मस्ती की पाठशाला (भाग 13 अंतिम) ©संजना इंगळे

विद्या ची टीम जिंकते अन आनंदाला पारावार उरत नाही. कित्येक वर्षांचा रेकॉर्ड मुलांनी मोडला होता, तोही आपल्या गनिमी काव्याने, डोकं वापरून. सर्वजण विद्या मॅम चे खूप आभार मानतात…

“मॅम, आजवर जी गोष्ट झाली नाही ती तुम्ही आमच्याकडून करवून घेतली…”

“हो मॅम, तुम्ही आम्हाला promote केलं…नाहीतर आम्ही खेळालोच नसतो..”

“पण एक कळत नाही, शेवटच्या बॉल ला विक्रम ला कोणी आवाज दिला? त्यामुळे तो विचलित झाला?”

विद्या मॅम आणि मुली हसायला लागल्या,

“त्या दिवशी आपण जोशी टीम चा खेळ प्रोजेक्टर वर बघत होतो ना, तेव्हा आमचं लक्ष विक्रम कडे गेलं…तो boundry वर उभा होता, पण त्याच सगळं लक्ष ग्राउंड च्या साईडला उभ्या असलेल्या मुलींकडे होतं…2-3 वेळा आम्ही ते पाहिलं, आणि आमच्या लक्षात आलं…की विक्रम चा विक पॉईंट काय आहे ते..”

“अच्छा…म्हणजे त्या दिवशी लेडीज talk म्हणत तुम्ही हसत होत्या ते हेच होतं का?”

“होय..”

“चला, म्हणजे या यशात मुलींचा खारीचा वाटा आहे तर..”

“तसं समजा…बरं, match तर जिंकले, पण आता gathering आहे..काय करणार आहात?”

“आता तेच प्लॅनिंग करायचं आहे..”

“ठीक आहे, कामाला लागा आता..”

मुलं कामाला लागतात, काहीजण गाणं म्हणणार असतात, काहींचा ग्रुप डान्स असतो…

Gathering चा दिवस उजडतो, मुलं एकेक सादरीकरण करत असतात…फिश pond चा कार्यक्रम खास गाजतो..

जोशी सरांवर अफाट फिश pond पडतात..

अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम..

पूर्ण माहोल हसायला लागतो,

विक्रम वर फिश pond

हुसेन हुसेन सद्दाम हुसेन
मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन

आकाश अन त्याच्या मैत्रिणीवर

तेरे बिना मेरी जिंदगी है अधूरी
मे तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी

सावंत सरांवर

झाडून झाडून झिजले झाडू
आता तरी द्या लग्नाचे लाडू

विद्या मॅमची टिंगल करण्याची मात्र कुणाची बिशाद नव्हती…

कार्यक्रम सम्पतो…

आभार प्रदर्शन करण्यात येते…अन सर्वांना जायला लावणार इतक्यात..

“थांबा…आमचं एक सादरीकरण बाकिये..”

“पण लिस्ट मध्ये तसं काही नव्हतं..”

“Surprise आहे हे…plz, फक्त 5 मिनिट..”

विद्या चा वर्ग पांढऱ्या पोशाखात स्टेजवर येतो…वातावरण शांत असते…सर्वांचे डोळे स्टेजकडे असतात…हे नक्की काय करणार म्हणून सर्वांचं कुतूहल जागृत होतं…

Music सुरू होतं अन गाणं लागतं…सर्वजण एक नाटकस्वरूप नृत्य सादर करतात…

खोलो खोलो दरवाज़े
पर्दे करो किनारे
खुंटे से बँधी है हवा
मिल के छुडाओ सारे

(सर्वजण वर्गात दंगा करताना दाखवले जातात, अभ्यासाला कंटाळलेले दाखवतात…)

आजाओ पतंग लेके
अपने ही रंग लेके
आसमान का शामियाना
आज हमें है सजना

(अंधारातून एक प्रकाशाचा किरण येतो अन सर्वजण त्याचकडे बघतात)

क्यूँ इस कदर हैरान तू
मौसम का है मेहमान तू
ओ दुनिया सजी तेरे लिए
खुद को ज़रा पहचान तू

( एक मुलगी विद्या मॅम बनून समोर येते, अन प्रत्येकाला समजावते..)

