हिरवा संघर्ष (भाग 1)

  “काय? दिशा येतेय?” “दिशा येणारे??” “दिशा??” गण्या रस्त्याने पळत सुटला होता… “दिशा येणारे..दिशा येणारे..” म्हणत अख्या गावभर त्याने दवंडी पिटली होती. गावातल्या एकेकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. गेले कितीतरी वर्ष ती शिक्षणासाठी बाहेरगावी होती..आणि परत येतेय ती मोठी डिग्री घेऊनच…गावाची मान तिच्यामुळे उंचावली होती…पेपर मध्ये तिने मिळवलेल्या गोल्ड मेडल चा फोटो प्रत्येक गावकऱ्याने जपून … Read more

हिरवा संघर्ष (भाग 2)

  सुलेखा ला पाहायला पाहुणे आले होते..आणि मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून माधव होता, ज्याच्याशी सुलेखा ने डोकं लावलं होतं तोच….सुलेखा चं मन सैरभैर होत होतं… काय करावं सुचत नव्हतं…चुपचाप एका ठिकाणी उभी राहून ती सर्व बघत होती. माधव ची नजर तिच्याकडे जाई, आणि त्याला हसू फुटे. सुलेखा चं लक्ष दिशा कडे गेलं… “बघ ना…” … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌(भाग 4)

 शौर्या ने नक्षलवाद्यांशी केलेले दोन हात ऐकून पोलिसांना शौर्याच्या शौर्याचा अंदाज आला.  “मॅडम तुम्ही तर कमाल केलीत..” “कमाल तर अजून करायची बाकी आहे..” “म्हणजे??” “सूर्यभान दळवी..” हे नाव ऐकताच पोलीस स्टेशन मध्ये शांतता पसरते..कारण इतर कितीही मोठे गुन्हेगार पकडले असले तरी सुर्यभानला सर्वजण दचकून असत. पोलीस कधीही त्याचा वाटेला जात नसत.. _____ कोयना वस्तीत काही … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 10 अंतिम

  श्रद्धा ने असं काय सांगितलं असेल रमेश ला???तर…श्रद्धा ने रमेश ला बाजूला नेलेलं आणि म्हणाली होती… “तुम्ही माझ्यावर संशय घेऊ नका…नाहीतर…” “नाहीतर काय?” “नाहीतर…तुमची पापं सर्वांना सांगेन बाहेर…” “क…को…कसली पापं??” “आठवा… नीट आठवा… अशी पापं ज्याचा तुम्हाला आजही पश्चात्ताप होतोय..” रमेश च्या डोळ्यासमोरून पूर्ण आयुष्याचा पट दिसू लागला..केलेली पापं आठवू लागली… “ही खोटं बोलतेय..अन … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 9

  श्रद्धा ला समजलं, मी माणूस कुठल्यातरी भीतीनेच अंधश्रद्धेकडे ओढला जातो… छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायला लागतो… आणि मग आधार घेतो या तंत्र मंत्राचा… एके दिवशी सासूबाईंच्या माहेरची मंडळी घरी येतात. श्रद्धा ऑफिस ला गेलेली असते..त्यात सासूबाईंचा भाचा होता..रमेश….वयाने बराच मोठा होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फारच दीडशहाणा होता…त्याने लग्नात श्रद्धा चं वागणं पाहिलं होतं… त्याला … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 8

  रोज संध्याकाळी श्रद्धा एका बॉक्स मधून पैसे मोजत असायची…सुरवातीला केतन ने दुर्लक्ष केलं…पण त्याला आता वाटू लागलं की ही रोज इतके पैसे कुठून आणते? “श्रद्धा…काय प्रकार आहे हा??” “लोकं आपली पापं धुताय..” “म्हणजे??” “सोड रे…नको लोड घेऊ तू…” केतन ने मात्र या गोष्टीची धास्ती घेतली…दरवेळी तो ऑफिस मधून उशिरा घरी यायचा. त्या आधीच सासूबाई … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 7

सासूबाई दिशा ने सांगितल्याप्रमाणे वडाला फेऱ्या मारायला जातात…तिथल्या बायका गप्पा मारत असतात ते सासूबाईंना ऐकू जातं…कुणी सुनेबद्दल तक्रार करत असतं… कुणी मुलाबद्दल…कुणाला दुखणं सुरू होतं तर कुणाकडे पैशाची कमी… सासूबाई विचार करतात…श्रद्धा आयुष्यात आली आणि सगळं आयुष्यच बदलून गेलं…घरात पैसे आले, दुखणं दूर पळालं, माणसं स्वावलंबी बनले, घरात शांतता आणि सुख नांदू लागलं…हे सगळं श्रद्धा … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 6

