भाग 1
https://www.irablogging.in/2020/09/1.html
भाग 2
https://www.irablogging.in/2020/09/2.html
एपिसोड 3 – जिद्द
“मिस गिरीजा आणि मिस्टर इम्रान..तुम्हाला आम्ही पुढील महिन्यात एक तारीख देतो, तेव्हा शस्त्रक्रिया केली जाईल..तोपर्यंत काय काळजी घ्यावी लागेल तुम्हाला माहीत आहेच…”
“मॅडम जरा लवकर नाही होणार का..”
“नाही…रोज 5 शस्त्रक्रिया होतात इथे..तुमचा नंबर बराच दूर आहे..”
“ठीक आहे..”
“सिस्टर अनु…जरा आत या..”
सिस्टर अनु जाणूबुजून दुर्लक्ष करते आणि निघून जाते..
गिरीजा आणि इम्रान गेल्यानंतर डॉक्टर शलाका सिस्टर अनु ला विचारतात,
“मी तुम्हाला आवाज दिला होता…आत का नाही आलात?”
सिस्टर अनुराधा काहीही बोलत नाही..
“तुम्हाला अजूनही वाटतय तुम्ही आई होऊ शकाल??”
“मी आई होण्यासाठी काहीही करायला तयार आहे..”
इतक्यात सिस्टर मीना आत धावत येते…
“मॅडम, एक घोळ झाला आहे…”
त्यानंतर 2 महिने हॉस्पिटलमध्ये असं काही नाट्य घडतं की सर्वांची आयुष्य बदलून जातात…
_______
20 वर्षांनी
“गिरीजा…किती दिवस अशी एकटी बसून राहणार आहेस..थोडं सावर आता स्वतःला..”
“कशी सावरू आई..इम्रान असं कसं वागला माझ्याशी?? असं कसं करू शकतो तो??”
“बाळा, मती फिरली त्याची.. एकावर एक फिल्म्स मिळत गेल्या, रातोरात सुपरस्टार झाला तो…आणि यशाची हवा डोक्यात गेली त्याच्या…तुझी गरज राहिली नाही त्याला..”
“आई, माणसं अशी का असतात गं?? या जगात कुणीच आपलं नसतं का??”
“असतं ना, रक्ताची नाती कायम आपल्या सोबत असतात…काहीही झालं तरी ती आपली साथ सोडत नाही..”
“आई…मला माफ कर…तुला आणि ताईला सोडून मी मॉडेलिंग साठी गेले, सगळं सुरळीत चालू होतं गं… पण…”
(फ्लॅशबॅक)
“मिस गिरीजा..येत्या हिंदी फिल्म साठी आम्ही audition ठेवले आहे…तुम्ही या रोल साठी परफेक्ट आहात असं आम्हाला वाटतं, तरी audition साठी येऊन जा..”
गिरीजा आनंदाने उड्या मारायला लागते…
“इम्रान….मला मुव्ही मिळतोय..”
“काय?”
“हो, आत्ताच त्या प्रोड्युसर चा कॉल आलेला..”
इम्रान स्वतः फिल्म साठी स्ट्रगल करत असतो…गिरीजा ला पहिली फिल्म मिळाली म्हणून त्याला जळवणुक व्हायला लागते..
“अजून सिलेक्शन झालं नाहीये, फक्त audition ला बोलावलंय ना..”
“हो..पण ते म्हणाले की ती जस्ट एक फॉर्मलिटी आहे…माझा चेहरा परफेक्ट आहे त्या रोल साठी..lets see..”
“हम्म..”
“तुला आनंद नाही झाला??”
“ऑफकोर्स… झालाय की..”
“तुझ्या चेहऱ्यावर दिसत तर नाहीये..”
“मी चांगला actor नाही ना, मला एक्सप्रेशन्स देता येत नाही..”
“Very funny..”
__________
“हे मायाजाल आहे बाळा, या फिल्मी दुनियेत टिकण्यासाठी काय काय करावं लागतं तू अनुभव घेतलाच असशील…”
“आई..मी परत आले…मला सामान्य जीवन जगायचं होतं गं… एखाद्या सध्या माणसाशी लग्न करून संसार थाटायचा होता…”
“हो पण तू शरीराशी असा खेळखंडोबा करून बसलीस…गर्भाशय नसलेल्या मुलीला कोण होकार देणार?? तुझं सौंदर्य पाहून तुला इतकी स्थळं आलेली, पण ही गोष्ट ऐकताच…”
गिरीजा रडायला लागते..
“So सॉरी गिरीजा… माझ्याकडून भावनेच्या भरात बोललं गेलं..”
“पण तेच तर सत्य आहे…आणि एक प्रश्न पडतो मला, स्त्री म्हणजे फक्त गर्भ का?? गर्भ नाही त्या स्त्रीला काही किंमतच नाही का?? ती मूल जन्माला घालू शकत नाही म्हणून आयुष्यात काहीच करू शकत नाही का??”
“बाळा या प्रश्नाचं उत्तर कित्येक काळापासून स्रीजात शोधत आलीये…पण निसर्गानेच जे बांधून दिलंय त्याला आव्हान द्यायची आपली कुवत नाही..”
_________
“हॅलो बाबा..”
“बोल गीतेश… कुठे आहेस सध्या..”
“मी अरुणाचल प्रदेशातील एका भव्य टेकडीवर आलोय, साधनेसाठी…तुम्ही कसे आहात?? दादा वहिनी कसे आहेत??”
“मी ठीक आहे…दादा आणि वहिनीने घर सोडलं..”
“काय??? बाबा काय बोलताय?? का सोडलं??”
बाबांनी त्याला सगळी हकीकत सांगितली…
“बाबा?? तुम्ही दादा ला वहिनी असताना दुसरं लग्न करायला कसं सांगू शकता??”
“गीतेश…आपण साधारण खानदानातील नाही आहोत, शास्त्रीय संगीतासाठी आपलं घराणं नावाजलेलं आहे…याला जर वंशज नसेल तर पिढ्यानपिढ्याची आपली मेहनत वाया जाईल… आपल्या पूर्वजांचा अपमान होईल…त्या दोघांना याचं गांभीर्य नसेल तर जाऊदेत…जाऊदेत त्यांना त्यांच्या सिंगापूर ला, त्यांच्या पब्लिशिंग हाऊस चं काम बघतील ते तिथे..”
गीतेश काहीही न बोलता फोन ठेवून देतो…
________
“सिस्टर अनु, बरं वाटतंय?? काही बदल जाणवताय??”
“बदल तर नाही जाणवत काही…”
“जाणवेल लवकरच..20 दिवसात रिपोर्ट येईल तेव्हाच समजेल आता..”
“मी आई व्हायलाच पाहिजे…मी होणारच..”
“सिस्टर अनु, आयुष्यात मी कधीही इतकी नर्व्हस झाले नव्हते, मी जे केलं आहे ते याआधी कधीही झालेलं नाही…दैवाची साथ म्हणून तुझ्या बाबतीत सगळं पोसिटीव्ह होतंय..”
“पण मॅडम, त्यांना समजलं तर??”
“समजायला ते या जगात नाही….”
क्रमशः