कुणाच्या खांद्यावर

 कुणाच्या खांद्यावर… बहिणीच्या लग्नात वहिनीची धावपळ मी बघत होते, दोन मिनिटं बसायला तिला उसंत नव्हती, तिकडे दादा मात्र निवांत खुर्चीवर बसून मित्रांसोबत गप्पा मारत होता..त्याच्यासोबत बसलेला माझा मामा..लग्न म्हणजे पुरुषांना निवांत बसण्याची जागाच जणू..एकदा का खुर्च्यांवर बुड टेकवले की जेवायलाच उठणार…मामाची बायको मात्र इकडे पाहुण्यांना चहा देण्यात गर्क होती..अधूनमधून मामा मामीला हाक मारून नवीन आलेल्या … Read more

सूनबाईचा मित्र (भाग 4)

दुसऱ्या दिवशी प्रभा सकाळी तयार होऊन पिंट्याची वाट बघत बसते, श्वेताची आई त्यांच्याजवळ येऊन बसते.. “विहिनबाई.. आल्यापासून बघतेय मी, तुम्ही दुसरीकडेच हरवलेल्या दिसताय, आणि श्वेतासोबत तिच्या माहेरीही आल्या आहात..खरं सांगा, आमचं काय चुकलं? श्वेता कडून काही चुकलं का? संकोच बाळगू नका..” “छे हो…तुम्हाला माहीत नाही मी इथे कशासाठी आलीये ते..” “कशासाठी??” “ती बोरं..” “अगं आईंना … Read more

सूनबाईचा मित्र (भाग 3)

श्वेताची सकाळपासून धावपळ सुरू होती, माहेरी जायचं पण इथे सर्वांची सोय तिने करून दिलेली, “बाबा, मी चिवडा, शंकरपाळे वर काढून ठेवलेत..नाश्त्याला लागले तर वरतीच दिसतील..आणि काकतकर काकूंना डबा सांगितलं आहे 2 वेळचा. बाहेरून काही मागवू नका. “ प्रभा तर केव्हाच तयार होऊन बसलेली, गावाकडची बोरं तिच्या डोळ्यासमोर येत होती. श्वेताची घराबाबत काळजी बघून प्रभाला खूप … Read more

सूनबाईचा मित्र (भाग 2)

सकाळचे 11 वाजले तरी सासूबाई उठल्या नव्हत्या, श्वेताला काळजी वाटू लागली, तिने केदारला सांगितलं, पण मला आज मिटिंग आहे म्हणत त्याने घाईतघाईत घर सोडलं…श्वेता त्यांच्या खोलीत गेली.. “सासूबाई… ओ सासूबाईं…” तरीही सासूबाईंचा काही प्रतिसाद नाही, श्वेता अजून घाबरली, तिने सासऱ्यांना सांगितलं, ते म्हणाले.. “काल सकाळी 6 पर्यन्त मिर्झापुर सिझन 2 पाहत होती, कशी उठणार ती?” … Read more

सूनबाईचा मित्र (भाग 1)

सूनबाईचा मित्र (भाग 1) “या अरुंधतीने ना चांगली कानफटात मारायला हवी त्या अनिरुद्ध च्या…इतके उपद्व्याप करूनही वर तोंड करून बोलतो, काही लाजच नाही या माणसाला..” “पुढच्या वेळेस मी गेलो की सांगेन हो तिला..” “त्या गुरुनाथ सारखी धिंड काढायला हवी याची, राधिका सारखी का नाही वागत ही??” “अगं हिला मसाले बनवता येत नसतील..” “हो पण गाणं … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (अंतिम)

नाईक आणि जैन त्या 2 संशयितांना पकडण्याचा प्रयत्न करतात, ते हाती लागताच त्यांची चौकशी होते.. खूप मार खाल्ल्यानंतर ते कबूल होतात की या ठिकाणी हल्ला करणार होते. त्यांच्याकडून भरपूर बॉम्बसाठा जप्त करण्यात आला. नाईक आणि जैन एक सुस्कारा टाकतात, त्यांनी फार मोठी कामगिरी केली होती. शौर्या नाईकांना फोन करून सगळं विचारते आणि माहिती घेते. ज्या … Read more

पुरुष

  विशाखा नवऱ्यासोबत शहरात आली तसं तिचं व्यक्तिमत्वच बदलून गेलं. छोट्याश्या खेडेगावात वाढलेली ती, काकांनी ओळखीतलं स्थळ आणलं आणि सगळ्या गोष्टी बघून विशाखाच्या आई वडिलांनी होकार देऊन टाकला. विशाखाला विचारण्याची गरजही त्यांना वाटली नाही. विशाखा हो ला हो लावत बोहल्यावर चढली, कारण त्या काळात आणि त्या गावात मुलींना स्वतःचं मत असं नव्हतंच. पण आई वडिलांचा … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 7)

