तुही हकीकत (अंतिम)

 


भाग 1
https://www.irablogging.in/2020/07/1.html

भाग 2
https://www.irablogging.in/2020/07/2.html

भाग 3
https://www.irablogging.in/2020/07/3.html

भाग 4
https://www.irablogging.in/2020/07/4.html

भाग 5
https://www.irablogging.in/2020/08/5.html

भाग 6
https://www.irablogging.in/2020/08/6.html

भाग 7
https://www.irablogging.in/2020/08/7.html

आशिष आणि ईशिका भरपूर पैसे खर्च करून एक नवीन घर घेतात, आशिष चं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. लंडन सारख्या शहरात स्वतःचं घर, उच्चवर्गीय राहणीमान… त्याला हेच तर हवं होतं.

आशिष तर आपल्या आई वडिलांनाही विसरला होता, लंडन मधील त्याच्या ऐशो अराम जगण्यात तो मश्गुल होता…एके दिवशी लंडन मध्ये एका मोठया कॉन्सर्ट ची घोषणा झाली…सेलिब्रिटी गायक तिथे आपला परफॉर्मन्स करणार होते…महागडे तिकीट घेऊन ही दोघे त्याला हजर राहतात…

तिथला महोलच अजब होता…तोकड्या कपड्यात, दारू पिऊन तर्र झालेली तरुणाई, वेडेवाकडे हावभाव करत झिंगत होती…इशिकाशी त्यात सामील झाली… आशिषसाठी हे सगळं नवं होतं पण तोही त्याच्या पद्धतीने सर्वात मिसळण्याचा प्रयत्न करत होता…

ईशिका सोबत गर्दीत मिसळत असतानाच एक विदेशी तरुण तिच्या जवळ येतो..

“Hey….here you are….after so long..”

“Omg…mark…where were you…”

असं म्हणत दोघेही एकमेकांशी जरा जास्तच लगट करतात…आशिष ला ते आवडत नाही… मार्क गेल्यावर तो ईशिका ला म्हणतो…

“हे काय होतं?”

“Oh come on आशु… लंडन आहे हे…I just spent few nights with him…nothing serious…”

“काय?? त्याच्यासोबत??”

“हो…आय मिन…आम्ही एका फ्लॅट मध्ये राहायचो…सो..you know….होऊन जातं कधी कधी..”

“ईशिका हे अति होतंय… मला हे माहीत असतं तर मी कधीच..”

दोघेही गर्दीतून बाहेर येतात आणि एका ठिकाणी उभं राहून बोलत असतात…

“काय केलं असतं तू?”

“मी कधीच तुझ्या सोबत आलो नसतो..”

“आणि मी तुला बायको आणि मुलगी असताना स्वीकारलं त्याचं काय??”

“माझं लग्न झालं होतं.. माझी गोष्ट वेगळी होती…”

“सगळे पुरुष सारखेच, तुम्ही स्वतः कितीही मळलेले असला तरी बायको मात्र धुतल्या तांदळासारखी हवी…”

“ईशिका तुला फरक समजत नाहीये का?? मी तसा असतो तर आपण एकाच फ्लॅट मध्ये राहून कधीच सर्व मर्यादा ओलांडल्या असत्या…पण मी कधी तसा प्रयत्नही केला नाही..”

“उपकार केले का मग?? एक लक्षात ठेव, हे सगळं जे आहे ते माझ्यामुळे आहे…मी नाही तर तू शून्य आहेस..”

आशिष एकदम मागे झाला…एका क्षणात त्याचा स्वाभिमान गळून पडला…स्वरा आणि कुटुंबाची खूप आठवण यायला लागली…पण स्वराचा पत्ता नव्हता आणि घरी कुठल्या तोंडाने बोलावं हा प्रश्न होता…

Concert संपलं, ईशिका सेलिब्रिटी चा फोटो घेण्यासाठी गर्दीतून वाट काढत पुढे गेली…आशिष तिच्या मागे मागे गेला…तिथून तो विदेशी गायक आणि गायिका जात होते…ते एका पाठमोऱ्या

स्त्री कडे बघून बोलत होते..

“Thanks for the entire event planning, it was absolutely amazing…can we have a selfie please??”

सेलिब्रिटी गायक खुद्द ज्या व्यक्तीचा सेल्फी मागत होता अशी ही व्यक्ती तरी कोण होती??

ती वळली तसा तिचा चेहरा समोर दिसला…ती स्वरा होती….एकदम बदललेली… एखाद्या मॉडेल ला लाजवेल असं रूप आणि कमालीचा फॅशन सेन्स…तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता…आणि मिळवलेला मोठा हुद्दा…

ईशिका आणि आशिष एकदम स्तब्ध झाले…त्यांचं डोकं एकदम सुन्न झालं… स्वरा ने दोघांकडे पाहिलं आणि security ला आवाज दिला..

“Security… Please clear this crowd…”

गार्ड आला आणि धक्के बुक्के देऊन ईशिका आणि आशिष ला बाहेर काढलं..

आशिष खटाटोप करून स्वरा च्या पुढ्यात जातो…

“स्वरा….कुठे होतीस?? आणि हे सगळं काय आहे??”

“सॉरी मी नाही ओळखत तुम्हाला.”

“स्वरा प्लिज…बोल माझ्याशी..”

“काय बोलायचं बाकिये? मी घर सोडलं आणि स्वतःच्या मेहनतीने पुढे गेले…event management साठी इथलं कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं…बाकी काय सांगू तुला??”

“स्वरा मला माफ कर…मला तुझ्यासोबत रहायचं आहे…प्लिज मला माफ कर..”

इतक्यात VIP सीट वरून उठून स्वरा चे सासू सासरे आणि खुशी तिच्या जवळ येतात…

“काय गं स्वरा? कोण आहेत ही माणसं?? चल आपल्याला उशीर होतोय…”

“आई…बाबा…मी आशिष तुमचा मुलगा.”

“आम्हाला कोणताही मुलगा नाही, फक्त एक मुलगी आहे..स्वरा नावाची, जिने स्वतःची स्वप्न पूर्ण करताना आम्हाला सोबत घेतलं..अखेर पर्यंत आमचीच काळजी केली आणि आम्हाला VIP चेयर वर बसायचा मान दिला..”

असं म्हणत सर्वजण तिथून निघून गेले…ईशिका चरफडत उभीच राहिली….

तुम्हाला काय वाटतं? स्वराने आशिषला माफ करावं? की भोगू द्यावी त्याच्या कर्माची फळं?? नक्की कळवा..

समाप्त

5 thoughts on “तुही हकीकत (अंतिम)”

  1. MLA vatt aashish khup chuklay.pn ata swara ni tyala maf karav.tyane konachahi vichar kela Nahi Manya pn tyane maryada pn Nahi olandli.mafi magavi swatachi.kiman Khushi sathi try maf Karel swara.baki khup sundar story

    Reply
  2. Khup chhan…Eka stri ne n harta swatachya payavar ubhe rahun tiche astitva nirman kele he awadale…maphi karaychi kahi garaj nahi karan tyane sarv maryada olandlyat…Perfect end

    Reply

Leave a Comment