तुही है आशीकी (भाग 1)

 “आई चल ना उशीर होतोय..”   “किती रे घाई तुला? नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. मी तर म्हणते तिथेच माळा टाकून घ्या अन येतांना तिला गाडीतच घेऊन येऊ, काय!”   “मस्त आयडिया आहे. मी शेरवानी घालू का?”   “चल गपचूप, अरे कधी मोठा होणारेस तू, मुलगी पाहायला जातोय आपण, त्या लोकांना तू सोज्वळ, समजूतदार … Read more

खेळ मांडला (भाग 20)

सरिताच्या हातून ट्रे पडतो, तिला गरगरल्यासारखं होतं. थरथरत्या हातांनी ती ट्रे आणि ग्लास उचलते आणि चेहरा लपवत आत जायला निघते तोच मानवची बायको तिला थांबवते, “सरिता असू दे, होतं असं कधी कधी..आवरता येईल, हे बघ आपल्याकडे कोण आलंय मी ओळख करून देते..” सरिताची नजर वर करायला बिचकत असते, मानवची बायको सांगते.. “हे मिस्टर नकुल आणि … Read more

एकदा विश्वास ठेवून तर बघ..

 Lockdown झालं आणि गंगारामच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. मार्केट मध्ये मध्यवर्ती भागात त्याचं खेळणीचं दुकान, भरपूर चालत असे. दिवसाला हजार एक चा गल्ला जमे. संपूर्ण घर त्यावरच सुरू. मुलांचं शिक्षण, सणवार सगळं या दुकानावरच.एकवेळ मंदी येऊ शकते, ग्राहक कमी होऊ शकतात याची जाणीव असते पण हा आजार येईल अन दुकानं बंद करावी लागतील हे कुणाच्या … Read more

डायरी

 बाबांनी रोहनच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि धाडकन सोफ्यावर आदळला. रोहनची बायको समिधा धावत बाहेर आली.बाबांचं हे रूप रोहनने पहिल्यांदा बघितले होतं. रोहनच्या पंधराव्या वर्षी त्याची आई गेल्यानंतर बाबांनी रोहनला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं होतं. त्याचं शिक्षण, लग्न सगळं जबाबदारीने पार पाडलं होतं. लग्नानंतर बाबा खरं तर व्यापातून निवृत्त झाले होते, पण आज अचानक त्यांना असं … Read more

खेळ मांडला (भाग 19)

नकुल मदतीसाठी याचना करतो. आजूबाजूला कुणीही नसतं. आरही दोन्ही हात डोक्याला लावून विव्हळत असते. आर्वीला आवाज ऐकू आल्याने ती तिच्या आईला आणि बाबाला सांगते. “बाबा, तिकडे कुणीतरी मदत मागतंय..” सर्वजण आवाजाच्या दिशेने धावायला लागतात. इतक्या वेळ रडकुंडीला आलेल्या नकुलला लांबून येणाऱ्या या माणसांना बघून जरा बरं वाटतं. ते जसजसे जवळ येतात तसं नकुलला समजतं, अरे … Read more

राउंड अँड राउंड

 दोन वर्षाच्या सियाने खोलीत जाऊन दरवाजा बंद केला अन latch lock केलं तसं घरातले सर्वजण घाबरून दरवाजाकडे पळाले. तिने नुसतं latch ओढलं नव्हतं तर खालून लॉक सुद्धा केलेलं. पण तिला आता ते काही उघडता येईना त्यामुळे ती जोरजोराने रडायला लागली. बाहेरून आजी, आजोबा आणि शशांक ओरडू लागले, आपापसात मोठ्याने गोंधळ घालू लागले. “तरी मी सांगत … Read more

किंमत थोरलीची

 रेवतीबाईंना मनासारखी सून मिळाली नाही म्हणून त्यांची सर्व आशा आता धाकट्या सुनेकडून होती. कार्तिकी एक डॉक्टर, प्रॅक्टिससाठी ती ओळखीतल्याच एका डॉक्टरकडे जात असे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 अशी तिची वेळ. सासरी कामाची बोंबच होती. सासूबाईं एकट्या कशाबशा घर आवरत. त्यांच्या एका लाडक्या भाचीचं फार्मसी मध्ये शिक्षण झालेलं, अर्थात तिने फक्त लग्नाच्या बायोडेटा वर उठून … Read more

संकल्प मात्र एकच..

