कधी एकदा सोनल च्या सासूला सोनल ची करामत सांगते असं शांता काकूंना झालेलं. शांता काकू, नाव जरी शांता असलं तरी चार घरात जाऊन तिथल्या चार गोष्टी पुढच्या चार घरात जाऊन सांगण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नव्हतं.
सोनल आणि मिलिंद, नोकरीनिमित्त परगावी रहात होते. दोघे नवरा बायको आणि त्यांची लहान मुलगी आयेशा असं 3 जणांचं कुटुंब. आई वडील गावी राहात होते. शांता काकू म्हणजे सोनल च्या सासूची जवळची मैत्रीण.
एकदा असंच एका लग्नसमारंभानिमित्त त्या सोनल च्या शहरात येतात. सोनल कडेही एक चक्कर मारून यावा म्हणून सोनल च्या सासूला पत्ता विचारतात आणि सोनल ला न कळवता अचानक घरी धाड टाकतात, कारण अशी अचानक धाड टाकली की घरातली गुपितं समजतात आणि ती चघळायला शांता काकू मोकळ्या.
आयेशा शेजारच्या घरी खेळून नुकतीच आलेली असते, ती घरात येते आणि दरवाजा उघडाच ठेवते..इतक्यात शांता काकू येतात, दारावर नॉक न करता आत घुसतात, आणि बघते तर काय…
सोनल मिलिंद ला जबरदस्ती किचन मध्ये ढकलत असते..
“नको ग सोनल काहीही शिकायला लावू मला…”
“ऐकावं लागेल माझं…स्वयंपाक काय फक्त स्त्रीची मक्तेदारी आहे का?”
आयेशा हसून सगळं बघत असते, या तिघांना शांताकाकू आलेल्याची भणकही लागत नाही. हे सगळं पाहून शांता काकू जवळजवळ ओरडतात…
“अगं सोनल काय हे? काय बघतेय मी? नवऱ्याला असं कुणी स्वयंपाक करायला लावतं का? बाईच्या जातीचं काम ते.. बाईनेच करावं..”
शांता काकूंना बघून सोनल ला धक्काच बसतो, तिची भितीने गाळण उडते..
काही मिनिटे तिला काय करावं सुचत नव्हतं, नंतर धीर करून ती म्हणते,
“काकू कधी आलात? या ना…बसा…”
“ते सगळं राहू दे, तू काय करत होतीस आत्ता?”
सोनल काहीही बोलत नाही, आयेशा तोंड उघडते..
“आजी…मम्मा की नई… पप्पांना भाजी बनवायला शिकवत होती…हिहीही…”
निरागस आयेशाने सत्यकथन केलं..
सोनल ने तर डोक्यालाच हात मारला…
“आजकालच्या मुली…संस्कार…सासर…माहेर… स्रीजात…उद्धट… “
अश्या अनेक मुद्द्यांना हाताशी घेऊन शांता काकूंनी जोरदार भाषण करूनच तिथून निरोप घेतला…
“आता आपलं काही खरं नाही…ह्या मावशी आता सगळीकडे दवंडी पिटणार…की सोनल तिच्या नवऱ्याला स्वयंपाक करायला लावते…”
झालं तसंच… शांता काकूंना विषयच मिळाला होता…
कधी एकदा सोनल च्या सासुकडे जाऊन भडाभडा बोलून टाकते असं त्यांना झालं…आणि शेवटी जाऊन त्यांनी सगळं सांगितलंच…
“काय? हे काय ऐकतेय मी? हे असं असेल तर मात्र मी शांत बसणार नाही…हे सगळं सहन करू शकत नाही मी…”
रागाने लालबुंद झालेल्या सोनल च्या सासूने शांता काकूंसमोर राग काढला..
शांता काकुंचं समाधान झालं…आदत से मजबूर असलेल्या शांता काकूंनि अखेर चुगली केलीच…
“चल मी येते…”
“कुठे चाललीस…थांब…आत्ताच्या आता मी मिलिंद आणि सोनल ला फोन लावते आणि चांगलीच झापते…”
हा ड्रामा पाहायला शांता काकू परत खाली बसून घेतात..
“हॅलो..मिलिंद…”
“बोल आई…”
“हे काय ऐकतेय मी?”
“काय?”
“सोनल तुला स्वयंपाक करायला लावते म्हणे?”
“नाही…अगं ते…आपलं….असंच…सॉरी….मी नाही ऐकणार सोनल चं आता…”..”
मिलिंद ला काय बोलावं खरंच सुचेना…
“ऐकायचं…”
“काय? कुणाचं?”
“सोनल चं…”
“म्हणजे?”
“तू म्हणे नाटकं करत होतास शिकायला…काय अडचण आहे रे तुला स्वयंपाक शिकायला…भूक प्रत्येकाला लागते, मग जेवणही प्रत्येकाला बनवता आलं पाहिजे…चुपचाप शिकून घ्यायचं…सोनल कडे दे…”
“हॅलो आई…”
“पोरी, अगदी उत्तम केलं बघ..शिकवून दे त्याला सगळं .. आणि हो,ऐकलं नाही तर मला सांग….समजलं…”
शांताकाकूंना आ वासून बघण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता..

भारी