एकदा “तिचं” आयुष्य जगून बघ

 “अनोळखी लोकांमध्ये जाऊन काम करायचं? छे, मला शक्यच होणार नाही, कंपनीने जरा तरी विचार करायचा..नोकरीला फक्त सहा वर्षे बाकी असताना अशी बदली करावी?” मंगेशराव आज निराश मनस्थितीत घरी परतत होते. कंपनीत जवळजवळ 35 वर्षे काम केलं, प्रामाणिकपणे काम करून सर्वांच्या मनात आदर निर्माण केला. प्रतिष्ठा मिळवली, मुलाबाळांचे शिक्षणं केली, लग्न केले. या कंपनीसोबत एक भावनिक … Read more

खेळ मांडला (भाग 12)

आरोहीला दिवस गेलेत ही गोष्ट आरोहीने प्रमिलाला सांगितली. प्रमिलाला धक्का बसला, आरोहीने प्रमिलाला विश्वासात घेऊन सगळी हकीकत सांगितली. प्रमिला काळजीत पडली. ही गोष्ट फक्त प्रमिला आणि आरोहीत होती, आरोही आधीच सर्व प्रकारामुळे नैराश्यात होती, त्यात हे असं..आरोही आता मोठ्या संकटात सापडते, एक चूक किती महागात पडली हे तिच्या लक्षात आलं “आरोही, मानवला आत्ताच्या आत्ता कळव. … Read more

विभक्तात एकत्र

 मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांना पसंत होते, मुलाची नोकरी, स्वभाव, वागणूक बघून मानसला नाही म्हणण्यासारखं काहीही नव्हतं. निशाच्या आईची मात्र मनात घालमेल सुरू होती. स्थळ चांगलं असलं तर नुसतं तेवढ्यावर भागत नाही, मुलीला नवऱ्यासोबतच इतर नाती सांभाळावी लागतील, नवरा वाट्याला कमी येणार आणि इतर लोकांच्या सेवेत पूर्ण आयुष्य जाणार हे आईला माहीत होतं. या पुढच्या … Read more

किंगमेकर (भाग 7 अंतिम)

सुरभी शहराकडे रवाना झाली. आलेल्या सर्व मंडळींना तिने घरी आणलं. आईला आनंद झाला, माहेरची मंडळी आलीत म्हणून तिने खास पाहुणचार केला. दुपारच्या वेळी सर्वजण जरा पहुडले असता आईने सुरभीला बाजूला घेऊन विचारलं, “काय गं? असा काय चमत्कार केला तू की ही माणसं लागलीच तयार झाली??” “जाताना मी बघ काही समान नेलेलं, त्यातूनच हा चमत्कार..” “म्हणजे?” … Read more

खेळ मांडला (भाग 11)

#खेळ_मांडला (भाग 11) सागर आणि खुशी निरोप देऊन निघतात. खुशीला आता जरा जोर देऊन या प्रकरणाची माहिती काढायची असते, कारण आरोहीचा नवरा नकुल आणि ती खास मित्र असतात, आपल्या मित्राचा हा त्रास खुशीला बघवत नसतो. प्रमिला कडे सर्व गुपितं असतात पण ती कुणाला कळू देणार नव्हती, आणि सागरला तिने वचन दिलं होतं की ही गोष्ट … Read more

खेळ मांडला (भाग 10)

#खेळ_मांडला (भाग 10) “आरोही खुश असेल का हो नकुल सोबत??” “हे तू आत्ता विचारतेय?” “काय करू मग मी? आई आहे तिची, सतत तिच्या काळजीने मन सैरभैर असतं..” “आधी लग्न झालेला मुलगा, त्याच्या पहिल्या बायकोच्या आठवणी सोबत घेऊनच आरोही सोबत संसार करतोय..आरोहीला किती जीव लावत असेल शंकाच आहे..” “नकुल चांगला मुलगा आहे, आरोही ला सुखात ठेवलं … Read more

फेमिनिजम ची दुसरी बाजू

 zomato delivery boy Zomato delivery boy hitting girl “पैशाचा माज दाखवून ही लोकं सामान्य माणसांची पिळवणूक करतात, यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे..” “पैसा आहे म्हणून दुसऱ्याच्या बायकोकडे वाईट नजरेने बघायची परवानगी यांना कुणी दिली? यांना महिलांच्या हातात द्या, चांगलं चोपून काढतो..” ऑफिसमध्ये मॅनेजर पदावर असलेल्या श्री. देसाईंवर भर कर्मचाऱ्यांमध्ये आरोप होत होते.देसाई त्यांची बाजू मांडण्याचा निष्फळ … Read more

