सत्य

“म्हणजे चूक तुमच्या सुनेची आहे तर…”
वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांना भेटायला गेल्यावर त्यांची एकंदरीत कहाणी ऐकून मी या निष्कर्षापर्यंत पोहोचले…खूप वाईट वाटलं, जगात माणसं इतकी वाईट कशी वागू शकतात? आई वडीलांसमान सासूसासऱ्यांना का नाही वागवलं त्या मुलीने?
माझा संताप अनावर झाला होता.. त्यांचा मुलाला आणि सुनेला शोधून मी जाब विचारायचं पक्क केलं. आजी आजोबांना खूपदा मी मुलाचा पत्ता विचारला, पण पत्ता विचारला की सांगायला टाळाटाळ करत, त्यांचा चेहऱ्यावरचे भाव बदलून जात, मनात आलं..शेवटी आई बापाचं हृदय कसं असतं ना..इतका त्रास देऊनही शेवटी मुलाचीच काळजी..
मग मी बाहेरून त्याचा पत्ता शोधला..आणि एकेक धागेदोरे जमा करत गेले..

जी माहिती मिळत गेली त्यावरून माझ्या डोळ्यावरची पट्टी खाडकन उडाली..जे ऐकत होतो, जी सहानुभूती देत होतो त्यात किती खोटेपणा होता ते सिद्ध झालं.
त्या आजी आजोबांचा मुलगा देश सोडून कधीच दुसरीकडे सेटल झालेला..सतत नवनवीन प्रेम प्रकरण, दारूच्या आहारी जाणं, बायकोला त्रास देणं यामुळे त्याचा बायकोने कधीच त्याच्याशी घटस्फोट घेतला होता..अगदी हे आजी आजोबा त्यांच्याकडे राहत असतांनाच हे झालेलं…पण याविषयी आजी आजोबांनी काहीही सांगितलं नाही..जर सुनेचा आणि मुलाचा घटस्पोट झालेला आहे तर मग यांना इथे कुणी सोडलं?
मग मी सुनेची माहिती जमा केली..सर्वांनी तिच्या स्वभावाबद्दल साकारात्मकच प्रतिक्रिया दिली…ती सध्या एका कंपनीत नोकरी करून स्वतःचं पोट भरतेय ही माहिती मिळाली…
त्यांचा मुलाने कधीच दुसरं लग्न करून तो दुसरीकडे राहत होता..आणि आजी आजोबा जिला कारणीभूत ठरवत होते ती त्यांची पहिली सून..किती विरोधाभास?
स्वतःच्या मुलाची कर्तुत एका शब्दाने त्यांचा तोंडून निघाली नाही, मुळात आपण आपल्या मुलाला संस्कार देण्यात कमी पडलो हे त्यांना मान्यच करायचं नव्हतं…ज्या सुनेशी मुलाचा घटस्फोट झालेला, त्यानंतर मुलाने त्यांना इथे आणून सोडलं होतं… मग त्या सुनेचा दोष तरी काय होता? तिला तर माहीतही नसावं हे इथे आहेत ते? मग उगाच कुणालातरी कारणीभूत ठरवायचं, मुलाचे अपराध लपवण्यासाठी एका निर्दोष व्यक्तीला वेठीस धरायचं हा कुठला न्याय?
पुन्हा त्या आजी आजोबांना भेटायची ईच्छा झाली नाही, मी दाखवलेल्या सहानुभूती बद्दल मलाच चीड येऊ लागली..
माझी कागदपत्रांची पिशवी गहाळ झालेली, माझ्या लक्षात आलं की ती त्या वृद्धाश्रमात मी विसरलो होतो..मग ईच्छा नसताना मला जावं लागलं…तिथे असलेल्या माणसाला विचारलं तर त्याने चटकन ती माझ्या हवाली केली..तो त्याचा रजिस्टर मध्ये काहीतरी लिहीत होता, मी आजी आजोबांचं नाव आणि त्यापुढे त्यांना मिळालेली रक्कम पाहिली…कुतूहल म्हणून मी त्यांना विचारलं..
“हे काय आहे?”

“इथे राहणाऱ्या वृद्धांना त्यांचा घरून आलेली फी..यांना काही कमी पडू नये म्हणून काहींच्या घरचे काही रक्कम देतात…”
त्याच्यापुढे एका स्त्री चं नाव दिसलं..
“ह्या कोण??”
“त्यांची सून…पहिली…मुलगा तर ओळखही दाखवत नाही, पण आजी आजोबांना न सांगण्याच्या अटीवर ह्या आम्हाला दरमहा रक्कम देत असतात..”


मी निःशब्द झाले…

______________
जाहिरात
ढोकळा बनवा 10 मिनिटात, माहेश्वरी ढोकळा पीठ, संपूर्ण रेसिपी सह
_______
#भाजणीच्या_चकल्या बनवा 15 मिनिटात.
घरगुती आणि सुरक्षितरित्या बनवलेल्या “माहेश्वरी” चकली भाजणी पिठाच्या चकल्या, पूर्ण रेसिपी सह. चकली शिवाय फराळ पूर्ण कसा होईल? आता बनवा झटपट चकल्या अगदी सोप्या. घरपोच पीठ मिळवा अगदी सहज. खालील नंबर वर तुम्ही व्हाट्सअप्प/कॉल करू शकता.
1 kg- 300 रुपये फक्त.आजच संपर्क करा.
9421609656
9834029424
 पूर्ण रेसिपी 
_______

Leave a Comment