हिरवा संघर्ष (भाग 5)

 मळक्या कपड्यात आणि डोकयावर ओढणी घेतलेली मुलगी ओढणी बाजूला करते आणि माधव ओरडतो…

“दिशा??”

आई पलीकडून हसत असते.

“आई? म्हणजे हे तुमच्या दोघींचं खलबत होतं तर.”

“बघ…मला हेही काम जमतं… आता झाली ना आपली बरोबरी?? आता लग्न करशील माझ्याशी??”

माधव ची आई लाजून तिथून निघून जाते..

“अरे?? मी लाजायला पाहिजे तर काकूच लाजल्या..”

“म्हणजे तू माझ्यासोबत लग्न केल्याशिवाय शांत बसणार नाहीस..”

“होय…ए पण तुला मी आवडते का??”


माधव हातातली कुऱ्हाड खांद्यावर घेतो आणि हसत चालू लागतो… दिशा त्याच्या मागे मागे जाते..

“ए सांग ना…”

कितीतरी अंतर ते चालत जातात…माधव पूढे आणि दिशा मागे…

अखेर दिशा कंटाळते..

“जा नको सांगू..”

असं म्हणत ती माधव कडे पाठ फिरवून पुढे चालायला लागते…तोच माधव तिला आवाज देतो…

“मॅडम..उगाच नाही त्यादिवशी तुमच्या बैलगाडी शेजारी ट्रॅक्टर घेतलं…”

दिशा ला माधव होकार देतो अन दिशा आनंदून घरी निघून जाते.

आल्यावर सुलेखा तिला चोपाळ्यावर बसलेली दिसते…
सुलेखा ला कसं सांगावं?
हिम्मत करून ती म्हणते,

“सुलू…”

“मला माहितीये तू काय बोलणारेस…तुला माधव आवडतो ना? खरं सांगू? माझी लाईफ पार्टनर बद्दल वेगळी अपेक्षा आहे…तू माझं लग्न मोडलं म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस…पण मला तुझी काळजी वाटते गं… शेतकऱ्याचं आयुष्य आम्ही जवळून पाहिलंय.. सोपं नसतं त्याचं आयुष्य…”

“आयुष्यात काहीही अवघड नसतं सुलू…”

“बरं… मग..कुठवर आली लव्ह स्टोरी??”

“त्याने मला होकार दिलाय..” दिशा लाजत सांगते..

“काय सांगतेस??” सुलेखा दिशा ला धरून एकच गिरकी घेते..

“हो हो…पण घरचे..”

“ऐकतील गं…”

माधव ची आई दिशा च्या आईला भेटते…तुमच्या मुलीला काहीही कमी पडू देणार नाही..असं आश्वासन देते…अखेर दिशा च्या आईवडिलांनाही मान्य करावं लागतं… आणि अखेर दोघांचं अगदी थाटामाटात लग्न होतं…

माधव ची आई खूप खुश असते…म्हणायला गेलं तर साधी, अडाणी, देवभोळी बाई..पण दिशा मध्ये ती स्वतःची मुलगी पाहत होती…माधव ला कितीतरी मुलींनी नकार दिलेला…पण दिशा ने माधव मधला माणूस ओळखून त्याच्यावर प्रेम केलं हे माधव च्या आईला उपकारासमान झालेलं..

लग्नानंतर ..काही नातेवाईकांना दिशा चं जास्त शिकलेलं खटकत होतं.. काहीजण इतकी छान सून मिळाली म्हणून जळत होते… त्यांनी माधव च्या आईचे बरेच कान भरवायला सुरवात केली..पण आईने लक्ष दिलं नाही..

“काय बाई..आपण खेड्यात राहतो याचं भान ठेवावं… इथे ड्रेस चालत नाही, डोक्यावर पदर घेऊन साडीच नेसावी लागते….सांग बाई तुझ्या सुनेला..”

दिशा ते ऐकते… तिला वाईट वाटतं… ती साडीतला पेहराव करून बाहेर येते…तोवर पाहुणे निघून गेलेले असतात..

माधव ची आई म्हणते..

“अगं वेडे…त्यांचं काय मनावर घेतेस…तुला सवय नाही साडीची…तुला जे पटेल ते घालत जा…”

“नाही आई…माझ्यामुळे तुम्हाला बोलणी ऐकावी लागतील हे मला पटत नाही…पेहराव कसाही असो, त्यातला माणूस सच्चा पाहिजे..”

माधव च्या आईला भरून आलं..

माधव दिशा ला आपलं शेत दाखवतो…दिशा एकेक कोपरा न्याहाळून घेते…कारण तिचं मिशन इथूनच सुरू होणार होतं… शेती कुठल्या पद्धतीने केली जातेय, कुठली पिकं घेतली जाताय याची सगळी माहिती घेतली…


फिरत असताना अचानक मीनाक्षी चा फोन येतो..मीनाक्षी.. दिशा च्या कॉलेजमधली तिची एक मैत्रीण.. मैत्रीण कसली, शत्रूच…कायम दिशाशी बरोबरी करू पाहणारी, दिशा च्या कर्तुत्ववार जळणारी…. आज कसकाय फोन आला हिचा म्हणत दिशा फोन घेते..

“हॅलो..”

“हॅलो दिशा..अगं लग्न केलंस, सांगितलंही नाहीस..”

“हं…”

“काय मग, शेतकरी नवरा आहे म्हणे…चुलीवर स्वयंपाक करावा लागत असेल ना..अरेरे…माझी तर मजा आहे बुवा…मस्त मुंबईला आहे…नवऱ्यासोबत.. एका फ्लॅट मध्ये…नुकतीच एक कार घेतली…10 लाखाची… ए तू कशी फिरतेस गं?? बैलगाडीवर?? हा हा हा…”

दिशा ला तिचा रोख समजला..

“3 वर्षांनी परत फोन कर, तेव्हा सांगेन कशावर फिरते ते…”

असं म्हणत दिशा ने फोन ठेऊन दिला…

“माधव…माझं एक ऐकशील??”

“बोल की..”

“आपली खुप मोठी जमीन आहे..काही जमीन मला देशील शेती करायला???”

“त्यात काय मग…भरपूर जमीन आहे आपली…अशीच पडलीये…. तुला हवं ते कर…”

दिशा चा सुरू होतो इथूनच…एक “हिरवा संघर्ष…”…शेतकऱ्याच्या सन्मानासाठी…. शेतीबद्दलच्या जुनाट संकल्पना उखडून टाकण्यासाठी…

1 thought on “हिरवा संघर्ष (भाग 5)”

Leave a Comment