उलगडा-2

पण ती जे वागली ते अनपेक्षित होतं.. तिने नवऱ्याला बाहेर बोलावलं.. शांतपणे विचारलं.. ही मुलगी कोण? त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.. तिने त्याला धीर दिला.. मी काहीही करणार नाहीये, मला खरं खरं फक्त सांगा.. त्याने सांगायला सुरुवात केली.. “ही प्रेरणा…माझ्या कॉलेजमध्ये असतानाची माझी प्रेयसी.. तेव्हा आमचं ब्रेकप झालेलं, पण नोकरीनिमित्त पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि आमचं … Read more

उलगडा-1

माहेरी जायला निघालेल्या तिची बस चुकली अन ती घरी परतली… दुपारची वेळ होती, नवऱ्याने स्टॉपवर सोडलेलं, अर्धा तास होऊनही बस आली नव्हती, तिने नवऱ्याला घरी पाठवलं होतं.. बस आली की मी जाईन म्हणत त्याला घरी पाठवलं, लेकीचा हात धरून तिथेच बसून राहिली.. त्या बस ला काहीतरी अडचण आलेली आणि बस आलीच नव्हती.. घरी परतल्यावर नवरा … Read more

हक्क-3

  नवऱ्याला मिळालेला नेकलेस सुद्धा नणंदेला गेला होता.. नवरा घरी आला.. तिचं अवसान आज वेगळं दिसत होतं..तो सावध झाला.. तिने एकेक गोष्टीचा जाब विचारला.. त्याला समजलं, आपलं पितळ उघडं पडलं.. पण त्यात त्याला काहीही चुकीचं वाटत नव्हतं.. “तुला काय करायचं आहे? माझा पगार, मी ठरवीन काय करायचं ते” “ठरवा ना, तुम्हीच ठरवा…हे सगळं मला विश्वासात … Read more

हक्क-2

बाकी घर खर्चात त्यातली काहीही मदत होत नसे… पण ती काय बोलणार.. एके दिवशी नणंदबाई सोन्याचा नेकलेस घालून घरी आल्या.. आईने भरभरून कौतुक केलं.. पेन्शनच्या इतक्याश्या पैशात एवढं महागडं कसं परवडत असेल? तिला प्रश्न पडायचा, पण विचारणार कोणाला… त्या दिवशी घरातले सार्वजण बाहेर गेलेले.. घरी नवऱ्याच्या कंपनीतलं एक जोडपं घरी आलं.. दोघे नवरा बायको, तिच्या … Read more

हक्क-1

“तुम्हाला नसतो का हा दिवाळीचा बोनस?” तिने गदगदून विचारले, कित्येक वर्षांपासून दिवाळीला चांगली साडी घेतली नव्हती.. यावेळी हौस म्हणून नाही पण निदान शेजारी पाजारी स्वतःची लाज राखायला तरी घ्यावी म्हणून तिने विचारलं.. तो मौन होता.. त्या मौनातच तिला त्याच्या वेदना कळून आल्या, तीच म्हणाली, “काही नाही हो, सहजच विचारलं..” तिचा हिरमोड झाला खरा, तिचा काटकसर … Read more

मनातली वादळं -3 अंतिम

 “शक्यच नाही, अहो तिला साधा कधी तापही आला नव्हता, मग असं अचानक कसं होऊ शकतं? तिला जगावं लागेल…अजून कितीतरी जबाबदाऱ्या बाकी आहेत..माझ्या बहिणीचं डोहाळजेवण अर्धवट राहिलं… धाकटी परदेशी चालली तिची….” त्याचं वाक्य पूर्ण होत नाही तोच त्याच्या गालावर खाडकन आवाज आला.. तिची आई आज पेटली होती, तिच्या डोळ्यात अंगार दिसत होता.. “याचसाठी हवी होती का … Read more

मनातली वादळं -2

आईला वाटे लेकीला सोडवून आणावं या जंजाळातून.. पण आईवरही नवऱ्याचा वचक, लेक माहेरी आली तर तिचा बाप सहन करणार नाही हे आईला माहीत होतं..खंबीर झाली असती तर बापाने हाकलून लावलं असतं.. लेकीला माहेर टिकावं म्हणून आई चार गोष्टी समजावून तिला परत पाठवी.. दोन्ही जावांचे नखरे, दिरांचे टोमणे यात ती दबून गेलेली.. नणंदा हौस पुरवायला सारख्या … Read more

