किंगमेकर (भाग 6)

एकीकडे चॅनेल वाचवण्याचं आणि दुसरीकडे गावाकडच्या लोकांना तयार करण्याचं टेन्शन. सुरभीचं चित्त ठिकाणावर नव्हतं. घरी येताच आईने तिला काळजीचं कारण विचारलं, “सुरभी? काय झालं गं?” “खूप मोठा निर्णय देऊन आलीये मी आज” “म्हणजे?” “मी ऑफिसमध्ये गेले तेव्हा चॅनेल बंद करण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण होत आलेले, मी त्यांना अडवलं आणि चॅनेलची जबाबदारी मी घेते असं सांगून … Read more

किंगमेकर (भाग 5)

सुरभीच्या मामेभावाने सर्वात आधी नानांना घरी आमंत्रण दिलं. “नाना, आमच्या घरी चहापाण्याला बोलावलं आहे तुम्हाला, लग्नात खूप मदत केली तुम्ही..” “अरे त्याचे उपकार नको मानु, मी प्रत्येक लग्नात अशी मदत करतच असतो, मला आवडतं लोकांना भेटायला, त्यांची मदत करायला..” “नाना, जरा वेगळं काम आहे.” “कसलं काम?” “माझी आतेबहिन, सुरभी..ती एका चॅनेल मध्ये काम करते, त्या … Read more

खेळ मांडला (भाग 3)

आरोही तिच्या खोलीत विचार करत बसते, तिच्या डोळ्यासमोर सारखी आर्वी येत असायची. का त्या मुलीबद्दल इतकं प्रेम ऊतू जात होतं समजायला मार्ग नव्हता. नकुलला तिने विचारलं.. “ती मुलगी कोण असेल रे? मला का तिच्याबद्दल इतकं प्रेम वाटतंय?” “खूप गोड होती ती, तू एक पाहिले का, तिचे ओठ अगदी तुझ्यासारखे होते. नाजूक, रेखीव..” आरोही विचारात पडली.. … Read more

सुख

 हिमालायतल्या उंच ठिकाणी एका तरुण ध्यानस्थाला विचारलं.. “तुम्ही सुखी आहात का?” त्याचं तोंड पडलं, तो म्हणाला.. “पिढीजात आमच्याकडे इथे येऊन संन्यास घ्यावा लागतो, माझी ईच्छा नव्हती पण यावं लागलं..खरं तर मला तुम्हा माणसांसारखं आयुष्य जगायचं आहे, संसार करायचा आहे, आनंद उपभोगायचा आहे..” असं म्हणत तो समोरच्या एका संसारी पुरुषाकडे पाहू लागला. त्या संसारी पुरुषाकडे जाताच … Read more

मालिका..आणि मला पडलेले प्रश्न 🤔🤔🤔

 मनोरंजनाचा अगदी शेवटचा पर्यायही जेव्हा संपला तेव्हा टाईमपास म्हणून tv सुरू केला, त्यातही मराठी सिरीयल चं चॅनेल. या मालिकांचं एक मात्र खरं, मालिकांमधील लोकांचं आयुष्य कधीच सरळ नसतं. सतत एखादं संकट आ वासत यांच्या मानगुटीवर बसलेलं असतं. आता ती सुभेदारांची…सॉरी सॉरी..आता बनहट्टीची राधिका..इतकी चांगली, इतकी सरळ तरी हिच्या मागे काहीना काही सुरूच..बहुदा मागच्या जन्मी एखाद्या … Read more

दुसऱ्या जातीची…

 बाबूंरावांची दोन्ही मुलं शिकायला बाहेर होती, एक इंजिनियर तर दुसरा डॉक्टर. बाबुरावांनी पै पै जोडून मुलांची शिक्षणं पूर्ण केली अन दोघांना लायक बनवलं. मुलं कमावती झाली, घरात लक्ष्मी पाणी भरू लागली, सुखाचे दिवस आले. आता मुलांच्या लग्नाची काळजी होती. बाबुरावांनी आपली बायको शितलकडे विषय काढला.. “मुलांसाठी स्थळं बघायला सुरवात करायला हवी..” “आधी मुलांना विचारावं लागेल.. … Read more

खेळ मांडला (भाग 2)

मानव आर्वीला घेऊन गेला तसं आरोहीला एकदम वेगळंच जाणवू  लागलं, असं वाटत होतं जणू तिच्या शरीराचा एक भाग कुणीतरी तिच्यापासून विलग करतोय. मानवच्या कपाळावर आठ्या तश्याच होत्या, त्याने आरोहीच्या आई बाबांकडे एकदा पाहिलं आणि पंधरा वर्षांपूर्वी केलेला अपमान त्याला आठवला. यावेळी आरोहिचे आई वडील मात्र जरा ओशाळले होते. काळ खूप विचित्र असतो, कुठली गोष्ट कधी … Read more

