मिस परफेक्ट (भाग 7)

 “हो प्लिज… तुम्हाला इथून काढलं म्हटल्यावर तो कलाइन्ट चिडले, आमच्यासोबत काम करणं सोडेल अन कंपनी तोट्यात येईल माझी…” “बरं.. मग रिक्वेस्ट करताय की…” “रिक्वेस्ट…प्लिज या परत..आणि मला माफ करा…” ठीक आहे.. मोठ्या रुबाबात माधवी परत ऑफिस मध्ये शिरते… “ऑफिस मधले लोकं विचारतात, सर कुठेय?” “माझी गाडी पार्क करताय…” “आं?????” सर्वजण अवाक होऊन पाहत उभे राहिले… … Read more

मिस परफेक्ट (भाग 6)

 माधवी ला ऑफिस मधल्या लोकांचं असं उशिरा पर्यन्त थांबलेलं आवडलं नाही… “काय गं सुनीता, तुला तरी पटतंय का हे?” “कुणाला पटेल सांग..हा बॉस इतका स्ट्रिक्ट आहे ना, बोलायला गेलो तर नोकरीवरून काढून टाकेल..” “मी बोलते मग..” “अगं वेडी आहेस का, एक तर तू आत्ताच जॉईन झालीये..” “मग काय झालं, मला असही गरज नाहीये जॉब ची…वेळ … Read more

मिस परफेक्ट (भाग 4)

 “माफ कर मला…पुन्हा असा आगाऊपणा मी करणारच नाही..कानाला खडा..” इतक्यात तुषार वर्तमानपत्र घेऊन माधवी कडे येतो.. “माधवी हे बघ…शहरात एका कंपनीत vacancy आहे..खूप चांगली पोस्ट आहे आणि पगारही चांगला आहे..जातेस का interview ला?” “हो हो…खरंच जा…घरातले खजूर तरी संपणार नाहीत…” दुर्गाबाई सांगतात… “खजूर??” “काही नाही…कधी आहे interview?” “उद्याच…” माधवी तयार होते अन interview ला जाते… … Read more

मिस परफेक्ट (भाग 3)

 “I love you…एवढंच सांगायचं होतं तुला??” “हे एवढंच आहे?” “नाहीतर काय, आपली पसंती झाली… लग्न झालं…मग I love you ची काय गरज? ते सिनेमात असतं फक्त..अन समज आत्ता नकार दिला तुला…तर????..” “बरं बाई…सॉरी…” “काही थ्रिलच नाही…” “कसलं?” “मला वाटलं होतं काहीतरी थ्रिलिंग होईल लाईफ मध्ये…तू मला आत्ता सांगशील, की तुझं already लग्न झालंय…तुला 2 मुलं … Read more

मिस परफेक्ट (भाग 2)

 दुर्गा बाईंचा मुलगा वयात आलेला असतो, माधवी चेही कॉलेज सम्पलेले असते. माधवी च्या आई वडिलांना तिच्या लग्नाची घाई असते. आई माधवी ला म्हणते, “पोरी लग्नासाठी आहेस का तयार?” “कधीच..” “आं? अगं लग्न म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही…खूप गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतील..” “सगळं सोपं असतं…. chill..” आईला माधवी चा बिनधास्त स्वभाव माहीत होता, पण हा स्वभाव लग्नानंतर … Read more

मिस परफेक्ट (भाग 1)

 “माधवी…अगं ए माधवी थांब…” पार्किंग मधून गाडी काढत निघालेल्या माधवी ला तिच्या मैत्रिणीने, शुभरा ने हाक दिली तशी ती थांबली.. “काय गं..” “या तुझ्या फाईल्स…तू लॅब मधेच विसरली होतील…उद्या सबमिशन आहे…” “Ok thank you..” इतके थंड उद्गार काढून माधवी फाईल्स बॅग मध्ये ठेऊ लागली.. “अगं ए..thank you राहू दे…फाईल्स मला दिसल्या नसत्या तर काय केलं … Read more

लग्नसंस्था

 शाळेत असतांना लिसा सोबत झालेली मैत्री श्रेयाच्या चांगलीच आठवणीत होती. लिसाचे वडील अँड्र्यू ब्रॅडी, एक मोठे बिझनेसमन. लिसा शाळेत असताना त्यांनी त्यांची एक शाखा भारतात सुरू केलेली आणि जवळजवळ सहा वर्षे ते भारतातच होते. या काळात लिसाला इथल्याच एका शाळेत त्यांनी भरती केलं जिथे श्रेयासोबत लिसाची चांगलीच गट्टी जमलेली. परदेशी चेहरा, इंग्रजी बोलणं यामुळे लिसा … Read more