  श्रद्धा च्या सासूबाईंच्या आई त्या 23 वर्षाच्या असतानाच देवाघरी गेलेल्या…सासूबाई तेव्हा खूप लहान होत्या. श्रद्धा ने ती माहिती काढली आणि दळवी सरांना सांगितलं.. “हे बघा…आईंना सांगा की तुम्हाला देवाने स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला की मी तुमची आई आहे…म्हणजे श्रद्धा सासूबाईंच्या आई आहेत असं सांगा…” दळवी सरांकडे काही ऑप्शनच नव्हता…त्यांनी ताईला सांगितलं आणि सासूबाई आता … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 5

  श्रद्धा तिच्या डब्याची आणि नोकरीवर जायची सोय लावून ठेवते…सासूबाई श्रद्धा च्या बोलण्यात अडकून ती सांगेल तसं करत होत्या.. श्रद्धा ने घरात एकेकाच्या सवयी पहिल्या…केतन आणि त्याचे वडील स्वतःचं कुठलंच काम स्वतः करत नव्हते…अगदी स्वतःची चादर घडी करून सुद्धा ठेवत नव्हते…किचन मध्ये कुणी पाय ठेवत नव्हतं, साधा चहा सुद्धा दोघांपैकी कुणी बनवत नसायचं…सासूबाई सर्व स्वतः … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 4

  लग्नाची तयारी सुरू होते…जेवणाचा मेनू ठरतो…श्रद्धा चे वडील ऍडव्हान्स देऊन मोकळे होतात… “ओ थांबा…कुठे चाललात? लग्न माझं आहे…सरका बाजूला…हं… तर काय काय देणार तुम्ही??” “भात, वरण, दोन भाज्या, कोशिंबीर, पापड..” “एव्हढ्याचे 70 हजार रुपये??” “हो म्हणजे तेवढी क्राऊड पण आहे ना..” “ताट मोजायला कोण आहे?” “आम्हीच मोजतो…” “बरं….” “अर्धे पैसे लग्नानंतर घेऊन जा…” “हो … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 3

  सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 3 ऑफिस मध्ये गेल्यावर केतन आणि श्रद्धा भेटतात.. “केतन, सॉरी मी आज जरा आगाऊ वागले…पण आपल्याला लग्न करायचं असेल तर दुसरा पर्याय नव्हता..” “मला नाही वाटत आपलं लग्न होईल…आणि नाही झालेलं चांगलं राहील..” “असं का म्हणतोय?? “ “कारण आईच्या अपेक्षा खूप अवास्तव आणि भलत्यासलत्या आहेत…नोकरी करणारी सून नको, बाहेर … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 2

  कॉलेज सोडल्यानंतर श्रद्धा ची ओळख नोकरीच्या ठिकाणी असलेल्या केतन सोबत होते…केतन अत्यंत सच्चा माणूस…आणि श्रद्धा ला अशीच खरी माणसं आवडायची…खोट्याचा तिला प्रचंड राग असायचा… घरी परत येत असताना वाटेत एक मंदिर लागायचं.. तिथे एक ढोंगी बाबा आपले चमत्कार दाखवून लोकांना लुबाडायचा… एकदा श्रद्धा ने त्याला तिथून पिटाळून लावलं होतं… पुन्हा तो दिसला नाही…पण काही … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 1

  “सर सही देत नाहीये यार…लास्ट सबमिशन आहे…एका सही साठी अडून राहिलंय..” “सकाळपासून ताटकळत बसलोय..दर वेळी गेलो की सर म्हणतात नंतर या..” “काय मिळतं यांना असं विद्यार्थ्यांना ताटकळत ठेऊन??” “यावर एकच उपाय..” “श्रद्धा…” “कुठेय ती..??” “बोलवा तिला..” सगळेजण श्रद्धा ला शोधतात…1st फ्लोअर वरून खाली पार्किंग मध्ये बघतात.. “दहा झाल्या फक्त…अजून 40 बाकिये..” श्रद्धा समोर 4 … Read more

