तिची काय चूक?-2

आपल्यापेक्षा हिला चांगलं जमलं.. म्हणजे आपण कमी पडलो.. यात तिची काय चूक होती? संध्याकाळी तिच्या नवऱ्याने मुव्हीचे तिकीटं काढली दोघांसाठी.. नणंद तिरकस नजरेने पाहत होती, आजवर दादा माझे हट्ट पुरवत होता, आता बायको आली, तिचे नखरे पुरवणार… तिच्याही मनात असूया, यात तिची काय चूक होती? संध्याकाळी दोघे बाहेर गेले, सूनबाईने स्वयंपाक करून ठेवलेला.. माय लेकी … Read more

तिची काय चूक?-1

99% घरातील सत्य परिस्थिती, दोघांचं लग्न ठरतं, तो- तुला माझ्या घरच्यांना सांभाळून घ्यावं लागेल, त्यांची मनं जपावी लागतील.. ती: हे काय सांगणं झालं? तो: आणि हो, वेगळं राहायचा विचारही करायचा नाही. ती: काळजी करू नकोस, मी स्वार्थी मुलींमधली नाही, आपलं कुटुंब असं बनवेन की लोकं आपल्या कुटुंबाचा आदर्श घेतील. बस, त्याला हेच ऐकायचं होतं, तो … Read more

पन्नास रुपये-3

 दोघे संसार करत होते, छानपैकी सुरू होतं.. मंदी आली तसा पगार कमी झाला, घरखर्च जेमतेम भागू लागला, महिनाअखेर होता, गाण्याच्या खिशात फक्त पन्नास रुपये होते, पगाराचा अजून पाच दिवस बाकी, पाच दिवस या पन्नास रुपयात काढायचे होते, तिसऱ्या दिवशी गावाकडून आई आली, रमेने यथेच्छ स्वागत केलं, गणू कामावरून घरी आला, आईला बघून खुश झाला, रमेने … Read more

पन्नास रुपये-1

 गणूची आई धावत धावत शाळेत आली, बालवाडीचा वर्ग, खेडेगाव, घराच्या जवळच शाळा भरे, घराचं दार उघडलं की उजव्या बाजूला शाळा, शाळेत काय चाललंय सगळं ऐकू येई.. गणू नुकताच शाळेत जायला लागला होता, दोन तीन दिवस चांगला रुळला, चौथ्या दिवशी अचानक शाळेत रडू लागला, बाईंनी शांत करण्याचा प्रयत्न केला,  रडण्याचं कारण विचारलं, पण तो काही बोलेच … Read more

पन्नास रुपये-2

 तिने क्षणभर नीट पाहिलं आणि विचारलं, याचं दप्तर कुठे आहे? सगळे इकडेतिकडे बघू लागले, आईचं लक्ष गेलं, त्याचा मित्र पक्या त्याच्या दप्तरावर बसला होता, तो पटकन उठला आणि दप्तर गणूकडे दिलं, गणू एकदम शांत, चिडीचूप.. बाईंनी डोक्यावर हात मारून घेतला, “अरे मग तोंडाने सांगायचं तरी..” “बाई तो बोलत नाही जास्त..आता चालुद्या तुमचं” आई निघून गेली, … Read more

जाणीव-2

तिने संध्याकाळी सर्वांना सांगायचं ठरवलं, संध्याकाळी सर्वजण जेवायला बसले, तिच्या आधीच मोठ्या सुनेने बोलायला सुरुवात केली, घरखर्च वाढतोय, मी शिवणकाम सुरू करावं म्हणतेय, तेवढाच घराला हातभार, आणि धाकली जाऊ आहे मदतीला, दोघी मिळून सांभाळून घेऊ सगळं, धाकली जाऊ नाराज झाली, थोरलीने विचारलं, काय गं तुला आवडणार नाही का? “काय वेळ आहे बघा ना, मी आजच … Read more

