माहेरी जायला निघालेल्या तिची बस चुकली अन ती घरी परतली…
दुपारची वेळ होती, नवऱ्याने स्टॉपवर सोडलेलं, अर्धा तास होऊनही बस आली नव्हती,
तिने नवऱ्याला घरी पाठवलं होतं..
बस आली की मी जाईन म्हणत त्याला घरी पाठवलं,
लेकीचा हात धरून तिथेच बसून राहिली..
त्या बस ला काहीतरी अडचण आलेली आणि बस आलीच नव्हती..
घरी परतल्यावर नवरा झोपला असेल, उठवायला नको म्हणून किल्लीने दरवाजा उघडला..
तिच्या बेडमध्ये जाताच नवऱ्याला एका परस्त्री सोबत पाहिलं…
नको त्या अवस्थेत..
क्षणात सगळं बेचिराख झालं..
तिने लेकीला पटकन बाहेर पाठवलं..
तिचा नवरा, त्याची प्रेयसी आणि ती..
क्षणभर स्तब्ध…
काय बोलावं काही कळेना..
त्याची प्रेयसी… अपराधीपणाने बाहेर जायला निघाली..
पण तिने थांबवलं..
नवऱ्याला घाम फुटलेला..
आता ही काय करेल?
पोलिसांना बोलवेल?
आरडाओरडा करेल?
की माझा जीव घेईल?
नवरा अन प्रेयसी दोघेही घाबरलेले..
भाग 2
भाग 3
ह्यालाच म्हणतात निस्वार्थी प्रेम प्रेम करावे तर असे. गोष्ट छान आहे. आवडली👌💐
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!