रणधुमाळी (भाग 8)

  संध्याकाळ झालेली, नोकरीवरून, कोलेजवरून माणसं परतत होते…अंधार वाढत चालला होता…रस्त्यावर बर्यापैकी गर्दी होती…आणि अचानक गणपतरावांच्या होर्डिंग वर प्रकाश चमकू लागला… लोकं उत्सुकतेने थांबून पाहायला लागले… अंधार पडायला लागला तेव्हा होर्डिंग अंधुक दिसायला लागलं, सानिका ने हीच योग्य वेळ समजून समोरच्या एका ठिकाणी प्रोजेक्टर ची व्यवस्था केली आणि गणपतरावांच्याच होर्डिंग वर आपला “transparent board” ची … Read more

रणधुमाळी (भाग 7)

 “उद्या सकाळी सकाळी निघायचं, प्रत्येक घरात…प्रत्येक माणसाला पकडायचं… त्याच्या हातात ह्या पैशांची चळत ठेवायची…आणि धमकवायचं…आम्ही छुपे कॅमेरे लावले आहेत असं सांगायचं, त्यामुळे चुकीचं मतदान केलं तर तुमच्या घरासकट तुम्हाला जाळून टाकू अशी धमकी द्यायची….एवढं सगळं केल्यावर, बघू कोण मत देतं त्या सानिका ला…”   गणपतराव इरेला पेटले होते..सानिका च्या येण्याने त्यांच्या राजकीय वजनावर खूप मोठा … Read more

रणधुमाळी (भाग 6)

व्हिडीओ संपल्यानंतर सानिका दिसू लागली, ती बोलत होती.. “नमस्कार समाजबांधवांनो…तुम्ही आता पहिलंच असेल की पुतळ्याची विटंबना कुणी आणि का केली असेल…लक्षात घ्या, गणपतराव हे राजकारण मतांसाठी करताय…स्वतःच पुतळ्याची विटंबना करायची, जनतेत संताप निर्माण करायचा… त्याला अजून ठिणगी द्यायची आणि मी तुमचा वाली आहे असा आव आणत मतं मिळवायची…राजकारणात ह्या असल्या व्यक्तीला तुम्ही मत देणार??? आता … Read more

रणधुमाळी (भाग 5)

रामू काका, जे नुकतेच घरात नोकर म्हणून कामाला येत असतात तेच गणपत रावांचे हेर असतात. रामू काका हात जोडून गयावया करतात… “ताईसाहेब माफ करा… घरात फार गरिबी आहे माझ्या, पैशासाठी हे सगळं केलं…माफ करा…” सानिका आणि रामू काकांचं दीर्घकाळ बोलणं होतं… आणि अखेर रामुकाका गाव सोडून निघून जातात. गणपतराव रामू काकांशी संपर्क करून करून थकतात… … Read more

रणधुमाळी (भाग 4)

सानिका ला आत्ताच आवर घालावा लागेल, या विचाराने 2 गुंड तिच्या ऑफिस मध्ये धाडले गेले… “मॅडम, बस झालं तुमचं…चुपचाप अर्ज मागे घ्या….” “आणि नाही घेतला तर?” “मला वाटतं तुमच्या घरी बरीच मंडळी आहेत..फार जीव आहे तुमचा त्यांच्यावर…” “बोला कोणाला उचलता? की मी बोलावू एकेकाला??” या धमकीलाही सानिका जुमानत नाही पाहून गुंड अजून बिथरले… “जास्त शानपट्टी … Read more

रणधुमाळी (भाग 3)

“ए…गप बसते का…” गणपतरावांना चिडायला काय झालं? ती दुर्लक्ष करते आणि कुस बदलून झोपी जाते… गणपतरावांना पहाटे पहाटे ते स्वप्न पडलं आणि त्यांना पुढे झोपच लागली नाही, सकाळचे 7 वाजले, बायको उठली आणि कामाला निघून गेली. गणपतराव खोलीतच येरझारा मारत होते…मधेच पडलेल्या स्वप्नाची त्यांना भीती वाटे, मधेच मनाची समजूत घालत स्वतःशीच हसत होते… गणपतराव तयार … Read more

रणधुमाळी (भाग 2)