खेळ मांडला (भाग 9)

आरोहीच्या आत्याला दारात उभं पाहून आईला धक्काच बसतो, एक क्षण वाटलं की कदाचित आत्या आरोहीला घेऊन आल्या असतील, पण आरोही कुठे दिसत नव्हती. “काय वहिनी, कश्या आहात?” “मी मजेत..या ना आत..” “बरं आरोही कुठेय? फार आठवण येते तिची..” हे ऐकून आईला जबरदस्त धक्का बसतो, आरोही आणि तिच्या बाबांनी सांगितलं की आरोही आत्याला बरं नाही म्हणून … Read more

खेळ मांडला (भाग 8)

आरोही एकदम घाबरते, इथे चांगल्यातलं चांगलं प्रेझेंटेशन व्हावं म्हणून मी प्रयत्न करतेय आणि स्वतःलाच असं जुन्या कपड्यात कसं प्रेझेंट करणार मी? इथे जवळपास मार्केटही नाही, मला दुपारीच बॅग उघडून बघायला हवं होतं, पण असं झालंच कसं? मी तर आठवणीने चांगले कपडे बॅगेत ठेवले होते. मग ते जाऊन हे जुने कपडे आले कुठून? आरोहीने आईला फोन … Read more

येरे माझ्या मागल्या..

 सहेली मंचाच्या कार्यक्रमाला पन्नाशीच्या बायका एकत्र जमल्या होत्या. आयुष्यभर नवरा, मुलं, सासू, सासरे यांच्यातून आता कुठे या बायकांना उसंत मिळाली होती, भरपूर वेळ आता मिळू लागला. आता या वेळेचा कुठेतरी सदुपयोग करावा म्हणून सहेली मंचात या महिलांनी सदस्यत्व घेतलं. इथे विविध प्रकारचे उपक्रम, खेळ, व्याख्यान हे सगळं महिलांना आवडत होतं. नवनवीन मैत्रिणी मिळत होत्या, नवनवीन … Read more

धाकली सून

 घरातली थोरली सून, तिच्या आई वडिलांची एकुलती एक म्हणून दोन्हीकडे लाडाची. सासरी लाडकी यासाठी कारण तिने येताना घरात सर्व सुखसोयी आणल्या होत्या, माहेराहून दरमहा पैसेही मिळायचे आणि सोबतच माहेरच्या संपत्तीचा वारस म्हणून तीच. त्यामुळे लालची सासरच्या मंडळींनी तिला अगदी फुलासारखं जपलेलं. ती येताच घराचं रूप पालटून गेलेलं, पैसा हातात खेळू लागला, नवऱ्याने आणि सासूने स्वाभिमान … Read more

खेळ मांडला (भाग 7)

लांबच्या रस्त्याने प्रमिला गावी पोहोचली. गाव बरंच बदललं होतं. सुरवातीला फक्त आरोहिचे मामा मामी अन प्रमिलाचं घर होतं, आता तिथे अनेक घरं झाली होती. पारावर कायम दिसणारे वृद्ध चेहरे आता नजरेआड झाले होते. दुकानांचा चेहरामोहरा बदलला होता. अनेक नवीन दुकानं आली होती. तारण्या पोरांची लग्न होऊन त्यांची मुलं अंगणात खेळतांना दिसत होती. ड्रायव्हरने घरासमोर गाडी … Read more

त्यानेही पायमल्ली केली स्वप्नांची

 आज घरी जातांना घुंगरू घेऊनच जायचे असा निर्धार करत राघव झपाझप पावलं टाकत होता. घरी कडक शिस्तीचं वातावरण, मुलीलाही कधी नृत्य शिकू दिलं नाही अश्या घरात आपल्या बायकोचा हट्ट पूर्ण करायचा त्याने निर्धारच केला होता.  घरी जाताच आईने पिशवी घेतली अन त्यात तिला घुंगरू दिसले, तिची तळपायाची आग मस्तकात गेली.  “वाटलंच..तरी मी सांगत होते, ती … Read more

सासूबाई का चिडल्या?