परिवर्तन

  “तुझी वहिनी बघ..तुलाही कधी जमली नाही अशी भाजी बनवली तिने..आणि घर इतकं टापटीप आणि छान ठेवलंय ना…नाहीतर एक तू होती, घरभर नुसता पसारा आणि तू बनवलेली भाजी म्हणजे अंगावर काटाच यायचा…” वहिनी खुदकन हसली, आणि मी बळेच रागावून, “जेव्हा पहावं तेव्हा वहिनीचं कौतुक, आम्ही काही कामाचेच नाही…ना?” वहिनीचं कौतुक ऐकून मी सुखावले होते, आई … Read more

“आमच्या वेळी नव्हतं असं…”

  “आमच्या वेळी नव्हतं बाई असं..” हे ऐकून ऐकून स्मिता चे कान विटले होते..पण सासूबाईंच्या या वाक्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी ती भोळी नव्हतीच…काहीतरी केलंच पाहिजे ज्याने ही टेप बंद होईल…पण काय करावं तिला काही सुचेना… घरात पाहुणे आले तसं सासूबाईंनी स्मिता ला आवाज दिला. गावाकडची मंडळी होती, सासूबाईंच्या मते हिने साडी घालून समोर यायला हवं. पण … Read more

का जपायचंय तिला?

  मराठी कथाMarathi stories राधा काकू नेहमीप्रमाणे सुनेला घेऊन दवाखान्यात गेल्या, दर महिन्याला तिची तपासणी असायची. एका असाध्य आजाराने जखडलेल्या शर्मिला ला त्या आजाराने पूर्ण परावलंबी बनवलं होतं. दवाखान्यात असलेल्या एका नर्स ला शर्मिला ची देखरेख करायला सांगितलेली…राधा काकू शर्मिला च्या सासुबाई आहेत हे ऐकूनच तिला धाक बसला..कारण आई असती तर गोष्ट वेगळी होती, पण … Read more

का असावे स्वावलंबी??

  “कशाला हे असले उपद्व्याप करत बसतेस… लोकं काय म्हणत असतील..नवरा मोठा मॅनेजर आणि बायको घरात शिवणकाम करते…” रुचिता खूप दिवसांनी तिच्या मैत्रिणीला भेटते आणि तिला शिवणकाम करताना बघून हे वाक्य बोलून जाते. “अगं अशी हलकी कामं कशाला करतेस? आणि खरं सांग तुला पैशाची गरज तरी आहे का?” “अगं चित्रा, केवळ पैशांसाठी नाही करत मी…काम … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 3)

“खरंच मॅडम, इतक्या सहजासहजी कसं ओळखलं तुम्ही चोरांना? आणि तेही तासाभरात??” “मी लहानपणी गावाला जायचे आजीकडे, तिथे छान उसाची शेतं होती. आम्ही इतकी मजा करायचो ना, शेतात दिवसभर खेळत असायचो…आमचा एक चुलतभाऊ होता..त्याची एकदा गंमतच झाली बघा, त्याचा निकाल लागला होता शाळेचा, बाबा रागावतील म्हणून गायब होऊन गेला..आम्ही त्याला वेड्यासारखं शोध शोध शोधलं..” “यांच्या घराला … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 2)

शौर्या आपली साडी सांभाळत पोलीस स्टेशन मध्ये जाते. मागे वळून आपल्या नवऱ्याला सांगते.. “तुम्ही फ्लॅट वर जा… पोरांना खाऊ घालून झोपवून द्या…डबा आहे ना सोबत??” नवरा बागेतून डबा काढतो, एका कपड्यात बांधलेल्या पोळ्या दाखवतो… “हा..जा आता, मी आले थोड्या वेळात…पोरांनो, पप्पांना त्रास द्यायचा नाही..बंट्या…बंट्या??? कुठे गेला हा??”” बंटी पोलीस स्टेशन मधेच हरवून जातो. शौर्या एकदम … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 1)

पोलीस स्टेशन मध्ये आज जोरदार धावपळ सुरू होती. शहरात नवीन ACP मॅडम येणार होत्या, एक तर कुणी पुरुष पोलीस असता तरी पोलीस स्टेशन मध्ये इतकी धावपळ नसे..पण महिला पोलीस म्हटली की कडेकोट शिस्त, दरारा..त्यात महिला असल्याने एक जबरदस्त अभिमान.. हे त्या पोलीस स्टेशन ने बऱ्याचदा अनुभवलं होतं.. “ए शूज पॉलिश केलेत का..” “हा आज केलेत..” … Read more