मनातली वादळं – 1

तिला असं अचानक बेशुद्ध झालेलं बघून सगळेच धास्तावले.. आजारी पडून तिने बेड धरलेला आजवर कुणीही पाहिलेलं नव्हतं, कधी सर्दी ताप आला तरी तिच्या कामात खंड नसायचा.. काय करणार, लग्न करून आली तश्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या, सासूबाईंनी अंथरूण धरलं आणि तिच्यावर सगळंच येऊन पडलं.. दोन दीर, दोन नणंद, दोन जावा आणि त्यात ही थोरली.. सर्वांची लग्नकार्य, … Read more

खंबीर-3 अंतिम

 रेखा आणि तिच्या नवऱ्याने कसेबसे पैसे जमवले आणि ओमची फी भरली, एके दिवशी शिल्पाचा फोन आला, “अगं आई मला बरं वाटत नाहीये, आज ऑफीसला काही जाणार नाही मी..घरीच आराम करते” तिच्या या सांगण्यामागे उद्देश हा की तिला आयतं जेवण पाठवावं.. आईची तगमग सुरू झाली, लगेच रेखाला आवाज दिला, “रेखा, अगं शिल्पाला बरं नाहीये…तिला दोन दिवस … Read more

खंबीर-1

नणंदबाई आणि तिच्या मिस्टरांची बदली रेखाच्या गावी झाल्यापासून रेखाला अजिबात फुरसत मिळत नसे.. सासूबाईंचा सगळा जीव मुलगी आणि तिच्या संसारात.. ती इथे आल्यापासून त्या रेखाच्या मागे सतत भुणभुण लावायच्या, “अगं शिल्पाला छानपैकी चिवडा बनवून दे..शंकरपाळे बनवून दे..आज पावभाजी बनवलीस का? ओमला सांग आत्याला देऊन ये म्हणून..” रेखाचा नवरा एका छोट्याशा कंपनीत कामगार म्हणून काम करत … Read more

खंबीर-2

हे म्हणण्यामागे शिल्पाचा हेतू वेगळा होता, उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तिला आपल्या गावंढळ वहिनीची लाज वाटू नये म्हणून रेखाला येऊ देण्यास तिने नकार दिला.. पण आई कुठे शांत बसते, “अगं रेखा ती म्हणत नसली तरी तिची धावपळ होत असेल, आज आणि उद्या जास्तीचा स्वयंपाक कर..तुझा नवरा देऊन येईल डबा रोज” रेखाला हे पटत नव्हतं, आईचं प्रेम … Read more

स्त्रीधन-2

 तिचं पार्लर होतं, घरातच एका छोट्याश्या जागेत तिने सगळी व्यवस्था केलेली, सकाळी लवकर कामं आटोपून बसत जाई.. मग 10 नंतर बायकांची येजा सुरू होई.. कुणाला आयब्रो, कुणाला haircut.. दिवसभर रेलचेल चालू असे.. रंजना काकूंनी सुरवातीला कटकट घातली,  पण नव्या सुनेने नाव ठेवायला जागाच ठेवली नाही.. घरातलं एकही काम सुटत नसे, सकाळी नाश्ता, स्वयंपाक, धुणी, भांडी, … Read more

स्त्रीधन – 3 अंतिम

 हे ऐकून त्यांना प्रचंड अभिमान वाटायला लागतो.. पार्लर मधली गर्दी दिवसेंदिवस वाढत असते, आहे ती जागा आणि उपकरणं कमी पडू लागतात.. एके दिवशी कविता आपल्या नवऱ्याशी बोलत असताना रंजना काकू ऐकतात.. “अहो मी काय म्हणते, थोडं लोन काढून पार्लर ची जागा वाढवूयात का? आणि काही नवीन कॉस्मेटिक पण घ्यायचेत.. बाजारात बरेच नवीन प्रोडक्ट आलेत, ग्राहक … Read more

