कल्पक -3 अंतिम

“मानलं हा तुला, देवानंतर नंबर तुम्हा स्त्रियांचाच.. कुणी कितीही त्रास दिला तरी तुम्ही त्यांचं चांगलंच चिंतणार”   “तुला अजूनही आवडते का रे मी?”   “हा काय प्रश्न आहे?”   “नाही म्हणजे कॉलेजमध्ये असताना तुझी स्वप्न पाहिलेली मी…पण तू स्वप्नातच राहिलास..”   “मी तिथेच असतो, माझं घरच ते…”   इतक्यात दारावरची बेल वाजली, साडेपाच वाजले होते, … Read more

कल्पक -1

नवऱ्याला आणि मुलांना तिने तयारी करून शाळेत पाठवलं.. आणि घरात येताच एक सुस्कारा टाकला.. दार लावून घेतलं आणि घराकडे एकदा बघितलं.. नुसतं अस्ताव्यस्त.. एखादी वस्तू शोधायची म्हणजे सगळ्या वस्तू बाहेर काढायच्या आणि पुन्हा आत ठेवायच्याच नाहीत.. हा जणू नियमच.. का? कारण आई आहे ना आपण गेल्यावर सगळं आवरायला.. तिने सगळा पसारा आवरला.. ओट्यावरचा पसारा बघून … Read more

कल्पक -2

“हो मग आता कामं तर करावीच लागणार ना..” “हात बघितलेस का तुझे? किती कडक झालेत ते…जसं दगड फोडायला जातेस तू..” “गप रे, काहीही काय..” “बरं मला सांग, काय काय झालं आज? आणि तू जेवलीस का?” “हो जेवले..” “थांब मी बघून येतो..” कल्पक आत किचनमध्ये जातो..आणि परत येतो.. “वाटलंच मला, अगं दीड पोळी जेवलीस तू फक्त..इतकं … Read more

सर्वांगसुंदर -2

प्रमोदला तिची लाज वाटत होती… बऱ्याच ठिकाणी तिला न्यायला तो टाळत असे.. तिच्या आता लक्षात आलं.. तिने आरशात बघितलं.. तिचं शरीर तिचं तरी कुठे होतं… सगळी कष्ट मुलं आणि नवऱ्यासाठी.. ज्या शरीराला राबवून त्यांची पोट ती भरत असे, त्यांचं उठण्यापासून सगळं आवरत असे त्याचीच त्यांना लाज वाटू लागलेली… तिकडे प्रमोद पार्टीत व्यस्त होता.. “केतकीची तब्येत … Read more

सर्वांगसुंदर -3 अंतिम

 बायका स्वतःचा जीव मुठीत घेऊन नवऱ्याला कुणीतरी वाचवा म्हणून आक्रोश करत होत्या, तिथे केतकी कसलाही विचार न करता झरकन वर गेली.. आगीचे लोट अंगावर येत होते.. चटक्यांनी पूर्ण शरीर वेदनेने तळमळत होतं.. पण तिला त्याची फिकीर नव्हती.. तिची नजर प्रमोदला शोधत होती.. एका कोपऱ्यात धुराने बेशुद्ध झालेला नवरा तिला दिसला.. तिने सगळं बळ एकटवलं..अंगावरचे पडदे … Read more

सर्वांगसुंदर – 1

“आज पार्टीत प्लांट हेडला माझं नवं प्रपोजल दाखवतो, त्याला आवडलं तर आपली चांदीच चांदी…” फाईल हातात घेत प्रमोद आपली बायको केतकीला सांगत होता, ती सुद्धा पार्टीत जाण्यासाठी नवऱ्याला तयार करत होती.. शर्ट, सूट, पॅन्ट सगळं इस्त्री करून ठेवलं, शूज पोलिश करून ठेवले.. तो आवरेपर्यंत ती त्याच्या अवतीभोवतीच फिरत होती.. त्याचं आवरून झालं आणि तो घाईघाईत … Read more

राजकुमारीची गोष्ट -3 अंतिम

एके दिवशी एक बाई 2 मुलांना घेऊन तिच्या झोपडीत आली. भांडायला लागली.. माझ्या नवऱ्याशी लग्नच कसं केलं तू? राजकुमारीला धक्का बसला.. हळुहळु समजलं, या मुलाने आपल्या रुबाबदार दिसण्याचा फायदा घेऊन अनेक स्त्रियांना फसवलं होतं.. तिने आपलं सामान घेतलं… आपल्या घरी जायला निघाली.. राजा राणीने तिचा धिक्कार केला..तिला परत स्वीकारलं नाही… ती परतीच्या वाटेवर जायला निघाली… … Read more

