भाग 1
https://www.irablogging.in/2020/08/1_20.html
भाग 2
https://www.irablogging.in/2020/08/2.html
भाग 3
https://www.irablogging.in/2020/08/3.html
https://www.irablogging.in/2021/04/5_24.html
भाग 6
https://www.irablogging.in/2021/04/6_25.html
भाग 7
https://www.irablogging.in/2021/04/7_26.html
प्रेरणाने भारताचा इतिहास याचा अभ्यास करायला घेतला. दुपारी वीर झोपला की तिलाही झोपायची सवय होती, ती सवय आधी तिने मोडली. दुपारी कितीही सुस्ती आली तरी डोळ्यावर पाणी मारून ती वाचायला घेत असे. खरं तर अभ्यासाची सवय राहिली नव्हती पण तरीही ती प्रयत्न करत होती. भलीमोठी पुस्तकं, कितीही वाचलं तरी कमीच होतं. पण तिने नोट्स काढायची सवय लावून घेतली, म्हणजे पुन्हा सगळं वाचायची गरज पडणार नव्हती.
पण अडचण अशी आली की काही पानांवर सगळंच महत्वाचं होतं, इतिहासातील व्यक्तींची नावं, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, वर्ष, तारीख.. एवढं सगळं नोट्स मध्ये लिहायचं म्हणजे पूर्णच्या पूर्ण पानं लिहिणं गरजेचं होतं. यावर काहीतरी तोडगा काढणं महत्वाचं होतं.
थोडावेळ ब्रेक म्हणून तिने tv लावला आणि बघत बसली. TV वर 3 idiots चित्रपट सुरू होता. तिचा आवडता, त्यात तिन्ही मित्रांची धमाल, interview मध्ये झालेली कमाल आणि आमीर खान च्या सही साठी सुरू असलेली धडपड ती मन लावून पहात होती. काही वेळाने भानावर आली, अरे आपल्याला तर अभ्यास करायचा आहे, वीर आत्ता तासाभरात उठेल. ती tv बंद करते आणि पुस्तक घेऊन बसते. ते वाचताना तिच्या डोळ्यासमोर आमिर खानच येत होता. मनात त्या मुव्हीचेच विचार. तिने खिडकीकडे पाहिलं, अभ्यासात मनच लागेना. आजचा दिवस तिने स्वघोषित सुट्टी जाहीर करून टाकली.
आदित्य वीर ला थोडावेळ बाहेर घेऊन गेला, जाताना सांगितलं की आज मस्त जेवणाबरोबर मिरचीचा ठेचा बनव. स्वयंपाक करता करता तो वेळ कारणी लागावा म्हणून पुस्तक बाजूला ठेवलं आणि वाचू लागली.
“मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तिचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ज्ञांनुसार आदिमानवाने भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला. साधारणपणे ९,००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व सिंधू नदीच्या काठावर त्याचे हळूहळू सिंधू संस्कृतीत रूपांतर झाले.. इसवी सन पूर्व ३५००चा सुमार सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो”
दगडी खलबत्त्यात मिरच्या कुटत असताना हे ती वाचत होती. एवढयात वीर आणि आदित्य परतही आले. ती वाचलेलं मनात घोळवत राहिली आणि पुस्तक ठेऊन दिलं.
तिच्या एक लक्षात आलं की कामं करत असताना वाचत राहिलं की चांगलं लक्षात राहतं. कारण जेव्हाही ती दगडी खलबत्ता वापरायला घेई तेव्हा तिला “पाषाणयुगी भित्तिचित्रे” हे नाव आठवत असे. फ्रिजवर दुकानाची एक पावती ठेवलेली त्यात सत्तर रुपये बिल होतं, ते पाहून तिला “आदिमानवाने भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला” हे वाक्य आठवू लागलं.
प्रेरणाचा कायम या वस्तूंशी संपर्क येत असल्याने दगडी खलबत्ता वापरताना पाषाणयुग आणि पावतीमधील 70 रुपये लिहिलेले बघून तिला सत्तर हजार वर्षांपूर्वी हे वाक्य तिच्या तोंडीपाठ झाली.
