जेव्हा माहेरपण उमगतं

 तेव्हा बायकोचं माहेर समजतं.. “अगं जातांना जास्तीचा फराळ घेऊन जा तुझ्या माहेरी, तुझा भाऊही आलाय ना यावेळी गावी…आणि हो, अप्पांसाठी मी हे श्रवणयंत्र आणलं आहे, नेताना आठवणीने ने हो..” भाऊसाहेबांचं हे रूप कल्पनाने गेल्या 25 वर्षात पहिल्यांदा पाहिलं होतं. मानापानाच्या बाबतीत अगदी कडक, कौटुंबिक रीती भाती अगदी तंतोतंत पाळणारे भाऊसाहेब आज इतके नरम कसे झाले … Read more

Facebook, instagram, whatsapp is down today

 Facebook whatsapp is down? Today, 4th Oct 2021, facebook, whatsapp and instagram is down since 9pm. This is the biggest flaw ever in facebook and whatsapp servers. Millions of businesses and ad companies are using facebook as their primary marketing sources, will facebook pay back to those trusted users?  Facebook is down and so as … Read more

प्रतिकार

 आपल्या मनोरुग्ण झालेल्या लेकीला भेटून देसाई जोडपं आणि शरयूचा भाऊ नुकतेच परतत होते.. लेकीची अशी अवस्था बघून दोघांनाही अश्रू अनावर होत नव्हते..भाऊ तर शून्यात नजर भिडवून बघत होता..शरयूची आई आवंढा गिळत बोलत होती.. “सोन्यासारखा संसार सुरू होता माझ्या शरूचा..कुणाची नजर लागली कुणास ठाऊक…कधी कुणाचं वाईट केलं नाही माझ्या लेकीने..तिच्यावर अशी वेळ का यावी बरं..” “खरंच … Read more

चुकलीस तू..!!!

 अठरा वर्षीय रानुचा कामाचा चपाटा सर्वजण बघतच राहिले. काही दिवसांपूर्वीच तिच्या मावशीची मुलगी बाळंतीण झाली होती, घरी पाहुण्यांची लगबग सुरू झाली..मावशीला एकीकडे मुलीकडे लक्ष द्यावं लागे आणि दुसरीकडे पाहुण्यांच्या पंगती उठवाव्या लागे. अश्या धावपळीच्या प्रसंगी “रानुला बोलावून घ्या” हे वाक्य तिच्या कुटुंबात लोकप्रिय होतं.. रानुची आई, मनीषा…गेले कित्येक वर्षे माहेरीच रहात असे. नवरा दारू पिऊन … Read more

का मागे पडतो मराठी माणूस व्यवसायात?

“हॅलो, एक enquiry करायची होती..” “आज संडे आहे मॅडम, उद्या फोन करा..” असं म्हणत त्या बाईने घाईगाईने फोन ठेऊन दिला. मी फोन स्क्रीनवर त्या इन्स्टिट्यूट ची माहिती बघू लागले, गुगल रेटिंग फक्त 2 स्टार….मनातल्या मनात हसू आलं, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते हे..!!! आधीच उतरती कळा लागलेली त्या इन्स्टिट्यूटला, वर असा attitude… बरं जाऊद्या, रविवार … Read more

अस्सं सासर सुरेख बाई

 “सुधा परत एकदा विचार कर, जॉईन फॅमिली आहे ती..दिसायला सगळं छान दिसतं बाहेरून पण एकदा त्यात अडकलीस की बाहेर पडता येणार नाही..तू एकुलती एक, लाडात वाढलेली..तुला ना कामाची सवय ना जबाबदारीची…फक्त प्रेम आहे तेवढं असून चालत नाही..” सुधा आणि अमित एकाच कॉलेजमध्ये, कॉलेज पासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. रुसवे फुगवे दुरावा करत करत शेवटी त्यांना … Read more

आपण पालक असाल तर नक्की वाचा..

 पालक झाल्यावर खालील ज्ञानात भर पडते.. 1. Tom and jerry व्यतिरिक्त pepa pig, wolfoo, pupu, Vlad and Nikki, masha and the bear अशीही कार्टून्स अस्तित्वात असतात. 2. कॅडबरी हे सर्वोच्च सुख नसून त्यात अनेक पोटजातीही असतात.  3. सहा फुटाच्या माणसापेक्षा 2 फुटाचे कपडे महाग असतात. 4. खेळणीतील गाड्या खेळण्यापेक्षा त्याचे पार्टस वेगळे करणं हा मनोरंजक … Read more

आज कळतेय स्वातंत्र्याची किंमत…

 संपूर्ण जगाला आज कुणाची कणव येत असेल तर ती अफगाणिस्तान मधील स्त्रियांची. तालिबान ने अफगाणिस्तानवर ताबा घेतला आणि सगळं गणितच बदललं. मीडिया मध्ये एकेक बातमी ऐकायला येते, तालिबान ने स्त्रियांवर लादलेले विचित्र नियम ऐकून चीड येतेय. बुरख्याशिवाय बाहेर पडायचं नाही, जातानाही एखादा पुरुष सोबत हवा, स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी, नोकरीवर बंदी, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर पूर्णपणे पुरुषांचं वर्चस्व..!!! … Read more

पुरुषांनो स्वावलंबी व्हा..!!!

