वीज-1

लिफ्टमध्ये अडकलेल्या त्या तिघांसाठी ती 20 मिनिटं आयुष्यात मोठी उलथापालथ करून जाणारी होती, ती, तिचा नवरा आणि तिचा पूर्वकालचा प्रियकर, योगायोग म्हणा किंवा दैवी इशारा, तिघे एकत्र आले होते आणि तेही अश्या अवस्थेत, दोघे नवरा बायको हॉस्पिटलमधून घरी जाणार होते, ती तापाने बेजार होती, नवऱ्याने सोबत नेऊन तपासून आणलं, घरी जायला दोघे लिफ्टमध्ये गेले, तेवढ्यात … Read more

वीज-3

 नवरा आणि प्रियकर, दोघेही एकमेकांकडे पाहू लागले, कारण आता जे होणार होतं त्यावरून त्यांच्या प्रेमाची परीक्षा ठरणार होती, वीज कडाडली की ती खूप घाबरायची, अगदी लहानपणापासून,  त्या आवाजाचा फोबिया होता तिला, वीज कडाडली की त्या आकाश दुमदुमून टाकणाऱ्या आवाजाला ती घाबरत जवळच्या माणसाला जाऊन बिलगायची, लहानपणी आई जवळ घेई, कधी तिचा प्रियकर, आणि आता नवरा… … Read more

राणे मास्तर-3

 आई वडिलांना समजावत, एकदा तर गणेश साठी त्याच्या नशेत असलेल्या वडिलांचा मारही खाल्लेला, पण आपला हट्ट त्यांनी सोडला नाही.. आज मास्तर दिसताच गणेशने त्यांचे पाय धरले, “मास्तर, माझ्यासाठी तुम्ही इतकं काही केलं होतं ते मी कसं विसरेन? मला शाळेत जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नसते तर आज मी इतका मोठा झालोच नसतो, मी विदेशात असतो..खूप मोठ्या … Read more

राणे मास्तर-2

 “तुकारामांनंतर तुम्हीच..लोकं त्यांचं बघून घेतील, तुम्ही आपलं बघा” असं म्हणत ती तुटपुंज्या पगारावर घर चालवत असायची, बायको लवकर गेली, मास्तर एकटे पडले, पण आपलं काम सोडलं नाही, खेड्यापाड्यात जाऊन, आदिवासी मुलांना शाळेत नेत, घरच्यांना तयार करत, कितीदा लोकांचे टोमणे ऐकले, एकवेळ मारही खाल्ला, पण या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून स्वतः मुलांच्या घरी जाऊन त्यांची दप्तरं … Read more

राणे मास्तर-1

 राणे मास्तर फाटकी पिशवी घेऊन रस्त्याच्या कडेने जात होते, बाजूला असलेल्या झोपडपट्टीत डोकावत, लहान मुलं दिसले की ओरडत, “शाळेला जायचं नाही का? दप्तर उचल आणि जा” “आलं परत..” झोपडपट्टीतले लोक त्यांना वेडसर समजत, रोज रोज येऊन हेच बोलून जात, साधारण 65 ते 70 च्या दरम्यान वय असावं, संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना शिकवण्यात गेलं, तेही शहरात नाही,  … Read more

चांगुलपणा-3

“ही मुलाखत घ्यायची आमच्या कंपनीची एक वेगळी पद्धत आहे, माणूस मुलाखतीत स्वतः जो नाहीये तो आहे असं दाखवतो, पण बाहेरचा सिक्युरिटी हा माणूस जसा आहे तसा त्याला ओळखून घेतो, म्हणूनच मी सिक्युरिटी बनून बाहेर बसलो आणि तुम्हा सर्वांना जज केलं” “पण सर, आमचं शिक्षण आणि अनुभव तरी बघा एकदा” “शिक्षण, अनुभव हे वेळेनुसार मिळवता येतं.. … Read more

चांगुलपणा-2

 “आधी वचन दे” सुयश जरा शांत झाला, वडील नसतांना आईने काय काय सोसलं याची त्याला जाणीव होती, त्याने वचन देऊन टाकलं आणि तो निघाला.. एका फूड कंपनी मध्ये डिलिव्हरी बॉय साठी तो मुलाखत देणार होता, तिथे अनेक पदांसाठी मुलाखती होणार होत्या, काही मॅनेजर साठी, काही क्लार्क साठी… तो कंपनीत गेला,  गेटपासून बरंच लांब एक सिक्युरिटी … Read more