स्त्रीधन-1

रंजना काकू आपल्या सोडून गेलेल्या आईचा सोन्याचा हार कवटाळून बसल्या होत्या.. रंजना काकू तश्या वयस्करच, पण आई शब्द म्हटला की भलेभले लहान होऊन जातात.. एका आजाराचं निमित्त झालं आणि रंजना काकूंची आई सोडून गेली.. आई गेली अन दहा दिवस मुली माहेरी राहिल्या, सगळे विधी झाले, शेवटच्या दिवशी भावाने आईचे दागिने बाहेर काढले आणि बहिणींसमोर ठेवले, … Read more

तिचं विश्व-3

 थोडा भाजीपाला लावला.. तिचा पूर्ण दिवस यात जाऊ लागला.. बागकामच्या वेगवेगळ्या पद्धती शोधणं, खत तयार करणं.. मशागत करणं.. यात तिला तिच्या दुःखाचा विसर पडला.. घरची मंडळी अस्वस्थ होऊ लागली.. आपल्या मागे मागे करणारी आई आता वेगळ्या विश्वात रमतेय… आईला बोलवायला आता बागेत जावं लागायचं.. आतापर्यंत हाक दिली की आई आपल्या जागेवर हजर असायची.. आता तिला … Read more

तिचं विश्व -1

ती रस्त्यावर अचानक चक्कर येऊन पडली आणि आजूबाजूचे सगळे लोकं जमा झाले.. चार माणसांनी तिला उचलून जवळच्या दवाखान्यात नेलं.. डॉक्टरांनी तिला तपासलं, उपाशीपोटी उन्हात फिरत असल्याने तिला भोवळ आलेली, तिला सलाईन लावली आणि ज्यूस प्यायला दिलं.. सोबत आलेली माणसं तिथेच होती, “मावशी तुमच्या घरी फोन लावतो” “नको रे बाळा, मी बरी आहे आता..जाईन बरोबर, फार … Read more

तिचं विश्व -2

“कुणी सांगितले होते उपास करायला?..” नवरा म्हणाला, “म्हणून तुला म्हणत होतो ते झुंबा वगैरे क्लास करू नकोस, बघितलं ना आता? या वयाला झेपणार नाही” मंदार म्हणाला.. “अशी एकटी जाऊ नकोस परत, मला सोबत नेत जा.मी आज संध्याकाळी मित्रांना जेवायला बोलावणार होतो बघ, राहिलं आता” – केदार म्हणाला.. आईला जे वाटलेलं त्याच्या अगदी उलटं होत होतं.. … Read more

छोटीशी प्रेमकथा – 3 अंतिम

 “दीड वर्ष संपलं आहे, अजितला बोलवूया भेटायला..” “का गं? इतकी घाई?” “अगं पेपर पाहिला का…त्याची IPS ऑफिसर मध्ये निवड झालीये, पेपरमध्ये फोटो आहे त्याचा… ट्रेनिंग साठी तो बाहेर जाईल, त्या आधीच उरकून टाकू तुमचं..” निकिता हसायला लागते, हीच आई काल म्हणत होती, डिलिव्हरी बॉय तो, काय सांभाळणार तुला.. निकिता म्हणते, “बाबा, त्याचा नंबर द्या मला, … Read more

छोटीशी प्रेमकथा-2

मग आई वडिलांनी त्यांना आपला निर्णय सांगितला.. दीड वर्ष दूर राहायचं, दीड वर्षांनी सुद्धा तुमचं प्रेम असंच राहिलं तर लग्नाला परवानगी देऊ आम्ही.. दोघेही जड मनाने तयार झाले.. दिवस सरत गेले, निकिता एका चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली.. एकमेकांची आठवण यायची, पण संपर्काची सगळी साधनं आई वडिलांनी तोडली होती.. दोघांना नंबर बदलायला लावला.. अजित काय करत … Read more

छोटीशी प्रेमकथा -1

“दीड वर्ष…फक्त दीड वर्ष आहेत तुमच्याकडे… या दीड वर्षात एकमेकांशी बोलायचं नाही आणि भेटायचं नाही…खरं प्रेम असेल तर दीड वर्षांनी पुन्हा एकत्र याल” निकीताच्या घरी आज अजित आणि निकीताचा चांगलाच समाचार घेतला जात होता. निकिता आणि अजित एकाच कॉलेजमध्ये शिकायला. निकिता बोलकी, सुंदर… अजित गरीब, पण कष्टाळू, मेहनती… दोघांचं बोलणं एका इव्हेंट निमित्ताने झालं.. एकमेकांचे … Read more