घराणं (भाग 9) ©संजना इंगळे

एक संपलं की दुसरं संकट शुभदा समोर दत्त म्हणून उभं राही. पुस्तकाच्या अनुवादाला सुरवात होत नाही तोच त्याचा अर्धा भाग गायब होतो. पण जेवढा भाग झाला आहे तेवढ्या भागात मात्र शुभदाला बऱ्यापैकी दुर्गावती देवीबद्दल समजलं होतं. दुर्गावती देवीचं जीवन, त्यांची आपल्या पुढील पिढीबाबत असलेली तळमळ, त्यांच्या वाट्याला जे भोग आले ते पुढच्या स्त्रियांना येऊ नये … Read more

घराणं (भाग 8) ©संजना इंगळे

____ घराणं (भाग 8) ©संजना इंगळे शुभदाला हे समजतं की पुस्तकाची उकल करणारी ती एकटी नव्हती, अजून कुणीतरी घराण्यात होऊन गेलेलं जिने याचा छडा लावायचा प्रयत्न केलेला. पुस्तकाला समजण्यासोबतच आधी आपल्या घराण्याची वंशावळ समजून घेणं तिला महत्वाचं वाटलं. दिगंबरपंत त्यांच्या आजी इतपत सांगू शकत होते पण त्या आधी कोण होतं? ती दिव्य स्त्री कोण होती … Read more

रिपोर्ट्स

  “तुमच्याकडे फक्त 6 महिने बाकी आहेत..” डॉक्टरांनी असं सांगताच काशीच्या पायाखालची जमीन सरकली. वयाच्या 56व्या वर्षी पोटाचा त्रास जो सुरू झाला त्याचे रिपोर्ट्स आज मिळाले अन मरणाची वाट त्यांना दिसू लागली. 6 महिने, फक्त 6 महिने? नातवाला खेळवायचं आहे, पोरीची बोळवण करायचीय, मुलाला मार्गी लावायचं आहे..सहा महिन्यात होईल?  हेकेखोर अन भांडकुडळ काशीचा स्वभाव गेल्या … Read more

घराणं (भाग 7) ©संजना इंगळे

शुभदा खूप नाराज होते, पुस्तकावर चहा सांडल्याने त्याची बरीचशी पानं खराब होऊन वाचता न येण्यासारखी झालेली होती. घरात शुभदा जशी पुस्तकाच्या शोधासाठी भारावून गेलेली तसंच रश्मी तिच्या स्पर्धेसाठी तयारी करत होती, मीनल तिच्या नव्या प्रदर्शनासाठी चित्र बनवत होती, मेघना वाढलेल्या व्यापाचे व्यवस्थापन करत होती. ऋग्वेदची बहीण वीणा, जी शिक्षणाकरिता बाहेरगावी होती ती सुट्ट्या असल्याने काही … Read more

घराणं (भाग 6) ©संजना इंगळे

शुभदाला रात्रभर झोप लागत नाही, ती पुन्हा त्या पुस्तकाकडे खेचली जाते. रात्रीच्या 2 वाजता ती देवघरात येते. अंधारातही त्या लाल कपड्यातील वस्तू तिला स्पष्ट दिसत होती. ती त्या वस्तूला हात लावणार तोच मागून तिच्या खांद्यावर एक हात ठेवला जातो. “शुभदा? इतक्या रात्री इथे काय करतेय??” “ऋग्वेद..झोपला नाहीस??” “नाही, मलाही झोप लागली नाही…मी खरं तर प्लॅंनिंग … Read more

घराणं (भाग 5) ©संजना इंगळे

रेखाला शुभदाने देव्हारातल्या त्या वस्तूबद्दल विचारलेलं आवडलं नाही. रेखा शक्य तितक्या शांततेत तिला त्या वस्तूबाबद्दल जास्त चौकशी न करण्याबद्दल खबरदारी घेतली. शुभदाला ऋग्वेद ने आवाज दिला तशी ती तिथून निघाली अन रेखाने सुटकेचा निःश्वास टाकला. विनायकच्या दोन्ही सुनांसोबत ती मिसळून गेली होती. रश्मी, विनायकाची मोठी सून अन दिवाकर ची बायको..सकाळी लवकर उठून जिम ला जायची … Read more

घराणं (भाग 4) ©संजना इंगळे

रावसाहेब दिगंबरपंतांना फोन करून पुढची बोलणी करायला आमंत्रण देतात. दिगंबरपंतांना खूप आनंद होतो. सुमन शुभदाच्या कानावर हे सगळं घालते. शुभदा हे ऐकून चिडते.. “मला न सांगता तुम्ही परस्पर ठरवलं तरी कसं? आणि असुदेत ते कितीही श्रीमंत.. माझं काही मत आहे की नाही??” “अगं तू मुलगा बघ, मग ठरव..आम्ही काही जबरदस्ती करणार नाहीये..” “तरी पण..” “फक्त … Read more

ती ‘कटकट’ नसतेच..