जाणीव-3

   दोघांना मुलं झाली,   थोरलीने सर्वांची जबाबदारी घेतली. दोघींच्याही मुलांना सारखं प्रेम दिलं..   सासरे आजारी पडले तसं थोरलीने शिवणकाम परत सोडलं,   हाताशी येणारा थोडाफार पैसाही बंद झाला,   धाकलीने स्वतःच्या हुषारीवर बढती मिळवली,   पगार वाढला,   नवरा आणि तिने मिळून नवीन कार घेतली,   घरात आनंदी आनंद,   गाडीची पूजा झाली, … Read more

जाणीव-1

धाकल्या सुनेने नोकरी करण्याचा हट्ट धरला तसं घराकडे कोण बघणार हा मोठा यक्षप्रश्न उभा राहिला, मानकर जोडप्याला दोन्ही तरुण मुलं, दोघांची लग्न झालेली, दोन्ही सुना प्रेमाने रहात. सासू, सासरे, मुलं आणि सुना.. सहा जणांचं कुटुंब, गोतावळा मोठा, नातेवाईकांचं येणं जाणं, दर दिवसाआड कुणी ना कुणी जेवायला, सासूबाई दुखणं घेऊन जागेवरच बसलेल्या, दोन्ही सुना सगळं बघून … Read more

सुवर्णमध्य-3

 पण घरातल्या सर्वांची मनं सांभाळून.. तिकडे त्याच्या आईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला, “मेलं या वयात अंगावर कामं पडताय, पोरी मस्त नटून थटून कामावर जाणार, आम्ही घरातलं बघत बसणार आयुष्यभर” त्याला वाईट वाटलं, संध्याकाळी प्रेझेंटेशन छान झाल्याच्या खुशीत ती घरी आली, आल्यावर छानपैकी स्वयंपाक केला, सगळे जेवायला बसल्यावर ती आनंदाची बातमी सांगणार होती, की प्रेझेन्टेशन क्लाएंटस … Read more

सुवर्णमध्य-2

नाश्त्याला चिवडा वर काढला आणि कांदे टमाटे कापून सुकी भेळ बनवून ठेवली, पटकन मुगाची डाळ टाकली, पोळ्यांना बाई येणार होती, ती रोज आठ ला यायची पण आज पत्ता नव्हता, सव्वाआठ झाले, तिचा फोन आला, “ताई माझ्या मुलाची तब्येत बरी नाही तर आज मी काही येत नाही” झालं, आता पोळ्या केल्या नाही तर डबे कसे देणार? … Read more

सुवर्णमध्य-1

आज आवरता आवरता तिची नुसती धडधड वाढत होती.. आज महत्वाचे क्लाएंट येणार होते ऑफिसमध्ये, बॉसने आठवडाभर आधीच तिला बजावून सांगितलेलं, की प्रेझेन्टेशन नीट व्हायला हवं, आठवडाभर तिने मेहनत घेतली होती, रात्रभर जागून एकेक काम पूर्ण केलं, त्यात घरात सासू, सासरे, मुलगी आणि नवरा, यांचंही पाहायचं होतं, काल रात्री उशिरापर्यंत तिने प्रेझेन्टेशन तपासून घेतलं होतं, सकाळी … Read more

परफेक्शन-3

 दोन दिवस मस्त रमल्या बहिणी, पण बहिणीचा व्याप भारी, शिवणकाम, क्लास, घर, मुलं.. त्यात अर्धी कामं आता तिच्यावर पडली, बहीण म्हणायची, आराम कर, पण बहिणीवर ओझं बनायला तिलाच नको वाटायचं, सासरी कामातून मुक्तता म्हणून ती गेली, पण आगीतून फुफाट्यात असं तिचं झालं.. तिला मोठ्या जावेची आठवण झाली, घरात कसलंच काम नाही, सगळ्याला बायका, जाऊ प्रचंड … Read more

परफेक्शन-2

 लहानपणापासून तिचे आई वडील तापट, सतत भांडायचे, ती घाबरायची, पण हळूहळू सवय झाली, पण आता परत … नकोसं झालं, मध्यस्थीही करू शकत नव्हती, तिला सासू सासऱ्यांची आठवण झाली, सासरे संथ डोहासारखे .. शांत,  कधी आवाज चढलेला पाहिला नाही, भांडण दूरच.. आई बाबांच्या भांडणात तिचा जीव रमेना.. वाटू लागलं, कामं आणि धावपळ बरी होती, किमान थकून … Read more

