https://www.irablogging.in/2020/07/1.html
भाग 2
https://www.irablogging.in/2020/07/2.html
भाग 3
https://www.irablogging.in/2020/07/3.html
भाग 4
https://www.irablogging.in/2020/07/4.html
भाग 5
https://www.irablogging.in/2020/08/5.html
आशिष चं वागणं आता पूर्णपणे बदलून गेलं होतं.. स्वरा साठी तर सगळंच बदललं होतं… तिला बायको म्हणून आशिष च्या मनात आता काहीही स्थान नव्हतं, पण या सगळ्यात होरपळ होत होती ती खुशी ची..रात्री खोलीत आल्यावर आशिष मोबाईल मध्ये डोकं घालून बसला होता, इतका वेळ मन घट्ट करून बसलेली स्वरा एकदम भावनिक झाली आणि आशिष ला घट्ट मिठी मारून रडायला लागली,
“आशिष काय चूक होती रे माझी, तू आणि ईशिका एक झाले नाहीत यात माझा काय दोष, ती तुझ्या आयुष्यात आत्ता आली यात माझा काय दोष? का माझी होरपळ केलीस तू??”
आशिष ला सुद्धा वाईट वाटलं, स्वरा बायको म्हणून कुठेही कमी पडली नाही, खरंच तिचा काय दोष होता??
ईशिका दाराबाहेर उभं राहून सगळं ऐकत होती, आशिष ने आपला इरादा बदलू नये म्हणून तिने तात्काळ आशिष ला मेसेज करून टेरेस वर बोलवून घेतले…आशिष ने तिचा मेसेज इग्नोर केला…ईशिका भडकली, तिने जोरजोरात दार ठोठावायला सुरवात केली…
“ईशिका? झोपली नाहीस?” स्वरा दार उघडून तिला म्हणते..
“आशिष सोबत बोलायचं आहे…त्याला बाहेर पाठव..”
“ईशिका…मला झोप येतेय आणि इतक्या रात्री नको बोलायला, उद्या बोलू..”
ईशिका अजून चिडते,
“मी तुला हे सांगायला बोलावलं होतं की लंडन मध्ये आपल्यासाठी नवीन फ्लॅट बघितला आहे..त्याचं इंटेरिअर दाखवायचं होतं..”
“लंडन? फ्लॅट??” स्वरा प्रश्नार्थक नजरेने बघते..
“होय…मी आणि आशिष लंडन ला जाणार आहोत, आशिष चं भविष्य तिथे आहे…इथे नाही…”
स्वरावर आभाळ कोसळतं… तिला याबद्दल काहीच कल्पना नव्हती…काही वेळापूर्वी काय घडलं हे आशिष विसरून गेला आणि तडक इशिकाशी बोलायला गेला…
“बघू फोटोज??”
“आशिष?? तू हे सगळं सोडून, मला सोडून लंडन ला जातोय??” स्वरा विचारते..
आशिष ला केवळ त्याचा प्रगती साठी लंडन ला जायचं होतं, ईशिका पेक्षा कदाचित त्याला ते महत्वाचं होतं… पण घरात असाच समज पसरला की ईशिका साठी आशिष घर सोडतोय…
आशिष स्वरा कडे बघून द्विधा मनस्थितीत सापडतो… तो निरुत्तर होतो..
“जा तुम्ही…नाही…जाच…खरंच जा…घरी सर्वांना मी समजावेन…पण एकच अट आहे, तुम्ही जायच्या आधी मी या घरातून जाईन…. मग तुम्ही वाट्टेल ते करा..”
स्वरा आपल्या बॅग भरते, खुशी आजी आजोबांकडे राहायला तयार होते…स्वरा घरातून निघून जाते…आशिष ला खूप वाईट वाटतं, पण ईशिका मात्र खुश होते…
स्वरा कुठे जातेय हे मात्र तिने सांगितलं नाही, सर्वांना हेच वाटलं की ती माहेरी जातेय…
स्वरा आता एकदम बदललेली असते, स्वतःवर असलेलं बायको, सून, मुलगी ही सगळी बिरुदं बाजूला सारून एका नव्या आव्हानाला ती समोर जात असते, ती कुठे जाते, काय करते कुणालाही कळत नाही…
आशिषच्या आईचं आणि आशिषचे घरात वाद होतात, ईशिका याचाच फायदा घेते आणि लंडन ला जण्याबद्दल त्याला विचारते, घरातल्या गोष्टींना कंटाळलेला आशिष लगेच तयार होतो.
सर्व तयारी करून दोघेही लंडनला जातात, ईशिका च्या मते ती जिंकलेली असते. आशिष ला आपल्या जाळ्यात ती पूर्णपणे ओढून घेते. लंडन फिरल्यानंतर आशिष त्या शहराच्या प्रेमात पडतो. आशिष ला काम शोधून देण्याचं वचन ईशिका त्याला देते.
आशिष ईशिका च्या घरातच राहतो. ईशिकाला आता आशिष ला पूर्णपणे समर्पित व्हायचं होतं…रात्री ती त्याच्या खोलीत जाते…
क्रमशः
Plz next part link send me
Khup sunder story ahe plz roj ek part kra na post ..m ani plz ata tya nalayk Aashish la swara chya aaushyat Naka pathvu parat … Tyachi layaki na swara ch Prem milvaychi ahe na Ishika cha Prem milvaychi