भाऊराया-1

“अगं ऐकलं का, उद्या रवी येणार आहे आपल्याकडे”

हे ऐकून ती काही क्षण विचारात गुंग झाली,

“काय गं? जीवावर आलंय की काय तुझ्या?”

“काहीही काय बोलताय, त्याच्यासाठी काहीतरी बनवून ठेवावं असा विचार करत होते”

हे ऐकून तो मनातल्या मनात पुटपुटला, “कसलं काय..”

“आणि रवी एक दोन दिवसासाठी नाही तर महिनाभरासाठी येणार आहे, त्याचा क्लास आहे इकडे, म्हटलं रूम घेण्यापेक्षा इथेच रहा”

“बरं केलंत की मग..चला आता आवरा लवकर आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय”

नेहा आणि सुयश, दोघेही जॉब करत, एकाच वेळी घरातून बाहेर पडत.

रवी हा सुयशचा लहान भाऊ. तो आणि आई वडील गावाकडे होते आणि हे दोघे कामानिमित्त दुसऱ्या शहरात.
सुयश 6 च्या आसपास घरी येई पण नेहाला यायला 7 वाजत. तोपर्यंत सुयश स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून ठेवी. कित्येक महिन्यांपासून हाच दिनक्रम सुरू होता. पण आता रवी येणार तर आपल्याकडून काही कमी नको पडायला म्हणून ती जरा चिंतेत होती.

सुयशला नेहमी वाटे, आपण आपल्या कुटुंबासोबत राहावं, आपल्या बायकोने आपल्या घरच्यांची सेवा करावी, नेहा सुद्धा शक्य असेल तेवढं आपल्या सासरी असतांना करायची, पण सुयशला वाटे की असं वेगळं राहून आपल्या बायकोला उकळ्या फुटत असतील.

प्रत्यक्षात मात्र तसं नव्हतं, नेहा आणि सुयश परिस्थितीमुळे बाहेरगावी रहात. सुयशला ते पचनी पडत नव्हतं, पण नोकरी सोडणं अशक्य आणि मोठ्या शहरात राहायचं म्हणजे एकाच्या पगारावर भागणार नाही म्हणून नाईलाजाने तिचं नोकरी करणं तो सहन करत होता.

दुसऱ्या दिवशी रवी आला. सुयशने अर्धा स्वयंपाक करून ठेवलेला. आपल्या भावाला लवकर जेवायची सवय म्हणून त्याने लवकर कामं आटोपली,

नेहाला यायला उशीर झाला तसा तो तिच्यावर चिडला,

Leave a Comment