भाग 1
https://www.irablogging.in/2020/07/cool-1.html
भाग 2
https://www.irablogging.in/2020/07/cool-2.html?m=1
भाग 3
https://www.irablogging.in/2020/07/cool-3.html
भाग 4
https://www.irablogging.in/2020/07/cool-4.html
भाग 5
https://www.irablogging.in/2020/07/cool-5.html
शिल्पा त्या मुलीच्या बॉयफ्रेंड ला फोन करून कळवते, बोलत असताना स्पीकर वर टाकते…
“हॅलो, तुमच्या मैत्रिणीने हाताची नस कापली आहे, तुम्हाला मदत करायला इकडे यावं लागेल..”
हे ऐकून समोरचा मुलगा घाबरतो…
“कोण मुलगी? कसली नस? सॉरी। wrong number…”
ती मुलगी हे सगळं ऐकते आणि जाम चिडते…तिला वाटलं होतं की फिल्मी स्टाईल ने तो मुलगा तिच्यावरच्या प्रेमाने धावत पळत येईल..तिच्यासाठी रडेल..
शिल्पा म्हणाली,
“हाच तो मुलगा ना? जो म्हणत होता की आकाशातून चंद्र तारे आणेन? इथे साधं औषध आणायला तो ओळ्खसुध्दा दाखवत नाहीये…”
इतक्यात तिचे आई वडील येतात,
“मॅडम हे घ्या औषध, अजून काही लागत असेल तरी कळवा..”
“बघ… हे तुझे आई वडील…यांच्यासाठी जग…यांचा विचार कर..”
ती मुलगी आई वडिलांच्या कुशीत हमसून हमसून रडते…का नाही रडणार..आज डोळे उघडले होते तिचे..
तिकडे सागर ला काही शेवटच्या टेस्ट करायच्या असतात, त्याचा रिपोर्ट येतो आणि तो शिल्पा मॅडम ला भेटायला येतो…
शिल्पा ते रिपोर्ट्स बघते आणि म्हणते..
“अभिनंदन… तुम्ही पुर्णपणे कॅन्सरमुक्त झाले आहात..”
“काय??? पण तुम्ही तर म्हणाला होतात की…मला कॅन्सर नाहीये, माझे रिपोर्ट्स चुकीचे आहेत..”
शिल्पा त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता त्याच्या आधीच्या हॉस्पिटल ला फोन लावते आणि डॉक्टर माने सोबत बोलते..
“डॉकटर, मी म्हटलं होतं ना…हा सगळा माईंड गेम आहे ते..”
“मॅडम…हा खरंच एक चमत्कार आहे..”
फोनवरचं संभाषण होताच सागर शिल्पा मॅडम ला पुन्हा विचारतो..
“मॅडम काय आहे हे सगळं??”
“सागर आता नीट ऐक…तुला कॅन्सर होता..पण मी तुझ्याशी खोटं बोलले..”
“मला माहित होतं, मला बरं वाटावं म्हणून माझ्याशी सगळे खोटं बोलताय…पण मी मरणार, हे सत्य तर कुणी बदलू शकत नाही ना??”
“हे रिपोर्ट्स बघ…तू कॅन्सर पासून पूर्णपणे बरा झाला आहेस आणि आता तुला कुठलाही धोका नाही..”
“कसं शक्य झालं हे??”
“तुझ्या आधीच्या डॉक्टर सोबत मी बोलले, त्यांनी सांगितलं की आता कुठल्याही ट्रीटमेंट चा फायदा होणार नाही, तुला घरी सोडून आता उर्वरित आयुष्य घरी घालवायचा सल्ला त्यांनी दिला…जेव्हा सगळे मार्ग बंद झाले असं समजलं तेव्हा मी subconscious mind ची थेअरी वापरायचं ठरवलं..”
“Subconsious mind??”
“हो..तुला खोटं सांगितलं नसतं तर तू घरी बसून दिवसरात्र मरणाचा विचार केला असतास..तू कॅन्सर ने नव्हे तर या नकारात्मक विचारांनीच जास्त खंगला असतास…आणि एक आत्मिक शक्ती असते, आपलं मन जे विचार करतात तेच आपलं शरीर accept करत असते..law of attraction बद्दल तर तुला माहीत असेलच…तू या काही महिन्यात सतत चांगले विचार करत गेलास…तुला नवीन आयुष्य मिळालं असं समजून तू प्रत्येक क्षण भरभरून जगत गेलास…आणि तुझ्या मनाने तेच बिंबवलं…तुला माहीत आहे? बहुतांश टक्के आजार हे मनातून असतात, शरीर मनाच्या आदेशाने चालत राहते..आणि निरर्थक आजार ओढवून घेते..”
“बापरे…!!! इतका मोठा गेम केला तुम्ही? आणि समजा, जर मला काही झालं असतं तर??”
“तू असा न तसा गेलाच असतास, पण जाताना भरभरून जगला असतास, तुला कॅन्सर नाही या भावनेने…”
सागर डोळ्यात पाणी आणून शिल्पा मॅडम चे आभार मानतो, त्याचे आई वडील तर अक्षरशः शिल्पा मॅडम चे पाय पकडतात…
“मॅडम, डॉक्टरांना पृथ्वीवरचा देव का म्हणतात हे आज समजलं मला…”
तर ही होती कहाणी एका cool डॉक्टर ची….जिने पुढे जाऊन गरिबांसाठी दवाखाना सुरू केला आणि आयुष्यभर लोकांच्या सेवेसाठी ती झटत राहिली…
कथा कशी वाटली नक्की कळवा…!!!
Khup chan story ahe very positive 👍👌
Khup chan
खूप छान . प्रत्यक्षात असे dr. भेटले पाहिजेत.
Owesome
Khup chan
pan te name ka change zale te kalal nahi adhi roshan mag akash ,adhi manas mag sagar ??
खूपच छान. अशे डॉ. असायलाच हवेत.