 सध्या फेमिनिजम, स्त्री पुरुष समानता यावर ट्रेंडिंग हेडलाईन्स बनत असतात. स्त्रीने स्वावलंबी असावे, स्वतःच्या पायावर उभे रहावे, कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ देऊ नये ही शिकवण दिली जाते. पण स्त्रीप्रमाणेच पुरुषानेही स्वावलंबी असावे ही शिकवण त्यांना दिली जाते का?  “पुरूष असतातच मुळात स्वावलंबी, त्यांना वेगळं काय करायची गरज आहे?” हा प्रश्न बहुतेकांना पडला असेल.. अर्चित, … Read more

साथ

 प्रसिद्ध उद्योगपती मिस्टर जामकर यांच्या निधनाची बातमी पेपर मध्ये झळकली आणि स्नेहाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले, आपण आयुष्यात घेतलेला निर्णय किती योग्य होता याची तिला आज प्रकर्षाने जाणीव झाली. तिचं असं स्तब्ध झालेलं बघताच तिचा नवरा सुधीर तिच्या जवळ आला आणि त्याने पेपर मधली बातमी पाहिली, तोही काही वेळ सुन्न झाला. स्नेहा आणि सुधीर ने पळून … Read more

वेळीच विरोध करा..-1

यावेळी दिवाळीत सासरी जातांना अनुराधाच्या मनात वेगळंच चलबिचल होती. चलबिचल पेक्षा जास्त तिला काळजी वाटत होती आशा ची. आशा, तिची धाकली जाऊ, वर्षभरापूर्वीच दिराचं लग्न झालेलं आणि आशा लक्ष्मीच्या पावलांनी घरी आली होती. तिचा पायगुणच म्हणायचा, ती आली आणि अनुराधाच्या नवऱ्याला मोठी जॉब ऑफर आली आणि त्यानिमित्ताने ते मोठ्या शहरात स्थायिक झाले. सासरचं घर त्यांना … Read more

तुही है आशिकी (भाग 26 अंतिम)

  भाग 1 https://www.irablogging.in/2021/04/1.html?m=1 भाग 2 https://www.irablogging.in/2021/04/2.html?m=1 भाग 3 https://www.irablogging.in/2021/04/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2021/04/4.html?m=1 भाग 5 https://www.irablogging.in/2021/04/5.html भाग 6 https://www.irablogging.in/2021/04/6.html भाग 7 https://www.irablogging.in/2021/04/7.html भाग 8 https://www.irablogging.in/2021/04/8.html भाग 9 https://www.irablogging.in/2021/04/9.html भाग 10 https://www.irablogging.in/2021/04/10.html भाग 11 https://www.irablogging.in/2021/04/11.html भाग 12 https://www.irablogging.in/2021/04/12.html भाग 13 https://www.irablogging.in/2021/04/13.html भाग 14 https://www.irablogging.in/2021/04/14.html भाग 15 https://www.irablogging.in/2021/05/15.html भाग 16 https://www.irablogging.in/2021/05/16.html भाग 17 https://www.irablogging.in/2021/05/17.html भाग 18 https://www.irablogging.in/2021/05/18.html … Read more

टेक्निकल संसार (भाग 5)

  श्वेता ने ती लँग्वेज शिकायला सुरवात केली..सोबतच घरातलं स्वयंपाकाचं ट्रेनिंग चालू होतं…   “आई..मला गाजर हलवा शिकवा…”   “का गं असा अचानक??”   “उद्या बाबांचा वाढदिवस आहे ना..”   “अरेच्या..मी विसरले होते बघ..तुला बरं लक्षात राहीलं..”   “हो मग..सर्वांच्या वाढदिवसाचा डेटाबेस मेंटेन केलाय मी..”   सासूबाई हसल्या..   “बरं तुला प्रोसेस सांगते, त्यानुसार कर..” … Read more

टेक्निकल संसार (भाग 4)

