संध्याकाळ झालेली, नोकरीवरून, कोलेजवरून माणसं परतत होते…अंधार वाढत चालला होता…रस्त्यावर बर्यापैकी गर्दी होती…आणि अचानक गणपतरावांच्या होर्डिंग वर प्रकाश चमकू लागला…
लोकं उत्सुकतेने थांबून पाहायला लागले…
अंधार पडायला लागला तेव्हा होर्डिंग अंधुक दिसायला लागलं, सानिका ने हीच योग्य वेळ समजून समोरच्या एका ठिकाणी प्रोजेक्टर ची व्यवस्था केली आणि गणपतरावांच्याच होर्डिंग वर आपला “transparent board” ची संकल्पना लोकांना दाखवली…
काय होतं नेमकं हे transparent board?
तर तो होता एक लेखाजोगा…
नगरात काय समस्या आहेत याची एक लिस्ट होती, अमुक एक ठिकाणी पाणी नाही, अमुक एक ठिकाणी रस्ता खराब वगैरे…. त्याच्या पुढच्या column मध्ये त्या कामाचं स्टेटस…solved?? येस or नो…
त्याच्या पुढच्या column मध्ये त्या कामासाठी सरकारकडून मागितला गेलेला निधी… त्याची प्रत…आणि त्यातला किती आणि कुठे खर्च केला गेला याची नोंद अगदी पावती सकट…वर नागरसेवकाचं नाव रिकामं होतं, तिथे प्रश्नचिन्ह… आणि मधेच प्रश्न येई…”सानिका ने नगराच्या विकासासाठी बनवलेला हा बोर्ड, जिथे सर्व काम पारदर्शी असेल, समस्या आणि त्यांचं निवारण याची सद्यस्थिती तुम्हाला येता जाता दिसेल…जोपर्यंत येथील सर्व समस्यांपुढे “solved- yes” हे चिन्ह येत नाही तोवर सानिका अथक काम करत राहणार, आता तुम्हीच ठरवा, या रिक्त ठिकाणी कोण शोभेल???”
लोकं ते अचंबित होऊन पाहू लागली..प्रचंड कौतुक वाटलं लोकांना…इतका आत्मविश्वास? इतकी मेहनत? इतकी कळकळ? आणि इतकी हुशारी??
जी लोकं गणपतरावांना मतं देणार होती त्यांचंसुद्धा आता मतपरिवर्तन झालं होतं…
मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व काम पार पाडून सानिका आपल्या आईच्या कुशीत पहुडली..
“आई…मी योग्य करतेय ना?”
“हो पोरी…तू सत्याच्या मार्गावर चालली आहेस, विजय तुझाच असेल…आता झोप, उद्या भरपूर धावपळ होईल, लोकं भेटायला येतील, तुझा सत्कार होईल…”
सानिका हसते आणि निजायला जाते…
आपण आपलं शंभर टक्के दिलं आहे, आता बाकी देवाच्या हातात असं म्हणत समाधानाने ती झोपी गेली..
गणपतराव मात्र रात्रभर जागे राहिले, आतापर्यंत केलेली पापं त्यांना शांत झोप येऊ देत नव्हती…
मतदानाचा दिवस उजाडला…लोकं एका नव्या आशेने मतं द्यायला निघाली…85% मतदान झालं, आजवर इतकं झालं नव्हतं…
नंतरची दोन दिवस शांतता होती…निवडणूक उरकली गेली असली तरी गणपतरावांच्या मनात सानिकाबद्दल संताप धगधगत होता…
निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायची वेळ आली..
“…आणि…निवडणुकीच्या इतिहासातील धक्कादायक निकाल…नगरातील सानिका नामक तरुण उमेदवार 5 लाख मतांनी विजयी…3 वेळा विजयी असलेल्या गणपतरावांचा सपशेल पराभव….त्यांचं केवळ 20 मतांवर समाधान…”
निकाल लागण्या आधीच गणपतरावांना हॉस्पिटलमध्ये सलाईन लावली गेली होती, त्यांचा सकाळपासून bp वाढला होता..पराभवाच्या सावटाची बहुदा त्यांना कल्पना आली असावी…
“Tv लावा रे…केव्हाचा सांगतोय…ऐकत का नाही?”