चांगुलपणा-1

सुयश आणि त्याची आई हतबल होऊन आपल्या घरात बसले होते, आज त्यांना समजलं होतं की काकांनी आणि त्यांच्या मुलांनी गावाकडची सगळी जमीन आणि घर त्यांच्या नावे करून घेतलं होतं, सुयशचे वडील खूप आधी देवाघरी गेलेले, तेव्हापासून या दोघांकडे कुणीही येत नव्हतं, गावाकडूच्या मालमत्तेतून नवीन घर घ्यायचं त्यांचं स्वप्न होतं, पण सगळं अपूर्ण राहिलं, सुयश आणि … Read more

प्रेम-2

त्याने आदेश सोडला, तिने गरमागरम कॉफी करून आणली, नवऱ्याजवळ बसली, कॉफी पिता पिता तो मोबाईल चाळू लागला, ती वाटच बघत होती, याचं आपल्याकडे लक्ष जातंय का, त्याने काही वेळाने मोबाईल ठेवला “मी जरा पडतो, जेवायला उठव मला” असं म्हणत तो बेडरूममध्ये निघून गेला, ती हिरमुसली, नकळत त्याची तुलना शेजारणीच्या नवऱ्याशी करू लागली, “तिचा नवरा काय … Read more

प्रेम-3

 आजवर कधीही न पाहिलेलं प्रेम अनुभवत होती, हळूहळू ती बरी झाली, घरी आली, नवऱ्याला विचारलं, “पैशाची व्यवस्था कशी केली?” “पॉलिसी काढली होती मी, आणि सोबतच काही सेविंग पण केलेली..अशी काही इमर्जन्सी येऊ शकते या विचाराने खूप आधीपासूनच जमवाजमव करत होतो..” तिला नवऱ्याचं वेगळंच रूप दिसलं, इतक्यात दारावर आवाज ऐकू आला, शेजारच्या जोडप्यातला तो नवरा रडत … Read more

प्रेम-1

शेजारच्या फ्लॅट मधल्या जोडप्याला बघून नेत्राच्या मनात कायम खळबळ माजे, नेत्रा बऱ्याचदा तिच्या गॅलरीतुन बघे, तो नवरा घरी येतांना कायम त्याच्या हातात काही ना काही दिसायचं, एखादं गिफ्ट, फुलं नाहीतर चॉकलेट्स, त्याची बायकोही कायम आनंदात असायची, असं म्हणतात की लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस असतात, पण त्या जोडप्याला लग्न होऊन बरीच वर्षे होऊनही नवलाई अजूनही तशीच … Read more

उपकार-1

आज मंत्रिपदाची शपथ घेतांना राहून राहून तिला मोठ्या जावेची आठवण येत होती, मोठ्या संघर्षानंतर रेवती मंत्रिमंडळात निवडून गेली होती, हा संघर्ष लहान नव्हता, 7 वर्षांचा काळ होता, या काळात कितीतरी गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या.. शपथविधी झाला, सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून झाल्या, सिक्युरिटी आणि तिथल्या ऑफिसर लोकांनी तिला तिची केबिन दाखवली, ती शांतपणे बसली, मनातून आनंद झालेला, फार … Read more

उपकार-2

रेवती घरी आली, घरात मोठ्या जाउबाई होत्या, दबलेल्या, शांत… त्यांचं बघून ती एकेक गोष्ट शिकत होती, श्रीमंत घर, पण कामाला माणसं नव्हती, कारण राजकारणी म्हटलं की हेर, गुप्तहेर.. घरातल्या गोष्टी आणि योजना बाहेर जायला नकोत म्हणून आधीच काळजी घेतलेली, सगळं काम सासुबाई आणि जाउबाई करत, आता त्यात रेवतीची भर पडली, रेवतीला वाटे, राजकारण करायचं म्हणजे … Read more

उपकार-3

 सासुबाई कडक स्वभावाच्या, रेवतीला कामाला जुंपून त्यांनी बेजार करून टाकलं होतं, जाउबाई म्हणायच्या, थोडेच दिवस..मी घरात सांगून कामवाली लावून घेईन.. 3 महिने झाले, 6 महिने झाले…तरी तेच..कामवाली लावलीच नाही.. “जाउबाई अहो कधी?” “राजकारणातला दुसरा धडा…आशा आणि संयम कधीही ढळू द्यायचा नाही” रेवतीला अगदी नको नको झालेलं, माहेरी रडून सगळं सांगू लागली, बॅग भरली आणि माहेरी … Read more

