सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 6

  श्रद्धा च्या सासूबाईंच्या आई त्या 23 वर्षाच्या असतानाच देवाघरी गेलेल्या…सासूबाई तेव्हा खूप लहान होत्या. श्रद्धा ने ती माहिती काढली आणि दळवी सरांना सांगितलं.. “हे बघा…आईंना सांगा की तुम्हाला देवाने स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला की मी तुमची आई आहे…म्हणजे श्रद्धा सासूबाईंच्या आई आहेत असं सांगा…” दळवी सरांकडे काही ऑप्शनच नव्हता…त्यांनी ताईला सांगितलं आणि सासूबाई आता … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 5

  श्रद्धा तिच्या डब्याची आणि नोकरीवर जायची सोय लावून ठेवते…सासूबाई श्रद्धा च्या बोलण्यात अडकून ती सांगेल तसं करत होत्या.. श्रद्धा ने घरात एकेकाच्या सवयी पहिल्या…केतन आणि त्याचे वडील स्वतःचं कुठलंच काम स्वतः करत नव्हते…अगदी स्वतःची चादर घडी करून सुद्धा ठेवत नव्हते…किचन मध्ये कुणी पाय ठेवत नव्हतं, साधा चहा सुद्धा दोघांपैकी कुणी बनवत नसायचं…सासूबाई सर्व स्वतः … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 4

  लग्नाची तयारी सुरू होते…जेवणाचा मेनू ठरतो…श्रद्धा चे वडील ऍडव्हान्स देऊन मोकळे होतात… “ओ थांबा…कुठे चाललात? लग्न माझं आहे…सरका बाजूला…हं… तर काय काय देणार तुम्ही??” “भात, वरण, दोन भाज्या, कोशिंबीर, पापड..” “एव्हढ्याचे 70 हजार रुपये??” “हो म्हणजे तेवढी क्राऊड पण आहे ना..” “ताट मोजायला कोण आहे?” “आम्हीच मोजतो…” “बरं….” “अर्धे पैसे लग्नानंतर घेऊन जा…” “हो … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 3

  सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 3 ऑफिस मध्ये गेल्यावर केतन आणि श्रद्धा भेटतात.. “केतन, सॉरी मी आज जरा आगाऊ वागले…पण आपल्याला लग्न करायचं असेल तर दुसरा पर्याय नव्हता..” “मला नाही वाटत आपलं लग्न होईल…आणि नाही झालेलं चांगलं राहील..” “असं का म्हणतोय?? “ “कारण आईच्या अपेक्षा खूप अवास्तव आणि भलत्यासलत्या आहेत…नोकरी करणारी सून नको, बाहेर … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 2

  कॉलेज सोडल्यानंतर श्रद्धा ची ओळख नोकरीच्या ठिकाणी असलेल्या केतन सोबत होते…केतन अत्यंत सच्चा माणूस…आणि श्रद्धा ला अशीच खरी माणसं आवडायची…खोट्याचा तिला प्रचंड राग असायचा… घरी परत येत असताना वाटेत एक मंदिर लागायचं.. तिथे एक ढोंगी बाबा आपले चमत्कार दाखवून लोकांना लुबाडायचा… एकदा श्रद्धा ने त्याला तिथून पिटाळून लावलं होतं… पुन्हा तो दिसला नाही…पण काही … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 1

  “सर सही देत नाहीये यार…लास्ट सबमिशन आहे…एका सही साठी अडून राहिलंय..” “सकाळपासून ताटकळत बसलोय..दर वेळी गेलो की सर म्हणतात नंतर या..” “काय मिळतं यांना असं विद्यार्थ्यांना ताटकळत ठेऊन??” “यावर एकच उपाय..” “श्रद्धा…” “कुठेय ती..??” “बोलवा तिला..” सगळेजण श्रद्धा ला शोधतात…1st फ्लोअर वरून खाली पार्किंग मध्ये बघतात.. “दहा झाल्या फक्त…अजून 40 बाकिये..” श्रद्धा समोर 4 … Read more

परिवर्तन

  “तुझी वहिनी बघ..तुलाही कधी जमली नाही अशी भाजी बनवली तिने..आणि घर इतकं टापटीप आणि छान ठेवलंय ना…नाहीतर एक तू होती, घरभर नुसता पसारा आणि तू बनवलेली भाजी म्हणजे अंगावर काटाच यायचा…” वहिनी खुदकन हसली, आणि मी बळेच रागावून, “जेव्हा पहावं तेव्हा वहिनीचं कौतुक, आम्ही काही कामाचेच नाही…ना?” वहिनीचं कौतुक ऐकून मी सुखावले होते, आई … Read more