 निशिता आज घराबाहेर पडली ते पोलिसात तक्रार करण्यासाठीच. घरात सासूचा रोज रोजचा त्रास आता सहन करण्यापलीकडे होता. एरवी दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणून भरपूर दुर्लक्ष केलं, पण जित्याची खोड मेल्यावाचून काही जात नाही असं म्हणत ती आज सोक्षमोक्ष करायलाच निघाली. घरगुती हिंसाचारामध्ये मानसिक हिंसाचारही येतो आणि त्याला शिक्षेचीही तरतूद आहे, ही शिक्षा झाल्याशिवाय सासू ताळ्यावर येणार नाही … Read more

खेळ मांडला (भाग 6)

आरोहीच्या आईला समजत नव्हतं, मानव इतका चांगला मुलगा असून आणि सगळं काही जुळून येण्यासारखं असताना केवळ जातीच्या भिंतीने सगळं काही रोखून धरलं होतं. म्हणूनच आरोहीला मानव पासून दूर ठेवणं महत्वाचं होतं. इकडे आरोहीला मनापासून टूर वर जायची इच्छा असते, पण घरच्यांच्या विरोध तिला माहीतच होता. काय करावं? कुणाला सांगावं? तिने मोठ्या धीराने वडिलांना याबद्दल सांगितलं. … Read more

अश्या कित्येक आयेशा अजूनही जगत आहेत?

 Ayesha news Ayesha husband Ayesha suicide एका स्त्रीला आत्महत्या हा शेवटचा पर्याय वाटावा आणि सर्व जोखड सोडवण्यासाठी मरणाचा मार्ग पत्करावा याहून मोठं दुर्दैव ते काय..!!! सोशल मीडियावर आयेशा नामक एका महिलेने आत्महत्येपूर्वी बनवलेला व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामागे कारणीभूत कोण, गुन्हेगार कोण यामागे न लागता अश्या अनेक मूक आयेशांबद्दल आपण बोलूयात. आयेशा ही एकटी स्त्री नाही … Read more

खेळ मांडला (भाग 5)

मानव त्याच्या सहकारी मित्राला आरोही बद्दल सांगत होता. “मी तिच्या घरी प्रोडक्ट विकायला गेलेलो, तिची नजर मला खूप काही सांगून गेली. भिंतीवर तिने काढलेली काही चित्र लावली होती, ते पाहून मी तर तिच्या प्रेमातच पडलो. पण तिच्याशी बोलायची संधी कधी मिळाली नव्हती” “आणि आज ती अशी अचानक समोर आली ना? आणि मग तू नोकरी देऊन … Read more

घरट्यातील पिल्लं

 राजेश खिन्न मनाने मुलाला भेटून परत आले होते. खरं तर दूरगावी पाठवलेल्या आपल्या मुलाला आपण भेटल्यावर खूप आनंद होईल असं वाटलेलं, पण राजेशना जेवढी ओढ आणि तळमळ होती तेवढी मुलात वाटली नव्हती. आल्या आल्या बायकोने त्यांना पाणी दिलं, त्यांच्या चेहऱ्यावरील खिन्नता तिच्या लगेच लक्षात आली. तिने काहीही न विचारता शांत बसणं पसंत केलं. थोड्या वेळाने … Read more

धाकली जाऊ

 थोरल्या जाउबाई कायम आपल्या धाकल्या जाऊची ईर्षा करत. तसं पाहिलं तर धाकली वर्षा साधी सरळ आणि शुद्ध मनाची होती, तिचा नवरा मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आणि साहजिकच चांगला पगार. दोघेही भाऊ वेगवेगळ्या शहरात राहत, सणावाराला दोघे भाऊ आपापल्या बायका मुलांना घेऊन गावी जात.  धाकला मनीष म्हणजेच वर्षाचा नवरा लहानपणापासून अभ्यासात हुशार, त्याच्या तल्लख बुद्धीने त्याने … Read more

खेळ मांडला (भाग 4)

आरोहीच्या आईच्या मनात खळबळ माजली होती, आरोहीच्या वडिलांचे शब्द तिच्या कानात घुमत होते.. “ना मानवला नकार दिला असता, ना आरोहीला गावी पाठवलं असतं ना तिचा अपघात झाला असता.” आरोहीच्या या स्थितीला आपणच कारणीभूत आहोत याची सल आईला बोचू लागली. पण कसं लावून देणार होतो आरोहीचं लग्न मानवशी? आपल्या नातेवाईकात आपली इतकी प्रतिष्ठा धुळीस मिळाली असती. … Read more