तू धूप है, झम से बिखर
तू है नदी.. ओ बेख़बर
बह चल कहीं, उड़ चल कहीं
दिल खुश जहाँ..
तेरी तो मंज़िल है वहीं..

(विद्या मुलांना formulae शिकवताना, अभ्यास शिकवताना, math सोपं करून दाखवताना दिसते)

ओ.. क्यूँ इस कदर हैरान तू
मौसम का है मेहमान तू

बासी ज़िंदगी उदासी
ताज़ी हँसने को राज़ी
गरमा गरमा सारी
अभी अभी है उतारी

(पार्किंग मध्ये आणि वर्गात घेतलेल्या गेम्स चं सादरीकरण)

हो ज़िंदगी तो हैं बताशा
मीठी मीठी सी है आशा
चख ले रख ले
हथेली से ढक ले इसे

तुझ में अगर प्यास है
बारिश का घर भी पास है
हो रोके तुझे कोई क्यों भला
संग संग तेरे आकाश है

(क्रिकेट साठी टीम ला प्रोत्साहन देताना दाखवलं जातं..)

तू धूप है झम से बिखर
तू है नदी ओ बेख़बर
बह चल कहीं उड़ चल कहीं
दिल खुश जहाँ..
तेरी तो मंज़िल है वहीं..

खुल गया..
आसमान का रस्ता देखो खुल गया
मिल गया..
खो गया था जो सितारा मिल गया
मिल गया..

(व्हिडीओ द्वारे घरून घेतलेला अभ्यास)

रोशन हुई सारी ज़मीन
जगमग हुआ सारा जहाँ
हो उड़ने को तू आज़ाद है
बंधन कोई अब है कहाँ

तू धूप है झम से बिखर
तू है नदी ओ बेख़बर
बह चल कहीं, उड़ चल कहीं
दिल खुश जहाँ..
तेरी तो मंज़िल है वहीं..

(मुलांच्या हातात क्रिकेट कप असतो, अभ्यासाच्या बाबतीत उत्साह असतो, पूर्ण वर्ग उत्साही, आनंदी आणि विजयी असतो)

ओ.. क्यूँ इस कदर हैरान तू
मौसम का है मेहमान तू

सर्वजण हात जोडून आणि डोळ्यात पाणी आणून विद्या मॅम चे आभार मानतात…

विद्या मॅम च्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं, सर्व प्रेक्षक भावनिक होतात, शिक्षकांचे सुद्धा डोळे पाणावतात…

कार्यक्रम सम्पतो आणि पूर्ण वर्ग विद्या ला कडकडून मिठी मारतो…

आता रिझल्ट लागतो…वर्गात शिंदे मामा रिझल्ट चा कागद देतात…विद्या ते बघते अन दुःखी होते ..

“80 पैकी फक्त 30 पास .”

इतक्यात शिंदे मामा परत येतात..

“मॅम सॉरी, चुकून तो कागद दिला, तो जोशी सरांच्या वर्गाचा होता…हा घ्या तुमचा..”

रिझल्ट दिसतो

“सर्वजण पास..अभिनंदन..”

प्रिन्सिपल सर वर्गात येतात..

