घोळका
सायंकाळी 5 च्या आसपास जवळच्या मंदिरात पन्नाशीतल्या बायका एकत्र जमायच्या, प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आयुष्यातील कडू गोड अनुभवांच्या सुरकुत्या होत्या. या वयात शरीराला लागलेलं आजारपण, दुखणं त्यांच्या हालचालींवरून दिसून येतच होतं. सर्व समवयस्क असल्याने त्यांचे गप्पांचे विषय अगदी ठरलेले असायचे. नातीगोती, नातेवाईकांचे गाऱ्हाणे, कुणी कुणासाठी किती केलं, कुणी किंमत ठेवली कुणी नाही ठेवली, मुलांनी किती प्रगती केली … Read more