खेळ मांडला (भाग 1)

लग्नाच्या मंडपात खूप वर्दळ सुरू होती, एकमेकांशी बोलताना सुद्धा मोठ्याने बोलावं लागे. प्रमिलाच्या भावाचं लग्न होतं. आई वडील नसल्याने तिलाच सगळं काही करावं लागत होतं. सर्व नातेवाईक, भावाचे मित्रमंडळी, तिच्या सासरची माणसं.. सर्वांना भेटून जेवणाचा आग्रह करत ती नुसती धावाधाव करत होती. पण एवढ्या सगळ्या गडबडीत मात्र तिचं लक्ष लग्न मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होतं. कारण आज … Read more

किंगमेकर (भाग 4)

आईला कळेना, सुरभिने अचानक गाडी का थांबवायला लावली असेल? गाडी थांबली तसं सुरभिने आईला खाली उतरायला सांगितलं.. “सुरभी? अगं काय झालं अचानक?” “तुम्ही जा.. आम्ही थांबतोय इथेच..” सुरभिने ड्रायव्हर ला सांगून पाठवून दिलं. “गाडीला का परत पाठवलंस? काय चालुये सुरभी तुझ्या मनात?” “आई, आपण अजून काही दिवस इथे थांबुया का?” “का? कशासाठी?” “इथूनच मला संधी … Read more

बेचव

 आजही त्याने टिफिन परत आणलेला पाहून दिव्याला वाईट वाटलं. अखिलेशची घरी आल्या आल्या चिडचिड व्हायची, ऑफिसचा ताण, त्यात तो दिव्याला रोज बोलत असे, “तुला चांगला स्वयंपाक येत नसेल तर आईला सांगतो मी..अजिबात चव नसते आता जेवणाला..” दिव्या रोज मनापासून त्याच्या आवडीचं बनवायचा प्रयत्न करे, अखिलेश सध्या असं का वागतोय तिलाच समजेना. रोज रोज टिफिन परत … Read more

मांडणी

 अत्यंत साध्या आणि टिपिकल राहण्याऱ्या आणि सर्वात कमी शिक्षण असणाऱ्या शीतलला बढती कशी मिळाली हेच ऑफिसमध्ये कुणाला कळत नव्हतं. वरच्या पोस्टवर जाण्यासाठी बऱ्याच मंडळींची रांग लागलेली, प्रचंड चढाओढ त्या पदासाठी चालू होती, ऑफिसमध्ये महिनाभर चर्चा सुरू होती, काहींनी तर पैजही लावली होती. शीतल कडे कुणी पाहातही नव्हतं, ती बिचारी एका कोपऱ्यात बसुन शांततेत तिचं काम … Read more

चॉकलेट टास्क

 “सोपं आहे का पिंकीला सांभाळून ऑफीसला येणं? काहीही काय बोलताय तुम्ही?”  “पिंकी 2 वर्षाची झाली आता, खेळते ती एकटी..आणि मी कुठे तिला घरी टाकून जायचं म्हणतोय, ऑफिस आपलं आहे, जागा आपली आहे..मालक आहोत आपण..” सुयोगची स्वतःची सॉफ्टवेअर फर्म होती, स्वतःचा व्यवसाय असल्याने त्याला बऱ्याच चढ उतारांचा सामना करावा लागत होता, पण जेव्हापासून नलिनी ऑफिसमध्ये आली … Read more

शिकलेली सून जेव्हा पाय धुते..

 घरात आलेल्या सुनेने लग्नानंतर 4 दिवस सासू सासऱ्यांचे पाय धुवून नमस्कार करायची प्रथा आजही काशीबाईच्या घरात सुरू होती. काशीबाई आज ऐंशीच्या घरात पोचलेल्या, त्यांनीही नवीन लग्न झाल्यावर ही प्रथा पाळली, त्यांच्या सुनेला म्हणजेच निर्मलालाही हेच करावं लागलेलं. आता निर्मलाच्या मोठ्या मुलाचं लग्न झालं, घरात लक्ष्मीच्या रुपी नवीन सुनबाई आली. कल्पना घरातली पहिली शिकलेली सून होती. … Read more