राजकुमारीची गोष्ट-1

“शर्वरी हा मेसेज कुणाचा आहे सांग पटकन, हा dear❤️ नावाने कुणाचा नंबर सेव्ह केलाय?” सतरा वर्षाच्या शर्वरीच्या मेसेजची रिंगटोन वाजली, नोटिफिकेशन आलं आणि आईने ते पाहिलं.. “शर्वरीने पटकन फोन उचलला” “आई तू कशाला हात लावलास माझ्या मोबाईल ला?” “मी हात नाही लावला, दिसलं मला…पण कोण आहे हा?” “बेस्ट फ्रेंड आहे माझी..” शर्वरी तुटक तुटक उत्तर … Read more

राजकुमारीची गोष्ट-2

आई सुन्न झाली, शर्वरी अश्या काही जंजाळात अडकेल याची आईला कल्पनाही नव्हती… शर्वरीच्या खोलीत जाऊन तिला विचारण्यासाचं धाडसही आईला झालं नाही.. एवढयात दारावरची बेल वाजली, आईची एक मैत्रीण आलेली, कल्पना… “ये बस..” कल्पनाने आईच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले, कल्पनाने विचारताच आईने रडत रडत सगळं सांगितलं… कल्पनाला ऐकून वाईट वाटलं… इतक्यात शेजारच्या एका बाईने आईला हाक दिली, … Read more

प्रसाद – 3 अंतिम

 “नाहीतर काय आई बाबा…काय केलं तुम्ही माझ्यासाठी आजवर? ना मोठा वाढदिवस साजरा केला माझा, ना लांब फिरायला नेलं, ना कसले लाड केले…मी एखाद्या दुसऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्मलो असतो तर किती बरं झालं असतं..” आईच्या अश्रुधारा वाहायला लागल्या,  वडील पुढे आले आणि त्याला जोरात कानाखाली मारली… “नालायका..तुझं संगोपन नीट व्हावं म्हणून दुसरं मूल होऊ दिलं … Read more

प्रसाद -1

वयाच्या 53व्या वर्षी तिला डिप्रेशनचा आजार जडला.. डॉक्टर, मानसोपचार तज्ञ…सगळं सुरू होतं.. 2 दिवस बरं वाटायचं, पण नंतर पुन्हा ये रे मागल्या… हार्मोसल बदलामुळे होतंय का? एखादे व्हिटॅमिन कमी आहे का? मेंदूवर काही ताण पडतोय का? यासाठी सर्व तपासण्या झाल्या.. सगळं अगदी नॉर्मल… म्हणजे आजार हिच्या मनातच होता.. कसलातरी सतत विचार करत असायची ती.. फारशी … Read more

प्रसाद -2

“पाटलांनी नवीन फर्निचर केलं.. “यांनीही जरा खटाटोप करून चांगली नोकरी केली असती तर…आपलंही झालं असतं..” ओमच्या परीक्षा संपल्या, तो घरी येणार म्हणून हिच्यात जरा उत्साह आला.. ओमला आवडतो म्हणून चिवडा बनवायला घेतला..लाडू करायला घेतले.. नवऱ्याला तिचा उत्साह बघून बरं वाटलं… ओम घरी आला , आल्यावर तो आईला कडकडून भेटेल असं तिला वाटलेलं.. पण आल्या आल्या … Read more

दुहेरी -3

 ती उठली,   “हेच ऐकायचं बाकी होतं मला…माझ्यावर विश्वास नाही मा तुमचा? मी जातेय घर सोडून, पण जाता जाता एक सांगते… मी आरवला भेटायला गेलेले हे सांगण्यासाठी तुमची घरी यायची वाट बघत होते..” “भेटायला गेली हे कशाला सांगायला हवं?” “कारण त्याने मला धमकी दिलेली, मला भेटायला आली नाहीस तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, विधवा करेन तुला…हे … Read more

