शबाना ने अध्याय पूर्ण केला…टेबल वर ठेवलेल्या पाण्याचा उचलून तोंडाला लावला…पाणी पीत असताना नजर अब्दुल च्या फोटोकडे गेली…कितीतरी वेळ ती त्या फोटोकडे बघत राहिली आणि ग्लास मधील उरलंसुरलं पाणी त्याच्या फोटोवर रागाने फेकलं…
27 ऑगस्ट चा दिवस…3 दिवसांवर हल्ल्याची तारीख येऊन ठेपली होती. नियोजन जोरात चालू होतं. घराबाहेरच्या मोकळ्या जागेत सर्वजण खाली बसायचे आणि शबाना त्यांना एकेक सूचना देत असायची..
“इथून फक्त 3 जण स्थळी जाणार…सीमा ओलांडायला आपला ठरलेला रस्ता आहे..तिथून वेष बदलून तडक पटेल मैदानात जायचं…तिथे न्यायला आपली भारतातली लोकं येतील…मैदानात तपासणी केली जाईल..एका लहान मुलाच्या बॅग मध्ये हत्यारं आणि बॉम्ब लपवलेले असतील..त्या मुलाला सर्व ट्रेनिंग दिली आहे…पोलिसांना चुकवत तो आत शिरेल… आणि बरोबर 5 वाजता तिथे बॉम्ब ठेऊन तिथून निसटायचं…”
शबाना च्या नियोजनाचं सर्वांना कौतुक वाटत होतं.. पण नासिर च्या मनातली शंका त्याला काही शांत बसू देत नव्हती…
तिथूनच त्याला एक माणूस पिशव्या घेऊन शबाना च्या घराकडे जाताना दिसला..त्याला अडवत नासिर ने विचारलं..
“कुठे जायचंय??”
“अबिदाजान कडे…बाजारातून काही वस्तू आणि भाजीपाला आणायला सांगितलेला तिने…”
नासिर ला हीच एक संधी होती, घरात प्रवेश करण्याची…
“आन माझ्याकडे…मी नेऊन देतो..”
“पण…”
“पण बिन काही नाही…मी यांच्या दिमतीतला माणूस आहे…आण..”
नासिर त्याच्या जवळची पिशवी जवळजवळ हिसकावूनच घेतो…आणि घराकडे चालायला लागतो..
जाताना शबाना च्या खोलीकडे बघतो, आज दरवाजा उघडाच होता…त्यामुळे सायरन ची भीती नव्हती… त्याचा मार्ग सोपा झाला…तो पिशवी खाली ठेऊन खोलीत चोरट्या पावलांनी शिरला…अबिदाजान स्वयंपाक घरात होती.. शबाना, अहमद आणि यासिन बाहेर नियोजनाची चर्चा करत होते…हीच एक संधी ओळखून त्याने खोलीतील सामान पटापट चेक केलं…त्याच्या हातात भगवद्गीता लागली…तो जवळजवळ उडालाच…आणि सोबतच खुश झाला…पुरावा मिळाला होता..अजून काही मिळतंय का हे बघण्यासाठी तो इकडेतिकडे पाहू लागला…
शबाना चा कॉम्प्युटर चालूच होता…त्याने तिचा मेल ओपन केला…नुकताच एक मेल एका वेगळ्याच मेल आयडीवर केलेला दिसला…त्याने तो उघडला…त्यात लिहिलं होतं..
“रमजान दिन स्वतंत्र वक्त हाथ..”
हे काय भलतंच?? या वाक्याला काही अर्थ तरी आहे का??
नासिर विचार करतो…खिडकीतून त्याने पाहिलं, सर्वजण आत येत आहेत..त्याने पटकन तिथून पळ काढला..
त्याला भगवद्गीता सर्वांना दाखवून शबाना चं खरं रूप सर्वांसमोर आणायचं होतं.. पण दुसऱ्या पुराव्याचा अर्थ त्याला उमगत नव्हता….
2 दिवस त्याने बराच विचार केला..
अखेर 30 तारिख आली…संध्याकाळी सर्वजण tv वर नजरा रोखून बसले….
शबाना ची माणसं केव्हाच तिथे पोचली होती आणि नियोजनानुसार सर्वकाही सुरू होतं…
नासिर च्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू होतं..
“रमजान दिन स्वतंत्र वक्त हाथ…”
काय अर्थ असेल याचा?
इतक्यात त्याचा कानावर बोल पडले…
“रमजान के 30 दिन..उन दिनो अल्लाह हमारे सबसे करिब रहता है…”
“रमजान दिन” म्हणजे रमजान मध्ये 30 दिवस असतात…हल्ला 30 तारखेचा….”स्वतंत्र..” म्हणजे भारताचा स्वातंत्र्यदिन ऑगस्ट मध्ये…”30 ऑगस्ट…”
“वक्त हाथ..” हाताची बोटं पाच… म्हणजे 5 वाजता…
नासिर च्या अंगावर रोमांच उठले…
“म्हणजे शबाना ने कोड लँग्वेज मध्ये भारत सरकारला या हल्ल्याची पूर्वसूचना दिली???”
तो पळत पळत जमावाकडे गेला…सर्वजण tv बघत होते…
“शबाना जासुस आहे….तिची सच्चाई समोर आली आहे…”
सर्वजण नासिर कडे बघू लागतात..
“हे बघा.. भगवद्गीता… हिच्याकडे कशी? आणि हिने भारत सरकारला हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती..5 वाजत आलेत…बघा तुम्ही, हा हल्ला होणारच नाही…शबाना ने सगळं उधळून लावलं…”
इतक्यात tv वर ब्रेकिंग न्युज..
“पटेल मैदानात दहशतवादी हल्ला…50 हुन अधिक लोकं ठार…”
क्रमशः