तुही हकीकत (भाग 7)

भाग 1
https://www.irablogging.in/2020/07/1.html


भाग 2
https://www.irablogging.in/2020/07/2.html


भाग 3
https://www.irablogging.in/2020/07/3.html


भाग 4
https://www.irablogging.in/2020/07/4.html


भाग 5
https://www.irablogging.in/2020/08/5.html

भाग 6
https://www.irablogging.in/2020/08/6.html

ईशिका चा मनसुबा वेगळा होता, ती आशिष च्या खोलीत आली… आशिष ला वाटलं की ती काहीतरी सांगायला आली आहे…

ईशिका आशिष च्या बेड वर बसली, आज मुद्दाम तिने मादक पेहराव केला होता…

“झोपली नाहीस?”

“कशी झोप येईल मला, तुझ्या आठवणीत इतक्या रात्री काढल्या आहेत, आणि आता तू समोर असतांना.”

हे बोलत असतानाच ईशिका त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते..

आशिष ला तिचा स्पर्श होताच तो एकदम तिचा हात झटकतो…डोळ्यासमोर एकदम लग्न, लग्नातले सात फेरे आणि स्वरा चा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येतो…

“ईशिका काय करतेस??”

“असं काय करतोस, आपण आता एक होणार आहोत..”

“ईशिका आपलं लग्न नाही झालेलं अजून..”

“आशिष हे लंडन आहे, इंडिया नाही….इथे कोण बघणार आहे..”

“प्रश्न इंडिया किंवा लंडन चा नाहीये, माझं लग्न झालं आहे आणि…”

ईशिका ला राग येतो, पण आशिष ला आता हातचं जाऊ द्यायचं नव्हतं…ती स्वतःवर नियंत्रण ठेवते..

“Ok आशिष… तू म्हणशील तसं…good night..”

ती गेल्यावर आशिष विचार करत बसतो..त्याला स्वरा ची आठवण येते…तो तिला फोन लावतो पण फोन बंद येत असतो…आशिष ला काळजी वाटू लागते…तो तिच्या माहेरी फोन लावतो…

“हॅलो…बाबा, स्वरा आहे का??”

“स्वरा? येणार होती का??”

“म्हणजे? ती तिकडे आली नाही??”

“नाही…एक मिनिट, तिकडे आली नाही म्हणजे?? कुठे आहे ती? जावईबापू माझी मुलगी कुठेय??”

“अहो…घाबरू नका, शेजारी गेली असेल ती…मला वाटलं..”

आशिष वडिलांना खोटं सांगून देतो पण इकडे प्रचंड काळजीत पडतो..कुठे गेली असेल स्वरा? तिने जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना?

रात्रभर आशिष ला झोप नाही, ईशिका सकाळी येऊन बघते तर आशिष जागा…

“काय रे, झोप नाही लागली??”

“अगं… स्वरा गायब आहे…”

“So??”

“अगं… मला काळजी नाही वाटणार का??”

“काळजी का वाटायला हवी तुला?? तू आता माझा आहेस, माझ्यासाठी लंडन ला आला आहेस, आणि आता म्हणतो आहेस की स्वरा ची काळजी….तू नक्की कोणाच्या बाजूने आहे ते सांग मला..इथे माझ्यासोबत राहतोय, आणि इकडे राहून स्वरा ची काळजी करतोय…काय चाललय तुझं??”

“तसं नाही गं… पण..”

“पण बिन काही नाही, उद्या तुला एका interview ला जायचं आहे….त्याची तयारी कर..”

आशिष खुश होतो, झालेलं सगळं विसरून पुढची स्वप्न बघायला लागतो…आशिष चा interview चांगला होतो आणि त्याला पहिल्याच संधीत नोकरी मिळते…

तो फ्लॅट वर येतो आणि आल्या आल्या..

“स्वरा…स्वरा…अगं ऐकलंस का…मला जॉब मिळालाय…”

ईशिका बाहेर येते..

“ईशिका म्हण..”

आशिष ला समजतच नाही तो काय बोलून गेला ते…कुठलीही आनंदाची बातमी असली की आधी स्वरा ला सांगायची, आणि मग स्वरा लगेच पूजेचं ताट घेऊन ओवाळून घ्यायची अशी आशिष ला सवय, त्याच्या डोळ्यासमोर सगळं आलं…असा भास झाला की समोरील स्वरा आली आहे, आरतीचं ताट ओवाळते आहे….

“आशिष…आशिष अरे काय झालं??”

समोर ईशिका bear ची बॉटल धरून उभी असते..

“अरे आज किती आनंदाचा दिवस आहे…let’s enjoy..”

आशिष भानावर येतो…एकीकडे नोकरीचा आनंद तर दुसरीकडे काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं…

तिकडे घरात वादळ सुरू असतं…स्वरा चे आई वडील घरी येऊन भांडून जातात, सासू सासरे मुलगा गेला आणि सूनही घर सोडून गेली म्हणून दुःखात असतात…काही दिवसात स्वरा ने आपल्या आई वडिलांना आणि सासू सासऱ्यांना आपण सुखरूप असल्याचं कळवलं, खुशी ची चौकशी केली आणि मी माझं काम पूर्ण झालं की परत येईन अशी हमी दिली….पण याबाबत आशिष ला काहीही कळवू नका असं तिने सांगितलं…

आशिष नोकरी करायला लागतो, ईशिका आशिष ला मिळवल्याच्या आनंदात असते, पण अजूनही आशिष पूर्णपणे तिचा झाला नव्हता. तिने आशिष ला लग्नाचं विचारलं…

“आशिष, लग्न करून टाकू आता..”

“हे बघ, स्वरा अजूनही माझी बायको आहे, तिला घटस्फोट दिल्याशिवाय कायदेशीर आपण लग्न करू शकत नाही..”

“मग पाठव ना तिला नोटीस..”

“स्वरा कुठे आहे याचा अजूनही पत्ता नाही..”

“मग आता??”

“वाट पाहू, ती परत यायची…”

आशिष दिवसेंदिवस लंडन मधल्या सुखसोयी भोगत होता.त्याला आता कशाचीच पर्वा राहिली नव्हती, हळूहळू तो बायको अन मुलीला विसरत गेला….
आशिष ला पगारही चांगला असल्याने स्वतःची सर्व स्वप्न तो पूर्ण करत होता…

एक दिवस आशिष ईशिका ला म्हणाला,

“मला वाटतं आपण अजून चांगलं घर घेऊया..म्हणजे जिथे मोठं गार्डन असेल, स्विमिंग पूल असेल….”

“आयडिया चांगली आहे, आणि आपल्या दोघांच्या इन्कम मधून आरामशीर असं घर घेऊ शकतो आपण..”

दोघेही नव्या घराच्या शोधात निघतात…एका agent कडून त्यांना माहिती मिळते की ते कमी किमतीत आपल्याला हवं तसं घर बांधून देतात…आशिष आणि ईशिका त्यांच्याकडून काम करून घ्यायचं ठरवतात…कारण त्यांना हवं तसं ते घर बांधून त्यांचं स्वप्नातलं घर उभं करू शकत होते…

क्रमशः

2 thoughts on “तुही हकीकत (भाग 7)”

Leave a Comment