 “आई ठेवते फोन, दूध ऊतू जातंय, सासूबाईंना चहाही ठेवायचा आहे आणि मग कपडे धुवायला बसायचं आहे..” मनीषा पटकन फोन ठेवते आणि इकडे आईच्या मनात काळजीचं  वारं उठतं. चांगलं स्थळ म्हणून मुलीचं लवकर लग्न लावून दिलं तेही एका छोट्याश्या गावात. लहान भाऊ खूप शिकला, त्याने खूप प्रगती केली अन घराचं रूप गरिबीपासून एकदम श्रीमंतीत पालटलं. ऐसपैस … Read more

खेळ मांडला (भाग 18)

#खेळ_मांडला (भाग 18) भाग 1 https://www.irablogging.in/2021/03/2.html?m=1 भाग 2 https://www.irablogging.in/2021/03/2.html?m=1 भाग 3 https://www.irablogging.in/2021/03/3.html?m=1 भाग 4 https://www.irablogging.in/2021/03/4.html?m=1 भाग 5 https://www.irablogging.in/2021/03/5_7.html?m=1 भाग 6 https://www.irablogging.in/2021/03/6.html?m=1 भाग 7 https://www.irablogging.in/2021/03/7.html?m=1 भाग 8 https://www.irablogging.in/2021/03/8.html?m=1 भाग 9 https://www.irablogging.in/2021/03/9.html?m=1 भाग 10 https://www.irablogging.in/2021/03/10.html?m=1 भाग 11 https://www.irablogging.in/2021/03/11.html?m=1 भाग 12 https://www.irablogging.in/2021/03/12.html?m=1 भाग 13 https://www.irablogging.in/2021/03/13.html?m=1 भाग 14 https://www.irablogging.in/2021/03/14.html?m=1 (वाचकांच्या मनात प्रश्न आहे की आर्वी अचानक मोठी कशी झाली? … Read more

शिक्षणातलं घरकाम

 आपल्याला घरकाम करणारी सून हवी यावर इंदूताई ठाम होत्या. खूप स्थळं येत होती, जवळपास प्रत्येक मुलगी काहीना काही नोकरी करत होती आणि त्या प्रत्येकीला नकार दिला गेलेला. मनोजला हे काही पटत नव्हतं पण आईच्या हट्टापुढे काय चालणार.  “शिकलेल्या मुली नोकरी करणार, मग तिच्या नोकरीसाठी आपण तडजोड करायची, वर तिचा पगार आपल्याच घरासाठी कामात येईल याची … Read more

आता कामंच होत नाहीत माझ्याकडून 😪😪😪

 दिशाची रोजच धांदल उडत असे. लग्न करून आली अन समोर नोकरी अन घर सांभाळणं दोन्ही जबाबदाऱ्या तिने हसत हसत अंगावर घेतल्या. सासूबाईंनी सून आली म्हणून एकेका जबाबदारी मधून अंग काढून घेतलं. आणि आता त्याची इतकी सवय झालेली की एखादं काम करायची वेळ आली ली त्यांना प्रचंड जीवावर यायचं.  “माझ्याकडून आता कामच होत नाही बाई..” हे … Read more

कोरडी झालेली ती

 “तुझं बरंय, तुझी बायको बिचारी काहीही बोलत नाही तुला..नाहीतर आम्ही, जरा कुठे उशीर झाला की फोनवर फोन सुरू..” “हो मग, माझी बायको नाही तुमच्या बायकांसारखी..आज पिऊन आले म्हणून जाब विचारणारी..” राकेशचे 4-5 मित्र नशेत बोलत होते. आज या मित्रांची मस्त मैफिल जमली होती. अकरा वाजत आले तसे एकेक जण उठू लागले.. घरून फोन येऊ लागलेले.. … Read more

खेळ मांडला (भाग 17)

खेळ_मांडला (भाग 17) आपल्याला हे समजलं नसतं तर बरं झालं असतं असं खुशीला वाटू लागलं. कारण जे काही तिला समजलं त्यानंतर तिचं कशातच लक्ष लागेना. पण नकुलला काय उत्तर द्यायचं? त्याच्याशी खोटं बोलणं तिला पटत नव्हतं पण काहीही करून तिला तो विषय नकुलपासून आता बंद करायचा होता. तिने एक विचित्र कथा तयार केली अन तीच … Read more

