सागर आणि प्रमिला, दोघेही भाऊ बहीण आपला भूतकाळ कितीतरी वेळ फोनवर आठवत असतात. इतके दिवस मनात साठलेलं प्रमिलाने पुन्हा एकदा बाहेर काढलं. एकप्रकारे मन मोकळं केलं. सागर या सर्वांचा साक्षीदार होताच. बाळ अनाथाश्रमात असताना त्यालाही त्याच्या निर्णयाचा राग येत होता, पण एकीकडे लहान जीव अन दुसरीकडे बहिणीचं भविष्य, या द्वंद्वात सागर अडकला होता. अखेर प्रमिलाच्या भविष्यासाठी बाळाला दूर करण्यासाठी सागरने आपला हट्ट लावून धरला होता. पण जेव्हा मानव कडे बाळ गेलं तेव्हा मात्र सागरच्या मनावरचं ओझं काहीसं कमी झालं.
आरोहीचा नवरा नकुल, त्याला काहीही करून त्या बाळाची माहिती हवी होती. आरोहीची स्मृती गेल्याने तिला विचारण्यात अर्थ नव्हता, तिच्या घरातले तर याबाबत पूर्णपणे अंधारात होते. म्हणूनच नकुलने सागरच्या बायकोला- खुशीला, जी त्याची कॉलेजची मैत्रीण होती तिला त्याने सागरकडून काहीही करून ही माहिती काढायला लावली. अखेर खुशी ने सागरच्या मोबाईल मध्ये त्याच्या नकळत कॉल रेकॉर्डिंग चा ऑप्शन चालू केला. सागर आणि प्रमिलाचं बोलणं होताच सागर बाहेर गेला असता खुशी ते रेकॉर्डिंग पटकन आपल्या मोबाईल मध्ये घेते. संभाषण बरंच मोठं असल्याने खुशी ते रात्री शांततेत ऐकायचं ठरवते आणि तोवर घरातल्या इतर कामाला लागते.
रात्री जेवायला बसले असता खुशीला अचानक नकुलचा फोन येतो. खुशी जरा घाबरते, सागर समोर नकुल ला काय उत्तर द्यायचं? माझं काम झालं का हेच विचारायला फोन केला असेल त्याने..खुशी मुद्दाम फोन सायलेंट करून बाजूला ठेऊन देते. पण नकुल मात्र सतत फोन करत असतो.
“खुशी, तांब्यातलं पाणी संपलं आहे..जरा आणतेस का?”
सागर खुशीला सांगतो.. खुशी उठून आत जाते अन तिच्या बाजूला असलेला तिचा फोन मात्र तिथेच ठेऊन जाते. सागरला फोन चमकताना दिसतो..
“खुशी पण ना, फोन सायलेंट करून ठेवते..”
असं म्हणत फोन हातात घेतो आणि बघतो तर नकुलचे 6 मिस्ड कॉल्स..
“नकुल? इतके मिस कॉल? काही अर्जंट असल्याशिवाय कॉल नाही करणार तो..आरोही बद्दल तर काही सांगायचं नसेल ना??”
सागर विचारात असताना परत एकदा कॉल येतो. सागर कसलाही विचार न करता कॉल उचलतो, सागर काही बोलायच्या आधी नकुल तिकडून बोलू लागतो… ते ऐकून सागर एकदम जेवण सोडून उभा राहतो.. इतक्यात खुशी पाणी घेऊन येते आणि सागरला तिच्या फोनवर असलेला बघते..खुशीला दरदरून घाम फुटतो..नकुलचा फोन येत होता.. काय बोलला असेल तो? सागरला सगळं समजलं नसेल ना?? खुशी घाबरून सागरकडे बघते.सागर म्हणतो..
“तू तिथेच थांब, मी येतो..”
“क..क..काय झालं..”
“फोन सायलेंट वर नको ठेवत जाऊस, नकुलचा फोन होता..त्याची गाडी आपल्या घराजवळ 2 km वर बंद पडलीये, मदत मागतोय तो..”
खुशीचा जीव भांड्यात पडला, तिला वाटलं आता आपलं भांडं फुटणार की काय..
“तू थांब घरी, रात्रीची वेळ आहे.. मी येतो जाऊन..”