“माझा पार्टनर आहेस…सर्व गोष्टीत आपले समान शेअर्स आहेत…आणि त्याची लीगल प्रोसेस लग्नात झालेली आहे..” सोहम कपाळावर हात मारून घेतो.. श्वेता ला त्याची अवस्था समजते, आणि ती म्हणते.. “आपण दोघेही variables आहोत..पण dependent variables… एकमेकांवर आपण depend आहोत… तूला काही झालं तर त्रास मला होतो… तू नाराज असला तर माझ्या मनाला रुखरुख लागते…आणि माझ्यावर काही संकट … Read more

टेक्निकल संसार (भाग 3)

सासुबाई तिची मेहनत कौतुकाने पाहून निर्धास्त झाल्या.. उद्या पाहुणे येणार म्हणून सासूबाईंनी काही तयारी केली, त्या दमल्या आणि दुपारी जरा पहुडल्या… अचानक दारावरची बेल वाजली..श्वेता दार उघडेल असं त्यांना वाटलं, पण ती काही बाहेर आली नाही..शेवटी सासूबाई स्वतः उठल्या आणि बघतो तर काय… पाहुणे एक दिवस आधीच हजर… डोक्यावर पांढरी टोपी घातलेले 2 आजोबा, नऊवारी … Read more

टेक्निकल संसार (भाग 2)

सासूबाई म्हणाल्या, “खूप साऱ्या errors येत आहेत. Warning मेसेज पण फार आलेत..” “Error आणि warning message हे शब्द ऐकून श्वेता पळत बाहेर आली..” “मला सांगा…कुठली लाईन चुकलीये?? माझ्या कोडींग मध्ये एकही लाईन ला error मेसेज येत नाही..” सासूबाई हसल्या.. “चांगलंय, पण error कोडिंग मध्ये नाही…या घरातून येतेय…” “म्हणजे??” “म्हणजे बघ ना..वस्तू चुकीच्या जागेवर आहेत…घर मातकट … Read more

टेक्निकल संसार (भाग 1)

#टेक्निकल_संसार ©संजना सरोजकुमार इंगळे सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या श्वेता चं लग्न ठरलं आणि आईच्या पोटात गोळाच उठला…मुलगी दूर चालली म्हणून? नाही…तर श्वेता च्या स्वभावामुळे… श्वेता शाळेपासून कायम अव्वल..अभ्यास सोडून इतर कुठेही लक्ष नसे…अगदी पुस्तकी किडा… नोकरीतही तसंच… कायम कामात लक्ष…जीव ओतून काम करायचं..अगदी ओव्हरटाईम सुद्धा…त्यामुळेच तिला पटापट बढती मिळत गेली… पण ही कामात इतकी गुंतलेली असे … Read more

प्रतिबिंब

 “तू पुन्हा तुझ्या ज्वेलरी डिजाईन चं काम का नाही सुरू करत? खूप डिमांड असायची तुला..एकदम का बंद केलंस?” “काही नाही गं, आधी सासूबाईंनी मदत व्हायची, आता वयानुरूप त्यांनाही जमत नाही मदत करायला, त्यात मागे एकदा बाथरूम मध्ये पडल्या त्या, आता बेडवरच आहेत..” “अच्छा म्हणून सोडलं काय तू सगळं…बाईने कितीही ठरवलं काही करायचं तरी काही ना … Read more

मुलांसाठी शाळा निवडताय? त्याआधी ही सत्य जाणून घ्या

 मध्यंतरी एक वारं उठलं होतं, एक पोस्ट खूप व्हायरल होत होती की मुलांना खरा खर्च बारावी नंतर येतो, मग शाळेसाठी भरमसाठ फी भरून पैसे वाया का घालवता? ते पैसे शेयर मार्केट मध्ये टाका आणि आरामात आयुष्य जगा. पुढील शिक्षण महागडं करा आणि मुलांसाठी भरपूर सेविंग्स करून ठेवा. खरोखर ते वाचल्यानंतर त्या विचारांमध्ये दूरदृष्टी नव्हे तर … Read more

समूहात वावरताना

 समूहात वावरतांना आज खूप दिवसांनी आरतीची मावसबहीण तिला भेटायला आली होती. म्हणजे अगदी 3 वर्षांनी दोघीजणी भेटल्या होत्या, पण यावेळीही सरिता घाईतच होती, मिस्टरांना कसंबसं मनवून बहिणीला भेटायला ती आलेली, फक्त 15 मिनिटं बसायचं म्हणून तिचे मिस्टर तयार झाले होते. एका लग्नानिमित्त दोघेही आलेले पण जाता जाता बहिणीला भेटण्यासाठी सरीताने तगादा लावला होता. सरिताला बघून … Read more