भाग 1
https://www.irablogging.in/2020/10/1.html
भाग 2
https://www.irablogging.in/2020/10/2_28.html
भाग 3
https://www.irablogging.in/2020/10/3_29.html
भाग 4
https://www.irablogging.in/2020/11/4.html?m=1
भाग 5
https://www.irablogging.in/2020/11/5_9.html
डिपार्टमेंट मध्ये काम उशिरा पर्यन्त चालायचं, आलेले 2 दहशतवादी शोधण्यासाठी सर्वांनी कस लावला होता..रात्री 9 वाजले तरी शौर्या ऑफिस मधेच होती..तिला घरून फोन आला, बंटी तापाने बेजार झालाय, आई आई करतोय.शौर्या काळजीत पडली, काम बाकी होतं तरी मुलाला घेऊन तडक हॉस्पिटलमध्ये पोचली. बंटी चा ताप काही केल्या उतरत नव्हता, सारखा आईला जवळ घेऊन होता..डॉक्टरांनी तपासून औषधं दिली होती, ताप नाही उतरला तर धोका होता.
शौर्या दिवसभर कामामुळे थकून गेली होती, आल्यावर जेवलीही नाही. बंटी शेजारी बसल्या बसल्या तिला झापड येत होती. तोच तिच्या डोक्यावरून एक हात फिरवला गेला..तिने डोळे उघडले.. तिचा नवरा डबा घेऊन तिच्या समोर उभा होता,
“जेवण केलं नाहीये तू ..दोन घास खाऊन घे..”
शौर्या रडायला लागली,
“माझ्यामुळे तुमची धावपळ झाली हो, जेवणही तुम्हाला बनवावं लागलं..”
“त्यात काय एवढं, तू सगळं सांभाळून घराचं बघते..मी एक दिवस पाहिलं तर कुठे बिघडतं??”
“मला वाटतं मी नोकरी सोडून द्यावी..मुलांकडे लक्ष देणं होत नाही माझं..पाहिलं बंटी कसा आजारी पडला ते..”
“अगं शौर्या, मुलं कधी आजारी पडत नाही का? त्याला तूच कारणीभूत आहे असं कसं??”
“मी थकले आता…”
“थकून चालणार नाही…लग्नानंतर अशीच घरी बसून होतील तेव्हा लहान मुलासारखा तुला शेजारी बसवून अभ्यास करवून घेतला, कशासाठी?? आज तुझ्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे…देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे…देशासाठी तुला खंबीरपणे लढायचं आहे..”
“अहो पण बंटी..”
“मी आहे ना, आजारपण मोजक्या दिवसाचं असतं…तेवढ्यासाठी तू तुझं काम नाही सोडायचं..”
पूर्ण शहराला शौर्या धीर देत असे, पण शौर्याला मात्र तिच्या नवऱ्याशिवाय कुणीही धीर देऊ शकत नव्हतं.. बायकोला असं धडाडीने उभं करणारा तिचा नवरा खरोखर एक आदर्श माणूस होता…
हॉस्पिटलमध्ये 4 दिवस थांबणं गरजेचं होतं, शौर्याच्या नवऱ्याने रजा घेतली होती, तो पूर्णवेळ मुलांकडे बघत होता.
तिकडे ATS पथकाचे मिस्टर जैन त्यांच्या गुप्तहेर खात्यामार्फत माहिती जमा करत होते. त्यांना तिथले आमदार शिरोळे यांचा फोन आला, एक व्यक्ती आमच्या होणाऱ्या सभेची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होता असं त्यांनी सांगितलं. शिरोळे यांच्या सभेला मोठा जनसमुदाय जमा होणार होता, जैन साहेबांना भीती होती की इथेच काहीतरी घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव असणार. तो व्यक्ती कोण आहे याचा शोध cctv द्वारे घेण्यात आला. त्याला पकडण्यात यश आलं, त्याने कबूल केलं की आमदार शिरोळे यांच्या सभेत हल्ला घडवून आणायचा कट आहे. पण त्याला कटाबद्दल काहीही माहिती दिली गेली नव्हती.
हे सगळं नाईक आणि मिस्टर जैन मिळून करत होते. शौर्या हॉस्पिटलमध्ये तिच्या मुलाजवळ होती. रात्री तिने मिस्टरांना घरी पाठवलं, पण हॉस्पिटलमध्ये तिला काही झोप येईना, डोक्यात सतत हल्ल्याचे विचार, त्यात तिला डिपार्टमेंट मुलामुळे सहभागी होऊ देत नव्हते… हॉस्पिटलच्या मागे मोठमोठ्याने स्पीकर चालू होते, रामनवमी जवळ असल्याने जोरदार तयारी सुरू होती. हॉस्पिटलमधला बराच स्टाफही मदत करत होता. कारण जमिनीवरून मंदिर की हॉस्पिटल असा वाद सुरू असताना मंदिर मंडळाने कुठलाही वाद न घालता हॉस्पिटलसाठी आग्रह केला आणि बाजूची लहानशी जागा मंदिरासाठी राखून ठेवली. त्याच्या बाजूला एक प्रचंड मोठा प्लॉट होता. एका मोठ्या व्यावसायिकाने तो खरेदी केला होता, मंदिराच्या सभेसाठी त्याने तो प्लॉट वापरायची परवानगी दिली होती, त्यामुळे मंदिराचे सर्व भव्य कार्यक्रम तिथेच होत.
शौर्याला झोप येईना…खिडकीतून ती डोकावून बघत होती, भाविक मोठे पटांगण सजवत होते, बसण्यासाठी लागणाऱ्या सतरंज्या गाडीतून उतरवल्या जात होत्या, पताका लावण्यात येत होत्या, मंदिराला रोषणाई करण्यात येत होती. परवाची रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार होती. शौर्या ही सगळी गडबड बघत होती, पण तिच्या नजरेतून काही गोष्टी सुटल्या नव्हत्या.
आमदार साहेबांच्या सभेची तयारी सुरू होती, जैन आणि नाईक त्या ठिकाणी पाहणी करत होते.. तिथे 2 लोकांच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटत होत्या..नाईकांनी स्टेजच्या खाली पाहणी केली..ते पाहताच नाईक जैन सरांना आवाज देतो..स्टेज खाली काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही वायर्स ची गुंतागुंत असलेला बोर्ड सापडतो..
क्रमशः