 लोकेशची मनस्थिती आज जरा खराबच होती. रोज हसत हसत सर्वांना गुड मॉर्निंग म्हणत ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकेशला आज असं शांत शांत पाहून सर्वांनाच चुकल्या चुकल्या सारखं झालेलं. त्याच्याच शेजारी बसणाऱ्या त्याचा को वर्कर मित्र सतिशच्या नजरेतूनही ही गोष्ट सुटली नव्हती.  सर्वजण कामाला लागले, लंच ब्रेक मध्ये लोकेश नीट जेवतही नव्हता. त्याला बघून सतीशने त्याला अखेर विचारलं, … Read more

घराणं (भाग 3)

दिगंबरपंत घरी जातात, सुभाषची बायको रेखा देवपूजा करत असते. या घरात आल्यापासून देवपूजा नेहमी तीच करत असायची, तिला पाहून दिगंबरपंत म्हणायचे, “अहो दुसऱ्यांनाही पुण्य मिळु द्या की..” “काय बाबा, सवय झालीये मला..देवपूजा केल्याशिवाय चैन पडत नाही..” “आता नवीन सुनबाई आली की करू दे तिलाच..” हे ऐकताच रेखा चमकते, देवपूजा दुसरं कुणी करणार हे तिला सहन … Read more

तिचा ‘मित्र’

 नवऱ्याशी भांडण झाल्यावर तावतावात ती घराबाहेर पडायला लागली, पण असं डायरेक्ट जाणार कसं? नवऱ्यासमोर आधी 2-3 धमक्या दिल्या… “मी चाललीये बाहेर..” हिमालयातल्या बर्फासारखा नवरा थंड.. मग अजून थोडी आदळआपट करून.. “मी जातेय बरं का..” नवऱ्याला समजलं…की हिला थांब असं सांगितल्या शिवाय ही काही हलत नाही.. “कुठे चाललीस..” नवऱ्याच्या प्रश्नाने आतून तिला गुदगुल्या होतात..पण तिला अजून … Read more

घराणं (भाग 2)

दिगंबर पंतांनी आपल्या धाकल्या मुलासाठी, परशुराम साठी मेघनाला निवडलं होतं, लग्नानंतर 3 वर्षांनी ऋग्वेदचा जन्म झाला आणि 2 वर्षांनी वीणा जन्माला आली. घराण्यात सर्वात लहान म्हणून वीणा विशेष लाडकी. तीही मेघना सारखी तडफदार, स्वाभिमानी आणि साहसी होती. म्हणूनच तिने पायलट बनण्याचं स्वप्न बघितलं होतं, त्याच्याच शिक्षणासाठी ती बाहेरगावी शिकायला होती. विनायकचे दोन्ही मुलं टेक्सटाईल बिझनेस … Read more

घराणं (भाग 1)

रत्नपारखी घराण्यात मुलगी देण्यासाठी मुलीच्या पालकांची चढाओढ चालत असायची, याला कारणही तसंच होतं. रत्नपारखी घराण्यात काही पिढ्यांपासून कुणी अज्ञात व्यक्तीने घालून दिलेले नियम हे पुढील पिढ्यांनी तंतोतंत पाळले होते. घरातल्या स्त्रीला उच्च सन्मान दिला जावा, घरातली कामं स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून करावी, घरातील सर्व सदस्यांनी महिन्याला एक ठराविक रक्कम घरातील ज्येष्ठ स्त्री कडे सुपूर्द … Read more

अरे संस्कार संस्कार..

 “अरे संसार संसार…” गाणं गुणगुणत शैला स्वयंपाकघरात कामं करीत होती. काम करता करता भाजीपाला किती संपला, किराणा काय आणावा लागेल, मुलांना सुट्टीच्या दिवशी कुठे न्यायचं, डब्याला काय द्यावं, नाश्त्याला काय करावं असे एक ना अनेक विचार मनात घोळत होते, तेवढं करून तिला संध्याकाळी पुन्हा सोसायटीतल्या बायकांसोबत गणपती उपक्रमांबद्दल चर्चा करायला मिटिंग साठी जायचं होतं, त्यामुळे … Read more

सूनबाईचा मित्र (भाग 11 अंतिम)