मग तिच्या लक्षात आलं, की अभ्यासाला तासनतास बसून राहिलं तर अभ्यास होणार नाही. येता जाता सतत अभ्यास समोर दिसला पाहिजे, कामं करतांना, स्वयंपाक करतांना सतत समोर दिसलं पाहिजे. अश्याने अभ्यासासाठी वेगळा वेळ काढायची गरज पडणार नाही…
प्रेरणाला स्वतःच्या या कल्पनेवर स्वतःचेच कौतुक वाटले. असं केलं तर कुणाकडेही वेळ द्या म्हणून भीक मागावी लागणार नाही.
तिने स्वयंपाकघरालाच तिच्या नोट्स बनवल्या..वाळवणाचे डबे, डाळी ठेवलेले डबे, धान्य भरलेल्या कोठ्या, चहा साखरेचे डबे या प्रत्येकाला एकेका माहितीचे साक्षिदार बनवले..
एकदा असंच बडबडत असताना आदित्यने तिला ऐकलं..
“पाण्याची घागर, हिने बेसिन पर्यंत पाणी ओघळवत तो भाग जिंकला..तिथे सगळीकडे आपलं पाणी पसरवलं.. आणि शेवटी घागरीचं पाणी बेसिनमधून झिरपत खालच्या पाईप मध्ये गेलं आणि मेलं..”
“प्रेरणा, तब्येत बरी आहे ना? काय बडबड करतेय? पाणी मेलं म्हणे..”
“अहो अभ्यासाची नवीन पद्धत आहे ही..”
“अशी कोणती पद्धत??”
“सिकंदराने गंगेच्या खोर्यापर्यतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक क्षात्रप म्हणजे सुभेदार नेमले.भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रीसमध्ये त्याचा म्रुत्यू झाला”
“हे सगळं मी या घागरीवरून पाठ केलंय”
“काय संबंध??”
“ही पाण्याची घागर म्हणजे सिकंदर…आणि हे बेसिन म्हणजे गंगेचे खोरे.. घागरीतून पाणी गळत गळत बेसिन पर्यंत म्हणजे गंगेच्या खोऱ्यापर्यंत जाते..तिथे आपले सुभेदार नेमले म्हणजे..आपलं पाणी पूर्ण बेसिनमध्ये पसरलं.. बेसिन खालचा पाईप म्हणजे ग्रीस…पाणी शेवटी तिथेच जाणार, म्हणजेच सिकंदाराचा त्यात जाऊन मृत्यू झाला..”
आदित्य बघतच राहिला..प्रेरणा परीक्षेत पास व्हायला चांगलीच पेटलीये हे त्याच्या लक्षात आलं.
संध्याकाळी अचानक आदित्य प्रेरणाला विचारू लागला..
“वीरचं वजन कमी झालंय असं का वाटतंय मला?”
“नाही ओ, आता त्याची उंची वाढतेय, मोठा होतोय तो..”
“तू त्याला वेळेवर खाऊ घालतेस ना?”
“हो मग, त्याचं खाणं मी कसं चुकवेन??”
“नाही, सध्या अभ्यासाची फारच खुमारी चढलीये ना..”
“त्याचा याच्याशी काय संबंध??”
“हे बघ, तू काहीही कर मी नाही म्हणत नाही, पण वीर कडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये…”
“मी दुर्लक्ष करतच नाहीये, आणि इतके दिवस त्याचं वजन किती आहे हेही तुम्हाला माहीत नव्हतं आणि आज अचानक त्याचं वजन कमी झालंय हे लक्षात आलं तुमच्या?”
“खरंच तेच वाटतंय..”
“मी सांगू का वजन कमी वाटतंय? कारण मी आपलं रोजचं रुटीन पूर्ण करून जास्तीची कामं करतेय, अभ्यास करतेय, नोट्स काढतेय.. ते डोळ्यात खुपतंय तुमच्या..”
क्रमशः
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!