असं म्हणत सागर पटापट जेवण आटोपून नकुल च्या मदतीसाठी निघून गेला. खुशीने पटापट सगळं आवरलं आणि आपल्या खोलीत हेडफोन लावून सागर आणि प्रमिलाच्या संभाषणाचं रेकॉर्डिंग ऐकू लागली. खुशी लक्षपूर्वक सगळं ऐकत होती. जसजसं तिला सगळं समजलं तसतसा तिच्या अंगावर काटाच उभा राहत होता. आरोहीचं प्रेम..मानवला घरातून असणारा विरोध.. ती बिझनेस टूर.. आरोहीच्या घरी समजणं.. तिला गावी पाठवणं… गावी तिचं बाळंतपण होणं..प्रमिलाने तिची घेतलेली काळजी.. मामीचा सौदा..नंतर झालेला अपघात अन आरोहीची गेलेली स्मृती..हे सगळं अगदी डोळ्यासमोर घडतय की काय असं खुशीला वाटू लागलं. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हे असलं काही झालं असणार याची तिला कल्पनाही नव्हती. ही गोष्ट इतकी नाजूक होती की तिला गुपिताच्या चौकटीत ठेवणच योग्य होतं.. माफ करा प्रमिला ताई, पण माझी मैत्री आड आली अन मला हे करावं लागलं..
खुशीने तिचं काम केलं, नकुलने सांगितल्याप्रमाणे तिने त्या बाळाची पूर्ण माहिती काढली होती. ती आर्वी, मानवकडे असलेली ती मुलगी..तीच आरोही आणि मानवची मुलगी..तिच्या वडीलांकडेच..दत्तक म्हणून मोठी होतेय. आता हे सगळं नकुलला सांगायला हवं..
एव्हाना सागर घरी आला, दमल्यामुळे लागलीच त्याला झोप लागली. सागर झोपलाय लक्षात येताच खुशी बाल्कनीत आली..तडक नकुलला फोन लावला..
“हॅलो नकुल..”
“हा खुशी, थँक्स हा, सागर अगदी लगेच मदतीला धावून आला..आता पोचलोय मी घरी सुखरूप..तू काय म्हणतेस, आणि हो, मी सांगितलेली माहिती काढली का??”
“हो नकुल..ते..”
पुढचं बोलायच्या ऐवजी खुशी एकदम शांत झाली, तिच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागलं, मेंदूला झिणझिण्या येऊ लागल्या.
“काय सांगायचं नकुलला? आर्वी आरोहीची मुलगी आहे म्हणून? नकुल त्या बाळामध्ये स्वतःचं बाळ शोधतोय.. नकुलला समजलं तर? तो आर्वीला घेऊन जाईल..आरोहीची मुलगी म्हणून..आरोही आता आई होऊ शकत नाही म्हटल्यावर हक्काचं मूल का सोडेल तो? आणि आरोही? तिचं काय? ही मुलगी तुझी आहे..मग ती कशी..कुणापासून हे सगळं तिला पचेल? बरं आर्वी उद्या गेली आरोही अन मानवकडे..तर..आरोहीच्या आई वडिलांना काय उत्तर देणार? मानव आणि आरोही ला मुलगी होती म्हणून? कसं स्वीकारतील ते हे सत्य? मानवला जर समजलं, की आर्वी त्याचीच खरी मुलगी आहे, आरोही पासून झालेली.. तर…तर त्याच्या संसार? त्याच्या बायकोची काय चूक यात? आणि…उद्या आरोही आणि मानव आर्वी साठी एकत्र आले तर? नकुल अन मानवच्या बायकोने कुठे जायचं??”
खुशीला समजलं, हे गुपित मोठ्या तळमळीने बाहेर प्रमिला ताई का पडू देत नव्हत्या ते.. हे सत्य जर बाहेर आलं तर कुणाचा ना कुणाचा तरी संसार मोडणार होता..आयुष्यात वादळं उठणार होती, नानाविध प्रश्न निर्माण होणार होते.. पुढे काय होऊ शकतं याची कल्पना करताच खुशीला घाबरायला झालं..
“काय गं? बोल ना…मी एकटाच बोलतोय..”
“काही नाही, पोचलास ना सुखरूप? तेच विचारायचं होतं..”
खुशीने ते गुपित शेवटी पुन्हा गुपितातच जतन केलं. पण त्या रात्री तिला झोप आली नाही. रात्रभर आरोहीच्या आयुष्यात घडलेलं सगळं डोळ्यासमोर उभं राहत होतं.
_____
प्रमिला मोठ्या ओझ्याखाली जगत होती. तिच्या घरी अनाथाश्रमातील लोकं घरी आल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली. कल्पेशराव तसे साध्या सरळ मनाचे, पण अनाथाश्रम, बाळ, सही… हे सगळं ऐकल्यानंतर मात्र प्रमिला बाबत त्यांच्या मनात प्रचंड संशय माजू लागला. प्रमिलाला जेव्हाही ते याबद्दल विचारत तेव्हा ती सांगायला टाळाटाळ करे, त्यामुळे कलपेशरावांचा संशय अजून बळावू लागला.
प्रमिला तरुण असताना काही चुकीचं पाऊल तर तिच्याकडून उचललं गेलं नसेल ना? तिचा भाऊ सागर कामानिमित्त कायम बाहेर, मग प्रमिला एकटी घरात असायची…मग…नको त्या शंका कल्पेश रावांच्या मनात उफाळु लागल्या..