दुहेरी -2

घरात बसणारी एक संस्कारी बाई हवी म्हणून त्याने कार्तिकीशी लग्न केलं…जिला आपला कधी संशयही येणार नाही आणि आपल्या कामाच्या ठिकाणी ती लुडबुड करणार नाही… आणि आपण आपले शौक करायला मोकळे… एके दिवशी अमोलची assistant त्याच्या केबिनमध्ये आली.. “ओह, wow नीना…आज फारच सुंदर दिसताय..” “थँक्स सर, by d way आपल्याकडे एक बिझनेस प्रपोजल आलेलं आहे…खूप फायदा … Read more

दुहेरी- 1

गेल्या अर्ध्या तासापासून कार्तिकी सुईत दोरा ओवायचा प्रयत्न करत होती.. तिच्या नवऱ्याने ते पाहिलं, तो म्हणाला, “अगं सोड ना ते, किती वेळ धरून बसलीये..” “थांब जरा..” अखेर सुईत दोरा टाकला आणि ती शांत झाली.. “कोण म्हणेल तू राज्यातल्या टॉप बिझनेसमन ची बायको आहेस ते? दिवसाला नवीन कपडे घेऊ शकतेस इतका पैसा आहे आपल्याकडे…अन तू..” ती … Read more

निष्प्राण 3 अंतिम

  आई आणि मनुला धक्काच बसला.. “हा असा विचार तुम्ही कसा करू शकता? मुलगी जड झालीये का आपल्याला?” “तुला नाही पण मला झालीये जड, किती दिवस असं सांभाळणार तिला? एक तर हिचं डोकं उठतं सारखं, काही कामाची नाही ही..त्याच्यामुळे हिच्याशी कुणी लग्नाला तयार होईना..” मनु मटकन खाली बसली.. विचार करून म्हणाली, “आई मी तयार आहे..” … Read more

निष्प्राण – 1

मनू…अगं पळ लवकर, जितू पास झालाय बारावी, 70 टक्के मिळालेत त्याला..” मनू ने घराकडून आलेली हाक ऐकली आणि शेतातले काम सोडून घरी पळाली.. तिचा लहान भाऊ जितू, यंदा बारावीला होता.. हुशार होता…बारावीला शाळेत पहिला आला अन घरी आनंदी आनंद… आईने देवापुढे साखर ठेवली, बाप छाती काढून मिरवत होता.. मनुला तर भावाला कुठे ठेऊ अन कुठे … Read more

निष्प्राण -2

“बस..ठरलं म्हणजे ठरलं..अर्धा भाग विकला पण अर्धा आहे ना? आणि जितू एकदा चांगलं शिकून नोकरीला लागला तर अश्या दहा जमिनी घेईल आपल्याला..” पैशांची सोय झाली, ऍडमिशन साठी बाबा आणि जितू शहरात जाणार होते..आई म्हणाली, “मनूला पण घेऊन जा, तिथे एखाद्या चांगल्या दवाखान्यात दाखवा…फरक पडेल..” मनू सुदधा आता त्यांच्यासोबत जाणार असं ठरलं.. जाण्याच्या आदल्या रात्री आई … Read more

देवदूत -3 अंतिम

 दुसऱ्या दिवशी पहाटेच तिला जाग आली, विचारांचं चक्र पुन्हा सुरू झालं.. तिच्या 3 लहानग्या अंकुरची काळजी तिला वाटू लागली.. मिहीरला सोबत हवी म्हणून त्याने लग्न केलं, पण त्याला माझ्या अंकुर ची अडचण वाटायला लागली तर? अंकुर साठी बापाचं प्रेम तरी का अपेक्षित करू त्याच्याकडून? का उपकार करावे त्याने? बाप नाही निदान माणूस म्हणून तरी माझ्या … Read more

देवदूत -1

दोघांचं नवीनच लग्न झालं होतं, एका लहानशा देवळात, ओळखीतले चार नातेवाईक आणि तिचे आई वडील.. लग्न कसलं ते, तडजोड होती. तिला 3 वर्षाचा एक मुलगा, आणि तो अविवाहित. लग्न करून ती आणि तिचा मुलगा त्याच्या घरी गेले. त्याने घर दाखवलं… बेडरूममध्ये तिने आपल्या मुलाला झोपवलं, पण पुढे काय होणार म्हणून तिला धास्ती वाटायला लागली. जीवनात … Read more