40 रुपये भाड्याने CD आणून त्यावर चित्रपट पाहिलेली आमची पिढी. दूरदर्शन वर शुक्रवार शनिवारी झोप येत असूनही बळजबरीने डोळे फाकवुन चित्रपट पाहिलेली आमची पिढी. रविवारी सह्याद्री वर दुपारी चार वाजताच्या मराठी चित्रपटासाठी आसुसलेली आमची पिढी. त्यात कधीतरी theatre मध्ये जाऊन मुव्ही बघणं म्हणजे पराकोटीचा आनंद गवसणारी आमची पिढी.
आज हे सगळं इतकं सोपं झालंय की हवा तो चित्रपट subscription घेऊन पाहू शकतो. CD आणताना 40 रुपयेही महाग वाटणारे आम्ही आज सर्रास 400 रुपये देऊन netflix, hotstar ची मेंबरशीप घेतोय.
काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं इथवर ठीक आहे, पण नेटफलिक्स सारख्या OTT प्लॅटफॉर्म वर अश्लीलता दाखवायची अशी काय गरज पडली की त्यापुढे सर्रास सर्व वेब सिरीज मध्ये असले प्रकार दाखवणं दिग्दर्शकाला अनिवार्य होऊ लागलं???
वेब सिरीज नावाचा भारतात उदय झाला तो “सेक्रेड गेम्स” मधून, भारतातील ही पहिली वेब सिरीज. सोशल मीडियावर चर्चा, सगळीकडे याचीच चर्चा..साधारण वर्षभर तरी मला हे सगळं पाहायला वेळ नव्हता पण अखेर त्याची लोकप्रियता ऐकून पाहायचं ठरवलं…
लहानपणी घरात सर्वजण एकत्र बसून आम्ही tv वर मुव्ही बघत असू, त्यात हिरो हिरोइन चा आलिंगन देण्याचा क्षण आला तरी आई वडीलांसमोर किती भयानक वाटायचं काय सांगू..अहो तत्सम सिन दाखवायचा म्हणून नुसती दोन फुलं एकमेकांजवळ येतांना दाखवली तरी इतकं awkward वाटायचं की काय सांगू…. अशातच माझ्यासारख्या निरागस मनाने TV सुरू केला, त्यात ते नेटफलिक्स वगैरे सुरू केलं…माहेरी असल्याने वेळच वेळ होता..मुलाला झोपवलं…आणि बसलो सगळे..
साधारण 5 मिनिटांनी दुबई ला असलेल्या माझ्या बहिणीचा फोन आला,
“दीदी काय करताय सगळे..”
“काही नाही, मुव्ही बघतोय..”
“अरेवा…कुठली..”
“अगं ती नाही का…फार लोकप्रिय आहे…वेब सिरीज… नाव विसरली बघ मी परत..”
“Please don’t say..की तुम्ही सेक्रेड गेम बघताय..”
“हा…तीच ती वेब सिरीज..”
“दीदी…..बंद कर, पटकन बंद कर.”
“अगं आत्ता तर सुरू झालीये, छान वाटतेय..”
“पुढे काय वाढून ठेवलंय हे कळणार नाही दीदी तुला..अगं आई वडीलांसमोर बघायच्या लायकीची नाहीये..”
“थोडंफार असतंच गं आता प्रत्येक मुव्ही मध्ये..”
“दीदी तुला कळत नाहीये…अगं …कसं सांगू तुला आता..”
“इतकं काय झालं…त्यात काय लहान कपडे घातलेल्या हिरोईन आहेत का??”
“अगं… एकही कपडा अंगावर नसलेले सिन आहेत…कळतंय का तुला…पॉ*र्न आहे पॉ*र्न..”
“मला घाम फुटला…एव्हाना आई वडील सिरीज ला टक लावून बघत होते…मी पटकन ते बंद केलं…नेट ला प्रॉब्लेम आहे असं कारण सांगून त्यांना पटकन कभी खुशी कभी गम लावून दिला आणि तिथून पळ काढला..”
मनात आलं त्या दिवशी बरं झालं बहिणीने फोन केला…नाहीतर…पण एक मिनिट…
“हॅलो…काय गं दीदी??”