____
“नकुल, किती दिवस आपण असं एकमेकांच्या सहाय्याने जगायचं रे?”
“आरोही? अचानक काय झालं तुला?”
“समाजात राहतो आपण, जोडपी बघतो..त्यांच्या मुलांना घेऊन किती आनंदाने जगताय ती..आपल्याला नाही म्हटलं तरी आयुष्य काढायचं आहे ..आणि आपलं ठरलंय ना, की आता आनंदाने जगायचं..”
नकुल एकदम नर्व्हस होतो..
“माहितीये आपल्याला बाळ होऊ शकत नाही, पण एखादा दुसरा मार्ग असू शकतो ना??”
नकुलला तिला सांगावंसं वाटतं, विचारावं वाटतं..
“अपघाताच्या वेळी ते बाळ कुणाचं होतं? तू का माझं बाळ, माझं बाळ म्हणून ओरडत होतीस??”
पण डॉक्टरांनी सांगितलं होतं, आरोहीच्या मेंदूवर ताण पडेल असं काहीही करायचं नाही म्हणून..दोघेही त्यांच्या बाल्कनीत उभं राहून ही चर्चा करत असतात. आरोहीचं लक्ष खाली गार्डन मध्ये खेळत असलेल्या मुलांकडे जातं. तिथे एक आई आपल्या मुलाला तिच्या बेबी सीटर सोबत बागेत आणते, आणि मुलाला त्या बाई सोबत सोडून परत जात असते..का कोण जाणे, आरोही एकदम विचलित होते..
“नको गं त्याला सोडू.. शेवटी तूच आई आहेस..तुझी सर नाही येणार त्या बाईला..”
नकुल एकदम दचकतो..आरोही अचानक ओरडू लागते, तिला नियंत्रित करणं कठीण होत होतं..
क्रमशः
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
_____
ईरा पुन्हा एकदा आयोजित करत आहे एक नवीन स्पर्धा…
“कादंबरी लेखन स्पर्धा..”
आपल्यातील अनेक लेखक उत्तमोत्तम कथामालिका लिहितात, पण त्याला कादंबरी चे स्वरूप आपण ईरा व्यासपीठावर देऊ शकतो. लिखाणात सातत्य आणि नवनवीन कल्पनाशक्तीला वाव या स्पर्धेतून नक्कीच साध्य होईल. स्पर्धेनंतर तुम्ही हीच कादंबरी छापील स्वरूपात प्रकाशित करू शकतात. त्यामुळे ही एक संधी आहे, आपल्या प्रतिभेला योग्य दिशा देण्याची. स्पर्धेसाठी नियम आणि अटी खालीलप्रमाणे.
1. स्पर्धा 1 एप्रिल ते 31 जुलै पर्यंत असेल
2. कादंबरी किमान 30 भागांची असावी, एका भागात किमान 1500 शब्द असावेत.
3. पुढील भाग पब्लिश करण्यात 2 दिवसाहुन जास्त अंतर नको.
3. कादंबरी साठी तुम्ही तुम्हाला हवा तो विषय निवडू शकता.
4. निकालाच्या वेळी भाषा, व्याकरण, विषयानुरूप लेखन या सर्वांचा विचार करून क्रमांक दिले जातील.
5. सहभागी प्रत्येक लेखकाला एक सन्मानचिन्ह दिले जाईल
6. कादंबरी साठी मिळालेल्या views नुसार दरमहा मानधनही दिले जाईल.
7. शीर्षकात #मराठी_कादंबरी असा उल्लेख असावा.
8. कथामालिका अर्धवट सोडून जाता येणार नाही.
9. गरज भासली तर अंतिम तारीख काही दिवस वाढवून देण्याचे अधिकार ईरा टीम कडे असतील.
10. ईरा च्या नियमानुसार सदर कथामालिका फक्त ईरा वेबसाईटवर असावी. अपवाद तुमचे फेसबुक पेज आणि वेबसाईट. तिथे टाकत असाल तरी आधी ईरा वेबसाईटवर पब्लिश करून इतरत्र शेयर करावी.
11. कथामालिका पोस्ट केल्यानंतर ती लिंक फेसबुकवर शेयर करून बघावी, इमेज दिसत असल्यास राहू द्यावे अथवा मोठी इमेज टाकावी.
12. ब्लॉग पोस्ट केल्यानंतर एडिट करू नये, गरज भासलीच तर आम्हाला संपर्क करावा. आम्ही हरप्रकारे मदत करण्यास तत्पर आहोत.
13. काहीही शंका असल्यास 8087201815 या क्रमांकावर whatsapp करून विचारावे
1 thought on “खेळ मांडला (भाग 16)”