परफेक्शन-1

आज खूप दिवसांनी ती माहेरी जाणार होती, खुश होती, सासरी सततची धावपळ आणि कामं याने ती थकून गेलेली, यावेळी स्वतः सासूबाई म्हणाल्या, जाऊन ये थोडे दिवस, तिने बॅग भरली, माहेराला पोहोचली, निवांत क्षण घालवत होती आई बाबांसोबत, कसलं काम नाही, कसली धावपळ नाही, छानपैकी वेळ घालवत होती, तोच आई बाबांच्या भांडणाचा आवाज, तिला नवीन नव्हतं, … Read more

मनाचे खेळ-3

 तिच्या कामाचं कुणी कौतुक केलं की म्हणायची, “हो पण आईंसारखं नाही जमलं हो..आई त्या आईच..” बस त्या एका वाक्याने आईला समाधान मिळायचं, ती आईपुढे नम्र असायची, एकदा सासरे म्हणाले, घर बांधून ठेवशील पोरी तू.. ती म्हणाली, “अहो बाबा माझ्या आधीच आईंनी घराचं नंदनवन केलंय, मला तर आयतं सगळं मिळतंय..त्यांचीच कृपा..” बायकोच्या वागण्याने आईची असुरक्षितता निघून … Read more

मनाचे खेळ-2

 पण फार कमी लोकं टिकू शकले, कारण कंपनीतील राजकारण, हेवेदावे.. वातावरण कलुषित होतं.. त्यात राठी मॅडम आणि नेरकर सर.. अनुभवी आणि उच्चपदस्थ व्यक्ती.. पण त्यांना भेदून जाणं महाकठीण.. त्यांना टक्कर दिल्याशिवाय बढती मिळणं अशक्य होतं.. पण त्याने काय केलं होतं देव जाणे,  त्याला ते मिळालं.. आजवर अनेकांनी व्यर्थ प्रयत्न केलेले, पण सगळं मातीमोल.. त्याने ते … Read more

मनाचे खेळ-1

तुला हे कसं शक्य झालं?  म्हणजे इतकं मोठं यश मिळवण्यामागे गमक काय? त्याचे मित्र त्याला खोदून खोदून विचारत होते, त्यानेही अभिमानाने सांगितलं, दुसरं तिसरं कुणी नसून माझी बायको.. तो पोस्ट ग्रॅज्युएट, आणि त्याची बायको बारावी पास, मित्र हसू लागले, चेष्टा करू लागले, पण तो खरं बोलत होता.. गेल्या अनेक वर्षात घडलं नव्हतं ते आज घडलं … Read more

गृहीत-3

 आई अहो आजी सिरीयस आहे, मला जावं लागेल, किमान 2 दिवस तरी थांबेन.. नवऱ्याला फोन लावला, नेहमीप्रमाणे त्याने उचलला नाही.. ती आजीकडे गेली.. आजी मृत्यूच्या दाढेतून परत आली, सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.. गावाकडे ते हॉस्पिटल, फोनला रेंज नाही, त्यात ही चार्जर विसरली, 2 दिवसांनी घरी परतली, पण घरात जे पाहिलं ते पाहून अंगावर काटाच उभा … Read more

गृहीत-1

कशी बदलतात ना माणसं.. एकेकाळी आपल्याशिवाय ताट न हलणाऱ्यांना आपण असलो नसलो काही फरक पडत नाही.. दोन शेजारीणी एकमेकींशी बोलत होत्या, त्यात तिचं दुःखं अजूनच जास्त, नवरा फक्त नावाला, नवऱ्यासारखं वागायला नको, चार चार दिवस बोलणं नाही, घरी येतो, जेवतो अन झोपतो, या व्यतिरिक्त काहीही नाही, गरजेचं असलं की तेवढं फक्त विचारणं, तिला वीट आलेला.. … Read more