“अभिनंदन, हा आजवरचा सर्वात यशस्वी रिझल्ट आहे. .विद्या मॅम, आज मी तुम्हाला वंदन करतो…जिथे शिक्षक फक्त पगारासाठी काम करायचे, तिथे तुम्ही तुमचं शिक्षकाचं मूळ कर्तव्य दाखवलं…मुलांवर अशी काही जादू केली की त्यांना शिक्षक म्हणजे फक्त तुम्हीच एकमेव योग्य वाटत होते…. खरंच, आजवर खुप शिक्षक पाहिले….पण तुमच्या सारखी शिक्षिका म्हणजे…न भूतो न भविष्यती…”

वर्ग ते ऐकून टाळ्या वाजवतो…विद्या ला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं…

आता खरी कसोटी तेव्हा येते जेव्हा विद्या च्या batch चा निरोप समारंभ असतो…

विद्या चा वर्ग वर्षभरात झालेल्या सगळ्या आठवणी आठवून भावनिक होत होता…

“विद्या मॅम आता नसणार, काय करणार आपण? कोण आपल्याला आधार देईल आता? कोण आपल्याला समजून घेईल?”

“मला तर कल्पनाही करवत नाहीये…”

विद्या ची सुद्धा अशीच परिस्थिती असते…तिला ह्या batch ला निरोप देताना भरून आलेलं असतं…

निरोप समारंभ पार पडतो, एकमेकांच्या संपर्कात राहण्याचं प्रॉमिस घेऊन सर्वजण नव्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात…

विद्या चा आता नवीन वर्ग सुरू होतो…नवीन विद्यार्थी समोर असतात..

विद्या ला चुकल्यासारखं वाटायचं…असं वाटायचं की समोर आकाश, शंतनू, दिशाच बसलेले आहेत…कितीदा नाव घेऊन ती फसायची…

नवीन विद्यार्थ्यांना ओळख करून द्यायला लावली..सर्वांनी आपले नावं सांगितले…वर्ग आता शांत झाला होता…पुढे काय बोलावं कुणालाही सुचेना…

इतक्यात वर्गाने एकमेकाकडे पाहिलं आणि ते म्हणाले..

“मॅम, आम्हालाही पार्किंग मध्ये प्रात्यक्षिक देणार ना?”

“मॅम आम्ही या वर्षी सुद्धा क्रिकेट खेळणार..”

“मॅम , आम्हाला फॉर्म्युला आधीच्या batch सारखाच शिकवा बरं का..”

विद्या अवाक होतें… यांना कसं माहीत हे सगळं? कुणी सांगितलं?

“मॅम, मागच्या batch ने आम्हाला ताकीद देऊन ठेवलीय…तुम्हाला त्रास द्यायचा नाही म्हणून..आणि तुम्ही किती छान आहात हेही सांगितलं…”

“कधी सांगितलं??”

मुलं हसतात, एकजण हळूच खिडकीतून बाहेर बघतो..

“बाहेर काय आहे?”

विद्या बाहेर बघते, तसं आकाश, दिशा अन शंतनू खाली लपतात… पूर्ण वर्ग खिडकीबाहेर आलेला असतो..

विद्या ला त्यांना पाहून आनंद होतो…

“तुम्ही? या इकडे…एकेकाला छडी देते मी….”

असं म्हणत विद्या खिडकीतूनच त्यांच्याकडे धाव घेते…

विद्यार्थी सोडून गेले असले तरी त्यांनी विद्या मॅम साठी पुढच्या batch ला ट्रेनिंग देऊन ठेवलं होतं…

समाप्त

17 thoughts on “मस्ती की पाठशाला (भाग 13 अंतिम) ©संजना इंगळे”

  1. खरच अतिशय सुंदर, अशा शिक्षिकांची आज आपल्या देशाला गरज आहे.

    Reply
  2. अतिशय सुंदर , खरच शिक्षक हे असेच असता , आपले विध्यार्थी पुढे जाण्यासाठी ते नेहमी धडपड} करत असता । आणि मुलांच्या लाडके शिक्षक बनता।

    Reply
  3. Kharach khup chan likhan… Read kartana hasun hasun pani ala dolyat… Very nice… School madhe divas athavale 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    Reply
  4. खूप आवडली कथा..छान लिहिलीय पण नेहमीपेक्षा वेगळी.

    Reply

Leave a Comment