समर्पण

 “पाच मिनिटापूर्वी टोपलंभर भांडी घासली, तरी सिंक मध्ये चार ग्लास आलेच..तिथेच खुर्ची टाकून बसावं आता..” गिरिजाची ही चिडचिड रोहनला नवीन नव्हती. तिचे सर्व डायलॉग एव्हाना त्याचे पाठही झाले होते. तो अजून अंघोळीला बसला नव्हता, त्यामुळे पुढील पाच मिनिटात हा डायलॉग ऐकू येणार.. “पटापट अंघोळीच करत नाहीत ही लोकं, 4 वाजेपर्यंत मशीनच चालू द्यायचं..” रोहन हा … Read more

खेळ मांडला (भाग 16)

सागर आणि प्रमिला, दोघेही भाऊ बहीण आपला भूतकाळ कितीतरी वेळ फोनवर आठवत असतात. इतके दिवस मनात साठलेलं प्रमिलाने पुन्हा एकदा बाहेर काढलं. एकप्रकारे मन मोकळं केलं. सागर या सर्वांचा साक्षीदार होताच. बाळ अनाथाश्रमात असताना त्यालाही त्याच्या निर्णयाचा राग येत होता, पण एकीकडे लहान जीव अन दुसरीकडे बहिणीचं भविष्य, या द्वंद्वात सागर अडकला होता. अखेर प्रमिलाच्या … Read more

खेळ मांडला (भाग 15)

#खेळ_मांडला (भाग 15) प्रमिला बाळाला अनाथाश्रमात नेते, तिथे तिची चौकशी केली जाते. बाळ कुठे सापडलं वगैरे जुजबी माहिती लिहून घेतली जाते. प्रमिला खोटं बोलून बाळाला तिथे हवाली करते. तिथे एक प्रेमळ आजीबाई होत्या, त्यांनी बाळाला जवळ घेतलं आणि प्रेमाने दूध पाजून झोपवून दिलं. प्रमिलाचा जीव नुसता कासावीस झालेला, पण त्या लोकांसमोर तिला ते दिसू द्यायचं … Read more

खेळ मांडला (भाग 14)

#खेळ_मांडला (भाग 14) आरोहीने शेवटी माघार घेतली, एक तर मामीमुळे हे बाळ जगात आलंय, मामीचे अनंत उपकार आहेत माझ्यावर आणि बाळालाही मामीच्या रूपाने आई मिळाली, जी त्याची हक्काची आई असेल. माझं उद्या काय होईल काही सांगता येणार नाही. सत्य समजलं तर माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्यात येईल, त्यापेक्षा बाळ इथे सुरक्षित राहील या विचाराने आरोहीने … Read more

प्रेमविवाह

 मेघना आणि सारंगच्या संसाराकडे सर्वांचं बारीक लक्ष होतं. दोघांचा प्रेमविवाह. घरचे तसेच नातेवाईक सर्वांनी लग्नाला प्रचंड विरोध केलेला पण दोघेही आपल्या मतावर ठाम होते. सर्वात जास्त विरोध होता तो काका काकूंचा. नातेवाईकात आपलं हसू होईल, सामाजिक प्रतिष्ठेला तडा जाईल म्हणून त्यांनी सुरवातीपासूनच प्रयत्न केले हे लग्न न होऊ देण्याकरिता. पण शेवटी प्रेम जिंकलं आणि मेघना … Read more

खेळ मांडला (भाग 13)

#खेळ_मांडला (भाग 13) “आई बाबा?” प्रमिलाच्या अंगणातून दोघींनी आई बाबांची गाडी मामाच्या दारात उभी पहिली, आरोहीच्या अंगावर काटाच आला, आई बाबांना माझी ही अवस्था समजली तर? काय होईल? तिकडे मामी एकटी आई बाबांशी बोलत होती, “ताई, अचानक कसकाय? फोन केला असता ना यायच्या आधी?” “तू कधीपासून शहरातल्या माणसांसारखं बोलायला लागली? आजवर कधी कळवून आलोय का … Read more

लेकाची माया

अक्कामाई मरणाच्या दारातून परत आली होती. जवळपास आठवडाभर मुलांचा टांगणीला लागलेला जीव आज मोकळा झाला होता. स्वतःकडे दुर्लक्ष करणारी अक्कामाई शुगर, bp, थायरॉईड अश्या अनेक आजारांनी घेरली गेली होती, पण जेव्हा ती जिन्यावरून पडली तेव्हा तिचा पाय फ्रॅक्चर झालाच पण हे बाकीचे आजारही समजून आले. त्या आधी अनेक दुखन्यांकडे ती दुर्लक्षच करत होती.  अक्कामाई ला … Read more