मनीषा ने चहा 2 कपात ओतला तोच नवऱ्याने हाक दिली,
“मला पण हवाय..”
मनीषा ने आपल्या वाटचा चहा सतीश ला नेऊन दिला..
आज सुट्टी असल्याने सतीश खोलीत मस्त आरामशीर पडला होता…
मनीषा ने सासूबाईंना चहा दिला, सासऱ्यांना नाष्टा दिला..सासूबाईंना जेवण काय बनवू विचारत ती किचन मध्ये घुसली..
इतक्यात दारावरची बेल वाजली..सासूबाई चहा घेताय म्हणून मनीषाने दार उघडलं..
दारात प्रतीक ला पाहून तिला धक्काच बसला…
“Hey मनीषा…कशी आहेस?? लग्न केलंस सांगितलं पण नाही…अमेरिकेला होतो…काल आलोय, म्हटलं तुला भेटावं…घरी विचारलं तर म्हणाले ती सासरी आहे..पत्ता घेऊन तडक इकडे आलो बघ..”
प्रतीक बोलता बोलता घरात शिरला…मनीषा ला काय बोलावं कळेचना…तिला दरदरून घाम फुटला…कसं सांगणार सासूबाई आणि नवऱ्याला की हा माझा मित्र आहे म्हणून??
प्रतीक आणि मनीषा शाळेपासून एकत्र…दोघांत निखळ मैत्री होती…केवळ मैत्री…पवित्र अशी…
पण सासरी हे सगळं घडत होतं..मनीषाने सासूबाईंकडे पाहिलं तर त्या उठून आत निघून गेलेल्या..
त्यांनव राग आला असेल का? काय वाटत असेल त्यांना?? याची घालमेल मनात सुरू असताना इकडे प्रतीक ची बडबड सुरूच होती..
“काय गं मी एकटाच बोलतोय…तू पण बोल काहितरी…”
“अं?? हो…काय मग…कुणी भेटतं का शाळेतलं?? मी फक्त आयुष आणि श्वेता च्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे…”
मनीषा ने बोलायला सुरुवात केली, चांगल्या अर्धा तास गप्पा झाल्या..
मनीषा ने त्याला विचारलं…
“लग्न बिग्न केलंस की नाही अजून??”
“कसं करणार…तू इंडिया मध्ये होतीस ना..हा हा हा..”
हे वाक्य ऐकतच सासूबाई चहा पोहे घेऊन आल्या..
मनीषा ला अजून घाम फुटला…दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ते हेच… मेलं मला पण आत्ताच विचारायचं सुचलं..
“काही न घेताच निघणार का? घे बाळ…पोहे खा..”
“थँक्स आंटी..मी प्रतीक…मनीषा चा मित्र…”
आता मात्र मनीषा ला चक्कर यायचीच बाकी होती…
“अच्छा..काय म्हणतोस…बरा आहेस ना? आई बाबा कसे आहेत?”
“सगळं मजेत…अमेरिके ला असतो मी…इकडे फार क्वचित येतो…”
प्रतीक ची कॅसेट सुरू झाली…बऱ्याच वेळाने प्रतीक उठला आणि म्हणाला…
“येतो मी..येतो गं मनीषा…भेट पुन्हा…”
असं म्हणत मनीष ने सासूबाईंच्या पाया पडल्या आणि तो निघून गेला..
तो गेला खरा पण मनीषा ला समजत नव्हतं की आता सासूबाईंना कसं सामोरं जावं..त्यांना काय वाटलं असेल…त्यांनी चहा पानी आणलं खरं पण ते रागाने की मनापासून??? प्रतीक समोर चांगल्या वागल्या खऱ्या, पण माझ्याबद्दल काय वाटलं असेल??
सासुबाई पुस्तकात डोकं खुपसून बसल्या…मनीषा ला राहवलं नाही, सासूबाईंची शांतता तिला खाऊ लागली, अखेर तिनेच विचारलं..
“आई..तुम्हाला राग तर आला नाही ना??”
“राग? कसला राग?”
“म्हणजे असं…माझा मित्र…अचानक…तुम्हाला चालतं की नाही…माहीत नव्हतं…” मनीषा तुटक तुटक बोलत होती..
सासुबाई हसायला लागल्या…
“अगं वेडे..तुझा चहा चालतो, तुझं जेवण चालतं, तू घेतलेली काळजी चालते… मग आम्हाला काय तुझा मित्र चालणार नाही का?? उगाच टेन्शन घेतेस…”
इतक्यात आतून आवाज येतो..
“आई…येऊ का आता बाहेर…मनीषा चा मित्र आला म्हणून बसवून ठेवलस मला इथे…त्यांना डिस्टर्ब नको म्हणून…मला भूक लागलीये आई…”
सासूबाईंनी मुलाकडे पाहून नाक मुरडलं…
“उगाच लग्न केलं या ध्यान सोबत…प्रतीक चांगला होता की…”
असं म्हणत सासू सुनांत एकच हशा पिकला…

https://mazablog.online/navra-bayko-nate-in-marathi/