लहान जाउबाई घरी येणार म्हणून मंजिरी ची धावपळ चालू होती. खूप वर्षांनी अंकिता सासरी येणार होती. सासरी मंजिरी, तिचा नवरा, सासू, सासरे असा परिवार. लहान भाऊ कामानिमित्त बाहेरगावी. अंकिताही नोकरीला, त्यामुळे त्यांना फारसं येणं जमत नसायचं. पण आज खूप महिन्यांनी वेळ काढून सगळे येणार होते.
सासूबाईंना तर काय करू अन काय नको असं झालेलं. मंजिरी ला सूचना देऊन देऊन त्यांनी हैराण केलं होतं.
अंकिता चं सासूबाईंना भारी कौतुक, नोकरी करते, घर सांभाळते. तिने अगदी साधा फोन केला अन विचारपूस केली तरी घरी तोंडभरून कौतुक. मंजिरी चोवीस तास सासू सासऱ्यांचं काय हवं नको बघे, पण तिचं कवडीमात्र कौतुक नाही. जेव्हा पहावं तेव्हा अंकिता चं कौतुक.
लांब राहून फोनवर 2 शब्द विचारपूस करणं वेगळं आणि 24 तास जवळ राहून काळजी घेणं वेगळं, मंजिरी सतत जवळ असतांना विचारपूस करायची गरजच काय होती? विचारपूस लांबची लोकं करतात, पण सासूबाईंना कळेल तर शप्पथ.
मंजिरी ने मात्र सर्व समजत असूनही कधी प्रतिप्रश्न केला नाही. उलट अंकिता येणार म्हणून ती चांगले चांगले पदार्थ बनवायच्या तयारीला लागली, घर आवरलं, त्या दोघांसाठी खोली साफ केली.
अंकिता आणि धाकला दीर घरी आले, दिराने आल्या आल्या आईच्या पाया पडल्या, अंकिता फोनवरच व्यस्त होती. सासूबाई तिचं बोलणं पूर्ण व्हायची वाट बघत बसल्या, तिचं बोलणं झालं आणि फक्त हसून तिने घरात प्रवेश केला, गेल्या गेल्या सोफ्यावर बसून राहिली,
“किती कामं असतात बाई धाकल्या सुनेला, बाहेर गेलं तरी ऑफिस चं काम काही सुटत नसावं..तोच फोन असावा..”
तिच्या बोलण्यावरून ती काही ऑफिस वगैरे साठी बोलत नव्हती, पण सासूबाई? तिच्या चुका त्यांना दिसतच नव्हत्या. मंजिरी ला आठवलं, ती प्रेग्नंट असताना तिला खाली वाकायला जमत नव्हतं, एकदा असंच पाया पडायच्या राहील्या अन सासूबाईंनी एकच कहर केला.
अंकिता ने सासुबाईंची विचारपूस केली, बॅगेतून साडी, कपडे आणि वेगवेगळे गिफ्ट्स काढून एकेकाला द्यायला लागली. मंजिरी ने साड्या पाहिल्या, अगदी हलक्या प्रतीच्या आणि स्वस्त साड्या पाहून तिला विशेष वाटलं. इतका पगार असून हिने असं करावं?
“काय बाई माया माझ्या सुनेला, इतक्या धावपळीत आणत बसली….”
मंजिरी ला दिवाळीत खरेदी ला 5000 रुपये नवऱ्याने दिले होते, सासूबाईंना घेऊन ती दुकानात गेली, त्यांनी अडीच अडीच हजाराच्या 2 साड्या घेतल्या, मग “मला भरपूर साड्या आहेत, मी नाही घेत” असं म्हणत तिने साडी घेतलीच नव्हती. सासूबाईंना ते नंतर समजलं…
“त्यात काय एवढं, भरपूर साड्या आहेत तिच्याजवळ…”
असं म्हणत त्यांनी मोठ्या सुनेच्या वागण्याबद्दल जराही कणव दाखवला नाही.
म्हणून मंजिरी ला आज सासूबाईंच्या अंकीताप्रती वागण्याबद्दल विशेष वाटत होतं.
असंच अंकिता टेरेस वर गेली, तिथून तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. सासूबाई ती येण्याची वाट बघत बसल्या, अचानक त्यांना वाटलं की टेरेस मध्ये ऊन लागेल अंकिता ला, म्हणून तिला मध्ये ये असं सांगायला त्या टेरेस मध्ये गेल्या. तिथे तिचं बोलणं त्यांनी ऐकलं..
एकदा का यांच्या तोंडावर चार पाच वस्तू फेकल्या आणि 2 शब्द बोलले की खुश..आमच्याकडे येत नाही हेच खूप आहे, एकतर मला विभक्त संसार हवा होता म्हणून नवऱ्याला सांगून सांगून तिकडे गेलो, नाहीतर ही कटकट राहिलीच असती मागे. आमच्याकडे राहायला या असं बळेच म्हणायचं, त्यांना तेवढंच समाधान, येत नाही ते एक बरं…”
सासूबाईंच्या डोळ्यावरची पट्टी खाडकन बाजूला पडली,
“मला वाटायचं लांब राहूनही किती काळजी करते ही आपली, पण लांब राहून बोलणं वेगळं…खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे” त्या मनाशीच बोलल्या..
2 दिवसाचे पाहुणे आहेत म्हणून त्यांनी काहीही न बोलायचं ठरलं..
सासूबाईंचं डोकं अचानक दुखू लागलं. मंजिरी ने पटापट काढा करून दिला, औषधं दिली…अंकिता तिथे फक्त बसून गोड गोड बोलायचं नाटक करत होती. सासूबाई मात्र यावेळी फसणाऱ्यातल्या नव्हत्या. त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. अंकिता ते पाहून निघून गेली, “जाऊदे ना, आपलं काय जातंय…” असं म्हणत..
इकडे अंकिता च्या नवऱ्याने सिनेमा ची चार तिकिटं काढली. मंजिरी आणि भावासाठी आणि अंकिता आणि त्याचासाठी. संध्याकाळी सगळे बाहेर गेले, अंकिता तर अगदी खुशीत, भारीतला ड्रेस घालून तयार होऊन निघाली.
इकडे सासूबाईंना अजून त्रास व्हायला लागला, त्यांना तहान लागली, पण घरात तर कुणीही नव्हतं. त्या मोठ्या मुश्किलीने उठल्या आणि पाहतो तर काय…मंजिरी मुगाची खिचडी बनवत होती… आणि दुसरीकडे आईशी फोनवर बोलत होती…
“अगं आई मीही गेले असते, पण आईंना बरं वाटत नाहीये, त्यांना असं एकटं सोडून कशी जाऊ? सिनेमा काय नंतरही बघता येईल. म्हणून बाकीच्यांना म्हटलं जा तुम्ही मी थांबते…”
“थोरली” या शब्दाला पुरेपूर न्याय देत मंजिरी वागली.
सासूबाईंना गलबलून आलं. अंकिता 2 शब्द काय बोलायची तर मला काय कौतुक वाटायचं, आणि मंजिरी केवळ बडबड न करता 24 तास आपल्यासाठी मूकपणे सर्व करायची तर तिची किंमत आपण केली नाही. दुरून डोंगर साजरे म्हणतात ना ते हेच खरं….