 भाग 1 https://www.irablogging.in/2020/10/1.html भाग 2https://www.irablogging.in/2020/10/2_28.html भाग 3https://www.irablogging.in/2020/10/3_29.html भाग 4https://www.irablogging.in/2020/11/4.html?m=1 भाग 5https://www.irablogging.in/2020/11/5_9.html भाग 6 https://www.irablogging.in/2020/11/6_18.html?m=1 ATS पथकाकडून शौर्याच्या डिपार्टमेंट ला अलर्ट करण्यात येतं, दहशतवादी येत्या 24 तारखेला हल्ला करणार अशी बातमी त्यांचाकडे पोहोचते..शौर्या वर मोठी जबाबदारी येऊन पडते, यावेळी तिला धीराने काम पार पडावं लागणार होतं. डिपार्टमेंट मध्ये काम उशिरा पर्यन्त चालायचं, आलेले 2 दहशतवादी शोधण्यासाठी … Read more

पेच

 घराच्या गेटजवळ उभी असतानाच दुरून माझ्या एका विद्यार्थिनीची आई जवळ येताना दिसली, लांबूनच त्यांनी मला पाहिलं, आणि पाहताक्षणी झपाझप पावलं टाकत माझ्याजवळ येऊ लागल्या, त्यांना काहीतरी सांगायचं आहे असं माझ्या लक्षात आलं.. त्या जवळ येताच त्यांना मी खुशहाली विचारली, त्यांनी बाकीचं काहीही न बोलता सरळ माझा हात हातात घेतला अन रडू लागल्या.. त्यांचं एकंदरीत अवसान … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 6)

तिकडे सूर्यभान सैरभैर होतो, एक तर शौर्याच्या मुलांनी पळ काढलेला असतो अन वर त्याचे कुटुंबीय गायब असतात. काय करावं त्याला सुचेना.. त्याचे सहकारी त्याला पोलिसात जायचा सल्ला देतात, पण कोणत्या तोंडाने तो जाणार होता? पण कुटुंबियांपुढे तो हतबल होतो.हात जोडून पोलिसांसमोर नतमस्तक व्हायला तयार होतो.. “काय, तुझे आई बाप गायब झालेत वाटतं..” पोलीस स्टेशनमध्ये गेल्या … Read more

“तू देवीची भक्त होऊच शकत नाही”

 “अगं आज नवरात्रीचा दिवस, आजही उशिरा उठलीस??” “आई ते रात्री उशिरापर्यंत खूप काम..” “देवाधर्माचं नको काही…आजच्या दिवशी सुना मुली लवकर उठून सडा रांगोळी करतात, लवकर अंघोळ करून साडी नेसून पूजेची तयारी करतात…आणि हे बघा..” गौरीला ओशाळल्यागत झालं, तिला स्वतःचीच लाज वाटू लागली..पण काय करणार, तिचं कामच असं होतं की रात्री अपरात्री केव्हाही मिटिंग साठी तयार … Read more

जोडलेली माणसं.

 घराच्या अंगणात अण्णा येरझारा घालत होते, त्यांचं मन स्थिर नव्हतं..शहरात असलेल्या आपल्या मुलाला ऍडमिट केलंय म्हटल्यावर अण्णांना नुसती चक्कर येत होती. राहुलच्या मित्राचा फोन आलेला.. “काका राहुलला ऍडमिट केलंय, जमलं तर येऊन जा..” त्याने फार काही माहिती दिली नव्हती, पण अण्णांच्या मनात नको ते विचार येऊन गेलेले..पटकन सदरा चढवून ते तयार झालेले…शेजारच्या बाळूला रिक्षा आणायला … Read more

देवपूजा कशी करावी?

 देवपूजा कशी करावी? लहानपणी आजी देवपूजा करत असायची तेव्हा तिच्याजवळ बसून लुडबुड करायला फार मजा यायची. आजीचं आखीव रेखीव काम, मूर्त्यांना लहान बाळाप्रमाणे नाजूकपणे त्यांची अंघोळ घालणं, मग त्यांना नक्षीदार कपडे चढवनं, सगळं अगदी मन लावून मी बघायची…देवांच्या जागा अगदी फिक्स होत्या, गणपती उजव्या बाजूला, देवी मध्यभागी आणि शंकराची पिंड डाव्या बाजूला..आजीला सहज विचारलं, आजी … Read more