“गणपतरावांना कुणीही निकाल सांगत नव्हतं..”
“साहेब आराम करा…तुम्हाला आरामाची गरज आहे..”
“डोंबल्याचा आराम, अरे आज निकाल आहे…tv लावा..”
अखेर एका नर्स ने tv चालू केला..
सगळं ऐकून..पाहून…वाचून गणपत रावांचे डोळे आगीने लालबुंद झाले…लावलेली सलाईन त्यांनी काढून फेकली आणि ते चालायला लागले…
घरी गेले…कार्यकर्त्यांना बोलावन्यात आलं..
“20 मतं?? खाऊची पेंड आहे काय?? माझ्या घरचे आणि चार नातेवाईक मिळून वीस जणं होतात…मग तुम्ही कुणाला मतं दिली??”
कार्यकर्ते काहीही बोलत नाहीत..
गणपतराव कुणा कुणाला धरणार..
त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटतो..ते संतापाने सैरभैर पळत सुटतात…
रस्त्याने सानिका च्या घरी जायला निघतात…जायच्या आधी भरपूर दारू ढोसतात… रस्त्याने जात असताना समोरून लोकांचा प्रचंड मोठा घोळका येत असतो…सानिका च्या विजयाचा जल्लोष करत…गणपतराव रस्त्याच्या कडेला थांबतात… मळलेले कपडे, विस्कटलेले केस…असल्या गाबाळ्या अवतारात गणपतरावांकडे कुणीही पाहत नाही…सानिका आणि तिचे कुटुंबीय लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत जात असतात…
गर्दी जवळ येते, सानिका चा जयघोष ऐकून गणपतराव गर्दीच्या मधोमध जातात…आणि स्वतःवरचं नियंत्रण सुटून धिंगाणा घालतात…दारूच्या नशेत झोकांड्या देत गणपतराव बरळतात..
“एय…. आवाज खाली….बोला गणपतरावांचा…विजय असो….मी जिंकलोय…”
“गणपतराव…. व्हा बाजूला…अहो 20 मतं पडलीये फक्त तुम्हाला…आजवरच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं पण आता घडलं…”
“सालं… पैसा वाटला मी…लोकांना धमकवल मी…आणि मतं हिला??? सालं दिली कुणी मतं हिला?? सांग तू दिलं?…की…ए… तू दिलंस…”
मागून एक पांगळा माणूस आपल्या कुबड्या सावरत पुढे येतो..
“मी दिलं मत….माझ्यासारख्या व्यक्तीला मदतीचा हात पुढे करणाऱ्याला…”
एक मुलगी येते पुढे..
“मी दिलं मत..भर चौकात अब्रूवर गदा येते तेव्हा धावून येणाऱ्याला…”
गर्दीत काही ओळखीची माणसं दिसू लागतात..
“हरामखोर बबन्या….तू??? आणि ए शिरप्या…आज्या…इथं काय करताय??”
“त्या दिवशी सानिका ला गोडाऊन मध्ये पाहिलं… आणि ती म्हणाली की माझ्या मुलीचं भविष्य तुमच्या सारख्या व्यक्तीच्या हातात देऊ नका… मला इथून सोडवू नका..त्यासाठी नाही बोलत ए मी… माझ्या विरोधात राहा…पण मुलीला शिकवा…सगळी मदत मी करेन….तेव्हा मी विचार केला…काय मिळालं मला तुमची हाजी हाजी करून? गुलामाचं जिणं? लाचारीचं वागणं आणि चव्हाट्यावर आणलेली इज्जत?? तिच्यात मला सानिका दिसू लागली..आणि मला समजलं..मुलगी शिकली तर सानिका सारखी तडफदार बनेल…मला कौतुक वाटू लागलं तिचं… आणि मी माझा मार्ग बदलला…”
“साल्या…मी तुला पैसे दिलेले लोकांना वाटायला…खाल्लेस ना?”