अनावधानाने का होईना, श्वेता आणि श्रीधर जोडीने नमस्कार करतात..श्रीधर श्वेताकडे बघतो..श्वेतालाही कळेना काय करावं. समोरून केदार हे सगळं बघत होता, त्यांच्या नजरेतूनच केदारला त्यांच्यात काही चालू असल्याची शंका येते. तो संतापातच गाडीत बसतो, बक्कळ पुरावा नसल्याने तो सरळ सरळ काही विचारूही शकत नव्हता. केदारला तसं काही श्वेतावर प्रेम वगैरे नव्हतं, पण बायको म्हणून अजूनही ती … Read more

कल्पनेतला मित्र

 ऋचाचं असं एकांतात जाऊन फोनवर बोलणं त्याच्या डोळ्यात खुपू लागलं होतं. एरवी सतत काहीना काही कामात व्यस्त असणारी ऋचा आता कामं अर्धवट टाकून गच्चीवर जाऊन कितीतरी वेळ गप्पा मारत असायची. मानव साठी हे काहीतरी विचित्रच होतं. सुरवातीला आईशी वगैरे बोलत असेल असं त्याला वाटायचं पण एकूण हावभाव बघून मामला काहीतरी वेगळाच आहे हे त्याला जाणवू … Read more

खाली दिमाग..शैतान का घर

 आज चारही भावांची टेरेसमध्ये गंभीर चर्चा सुरू होती. चौघेही बायकांच्या एकमेकीबद्दल असलेल्या कुरकुरीला कंटाळले होते. रोज उठून तेच..”ती मला अशी बोलली, तिने मला टोमणा मारला, ती स्वतःला शहाणी समजते..” चारही जावा एकमेकींना वरचढ..माघार घ्यायला कुणीही तयार नाही. आई वडील गेल्यानंतर मोठा वाडा सुना पडला. चौघाही भावांनी लग्न करून बायकांना आणलं, वाड्याला एक चैतन्य येईल असं … Read more

सूनबाईचा मित्र (भाग 10)

मोहन मागे पळत जातो, प्रभाच्या अंगावर काटाच येतो, बुजगावण्याच्या आत असलेली प्रभा जर मोहनला दिसली तर काय इज्जत राहणार होती तिची?? बुजगावनं घरात घुसून एका खोलीत दार बंद करून घेतं, मोहन बाहेरचं दार वाजवत असतो, प्रभाला आत काय करावं समजेना, ती पटकन तिच्या अंगणातल्या बुजगावण्याचे कपडे उतरवते, गादिखाली लपवून देते आणि जोरजोरात ओरडायला लागते.. मोहन … Read more

केवळ एक सन्मान..

 नाही म्हटलं तरी ननंदेच्या घरी लग्न म्हणजे कावेरीच्या पोटात गोळाच उठायचा. एका छोट्याश्या खेडेगावतल्या कुटुंबातील कावेरी. नवरा, मूल, सासू सासरे आणि नातेवाईक यापलीकडे स्त्रीचं काही आयुष्य नसलं तरी याच व्यापात आपलं सुख मानत कावेरीचं आयुष्य चाललं होतं. खेडेगावात भावाची बायको म्हणजे कामं करणारी हक्काची बाई, तिथे कामवाल्या बाया असा प्रकारच नसायचा, कारण या कामासाठी माम्या, … Read more

सूनबाईचा मित्र (भाग 9)

“तात्या…आईला काय झालं? अशी काय येड्यागत करतेय??” “काही नाही, बरं नाही आईला…पळ तू..” सकाळीच पिंट्या मामाच्या गावाहून आला होता अन आल्या आल्या हे सगळं त्याला दिसलं. श्वेताताईला भेटायला तो जातो अन वाटेत त्याला प्रभा भेटते. “तू परत आलीस??” “हो मग.. करमत नाही मला तिकडे..” “एक काम कर, तू इथेच रहा…” “बरं इथेच राहील…पण श्वेता चा … Read more

सूनबाईचा मित्र (भाग 8)

श्वेता, क्रांती सकट सर्वांनी कोकम सरबतच्या जागी दारू पिलेली असते, सर्वजणी तररर असतात, काहीबाही बरळत असतात. सर्व माणसं तिथे येऊन आपापल्या बायकांचं निराळंच रूप बघत असतात. ज्याच्या बायकोने आयुष्यात कधी नाच केलेला नसतो ती my name is sheela म्हणत थिरकत असते, एकाची बायको सासूच्या काठीची बंदूक करून झाडामागे लपून वाघाची वाट बघत असते, शिकार करण्यासाठी…आपापल्या … Read more