मॅरेथॉन

 मॅरेथॉन मॅरेथॉन म्हणजे अनघासाठी एक सोहळाच जणू. लहानपणापासून तिला धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्याची भारी आवड. पहिला नंबर तिने कधी सोडला नव्हता. राज्यस्तरीय स्पर्धेपर्यन्त तिने मजल मारली होती. शिक्षण झाल्यानंतर मॅरेथॉन सोडणार नाही या एका अटीवर तिने सुहासला हो म्हटलं होतं. अनघाने सांसारिक जबाबदाऱ्या स्वीकारल्या, सासू, सासरे आणि नवरा यांना तक्रारीला जागाच सोडली नाही, 1 वर्ष … Read more

वर्दी माझी झक्कास👌👌👌 (भाग 5)

 “येतील..” शौर्या थंडपणे उत्तर देते.. “अगं येतील काय. . नेहमीपेक्षा 2 तास उशीर झालाय त्यांना..” “काही होणार नाही..” “सगळ्या गोष्टी तुला सोप्या वाटतात…नाईक, तुम्ही complaint लिहून घ्या बरं… “ “काळजी करू नका..आम्ही शोधून काढतो मुलांना..” नाईक जीप काढतात, 2 पोलिसांना घेतात आणि शाळेकडे निघतात.. “अहो उगाच वेळ वाया घालवताय तुम्ही..” शौर्या मागून आवाज देते पण … Read more

माहेरपण

 कावेरी आज खूप दिवसांनी माहेरी आली होती. लग्न झाल्यापासून जवळपास एक वर्षांनंतर. सासर अगदी दूर होतं. 3 दिवस लागायचे पोहोचायला. यावेळी चांगलं महिनाभर राहायचं म्हणून ती परवानगी काढून आली होती. पूर्ण प्रवासात तिच्या मनात आनंदाच्या लहरी उसळत होत्या. लग्नानंतर नव्याची नवलाई संपून जबाबदारी अंगावर पडली होती. कोवळ्या मुलीचं रूपांतर अचानक जबाबदार स्त्री मध्ये झालं होतं. … Read more

मस्ती की पाठशाला – भाग 5

  आकाश आणि क्रांती कॉलेज सुटल्यावर विद्या मॅडम ला भेटतात..दोघेही घाबरलेली असतात, मॅडम काय करतील? आपल्याला बोलतील का? की आपल्या घरी सांगतील? दोघेही दबक्या पावलांनी कँटीन मध्ये विद्या ला भेटले… “या या..बसा इथे..” दोघेही विद्या समोर बसतात.. “मग…आकाश…तुला क्रांती आवडते?” “अं??” या अनपेक्षित प्रश्नाने दोघे गोंधळून जातात.. “क्रांती, तुला आकाश आवडतो? हे बघा लाजू नका…वर्गात … Read more

मस्ती की पाठशाला (भाग 10)

  प्रिन्सिपल सरांकडून झालेला अपमान जोशी सरांच्या जिव्हारी बसतो…ते वर्गात येतात..पूर्ण वर्गाकडे एक कटाक्ष टाकतात.. “हे काम कुणी केलं मला माहीत नाही…मी आत्ता नाही बोलणार तुम्हाला काही, पण जेव्हा परीक्षा होईल आणि रिझल्ट येईल ना, तेव्हा मला भेटा…बघू, math मध्ये काय काय दिवे लावताय तुम्ही..चॅलेंज आहे माझं…” नंतर विद्या मॅम चा तास असतो, वर्गात आल्यावर … Read more

मस्ती की पाठशाला (भाग 9)

   परीक्षा जवळ आलेली असते. विद्या पूर्ण मेहनतीने मुलांचा अभ्यास घेत असते. विद्याची लोकप्रियता इतर स्टाफ च्या डोळ्यात खुपु लागलेली. इतर प्रोफेसर नी आपला syllabus थोडक्यात आटोपून घेतला होता, पण विद्या मात्र मुलांना प्रत्येक chapter खोलात जाऊन शिकवत होती. त्यामुळे तिचा syllabus बराच मागे होता. एकदा प्रिन्सिपल ने विद्या ला त्यांच्या ऑफिस मध्ये बोलावलं..दिशा सुद्धा … Read more

मस्ती की पाठशाला – (भाग 8)

   आणि अशा प्रकारे विद्यार्थी विद्या चं टेन्शन दूर करतात. विद्या ला तर भणक ही नसते…जेव्हा तिला समजतं तेव्हा तिला खूप बरं वाटतं, विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी इतकं करावं? तिला कौतुक वाटलं..पण विद्यार्थ्यांनी जे काही केलं ते एक शिक्षक म्हणून तिला आवडलं नाही. त्यांचा मार्ग वेगळा होता, त्यावरून तिने विद्यार्थ्यांना रागवायचं ठरवलं.. दुसऱ्या दिवशी वर्गात.. विद्या मुद्दाम … Read more