“नाही..ते सानिका कडे दिलेत..विकास कामांसाठी…”
“तुम्ही घरोघरी गेले नव्हते..?”
“गेलो होतो ना…सर्वांना सांगितलं..की मत फक्त सानिका लाच द्यायचं…”
अश्या प्रकारे सर्व कार्यकर्ते आणि जनता…सर्वांनी सानिकालाच कौल दिलेला…
गणपतरावांच्या डोक्यात अजून तिडीक जाते…ते तिथून संतापाने निघून जातात…आता तर काहीही उरलं नव्हतं.. सगळं संपलं होतं… मनाशी काहीतरी ठरवतात… कसेबसे रॉकेल आणि आगपेटी विकत घेतात आणि सानिका चं घर जाळायला निघतात…
सानिका च्या घरी कुणीही नव्हतं…गणपतराव घराच्या भिंतींवर… मागे..पुढे…जिथे जागा मिळेल तिथे रॉकेल ओततात आणि घर पेटवतात…कारण त्यांना आता राग काढायला दुसरं काहीही उरलेलं नसतं…
सानिका आणि कुटुंबीय घरी येतात..घर जाळून खाक…आई एकच हंबरडा फोडते…सानिका च्या मनात काहूर उठतं…. हे काम कुणाचं आहे हे तिला लक्षात येतं… ती आईला धीर देते..
गणपतरावांचा निकलावर अजूनही विश्वास नसतो…ते अर्ज करायचं ठरवतात…फेरनिवडणूक साठी…EVM मशीन तपासणी साठी…तसा पोलिसात फोन करतात…
2 माणसं गणपतरावांच्या घरी येतात…
“यावर सही करा..”
“काय आहे?”
“फेरनिवडणूक घेण्यासाठीचा अर्ज आहे…”
इंग्रजी मध्ये लिहिलेल्या अर्जावर गणपतराव सही करतात..
ती दोन माणसं हसतात..
“काय झालं दात काढायला??”
मागून सानिका येते..
“गणपतराव… काढा 1 कोटी रुपये..”
तिला पाहून गणपतराव चक्रावतात..
“कसले? आणि तू इथे?ही लोकं?? काय प्रकार आहे..?”
“हाच फायदा असतो शिक्षणाचा….तुम्हाला धड इंग्रजी वाचता आलं नाही म्हणून सह्या केल्या खुशाल..शिकले असते तर अर्ज वाचला असता..”
गणपतराव दोन पावलं मागे घेतात..
“क क काय कसला अर्ज ह होता हा..?”
“कबुलीजबाब..”
“कसला?”
“सानिका चं घर जाळण्यात माझा हात असून मी नुकसानभरपाई म्हणून 1 कोटी देण्याचं कबूल करतोय… इंग्रजीत होतं हे…वाचता आलं नाही तुम्हाला…”
पुन्हा एकदा सानिका ने प्रतीवार केला आणि गणपतराव आता आतून बाहेरून पूर्णपणे पराभूत झाले होते…त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली…
बाहेरून विजयाचे जयघोष ऐकू येत होते…घराघरात दिवाळी साजरी केली जात होती…
हा सानिका चा विजय नव्हता…हा विजय होता सत्याचा असत्यावर….धर्माचा अधर्मावर….ज्ञानाचा अज्ञानावर आणि चांगल्याचा वाईटावर….एका स्त्री च्या कर्तेपणावर जेव्हा बोट ठेवतो तेव्हा अवस्था गणपतरावांसारखी होते..
आजही त्या नगरात कुणा स्त्री चा अपमान होत असेल तर ती निधढ्या छातीने सांगते…
“अशी चूक करू नका…नाहीतर तुमचा गणपतराव व्हायला वेळ लागणार नाही…”
समाप्त
(कथा आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा, लिखाणाच्या मेहनतीचं चीज झाल्यासारखे वाटेल 😊 अश्याच कथा मालिकांसाठी नक्की लाईक करा खालील फेसबुक पेज)
https://www.facebook.com/irablogs/
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!