“तू कधी पहिली ही सिरीज?????”
“कधीची..”
“म्हणजे हे सगळं तू पाहिलंस??”
“हो…काय करणार, आता सगळीकडे तसंच दाखवतात..”
वेब सिरीज कधीही एकट्याने पहायची असा सल्ला तिने मला दिला…
मी फोन ठेवला …आणि माझ्या मैत्रिणीचे बोल आठवले..
“आमच्या रोशन ला ना…या मुव्ही, सिरियल्स मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये…तो ते नेटफलिक्स वगैरे मधेच जास्त इंटेरेस्टेड असतो…आपल्याला काय कळत नाही त्यातलं जास्त..” (हा मुलगा 8वीला…)
अरे नेटफलिक्स म्हणजे काय discovery चॅनेल वाटलं का तुम्हाला? की educational व्हिडीओ ची साईट वाटली ज्यात पोरं पायथागोरस चे प्रमेय अभ्यासतील???
आजकाल कमी वयाची मुलं सुद्धा सर्रास हे सगळं पाहताय. या OTT प्लॅटफॉर्म ला सेन्सॉर चे काहीही भय नसल्याने उघडउघड पॉ*र्न कंटेंट यात दिसू लागलाय…अतिरंजित दाखवण्यासाठी ही लोकं कुठल्याही थराला जाऊ लागली आहेत.
काय आहे त्या सिरीज मध्ये पाहूनच घेऊ म्हणत 2 रात्री जागून ती सिरीज पाहिली. विषय खूपच छान होता आणि कथानक खूप सुंदर, पण प्रत्येक वाक्यात शिव्या ऐकून नको नको झालं होतं. स्त्री पुरुषाचा सिन असला की त्यांना “ते” करताना दाखवणं गरजेचंच होतं का?? जवळपास प्रत्येक सिन मध्ये असा मूर्खपणा दाखवलाच..
नंतर इतर काही वेब सिरीज पहिल्या, सगळीकडे तेच…अरे काय लावलंय?? बरं इतकं करून थांबले नाही…त्यात हिंदू धर्माला वेठीस धरून अतिरंजित गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत…
त्यावर 18+ कन्टेन्ट म्हणून फक्त एक लाईन दाखवतात, तेवढं वाचून शाळकरी मुलं ते बंद करतील? उलट असलं काहीतरी पाहायला मिळणार म्हणून अजून बघतील
जी गोष्ट आपल्या संस्कृतीने अतिशय गुप्त आणि खाजगी पद्धतीने त्यातली पवित्रता टिकवून जपून ठेवली आहे ती आता अतिरंजित करून सर्रास स्क्रीन वर दाखवली जातेय…आपली पुढची पिढी कुठल्या जाळ्यात अडकणार आहे याची जाणीव झाली…
मुळात लहान मुलांसाठी वेब सीरिज नसतात आणि 18 वर्षांचे होई पर्यंत त्यांनी मोबाईल व वाहन चालवूच नये पण आपण लोक त्यांना त्या सुविधा पुरवून देतो तसेच parental control नावाचे एक फिचर असते ते सुरू करून मोबाईल अथवा कॉम्प्युटर द्यायचा असतो ते आपण करत नाही ही आपली चूक आहे.काही वेळा फक्त कथानकाची गरज म्हणून ती दृश्य दाखवावी लागतात.प्रत्येक जणाचा दृष्टिकोन महत्त्वाचा.
Jeva lahan mul phone use kartat Teva app mdhe child account navacha ek option asto to on Karun thevu shakto jyat 16+ content dakhvla jaat Nahi toh use karu shakto
मला मुळात ह्या गोष्टीची गरज काय हे समजत नाही.पूर्वी हे सर्व नसून सुद्धा सीरियल होत्याच ना.त्या अजूनही आपण बघतो ना.बर आपण कितीही नको म्हणून बंद केले तर मुले बाहेर जून बघणार चोरून.तेंव्हा मुळात ह्या निर्मात्या व चॅनल ला kadak शिक्षा व्हावी जेणेकरून असे प्रोग्रॅम परत बनवणार नाहीत.