण त्या असं का वागल्या? त्यांना माहीत होतं का मी जे करतेय ते?? एक ना अनेक प्रश्न शिखा च्या मनात उठले, पण नंतर सासूबाईंनीही तिला काही विचारलं नाही आणि तिनेही काही सांगितलं नाही, दोघींनीही मौन बाळगणं पसंद केलं.. शिखा च्या सासऱ्यांनी आता जमिनीचे व्यवहार हाती घेतले होते…त्यांनी बरीच मोठी … Read more

“न्यूज”प्रतिकारक शक्ती वाढवा

 सुशांत प्रकरणावरून काय धडा घेतला? गेले कित्येक दिवस मीडियामध्ये सुरू असलेल्या चर्चेला CBI ने दिलेल्या निर्णयाने पूर्णविराम लागला. सुशांत सिंग राजपूत ची हत्या नसून ती आत्महत्याच आहे या निष्कर्षावर CBI पोहोचले.. पण या सर्व गोष्टीत सामान्य माणसापासून ते मीडिया पर्यन्त सर्वांनीच ज्या पद्धतीने वर्तन केले त्यावर पुन्हा एकदा विचार करायला हवा.. सर्वप्रथम त्याच्या आत्महत्येची बातमी … Read more

अशिक्षित सून हवी (भाग 3)

साहिलने शिखाला विचारलं.. “मग…घरात रुळली आहेस तर..” “काही पर्यायच नाहीये ना आता…बरं इथून लवकर कसं निघता येईल ते बघ, मी जास्त दिवस अशी नाही राहू शकत..” “हो हो, मी करतो काहितरी… तू काळजी करू नकोस..” रात्री शिखाला अचानक थंडी वाजायला लागली, अंगात ताप भरला…लहाण्या सासूबाईंना समजलं तश्या त्या आत आल्या… “काय गं… जास्त त्रास होतोय … Read more

अशिक्षित सून हवी (भाग 2)

लग्नाच्या पहिल्याच दिवशी शिखा आणि साहिल मध्ये जोरदार भांडण झालं…साहिल रोमँटिक मूड मध्ये खोलीत घुसताच शिखा हातात येईल ती वस्तू साहिलवर फेकून मारू लागली… “फसवलं मला…तुला लाज कशी वाटली नाही…मी चौथी पास काय….” शिखा चे डोळे लाल झालेले असतात, अंगात राक्षस संचारलेला असतो…अश्या अवस्थेत ती काय करेल काही सांगता येत नव्हतं.. साहिलला लक्षात आलं की … Read more

अशिक्षित सून हवी…अं??’शिक्षित??

सर्व चॅनेल वर बिल्डर सुधीरच्या अटकेची बातमी दाखवत होते, सुधीर नुकतीच वकिलांशी चर्चा करून बाहेर पडत होते तेवढ्यात मीडियाने त्यांना घेराव घातला.. “जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप आपल्यावर आहे, काय सांगाल त्याबद्दल..” “ती जमीन शेतकऱ्यांची आहे असं ऐकिवात आहे, तुम्ही खरंच शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवल्या का??” सुधीर कुणालाही उत्तर न देता आपल्या अंगरक्षकांआडून पुढे चालत होते… एवढ्यात मागून … Read more

राधिकाचं आगळंवेगळं वाण

 “या वयात काय होऊन जातं कुणास ठाऊक…कसली कामं होत नाही अन कसला उत्साह राहत नाही…अंग जड पडतं, साधी भाजी टाकायची तरी अर्धा तास लागून जातो…” राधिकाच्या सासूबाई असं सांगत असतानाच तिला आईचं बोलणं आठवलं, आईही अगदी हेच म्हणत होती…दोघींनी वयाची पन्नाशी ओलांडली होती…रजोनिवृत्ती चा काळ होता आणि शारीरिक बदल दोघींना त्रस्त करत होते… अधिक मासात … Read more

जमणार नाही…!!!

 संध्याकाळचे साडेपाच वाजले अन धाकल्या जाऊबाई ऑफिसहून घरी परतल्या. मोठ्या जाउबाई तिला आल्या आल्या चहा देत, पण आज त्या काही दिसत नव्हत्या…सासूबाई सोफ्यावरच आडव्या पडून होत्या. तिने विचारलं,  “साधना ताई बाहेर गेल्यात का?” “हो…दवाखान्यात..” “काय झालं? बरं नाही का त्यांना??” “चक्कर येत होती म्हणे…काय माहीत काय झालं..” सासूबाईंच्या चेहऱ्यावर कसलीच काळजी नव्हती…इतक्यात मोठ्या जाउबाई आणि … Read more

खापर कायम आईवरच…

 संध्याकाळचे 7 वाजून गेले तरी मंगेशचा पत्ता नव्हता, कॉलेजमधून एरवी 4 वाजताच घरी परतणाऱ्या मंगेशला आज इतका उशीर का झाला हेच समजत नव्हतं… आई काळजीत पडली, त्याचा फोन बंद येत होता. आणि त्याचे मित्र तर फोनही उचलत नव्हते. आईच्या मनात विचित्र विचार येऊ लागलेले… त्यात घरातले सासू सासरे सतत विचारून तिला हैराण करत होते. 6 … Read more

भिंती नको…माणसं हवी

 “सुधीर..सुनबाई इतका हट्ट करतेय तर कर की काहीतरी खटाटोप..” “आता तुपण हो तिच्या बाजूने..” “अरे बाईच्या जातीला असते हौस, तुम्ही माणसं 10-10 तास बाहेर असता…बाईचं विश्व म्हणजे हे घरच असतं..24 तास तिथंच राबत असते, मग ते घर छान असावं, मोठं असावं असं तिला वाटलं तर काय चूक?” “बरं… बघतो..” मनात आकडेमोड करत सुधीर निघून गेला…अलका … Read more