तिचं तयार होऊन नोकरीवर जाणे,
पगार कमावणे,
आजेसासू कौतुकाने बघत असायची,
“भलती हुशार हो माझी नातसून..पैसाही कमावते, घर पण बघते..बायका कसं बाई दोन्ही सांभाळतात”
ती प्रश्नार्थक नजरेने पहात राहिली,
घरातले खर्च वाढले,
ती मुलांकडे मागत राहायची,
मुलं एक दिवस कंटाळले,
म्हणाले,
“आई तू कमावती पाहिजे होतीस”
नवऱ्याने एक दिवस एका पार्टीला नेले,
मित्र मित्र बोलत होते,
त्यांच्या बायका शिकलेल्या, उंची राहणाऱ्या,
हा तिला म्हणाला,
“तू नोकरी करायला हवी होतीस, अजूनही बँकेचे हफ्ते मीच फेडतोय”
ती परत प्रश्नार्थक नजरेने बघत राहिली,
मुलं बोलायची, सुना बोलायच्या, सासू बोलायची, नवरा बोलायचा..
ती बॅग भरून दुःखी मनाने माहेरी आली,
घरी आपलं मन मोकळं केलं,
वडील म्हणाले,
“तू स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजे होतीस”
परत तीच प्रश्नार्थक नजर..
काय करणार,
कारण त्या त्या वेळेला तिच्या प्रश्नांना पूर्णविराम देणारे,
आज तिच्याकडेच उत्तर मागत होते…
समाप्त
****
कुणी आपल्याला मदत करेल,
सपोर्ट करेल,
पुढे नेईल,
मार्ग दाखवेल,
अशी अपेक्षा चुकूनही ठेऊ नये,
वेळप्रसंगी वाईट शिक्का बसला तरी चालेल,
पण स्वतःसाठी स्वतःच खंबीरपणे उभे राहायला हवे..
समाप्त
बिल्कुल सही है, शादी के समय ससुराल वालों के कहने पर पति के माता पिता बच्चों की जिम्मेदारी सौंपी दी जाती है और बाद में उसी महिला को बोझ समझकर पति बच्चों, बहुओं की तरफ से ताना सुनना पड़ता है
100टक्के सत्य आहे, याचा पूर्ण अनुभव आहे
जिथे जन्म दिलेल्या आई वडील ना च मुलगी ओझे वाटते तिथे इतरांन कडून काय अपेक्षा? आयुष्यभर मन मारून जगत संसार केल्या नंतर उत्तरार्धात तु नौकरी केली पाहिजे होती, पुढे शिक्षण घेतले पाहिजे होते हे असे ऐकावे लागणे ही खरी आमच्या पिढीची व्यथा आहे.. ज्याने जन्म दिला तो, बाप, ज्याच्या साठी संपूर्ण आयुष्य वेचले तो नवरा, ज्याना जन्म देऊन लहानाचे मोठे करताना स्वतःला विसरून गेले ती मुले कोणीच तिला समजून घेऊ शकले नाही याचेच दुःख आहे….
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://accounts.binance.com/pl/register?ref=YY80CKRN