“आमच्या वेळी नव्हतं असं…”

  “आमच्या वेळी नव्हतं बाई असं..” हे ऐकून ऐकून स्मिता चे कान विटले होते..पण सासूबाईंच्या या वाक्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी ती भोळी नव्हतीच…काहीतरी केलंच पाहिजे ज्याने ही टेप बंद होईल…पण काय करावं तिला काही सुचेना… घरात पाहुणे आले तसं सासूबाईंनी स्मिता ला आवाज दिला. गावाकडची मंडळी होती, सासूबाईंच्या मते हिने साडी घालून समोर यायला हवं. पण … Read more

का जपायचंय तिला?

  मराठी कथाMarathi stories राधा काकू नेहमीप्रमाणे सुनेला घेऊन दवाखान्यात गेल्या, दर महिन्याला तिची तपासणी असायची. एका असाध्य आजाराने जखडलेल्या शर्मिला ला त्या आजाराने पूर्ण परावलंबी बनवलं होतं. दवाखान्यात असलेल्या एका नर्स ला शर्मिला ची देखरेख करायला सांगितलेली…राधा काकू शर्मिला च्या सासुबाई आहेत हे ऐकूनच तिला धाक बसला..कारण आई असती तर गोष्ट वेगळी होती, पण … Read more

का असावे स्वावलंबी??

  “कशाला हे असले उपद्व्याप करत बसतेस… लोकं काय म्हणत असतील..नवरा मोठा मॅनेजर आणि बायको घरात शिवणकाम करते…” रुचिता खूप दिवसांनी तिच्या मैत्रिणीला भेटते आणि तिला शिवणकाम करताना बघून हे वाक्य बोलून जाते. “अगं अशी हलकी कामं कशाला करतेस? आणि खरं सांग तुला पैशाची गरज तरी आहे का?” “अगं चित्रा, केवळ पैशांसाठी नाही करत मी…काम … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 3)

“खरंच मॅडम, इतक्या सहजासहजी कसं ओळखलं तुम्ही चोरांना? आणि तेही तासाभरात??” “मी लहानपणी गावाला जायचे आजीकडे, तिथे छान उसाची शेतं होती. आम्ही इतकी मजा करायचो ना, शेतात दिवसभर खेळत असायचो…आमचा एक चुलतभाऊ होता..त्याची एकदा गंमतच झाली बघा, त्याचा निकाल लागला होता शाळेचा, बाबा रागावतील म्हणून गायब होऊन गेला..आम्ही त्याला वेड्यासारखं शोध शोध शोधलं..” “यांच्या घराला … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 2)

शौर्या आपली साडी सांभाळत पोलीस स्टेशन मध्ये जाते. मागे वळून आपल्या नवऱ्याला सांगते.. “तुम्ही फ्लॅट वर जा… पोरांना खाऊ घालून झोपवून द्या…डबा आहे ना सोबत??” नवरा बागेतून डबा काढतो, एका कपड्यात बांधलेल्या पोळ्या दाखवतो… “हा..जा आता, मी आले थोड्या वेळात…पोरांनो, पप्पांना त्रास द्यायचा नाही..बंट्या…बंट्या??? कुठे गेला हा??”” बंटी पोलीस स्टेशन मधेच हरवून जातो. शौर्या एकदम … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 1)

पोलीस स्टेशन मध्ये आज जोरदार धावपळ सुरू होती. शहरात नवीन ACP मॅडम येणार होत्या, एक तर कुणी पुरुष पोलीस असता तरी पोलीस स्टेशन मध्ये इतकी धावपळ नसे..पण महिला पोलीस म्हटली की कडेकोट शिस्त, दरारा..त्यात महिला असल्याने एक जबरदस्त अभिमान.. हे त्या पोलीस स्टेशन ने बऱ्याचदा अनुभवलं होतं.. “ए शूज पॉलिश केलेत का..” “हा आज केलेत..” … Read more

अशिक्षित सून हवी (भाग 11 अंतिम)