नशिबाची थट्टा-3

 रेखाताईंनी मन लावून ऐकलं, आता कानाला खडा, धाकल्या मुलाला त्याच्या पसंतीची मुलगी शोधायला लावायची, आणि तीही शहरातली…नोकरी वाली, लहान मुलगा कामाला लागला, त्याला कसली आली गर्लफ्रेंड, कुत्रं विचारत नव्हतं, पण आता आईने परवानगी दिली म्हटल्यावर भेटेल त्या मुलीशी ओळख करून घेऊ लागला, एक मुलगी कशीबशी पटली, नोकरी करत होती, लग्न झाल्यानंतर ती घरात आली, रेखाताईंनी … Read more

नशिबाची थट्टा-2

त्यातल्या त्यात एक मुलालाही पसंत पडली आणि रेखाताईंचा जीव भांड्यात पडला.. सुनबाई गावाकडे एका लहानशा घरात राहत होती, लग्न झाल्यानंतर ती घरात आली, रेखाताईंनी सुटकेचा निःश्वास सोडला, “आता सुनेवर सगळं सोपवून मी मोकळी” घड्याळाकडे पाहिलं, 9 वाजून गेलेले, किचनमध्ये अजूनही काही आवाज ऐकू येत नव्हता, त्या पाहायला आल्या, सुनबाई अजून उठली नव्हती.. “लग्नाची दगदग.. असो, … Read more

नशिबाची थट्टा-1

रेखाताईंनी मुलांच्या लग्नाचा धसकाच घेतला होता, आजूबाजूला प्रेमविवाह, घटस्फोट अशी इतकी प्रकरणं ऐकू येत होती की रेखाताई दिवसेंदिवस काळजी करत होत्या, एकदा रेखाताईंच्या चुलतबहिणीने बोलावलं म्हणून जोडीने आपल्या नवऱ्याला घेऊन त्या तिथे गेल्या, त्यांची चुलतबहीण, त्यांच्याहुन 6-7 वर्षांनी मोठी असावी, त्यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं, रेखाताई नव्या सूनबाईकडे निरखून बघत होत्या, तिचं वागणं, बोलणं.. … Read more

युक्ती-3

 पण पाहिलं तर नवलच, उठून तयार होऊन, झाडाझुड करून, नाष्टा बनवून ती देवपूजा करत होती,  त्याला धक्का बसला, ती म्हणाली, “अहो दुपारी माझे मामा आणि मामी येणारेत जेवायला..” अच्छा म्हणून हे चाललंय तर…त्याला हसू आलं.. दुसऱ्या दिवशी परत सगळं आवरून बसली, “अहो संध्याकाळी माझे काका काकू येणारेत भेटायला, फार आठवण येत होती माझी त्यांना..त्यांनी असं … Read more

युक्ती-2

“आई, अगं सगळं नाही पण किमान जेवण तरी नीट बनवावं एवढीच अपेक्षा आहे माझी..कित्येकदा मीच ऑफिसमधून थकून आल्यावर भाजी टाकायचो,तिला चार पोळ्या लाटायलाही कंटाळा येतो.. बरं तेही जाऊदे, सकाळी चहाचा कप संध्याकाळी मी येतो तोवर तिथेच असतो..किमान नीटनेटकं राहावं अन घरही नीट ठेवावं ना..तिला जॉब वर जॉईन व्हायला अजून अवकाश आहे, तिचं काम सुरू झालं … Read more

युक्ती-1

फोनवरून मुलाच्या आवाजातला फरक आईने हेरला होता, काहीतरी बिनसलं आहे दोघांचं, आईला समजत होतं, तिने शेवटी न राहवून विचारलंच, “नक्की काय बिनसलं आहे तुम्हा दोघांचं?” आईच्या अश्या स्पष्टपणे विचारलेल्या प्रश्नाने तोही क्षणभर गोंधळला, वर्ष झालं होतं लग्नाला, त्याने त्याच्याच पसंतीची एक मुलगी बघितली, घरच्यांनाही कसलेही आढेवेढे न घेता लग्न लावून दिलं, दोघेही लग्न करून दूरवर … Read more