किंगमेकर (भाग 3) ©संजना इंगळे

बराच वेळ मुलांचा नाच सुरू होता, घरात पाहुणे मंडळींची रेलचेल होती, अश्यातच एक धिप्पाड, उंचापुरा, सावळ्या रंगांचा, कपाळावर टिळा लावलेला, अंगात फिक्कट तपकिरी रंगाचा शर्ट आणि करड्या रंगाची पॅन्ट असलेला एक पाहुणा मध्ये आला.. “चला चला, झाला का नाच? आता पूजा सुरू होईल आत..” हा माणूस कार्यक्रमांना घाई करत होता..लग्नाचे अर्धेअधिक काम याच व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली … Read more

वैभव

 मॉल मध्ये सुमतीला अचानक विशाखा दिसली अन दिसताक्षणी दोघींनी एकमेकींना मिठी मारली. दोघीही बालपणीच्या मैत्रिणी, शाळेनंतर पहिल्यांदाच दोघी भेटल्या होत्या. दोघीही आपापल्या नवऱ्यासोबत आलेल्या, दोघींना किती बोलावं अन किती नाही असं झालं. सुमतीच्या नवऱ्याला हे बघून समजलं की आता या दोघी लवकर इथून हलणार नाहीत, दोघींच्या नवऱ्याने ठरवलं की तुम्ही दोघी कॅन्टीन मध्ये जाऊन नाष्टा … Read more

किंगमेकर (भाग 2) ©संजना इंगळे

भाग 2 पुढीलप्रमाणे: सुरभी अनिच्छेनेच तयार होते, “अगं हे काय, गावाकडे जातोय आपण.. अशी जीन्स आणि टॉप घालू नकोस..तिथल्या लोकांना नाही आवडत..” सुरभीची पुन्हा चिडचिड, “मी यायलाच हवं का?” “घरी थांबूनच काय करशील? चल आमच्यासोबत..” दोघीही तयार होऊन बस स्टॉप वर गेल्या, हातात 2 जड बॅग्स होत्या. सुदैवाने लवकर बस मिळाली आणि दोघीही आत जाऊन … Read more

किंगमेकर (भाग 1) ©संजना इंगळे

कुणालची आई पेढे द्यायला घरी आली होती, मोठ्या अभिमानाने कुणालच्या नव्या नोकरीच्या बढाया मारत होती.. “हे घ्या पेढे, एकच कशाला हे दोन घ्या..एक काम करा पूर्ण बॉक्सच ठेऊन घ्या..” “अहो कशाला..तुम्हाला वाटायचे असतील ना अजून?” “वाटू हो..आता काय, 20 लाखांचं पॅकेज मिळालंय कुणालला..आता कंजूसी करून चालणार नाही..” “अय्या किती छान, कौतुक वाटतं हो कुणालचं.. आमच्या … Read more

राधेच्या हातात बासरी #valentines_special

 “ताई मी येतेय तुमच्याकडे, केक बनवलाय तुम्ही सांगितला तसा..पण वरची डिजाईन काही जमत नाहीये..येऊ का खाली 2 मिनिट??” शीतल खालच्या मजल्यावर राहणाऱ्या नलूताईला फोन लावत होती, तिने हो बोलताच पटकन अंगावर ओढणी चढवत केक आणि क्रिम घेऊन ती एक जिना खाली उतरली. “ये..आण इकडे..छान डिजाईन करून देते मी..” नलूताईने डिजाईन केली तशी शीतल खुश झाली,  … Read more

काळ

 #काळ काळ किती वेगाने पुढे जात असतो नाही का? एकेकाळचा वर्तमान सुदधा आता भूतकाळात बदललेला असतो, पण आयुष्यात मागे सोडून गेलेल्या माणसांचं वय मात्र आपल्या बुद्धीतुन काही पुढे सरकत नाही. आता हेच बघा ना, माहेरी एका वहिनीला बाळ झालं असता कौतुकाने आम्ही त्याला खेळवत असायचो, नंतर कधी आमची भेटही झाली नाही, एकदा अचानक माहेरी रस्त्यावरून … Read more

ती सहा पत्र

त्या सहा पत्रांनी तिचा संसार पूर्ण विस्कळीत केला होता. देव जाणे कोणी कुठून ती पत्रं पाठवली होती, घराच्या लेटरबॉक्स मधून ती पत्र नवऱ्याच्या हाती लागली अन सुरू झाला संशयाचा खेळ. माधुरी एका साधारण गावातील मुलगी, नाकापुढे चालणारी, सुंदर, बऱ्यापैकी शिकलेली. गावात सर्वात भारी स्थळ कुणाला मिळालं असेल तर ते माधुरीला. शहरातून आलेलं स्थळ, त्यात मुलाला … Read more