रावसाहेबांच्या चेहऱ्यावर आज वेगळीच चमक असते..भावना रावसाहेबांसमोर येते आणि म्हणते.. “अभिनंदन… सत्याची नेहमी जीत होत असते…तुमची बाजू सत्याची होती, तुम्ही जिंकलात.. ” “सत्याची नेहमीच जीत होते असं नाही..काही पूर्वग्रह आणि विचार सत्यालाही पायचीत करतात..” भावनाला रावसाहेबांचा रोख समजला…राबसाहेब पुढे बोलायला लागले.. “तुझी बाजू सत्याची होती भावना..तुझ्या वकिली व्यवसायाला अनुसरून सत्याची बाजू धरून ठेवणारा तुझा स्वभाव, … Read more

लग्न की शिक्षण

  “आई तुला कितीवेळा सांगितलं आहे,  की मला लग्न करायचं नाहीये… तरी का हात धुऊन माझ्या मागे लागलीयेस?” “अरे बेटा तुला समजतेय का? योग्य वयात लग्न झालं नाही  नाही तर पुढे जाऊन तुला कोण मुलगा देणार आहे?” “आई,  पण माझं नुकतंच शिक्षण संपलेलं आहे… पुढे मला नोकरी करायची आहे आहे त्यासाठी पुढील शिक्षण घ्यायचं आहे..” “लग्न … Read more

नात्यातला विरोधाभास

 आई अगं वाहिनीसोबत का असं वागतेस? तीही माझ्यातकीच शिकलेली आहे, मला तू किती सपोर्ट करतेस आणि तिला मात्र घरकामात अडकवून ठेवलस. “हे बघ, मला शिकवू नकोस, मी सासू आहे तिची, आणि आपल्या घरात हेच चालतं.. तू तुझ्या घरी तुला हवं ते कर…आणि सून ती सूनच असते, मुलीची सर तिला येत नाही”त्या क्षणी पूनम ला आपण … Read more

देवचिये द्वारी…

 क्षणभर त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना..ज्या मंदिराच्या गाभाऱ्यात तो कितीतरी वेळ रडत बसला होता, त्याच मूर्तीतून देव पुढ्यात येऊन उभा राहिला…भगवंताने त्याला साक्षात्कार दिला आणि तो क्षणभर चक्रावला… “रडू नकोस बाळ…तुझ्या दुःखाने मी कळवळलोय…सांग तुला काय हवंय..” अद्वैत आयुष्यात सतत येणाऱ्या अपयशामुळे खचुन गेला होता..त्याचा स्वतःवरचा विश्वासच उडाला होता…त्याने देवाला सांगितलं.. “एक गोष्ट असेल तर … Read more

वास्तुदोष

   आज पुन्हा घरातल्या कटकटीला कंटाळून मोहित घरातून निघून गेला, “वास्तुदोष असेल का घरात? कापटाची जागा तर चुकीची नाही ना? झोपायची दिशा चुकतेय का? शांती करावी लागेल बहुतेक…सगळंच गणित चुकतंय…घरात 2 मिनिट शांतता नांदत नाही…” असे असंख्य विचार त्याचा मनात फेर घालत होते.. सकाळपासून जे झालं त्याचा मोहित विचार करू लागला… “रोजचंच आहे, सकाळी सुचित्रा … Read more

नियतीचा खेळ

 मिथिला आणि नकुल च्या आयुष्याने असं काही वळण घेतलं होतं की नियतीने हा खेळ त्या दोघांसोबतच का खेळावा हा प्रश्न सतत दोघांना सतावत होता…भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यातली दरी मिटवायला दोघांचं एकत्र येणं जरुरी होतं… पण भूतकाळात जे दोघे एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनले होते, तेच आज एकमेकाला नाकारत होते…   <body> साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट, मिथिला … Read more

अशिक्षित सून हवी (भाग 10)

घरातले सर्वजण जमा होतात..वकील भावना पूर्ण घराकडे एकदा डोळे भरून बघते…अरुण धावत बाहेर येतो..दोघेही एकमेकांकडे ओल्या नजरेने बघतात..शिखा हळूच लहान सासूबाईंना विचारते.. “कोण आहे??” “भावना…मोठ्या जाऊबाईंची घर सोडून गेलेली सून..” शिखाला आठवतं, वकील असलेली ही घरातली मोठी सून, शिकलेली होती म्हणून तिला घर सोडून जावं लागलेलं… ती आज अचानक आली, इतक्या वर्षांनी… भावनाशी कुणीही बोलत … Read more