“मला राजकारणात अजिबात रस नाही…आणि ..” “हा….आता आली ना आपल्या लायकीवर…एक तर स्वतःमध्ये धमक नाही आणि चालली दुसऱ्याला शिकवायला…राजकारणाला नाव ठेवायचं आणि स्वतः उतरायला लावलं तर फाटते लोकांची…” “हे बघा…” “काय? बोल, अजून अर्ज द्यायला एक दिवस बाकी आहे…राहा गं उभी…मतं कोण देईल असं वाटतंय ना? चल..मी स्वतः मत देतो तुला…उभी राहा, जिंकून दाखव…मग येशील … Read more

रणधुमाळी (भाग 1)

 सानिका नुकतंच आपलं इंजिनिअरिंग चं शिक्षण पूर्ण करून आपल्या घरी आली होती. हॉस्टेल वरची चार वर्षे मजेत काढून आता तिला घराची ओढ लागली होती.  हॉस्टेल वर मजामस्ती होतीच पण जेवणाचे आणि राहण्याचे बरेच हाल झालेले..कधी एकदा आईच्या हातचं खाते असं तिला झालं. कॉलेज सोडतांना तिला बरंच वाईट वाटलं, कारण कॉलेज मध्ये तिचा सर्व उपक्रमात सहभाग … Read more

प्रेमाची ओंजळ

 “विवेक सर तुम्हाला या candidate ला काही प्रश्न विचारायची आहेत का?” विवेक सुन्न झालेल्या नजरेने निशा कडे बघत होता, ती परत आली होती, तब्बल चार वर्षांनी, त्याचाच कंपनीत जॉब साठी, विवेक फार झटपट नोकरीत प्रगती करून वरच्या पोझिशन ला गेला होता…पण निशा? चार वर्षांपूर्वी त्या प्लॅटफॉर्म वरून ती गेली ती गेलीच… कायमची….आणि आज समोर…त्याची पोझिशन, … Read more

तुझ्याविना…

 “मग तुमच्या योग्यतेचीच मुलगी करायची होती, माझ्याशी का लग्न केलंत?” “तेच चुकलं..मला वाटलं गावाकडची असलीस तरी शहरातील गोष्टी करशील आत्मसात… पण तुझ्या या गावठी राहणीमानाला आणि टिपिकल बाई सारख्या वागण्याला कंटाळलोय मी..” “नक्की काय खटकायला लागलं हो तुम्हाला माझं?” “एक गोष्ट असेल तर सांगू… म्हटलं बाहेर तुला घेऊन मिरवायला तू जरा चांगली तयार होशील, चांगले … Read more

तुही है आशिकी (भाग 22)

भाग 1    #तुही_है_आशिकी (भाग 22) कोमलचे वडील काळजीत पडतात, अभिनव नावाचा माणूस आपल्या आयुष्यात का आला हा प्रश्न त्यांना सतावू लागला. त्यांच्या हातात चार दिवस होते, अभिनव गुंड प्रवृत्तीचा असल्याने काहीही झालं तरी कोमलला त्याच्या हाती देणार नाही हे त्यांनी ठरवलं होतं. पोलिसात गेलं म्हणजे गावभर बदनामी. आता त्यांना एकच पर्याय दिसू लागतो..सुरजला सगळं … Read more

जरुरी था (भाग 5 अंतिम)

 श्रीधर तिकडे हर्षदा ला भेटतो आणि इकडे मंगेश मोनिका च्या घरी येतो. त्याला असं अचानक आलेलं पाहून ती धास्तावते. मंगेश गेल्या गेल्या तिचा हात हात हातात हात घेऊन तिच्या डोळ्यात पाहतो. मोनिका क्षणाचाही विचार न करता हात झटकते, पुढच्याच क्षणाला तिने असं का केलं हे तिलाच कळलं नाही. मंगेश वर तिचं प्रेम होता ना?  मंगेश … Read more

जरुरी था (भाग 4)

 “श्रीधर काय बोलतोय तू? आपल्या इतक्या वर्षाचा संसार सोडून मी त्याचाकडे जाईल असं वाटलंच कसं तुला?”   “मोनिका, तू भावनेच्या भरात हे बोलतेय, पण मला तुझ्या डोळ्यात आजही त्याच्याबद्दल प्रेम दिसलं, जे माझ्यासाठी कधीच दिसलं नाही. तुझ्या आयुष्यातली एक सल सतत आपल्यात डोकावत राहिली..ती आता पुसून टाक.. जा तुझ्या पहिल्या प्रेमाकडे…”   मोनिका काहीही न … Read more